माथेरानमध्ये स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन
– जेष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुकुंद रांजाणे (माथेरान)जेष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात एसटी महामंडळ बसेसची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी माथेरान मध्ये एम.एस.आर.टी.सी.( कर्जत ) आणि माथेरान जेष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन श्रीराम चौकातील गेम झोन याठिकाणी करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिकांनी या शिबिरास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. माथेरान शहरातील १८ वर्षावरील सर्व महिला,६५ वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिक, ७५ वर्षावरील सर्व जेष्ठ नागरीक या सर्वांकरिता महाराष्ट्र राज्यात सवलतीच्या दरात एसटी बसने प्रवास करताना स्मार्ट कार्डाचा वापर करता येणार आहे.हे कार्ड बनविण्यासाठी जेष्ठ नागरिकांना कर्जत आगारात जाणे शक्य नसल्याने कर्जत आगार प्रमुख महादेव पालवे यांच्या सहकार्याने आणि माथेरान जेष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन दि.१९ रोजी अक्षयतृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सकाळी १० ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करण्यात आले. जवळपास नव्वद जेष्ठ नागरिकांनी या शिबिरात आपला सहभाग नोंदवला.या शिबिराला विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी भेट देऊन जेष्ठ नागरिकांशी संवाद साधताना नगर परिषदेच्या माध्यमातून जे काही सहकार्य आवश्यक आहे ते निश्चितच केले जाईल असे सांगितले.यावेळी नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी कर्जतचे अक्षय म्हसे, गीता शहा यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. हा महत्वपूर्ण शिबिराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अब्दुल रहिमान शेख,उपाध्यक्ष अरविंद रांजाणे, सचिव अनंत शेलार, खजिनदार रजनी (बीना) कदम, सल्लागार चंद्रकांत जाधव, प्रकाश (अण्णा) सुतार,दत्ता सनगरे, वासंती जांभळे, कांचन केतकर, जयश्री रामाणे, सुहासिनी शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. 00000000
आयएसपीएल, एमपीटी, सीजीएसटीची विजयी सलामी
आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा महिलांच्या गटात श्रीराम, धर्मवीर, स्वस्तिक संघांचे विजय मुंबई, दि. १९ (क्री.प्र.)-कबड्डी संघ आणि कबड्डीपटूंना लाखमोलाचा पुरस्कार देणार्या क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांच्या संयोजनाखाली सुरु झालेल्या…
कुर्ल्यात फिटनेस आणि एकतेचा उत्साह
५वी मायकेलाइट मॅरेथॉन कुर्ला पश्चिम येथील सिईएस माइकल हाय स्कूल द्वारा आयोजित ५वी मायकेलाइट मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली. या उपक्रमाने कुर्ला परिसरातील नागरिकांना एकत्र आणत एकता आणि उत्साहाची भावना…
टीडब्ल्यूपीएल क्रिकेट स्पर्धेतून चांगले खेळाडू घडतील – अजिंक्य नाईक
ठाणे – टेनिस क्रिकेटमधून करिअर सुरु करणारे अनेक खेळाडू आज मुंबई संघासाठी आणि आयपीएलमध्ये खेळत आहेत. ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून आयोजित टीडब्ल्यूपीएल क्रिकेट स्पर्धा हे एक मोठे व्यासपिठ असून…
एमटीएनएल, ऍडव्हान्स, पटेल व अशोक कामत सेमीफायनलमध्ये
आरएसए टी-२० कप मुंबई : रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित आरएसए टी-२० कप २०२५-२६ स्पर्धेत एमटीएनएल, ऍडव्हान्स सी.सी., पटेल सी.सी. आणि अशोक कामत सी.सी. या संघांनी दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश…
दहिसर येथे शिवसेनप्रमुख जन्मशताब्दी कॅरम स्पर्धेचे यशस्वी आयोजन
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेना शाखा क्रमांक २, दहिसर वतीने कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख…
जान्हवी मोरे स्मृती चषक मुला-मुलींची कॅरम स्पर्धा २९ एप्रिलला
ठाणे : डोंबिवली येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळाच्या विद्यमाने येत्या २९ एप्रिल रोजी राष्ट्रीय कॅरमपटू स्व. जान्हवी मोरे स्मृती प्रित्यर्थ १६ वर्षाखालील मुला -मुलींच्या राज्य स्तरीय कॅरम स्पर्धेचे २९ एप्रिल रोजी आयोजन करण्यात…
स्वराज्य स्पोर्टस्, श्रीराम क्रीडा विश्वस्त संघ अजिंक्य
श्री मावळी मंडळ कबड्डी स्पर्धा याशिका पुजारी, तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. ठाणे :-महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या…
आरोग्य सुविधांचे लोकार्पण विकसित भारताच्या संकल्पात पालघरचा सहभाग अनिवार्य
– राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे प्रतिपादन पालघर : (अशोक गायकवाड )—भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करताना समाजातील अंतिम घटकाचा विकास करणे व त्या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. पालघरच्या सर्वांगीण विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी डहाणू येथे केले. मार्च २०२६ मध्ये राज्याच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यपालांचा हा पहिलाच पालघर जिल्हा दौरा असल्याने पालघरवासियांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. अक्षय्य तृतीया आणि भगवान श्री परशुराम जयंतीच्या शुभ मुहूर्तावर डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथे वनबंधू ट्रस्ट आणि भारत विकास संगम यांच्याद्वारे पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सेवांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारत विकास संगमचे संरक्षक संजय पटेल, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष आणि विश्वस्त लाडूलाल सोनी, योगायतन ग्रुपचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, ज्येष्ठ समाजसेवक सुशील सिंघानिया आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आपल्या भाषणाची सुरुवात ‘सर्वे भवन्तु निरामय:’ या मंत्राचा उल्लेख करीत त्यांनी केली व आरोग्य सुविधा केवळ शहरांपुरत्याच मर्यादित न राहता त्या दुर्गम भागात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे, हा आपला मुख्य संकल्प आहे. पालघर जिल्ह्यासारख्या आदिवासीबहुल क्षेत्रात रोजगार, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याची समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पालघरमध्ये एक ‘आदर्श गाव’ संकल्पना राबविण्यासाठी लोकभवन स्तरावर नियोजन सुरू असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. यासाठी लवकरच जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन एक सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणाही त्यांनी यावेळी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या भूमिकेचा संदर्भ देत, राज्यपाल म्हणाले की, विकासाच्या प्रक्रियेत ‘अंत्योदय’ म्हणजेच रांगेतील शेवटच्या माणसाला प्राधान्य देणे आमचे कर्तव्य आहे. वन बंधू ट्रस्टच्या माध्यमातून दुर्गम भागात फिरता दवाखाना, रुग्णवाहिका आणि डॉक्टर उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. चांगले इंजिनिअर, तंत्रज्ञ किंवा सनदी लेखापाल होणे ही चांगली गोष्ट आहे. पण त्यापेक्षा समाजात चांगला नागरिक म्हणून कार्य करणे ही त्याहून मोठी गोष्ट असल्याचे सांगून पीडितांची सेवा करणे हाच खरा स्वर्ग असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून दुर्गम भागातील पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी लोकभवनाचे दरवाजे सदैव उघडे राहतील आणि पालघरच्या विकासासाठी स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याची ग्वाही दिली. वन बंधू ट्रस्टचे अध्यक्ष लाडू लाल सोनी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी ट्रस्टच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या आरोग्य प्रकल्पांची माहिती देऊन आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी ट्रस्ट कटिबद्ध असल्याचे सांगितले. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रशासकीय आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून दुर्गम भागाचे चित्र कसे बदलता येईल, यावर प्रकाश टाकला. पालघरच्या जिल्हाधिकारी श्रीमती इंदुराणी जाखड यांनी आपल्या मनोगतात जिल्ह्यातील आरोग्य सद्यस्थिती आणि राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांविषयी माहिती दिली. तसेच, राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन अधिक वेगाने कार्य करेल, अशी ग्वाही दिली. 0000000000
