Category: होम

 टोलमाफी, माझी लाडकी बहीण,३ सिलेंडर वर्षभरात मोफत, बळीराजासाठी ७५० एचपीपेक्षा कमी मोटारपंप वीज माफी

सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे महायुतीच सत्तेत येणार – आनंद परांजपे अनिल ठाणेकर ठाणे : टोलमाफी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, माता-भगिनींसाठी ३ सिलेंडर वर्षभरात मोफत देण्याची योजना, माझ्या बळीराजासाठी ७५० एचपी पेक्षा कमी मोटारपंप वापरणाऱ्यांना वीज माफी आदी क्रांतीकारी व कल्याणकारी निर्णय महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी घेतले. यामुळेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे राज्यातील शीर्ष नेतृत्व व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुती पुन्हा एकदा सत्तेत येईल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. एका टप्प्यात होणार्‍या या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होईल. मला विश्वास आहे की महायुती पुन्हा एकदा बहुमताने सत्तेवर येईल. महायुती शासनाने, टोलमाफी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, माताभगिनिंना ३ सिलेंडर वर्षभरात मोफत देण्याची योजना, माझ्या बळीराजासाठी ७५० एचपी पेक्षा कमी मोटारपंप वापरणाऱ्यांना वीज माफी असेल. अश्या अनेक क्रांतीकारी व कल्याणकारी निर्णय महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी घेतले. यामुळेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजपचे राज्यातील शीर्ष नेतृत्व व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या तीनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुती पुन्हा एकदा सत्तेत येईल. ह्या विधानसभेचा कार्यकाल हा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत आहे. त्याच्या आत नवीन विधानसभा अस्तित्वात आली पाहिजे. २० नोव्हेंबरला मतदान आणि मतमोजणी २३ नोव्हेंबरला आहे आणि त्यामुळेच कार्यकाल संपायच्या आत विधानसभेची निवडणूक व निवडणूक निकाल दोन्ही पार पडत आहे. त्यामुळे कुठेही केंद्रीय निवडणूक आयोग २६ नोव्हेंबर नंतर निवडणूका घेत नाही. महाविकास आघाडी या निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांच्याकडे मुद्देच नाहीत. कुठल्या मुद्द्यांवर महायुतीविरोधात प्रचार करायचा हा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडलेला आहे. तरुण मतदारांना खासकरुन १८ ते २५ वयोगटातील मतदारांना व पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना आवाहन आहे की, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदानाचा जो पवित्र हक्क आपल्याला दिलेला आहे तो हक्क आपण निभावला पाहिजे. जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्रात मतदान कसे होईल यासाठी माझ्या तरुण मित्रांनी प्रयत्न करायला हवेत, असे अपील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहे.

 पांढरीच्या लाकडांची तस्करीप्रकरणी संबंधितांवर

 शहापूर वन विभागाने काय कारवाई केली ? – सागर जोंधळे ठाणे : पांढरीच्या लाकडांची तस्करी केल्याप्रकरणी शहापूर तालुक्यातील डोळखांब वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बोधनपाडा गावाशेजारील फार्महाऊसवर संबंधितांवर शहापूर विभागीय वन अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली ? असा प्रश्न डोंबिवली येथील स. है. जोंधळे विद्यासमुहाचे अध्यक्ष सागर शिवाजीराव जोंधळे यांनी माहितीच्या अधिकारात विचारला आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये पांढरीच्या लाकडांची तस्करी केल्याप्रकरणी वनविभाग शहापूर यांनी वअनिल देशमुख यांच्या डोळखांब वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बोधनपाडा गावाशेजारील फार्महाऊसवर कारवाई केलेली होती व वन विभागाकडून धाड टाकून पांढरीची लाकडे जप्त करण्यात आली. पुढे आपण संबंधित व्यक्तीवर काय कारवाई केली ? आणि कारवाई केली असल्यास त्याची पूर्ण माहिती मला मिळावी ? असे प्रश्न स. है. जोंधळे विद्यासमुहाचे अध्यक्ष सागर शिवाजीराव जोंधळे यांनी माहितीच्या अधिकारात विचारला आहे. सागर शिवाजीराव जोंधळे यांच्या या माहिती अधिकारातील प्रश्नाने शहापूर विभागीय वन अधिकाऱ्यांकडून उत्तरे देताना अनेक गुपीते बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. यामुळे सागर शिवाजीराव जोधळे यांच्या प्रश्नांना शहापूर विभागीय वन विभाग काय उत्तरे देतो याकडेच सर्वांचेच लक्ष लागले आहे. चौकट पांढरीचे लाकुड खुप दुर्मिळ अशी वनस्पती आहे. ही वनस्पती मुख्यत: कोकण भागातील जंगलामधेच आढळते. पांढरीच्या लाकडाचे मुख्य वैशिष्टे म्हणजे या वनस्पतिचे लाकुड पाण्यात तळाशी बुडते.

अर्चना देशमुख यांच्या श्री ब्रम्हगुलाब तालवाद्य क्लासेस संस्थेचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

ठाणे : श्री. ब्रम्हगुलाब तालवाद्य क्लासेस, ठाणे या संस्थेच्या प्रमुख अर्चना देशमुख यांनी आयोजित केलेल्या वार्षिक संमेलणाचा कार्यक्रम नुकताच द्वारका बँक्वेट हॉल येथे उत्साहात संपन्न झाला. दर्शना योगेश जानकर, डॉ. अरुंधती भालेराव, तेजश्री सावंत, चंद्रकांत चौधरी, चेतन कोळी, आनंदी खोत, पत्रकार अनिल ठाणेकर आदी विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवर उपस्थित होते. श्री ब्रह्म गुलाब क्लासेस यांचा स्नेहसंमेलन तसेच गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता  हा सांस्कृतिक कार्यक्रम अर्चना देशमुख यांच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण दाखवत स्वतंत्र तबला वादन, ढोलकी वादन तसेच गायन नृत्य यांच्या सादरीकरणाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रेक्षकांनी व पालकांनी भरभरून दाद दिली. याप्रसंगी मान्यवरांचे योग्य असे मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना लाभले गेल्या पंधरा वर्ष विद्यादानाचे कार्य श्री ब्रह्म गुलाब क्लासेस मार्फत अर्चना देशमुख या करीत आहेत ठाणे, मुलुंड येथे ऑनलाइन वर्ग अर्चना देशमुख या घेत असतात.

जनताच आता न्याय करणार, मशाल धगधगणार- आदित्य

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडीयावर प्रतिक्रीया व्यक्त करताना आता जनताच आता न्याय करणार असून मशाल धगधगणार असल्याचे म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी…

मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका

अहिल्यानगर :  ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास ब्रेनस्ट्रोकचा झटका बसला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नाशिकच्या नाईन पल्स रूग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास राजूर…

आमदारांच्या नियुक्तीला कोर्टात आव्हान देणार : अनिल देशमुख

नागपूर : राज्यपाल नियुक्त ७ आमदारांच्या शपथविधीला कोर्टात आव्हान देणार असल्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी जाहीर केले. राज्यपाल हे भाजप कार्यकर्त्यासारखे काम करत असल्याची टीकाही…

महायुतीचा कार्यक्रमही आता एकाच टप्प्यात – जयंत पाटील

मुंबई :  ‘एकाच टप्प्यात निवडणूक, आता एकाच टप्प्यात कार्यक्रम’ अशी सूचक प्रतिक्रिया जयंत पाटलांनी महाराष्ट विधानसभेचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर दिली. जयंत पाटील म्हणाले की, राज्यातील निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार असून मतदारही महायुतीचा…

जरांगेचा फडणवीसांविरोधात फतवा

लोकसभेपेक्षा जास्त ताकद लावा, विधानसभेला फडणवीसांची जिरवा मुंबई : आचारसंहिता लागायच्या आधी मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी आशा होती, पण देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचा कार्यक्रम केला. आता विधानसभेत त्यांची जिरवायचीच, लोकसभेपेक्षा जास्त ताकद दाखवा असा देवेंद्र फडणवीसांविरोधात…

राज्यपाल नियुक्त ७ आमदारांत चित्रा वाघ, पंकज भुजबळांची वर्णी

 आचारसंहीतेपुर्वी घाईघाईत शपथवीधी स्वाती घोसाळकर   मुंबई : विरोधकांचा टोकाचा विरोध, न्यायालयात सुरु असलेला खटला या सगळ्याला बाजूला करीत महायुतीने आज राज्यपाल नियुक्त १२ पैकी ७ जागांवर आपल्या नेत्यांना शपथ दिली. यात…