Category: होम

ठाण्यात आजपासून प्रचाराची रणधुमाळीला सुरूवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव अर्ज भरणार अर्ज भरण्यासाठी शरद पवार आणि राज ठाकरे हे उपस्थित राहणार   ठाणे : आजचा गुरुपुष्यामृत योग साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड, मनसे नेते अविनाश जाधव हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हे अर्ज दाखल करण्यापुर्वी तिन्ही पक्षांकडून शहरात मिरवणुका काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. आव्हाड यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे तर, अविनाश जाधव यांचा अर्ज भरण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. यामुळे गुरूवारपासून ठाण्यातील मतदार संघांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार असल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी-पाचपखाडी मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुक लढविणार असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून तुल्यबळ उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. या जागेची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केली होती. परंतु शिवसेना (ठाकरे गट) या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार आणि उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असतानाच गुरुवार, २४ ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला सुरूवात करणार आहेत. अर्ज भरण्यापुर्वी त्यांच्याकडून मिरवणुक काढली जाणार असून त्यात ते शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे समजते. कल्याण ग्रामीणमधील मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटनासाठी सोमवारी मनसे प्रमुख राज ठाकरे हे कल्याण ग्रामीण भागात आले होते. त्यावेळी त्यांनी कल्याण ग्रामीणमधून प्रमोद पाटील यांची तर, ठाणे शहरातून अविनाश जाधव यांची उमेदवारी घोषित केली. अविनाश जाधव हे सुद्धा गुरुवार, २४ ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग साधत उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जाधव यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राज ठाकरे हे ठाण्यात येणार आहेत. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड हे चौथ्यांदा निवडणुक लढविणार आहेत. ते सुद्धा गुरुवार, २४ ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग साधत उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आव्हाड हे मुंब्रा भागात मिरवणुक काढून शक्ती प्रर्दशन करणार आहेत. ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेले भाजपचे आमदार संजय केळकर हे वसुबारसचा मुहूर्त साधत सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पुर्वी ते मिरवणुक काढून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. असे असले तरी त्यांनी मंगळवारी दमाणी इस्टेटमधील दत्त मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात केली आहे. भाजपा घर चलो अभियानांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला असून यामध्ये ४०० बुथवरील पदाधिकारी घरोघरी जाऊन केळकर यांची माहिती पत्रकांचे वाटप करणार आहेत. गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी चंद्र संपूर्ण दिवस-रात्र पुष्य नक्षत्रात रहाणार असल्याने दुर्मिळ असा ‘ गुरुपुष्यामृत योग ‘ आला आहे. या दिवशी सकाळी सूर्योदयापासून ( सकाळी ६.३७ ) दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत ( शुक्रवारी सकाळी ६.३७ ) हा योग आहे. गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. तसेच चांगल्या कामांचा प्रारंभ या दिवशी करण्याची प्रथा आहे, असे पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यानी सांगितले.

निवडणुक निर्भय, भयमुक्त, पारदर्शक पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे-राजेश कुमार

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ७ मतदार संघामध्ये निवडणुक निर्भय, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे व सदैव दक्ष राहून पार पाडावी, असे निर्देश पनवेल, पेण, कर्जत, उरण मतदारसंघ निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कुमार यांनी दिले. भारत निवडणूक आयोगाने रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघासाठी दोन निवडणूक खर्च निरीक्षक नियुक्त केले आहेत. पनवेल, पेण, कर्जत, उरण मतदारसंघासाठी भारतीय महसूल सेवेतील २००५ च्या तुकडीचे अधिकारी राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड मतदार संघांसाठी भारतीय महसूल सेवेतील २०१५ च्या तुकडीच्या अधिकारी ज्योती मीना यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे मंगळवारी,(दि.२२ ऑक्टोंबर २०२४) रोजी रायगड येथे आगमन झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात (दि. २२) रोजी या दोन्ही खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व कार्यान्वयीन यंत्रणाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक्षक रविकिरण कोले, खर्च तपासणी विभागाचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. यावेळी राजेश कुमार यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान बँकांमध्ये होणारे दैनंदिन व्यवहार, संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष द्यावे. तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय अतिसंवेदनशील भागाविषयी माहिती जाणून घेतली व अशा भागात विशेष उपाययोजना राबविण्याबाबत उत्पादन शुल्क विभाग, आयकर अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सुचना दिल्या. तसेच निवडणूक खर्च व्यवस्थापन वेळीच व योग्य प्रकारे करण्याच्या सुचना दिल्या. इलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसिध्द होणा-या जाहिरातींकडे लक्ष देण्याबाबत जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या नोडल अधिका-यांना निर्देश दिले. निवडणूक खर्च निरीक्षकांनी सर्व सहायक निवडणूक अधिकारी व नोडल अधिका-यांकडून निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. निवडणूक काळात प्रलोभन दाखविण्यासाठी साड्या, मद्य, वस्तू, पैसे यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सजग राहून अशा बाबींना तत्काळ निर्बंध घालावा व संबंधितांवर कारवाई करावी. उमेदवाराकडून प्रचारासाठी केल्या जाणा-या प्रत्येक खर्चाची काटेकोरपणे नोंद घ्यावी. निवडणूक आयोगाच्या निर्देश व सूचनांचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असेही निर्देश खर्च निरीक्षक राजेश कुमार यांनी दिले.निवडणूक खर्च निरीक्षक ज्योती मीना यांनी सहकारी बँका मार्फत होणारे व्यवहार तसेच राष्ट्रीयकृत बँका मार्फत होणारे व्यवहार यावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश दिले. पेड न्युज वर देखील विशेष लक्ष ठेवावे असेही सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार प्रत्येक यंत्रणेनी कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या.यावेळी सर्व कार्यान्वयीन यंत्रणानी केलेल्या कार्यवाहीचा आढावा सादर केला.यावेळी खर्च निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि आढावा घेतला.

ठाणे, पालघरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ‘जिजाऊ’ संघटना

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघामधून अपक्ष निवडणूक लढवून दोन लाखाहून अधिक मते घेत सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का देणारे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह…

खाजगी बसेसमधून प्रवाशाकडून जादा भाडेदर आकारल्यास तक्रार करा – महेश देवकाते

अशोक गायकवाड रायगड: खाजगी बसेसमधून प्रवाशाकडून जादा भाडेदर आकारल्यास नागरिकांनी योग्य तक्रारी कळवाव्यात असे आवाहन, पेण जि. रायगडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी केले आहे. १ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणानिमित्त प्रवासी मोठ्या प्रमाणात गावी येत व जात असतात. त्यादरम्यान प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारल्याबद्दल वारंवार तक्रारी प्राप्त होत असतात. यास्तव खाजगी वाहतूकदारांकडून प्रवाश्यांकडून जादा भाडे – आकारण्यात येणाच्या प्रवृतीला आळा घालण्यासाठी व रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून २१.१०.२०२४ ते ९.११.२०२४ या कालावधीत खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी जादा भाडेदर आकारलेबाबतची तक्रार नोंदविण्याकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय हेल्पलाईन क्रमांक:- २५२२३४-०२१४३ व कार्यालय ई-मेल आयडी:- dyrto.06-mh@gov.in येथे संपर्क साधावा. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयाच्या कार्याक्षेत्रातील खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणापासूनचे कि.मी. प्रमाणे खाजगी, बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भाडे बाबतचा विहित नमुन्यात तक्ता तयार करुन व त्यप्रमाणे येणारा प्रती आसन दर दर्शवून सदर खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच प्रवाश्यांच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. ५० प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय. पेण कार्यालयाच्या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी योग्य तक्रारी कळवाव्यात असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण जि. रायगड यांनी केले आहे.

‘माझी टीएमटी’ मोबाईल ॲप ची केवळ घोषणा

ठाणे : परिवहन सेवेतील प्रवाशांचा सुट्ट्या पैशाचा त्रास वाचावा यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाने नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण केलेले माझी टीएमटी हे ॲप केवळ घोषणाच आहे का…

 १५ वर्षांत न फुटलेले नारळ १५ दिवसांत फुटले,

 सुभाष पवार यांचा किसन कथोरेंवर हल्लाबोल   बदलापूर : मुरबाड तालुक्यात १५ वर्षांत फुटले नव्हते, तेवढे नारळ गेल्या १५ दिवसांत मुरबाडमध्ये फुटले, असा टोला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व महाविकास आघाडीचे मुरबाड मतदारसंघातील नियोजित उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांनी आमदार किसन कथोरे यांना लगावला. सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केल्यानंतर माध्यमांश संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कथोरे यांच्यावर विविध विषयांवर टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केल्यानंतर सुभाष पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. विद्यमान आमदार किसन कथोरे यांना भाजपातून उमेदवारी जाहिर झाल्यानंतर सुभाष पवार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला होता. त्याचवेळी पवार कथोरे यांच्याविरूद्ध मुरबाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले होते. प्रवेश होताच पवार यांनी कथोरे यांच्यावर विविध विषयांवर टीकास्त्र सोडले. खड्डे संपल्यानंतर मुरबाड मतदारसंघ लागतो, असे म्हणणाऱ्यांच्या कारकिर्दीतच मुरबाड मतदारसंघ खड्ड्यात गेला आहे, अशी टीकाही सुभाष पवार यांनी यावेळी बोलताना केली. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा आणि बदलापूर शहराचा विकास याच मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले. गेल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा अपेक्षित विकास झालेला नाही. मुरबाड शहरातील एमआयडीसीतील अनेक उद्योग निघून गेले. त्यामुळे मुरबाडमध्ये तरुणांना रोजगारात वाढ झालेली नाही, ही वस्तूस्थिती आहे, याकडे सुभाष पवार यांनी लक्ष वेधले. एकनाथ शिंदेंबद्दल आदर पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आजही आदर आहे. त्यांच्या सहकार्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक कामे पूर्ण करता आली, असे सुभाष पवार यांनी नमूद केले. मात्र यंदाची विधानसभा निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यामुळे मला शिवसेनेबाहेर पडावे लागले, असेही सुभाष पवार म्हणाले. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भातपिकासह विविध पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली.

मिहीर कोटेचा मुलुंड विधानसभेसाठी आज उमेदवारी दाखल करणार

मुंबई : मुलुंडचे आमदार आणि भाजप आणि महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा हे उद्या, गुरुवारी, २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योगच्या दिवशी मुलुंड विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी जंगी…

कॉंग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांच्या हाती ‘घड्याळ’…

मुंबई : अमरावती शहरातील कॉँग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.…

 ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा आयुक्त सौरभ राव यांना इशारा

अनधिकृत बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास न्यायालयात जाणार!   अनिल ठाणेकर ठाणे : अनधिकृत बांधकामांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कुठलीही ठोस कारवाई न करता प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवून चौकशीचा फार्स केल्याने या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात यावी अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असा इशारा महापालिका आयुक्त सौरभ राव यांना ठाणे शहर (जि.) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे. ठाणे महापालिका हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना महापालिकेचे संबंधित अधिकारी अभय देत नागरी सुविधा पुरवत असल्याने शहरातील नागरी सुविधांवर ताण वाढत असल्याने अनेक सामाजिक संघटनांसह नगरसेवकांनी आवाज उठवला होता. मुंब्रा परिसरातील लकी कंपाऊंड,वागळे येथील साईराज इमारत कोसळून अनेक जणांचे प्राण गेल्याच्या भीषण घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अशा अनधिकृत बांधकामांना कायमचा पायबंद घालण्यासाठी व  त्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्याकरता मा.ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण व माजी नगरसेवक नारायण पवार यांनी महासभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती.या लक्षवेधी सुचनेवर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर सभागृहाने सर्वानुमते ६ सप्टेंबर २०२१ रोजी अनधिकृत बांधकामांच्या चौकशीचा ठराव पारित केला होता.त्या ठरावाच्या व २००९ च्या नगरविकास शासन निर्णयास अनुसरून तत्कालीन आयुक्त विपिन शर्मा यांनी १६ ऑगस्ट २०२१ रोजी सर्व सहाय्यक आयुक्तांच्या चौकशीच्या दिलेल्या आदेशानुसार ठा.म.पा सेवेतील  सहाय्यक आयुक्तांच्या चौकशी ह्या चौकशी अधिकारी नेमुण करण्यात आल्या व प्रतिनियुक्ती वर आलेल्या सहाय्यक आयुक्तांची शासनाने चौकशी केली होती. बारा पैकी अकरा सहाय्यक आयुक्तांना चौकशी अधिकाऱ्याने दोषारोपातून मुक्त केले आहे आणि एका सहाय्यक आयुक्ताची चौकशी प्रलंबित आहे. या प्रकरणी ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाणे काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे,हिंदुराव गळवे यांच्यासह पत्रकार परिषद घेत अनधिकृत बांधकाम करणारे ठा.म.पा सेवेतील व प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी जर निर्दोष असतील तर अनधिकृत बांधकामे करणारे व त्यास जबाबदार असणारे कोण..? तसेच या प्रकरणी कुठलीही ठोस कार्यवाही न झाल्याने सहाय्यक आयुक्तांची चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना कोणाच्या दबावाखाली क्लीन चिट देण्यात आली.तसेच आयुक्तांनी हा बोगस चौकशी अहवाल स्वीकारू नये व या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्यात यावी अशी मागणी  ठाणे शहर (जि.) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे केली आहे.