Category: होम

एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर

अनिल ठाणेकर मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून आज रात्री उशीरा ४५ उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे. पक्षातील विद्यमान जवळपास सर्वच आमदारांना पुन्हा विधानसभेची तिकीट जाहीर करण्यात आली आहे. जेथे विद्यमान आमदार खासदारकीची…

ऑलेक्ट्राचा सहामाही आर्थिक अहवाल सकारात्मक

मुंबई : प्रवाशांना प्रदुषण विरहीत गारेगार प्रवासाची संधी एसटी आणि बेस्टच्या इलेक्ट्रिक बस देत आहेत. दिवाळीच्या दरम्यान या पुरवठ्यात वाढही झाल्याचे नुकतेच महामंडळाने सांगीतले. एसटी आणि बेस्टला इलेक्ट्रिक बस पुरवण्यता आघाडीवर असणारी  इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL) ने  दुसऱ्या तिमाही आणि पहिल्या सहामाहीचा  एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केला. संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत या उल्लेखनीय बाबींना अधिकृतपणे मान्यता दिली.  या  तिमाहीत, ऑलेक्ट्रा ने 315 इलेक्ट्रिक वाहने वितरित केली, 23-24 या आर्थिक वर्षातील 154 च्या तुलनेत यात  105 टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीकडे एकूण 10,503  बस ऑर्डर्स आता पर्यत नोंदवण्यात आल्या आहेत. 0000  

सेनादलाच्या विर मराठा रेजिमेंटच्या कबड्डी संघ चांगली कामगिरी करणार – लक्ष्मण गांवड

अशोक गायकवाड अलिबाग : सेनादलाच्या विर मराठा रेजिमेंटच्या कबड्डी सराव शिबिर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पिपंळपाडा येथे घेण्यात आले. न्युयंग संघ पिपळपाडा यांच्या क्रिडांगणावर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी बिकानेर येथे होणाऱ्या सेनादलाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये हा संघ चांगली कामगिरी करुन अंतिम विजेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आसल्याचे वीरमराठा रेजिमेंटचे प्रशिक्षक लक्ष्मण गांवड यांनी सांगितले.* या शिबीराच्या सांगता समारंभाप्रसंगी न्यूयंग संघ पिपळपाडा संघाने सेना दलाच्या संघाचा सत्कार केला या वेळी जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी पेण तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हरिचंद्र शिंदे, कराटे, किकबॉक्सिंगचे आंतराष्ट्रीय खेळांडु किकबॉक्सिंग पंच प्रविण पाटील, सेनादल संघाचे प्रशिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक तथा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य लक्ष्मण गावंड, न्यू यंग संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता पाटील, न्यू यंग संघाचे अध्यक्ष विकास पाटील,खजिनदार सुनिल पाटील, उपाध्यक्ष गजानन पाटील सरचिटणीस हरिश्चंद्र पाटील, कासु ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुनंदा गांवड,राष्ट्रीय कबड्डी पंच हिरामण भोईर, योगेश पाटील, योगेश टेमकर , धावपटू गजानन भोईर, महेंद्र पाटील, आकाश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. रायगड ही कबड्डीची पंढरी मानली जाते रायगड जिल्ह्याने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळांडू दिले तर राष्ट्रीय प्रशिक्षक दिले रायगडच्या कबड्डीचे आकर्षण सगळ्यानाच असते अनेक राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रायगड जिल्ह्यात केले जाते. सेनादलाच्या विर मराठा रेजिमेंट, बीकानेर-राजस्थान या संघाचा सराव शिबिरासाठी सेना दलाने देखील रायगगड जिल्ह्याची निवड केली. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पिपंळपाडा येथे सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर न्यूयंगसंघ पिपंळपाडा संघाचा कबड्डी खेळांडू सध्या सेनादलात कार्यरत असलेला प्रदिप भगत यांनी वीरमराठा रेजिमेंट संघाचे सराव शिबिर घेण्याचे ठरविले येथील क्रिडांमंडळाच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी या खेळांडूना क्रिडांगण उपलब्ध करुन दिले. तर खेळांडुच्या राहाण्याची व सर्व व्यवस्था केली. या संघाला प्रशिक्षण देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रशिक्षक लक्ष्मण गांवड यांची निवड करण्यात आली. लक्ष्मण गांवड हे अनुभवी प्रशिक्षक असल्याने त्यांनी या संघाला उत्तम प्रकारे प्रशिक्षण देण्याचे काम केले बिकानेर येथे होणाऱ्या सेनादलाच्या कबड्डी स्पर्धेमधे हा संघ सहभागी होणार असून या संघासोबत लक्ष्मण गांवड प्रशिक्षक तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून न्यू यंग संघाचे तथा पोलीस दलातील नंदकुमार पाटील हे असणार आहेत. या गोदर लक्ष्मण गांवड यांनी 2010 ला फिरोजपुर पंजाब येथे या संघाला प्रशिक्षण दिले आहे त्यावेळी लक्ष्मण गांवड यांना सेनादलाने आर्मी कॅप देवून सन्मानित केले होते.सेनादलाच्या वीरमराठा रेजिमेंटच्या संघाला दोन वेळा प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. या संघामधे चांगले खेळाडू आहेत खेळांडूनी चांगली मेहनत घेतलीच आहे तर न्युयंग संघ पिपळपाडा संघाने या सराव शिबिरासाठी चांगले सहकार्य केले आहे. यावर्षी बिकानेर येथे होणाऱ्या सेनादलाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये हा संघ चांगली कामगिरी करुन अंतिम विजेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आसल्याचे वीरमराठा रेजिमेंटचे प्रशिक्षक लक्ष्मण गांवड यांनी सांगितले.आम्ही जे सुखाने जगतो ते तुमच्या मुले सेनादलाने येथे कबड्डीचा सराव शिबिराचे आयोजन आमच्या पिपंळपाडा गावात केले हे आमचे भाग्य आसल्याचे न्युयंगसंघ पिपंळपाडा संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता पाटील. यांनी या वेळी सांगितले.या सराव शिबीरास न्यू यंग संघाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी ऊत्तम सहकार्य केले. तसेच संघाचे खेळाडू नंदकुमार पाटील, दुर्वास पाटील, गजानन पाटील, विजय भगत सतिष पाटील तसेच अन्य वरिष्ठ खेळाडुंनी शिबीरात ऊत्तम मार्गदर्शन केले.या प्रशिक्षण शिबीरास सर्वश्री विकास पाटील, चंद्रकांत पाटील, विश्वनाथ पाटील, सुनिल पाटील, संदेश पाटील, देवेंद्र भोईर , दत्तात्रेय पाटील, हिरामण भोईर, लिलाधर म्हात्रे, प्रविण पाटील, जयेश पाटील या सर्वांनी आर्थिक व अन्य स्वरुपात मदत केली.

मुंब्र्यातून नजीब मुल्ला आव्हांडविरोधात लढणार

मुंबई :  ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार जिंतेंद्र आव्हाडांविरुद्धचा महायुतीचा उमेदवार निश्चित झाला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघासाठी नजीब मुल्ला यांना तिकीट दिलं आहे. उमेदवार नजीब मुल्ला यांनी अजित…

दीपक फर्टिलायझर्स प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वततेसाठी कटिबद्ध – मुकुल अग्रवाल

अशोक गायकवाड   पनवेल:अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रणात दीपक फर्टिलायझर्स आघाडीवर असून दीपक फर्टिलायझर्समध्ये आम्ही प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वततेसाठी कटिबद्ध आहोत, अशी माहिती दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग विभागाचे अध्यक्ष मुकुल अग्रवाल यांनी दिली. दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून प्रगत पर्यावरणीय तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषण कमी करण्यासाठी सक्रिय पावले उचलले जातात. त्यानुसार प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी उपकरणे निवडण्यासाठी त्या प्रक्रियेचे काळजी पूर्वक विश्लेषण केले जाते, त्या अनुषंगाने सध्याच्या आणि भविष्यातील नियमांची पूर्तता करण्यासाठी कंपनीने आपल्या सुविधांमध्ये आधुनिक वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली कार्यान्वित केली आहे.तळोजा प्रकल्पात दीपक फर्टिलायझर्सने स्पेनच्या इन्क्रोएसए कंपनीच्या सहयोगाने एनपीके खते तयार करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला. या नवीन प्रणालीमुळे उत्पादनात वापरले जाणारे जवळजवळ सर्व अमोनिया पकडण्यास मदत होते, ज्यामुळे ते हवेत सोडण्यापासून रोखले जाते. याचा परिणाम असा होतो की अमोनियाचे उत्सर्जन खूप कमी ठेवले जाते आणि ते भारतीय मानकांपेक्षा तीनपट कमी आहे. या प्रणालीमुळे दरवर्षी ५०० टन अमोनियाची बचत होत असून कोणताही हानिकारक द्रव कचरा तयार होत नाही, त्यामुळे प्रक्रिया अधिक स्वच्छ होते. जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून इन्क्रोने मान्यता दिलेले हे तंत्रज्ञान पर्यावरणाचे रक्षण आणि वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. या संदर्भात मॅन्युफॅक्चरिंगचे विभागाचे अध्यक्ष मुकुल अग्रवाल म्हणाले कि,“दीपक फर्टिलायझर्समध्ये आम्ही प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वततेसाठी कटिबद्ध आहोत. तळोजा प्रकल्पातील आमची उत्सर्जन कमी करणारी प्रणाली पर्यावरणीय प्रभाव लक्षणीयरित्या कमी करते, अमोनिया उत्सर्जन नियामक मर्यादेपेक्षा खूप कमी आहे आणि जवळजवळ संपूर्ण अमोनियाची पुनर्प्राप्ती होते. इनक्रोएसएच्या सहकार्याने, आम्ही हवेची गुणवत्ता आणि संसाधन संवर्धनासाठी नवीन उद्योग बेंचमार्क स्थापित केले आहेत. एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून, आम्ही हरित, अधिक शाश्वत भविष्यासाठी आमच्या ऑपरेशन्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानात गुंतवणूक करत आहोत”. दीपक फर्टिलायझर्सने अलीकडेच तळोजा येथील अमोनिया प्रकल्पात या योजनेची सुरुवात केली आहे, ज्याचे व्यवस्थापन परफॉर्मन्स केमिसर्व्ह लिमिटेड या उपकंपनीद्वारे केले जाते. या प्रकल्पातून दररोज १५०० टन अमोनियाचे उत्पादन होऊ शकते. पर्यावरण रक्षणासाठी दीपक फर्टिलायझर्सने प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. त्यांनी हानिकारक नायट्रोजन ऑक्साईड उत्सर्जन 80% पेक्षा जास्त कमी करणारे विशेष बर्नर आणि प्रगत तंत्रज्ञान स्थापित केले आहे. यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते आणि प्रकल्प पर्यावरणपूरक बनतो.तसेच विसर्गापूर्वी वायू प्रदूषकांच्या सांद्रतेचा मागोवा घेण्यासाठी प्रगत ऑनलाइन निरंतर उत्सर्जन देखरेख प्रणाली स्थापित केले आहे. पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि जलद कारवाई सक्षम करण्यासाठी डेटावर २४/७ लक्ष ठेवले जाते आणि केंद्र आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाईटवर अपलोड केले जाते.

शिंदेसेनेचे माजी नगरसेवक हाजी बब्बू खान यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश मुंबई : काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक हाजी बब्बू खान यांनी आज मुंबई काँग्रेस अधयक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी वर्षा गायकवाड यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा सरकार अदानीसाठी काम करत असून धारावीकरांना बाहेर हाकलण्याचे षडयंत्र सुरु आहे. धारावीच्या लोकांना मुलुंड, देवनार, कुर्ला, मालवणी आक्सा, मिठागरांच्या जागेवर विस्थापीत केले जात आहे. पण धारावीसाठी आपली लढाई अदानीच्या विरोधात सुरु आहे. विधानसभेच्या निवडणुकीत धारावीतून सर्वात जास्त मताधिक्क्याने आपला उमेदवार विजयी करायचा आहे. विधानसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी महत्वाची आहे. धारावीसाठी, मुंबईसाठी व महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मविआचे सरकार आणायचे आहे, त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले. हाजी बब्बू खान म्हणाले की, काँग्रेस पक्षच सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. काहीवेळेसाठी काँग्रेसमधून बाहेल गेले होते पण मनातून काँग्रेस कधीही गेली नाही. माझे व या सर्व   लोकांचे धारावीवर प्रेम आहे, सर्व लोक स्वतः उमेदवार समजून काम करतात. काँग्रेस पक्ष व खासदार वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभे राहू. या पक्षप्रवेशावेळी माजी मंत्री अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, विरेंद्र चौधरी, कचरू यादव, इब्राहिम भाईजान आदी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा

एसएसटी महाविद्यालयाचा दुहेरी विजय उल्हासनगर : क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद,ठाणे आणि उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये एसएसटी महाविद्यालयाने आपला दबदबा सिद्ध करत दुहेरी मुकुट मिळवला आहे. स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या गटात एसएसटी महाविद्यालयाच्या संघाने अप्रतिम खेळ दाखवत प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे, १९ वर्षाखालील मुलींच्या गटातही उत्कृष्ट प्रदर्शन करत एसएसटी महाविद्यालयाच्या मुलींनी प्रथम क्रमांकावर आपली मोहर उमटवली. या दुहेरी विजयामुळे एसएसटी महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत असून, महाविद्यालयाचे प्रशिक्षक आणि खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच या विजयाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ.पुरस्वानी,आयक्यूएसी समन्वय डॉ.खुशबू पुरस्वानी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले असून त्यांना विभागीय स्पर्धांसाठी शुभेच्छा ही दिल्या.

 तोपर्यंत नैना प्रकल्पाची वीट देखील ठेऊ देणार नाही

आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही पनवेल : जो पर्यंत सर्वांच्या शंकांचे निरासन होत नाही तो पर्यंत नैना प्रकल्पाची वीट देखील ठेऊ देणार नाही याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिपळे येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटनावेळी दिली. तसेच भाजपची भूमिका सर्व सामान्य जनतेमध्ये पोहचवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा निवडून देण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. पनवेल विधानसभा मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे. या पार्श्ववभूमीवर तालुक्यातील चिपळे गावात भारतीय जनता पार्टीचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. याचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून अनेकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी जनसामान्यांमध्ये मिळून काम करणारी पार्टी आहे. आज सुरु झालेल्या या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मला खात्री आहे निवडणुकी नंतर देखील संपूर्ण परिसरातील लोकांना सेवा देणारे हे केंद्र बनणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून उभाटा गटाचे भोकरपाडा गावातील शाखा प्रमुख गजानन फुलोरे, अनिकेत फुलोरे, अभिजित फुलोरे तसेच विहिघर मधील रहिवासी तथा वीरार येथील उभाटा गटाचे शाखाप्रमुख विश्वनाथ कांबळे यांनी भाजपमध्ये सामील होत पक्षाची ताकद अधिक मजबूत केली. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत करून त्यांचा निर्णय सार्थ ठरेल असे काम भाजपच्या माध्यमातून होईल असा विश्वास त्यांना दिला. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अमित जाधव, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच अनंत ढवळे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, हनुमान फुलोरे, अशोक फुलोरे, रुपेश फुलोरे, गिरीश फुलोरे, बूथ अध्यक्ष भास्कर फुलोरे, कल्पेश फुलोरे, किशोर फुलोरे, गणेश फुलोरे, राजेश फुलोरे, हरिदास फुलोरे, गणेश फुलोरे, धीरज फुलोरे, अमोल फुलोरे, लहू फुलोरे, रमेश फुलोरे, दत्ता फुलोरे, माजी सरपंच रमेश पाटील, माजी सदस्य गणेश म्हसकर, माजी उपसरपंच धनंजय पाटील, रोशन पाटील, महेश शाह, नागेश म्हसकर, ह.भ.प. धनाजी परशुराम म्हसकर, आकाश पाटील, कुलदीप पाडवी, विवेक पांडेय, रोहित पाटील, चंद्रकांत राणे, अनुराग पांड्या, सुनील फडके, समाधान फडके, रुपेश फडके, कान्हा फडके, अनंता फडके, मंगेश फडके, दीपक फडके, समीर पाटील, दुशांत पवार, सुनील पाटील, भरत पाटील, नामदेव पाटील, साईनाथ पाटील, दिनकर पाटील, सागर पाटील, संदेश फडके, भावेश फडके, अभिनय पाटील, नितीन पाटील, अक्षय पाटील, स्वप्नील फडके, समीर पाटील, विजय पाटील, विशाल पाटील, तुकाराम पाटील, तन्मय पाटील, सुभाष पाटील, शरद म्हस्कर, सचीन पाटील, प्रतिप पाटील, प्रतीक फडके, प्रनिल फडके, प्रसाद पाटील, निलेश पाटील, नारायण पाटील, महेंद्र पाटील, किरण पाटील, सैरभ पाटील, योगेश पाटील, दिनकर पाटील, धीरज म्हात्रे, अविनाश म्हात्रे, संजय पाटील, रोहीत पाटील, विठ्ठल पाटील हौशिराम फडके, हरीश्चंद्र पाटील, हरीष पाटील, अजीत म्हात्रे, विष्णू पाटील, रवी पाटील, नरेश पाटील, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 000

मुंबईकरांनो सावधान ! पाणी गाळून, उकळून प्या

मुंबई : राजधानी मुंबईसह उपनगरातील अनेक भागांत गेल्या ४ दिवसांपासून पावासाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या परतीच्या पावसामुळे धरणक्षेत्र भागातील नद्यांमधून पावसाचे पाणी जलशयात जात आहे. येथील भातसा जलाशयाच्‍या पाणलोट क्षेत्रात मागील ३…

विधानसभेसाठी लोकराज्य पार्टीच्या  16 उमेदवारांची पहिली यादी जाहिर

ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी लोकराज्य पार्टीची 16 उमेदवारांची पहिली यादी आज ठाण्यातील पत्रकार परिषदेत जाहिर करण्यात आली. लोकराज्य  पार्टीचे महासचिव अॅड. किशोर दिवेकर यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. नरेंद्र पाटील – 172 अणुशक्ती नगर, मुंबई; निल शिवडीकर – 183 शिवडी, मुंबई; कमलेश पोखरे – 173 चेंबूर, मुंबई; संजीवनी वैती. – 155 मुलुंड, मुंबई; बाबुकुमार कांबळे – 147 कोपरी पंचपाखाडी; सुनील विश्वकर्मा – 146 ओवळा माजिवडा; जालिंदर सिनलकर – 148 ठाणे शहर, धीरज मोरे – 118 सटाणा; हेमंत कोळी – 190 उरण; अॅड.  विलास निकुम – 2 शहादा, नंदुरबार (ST); सुभाष बाविस्कर – 105 कन्नड, संभाजी नगर (औरंगाबाद); रवींद्र जाधव – 111 गंगापूर, संभाजी नगर (औरंगाबाद); भूपेंद्र गवते – 150 ऐरोली, नवी मुंबई; सौ. ज्योती गायकवाड-पवार – 174 कुर्ला, मुंबई (SC); सौ. संगीत जामनेकर – 37 बडनेरा, अमरावती आणि विशाल बगाळे – 39 तिवसा, अमरावती अशी त्यांची नावे आहेत. राज्यातील सर्वच अन्यायग्रस्त अनुसूचित जाती-जमातींचा सर्वांगीण विकास साधणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे लोकराज्य  पार्टी चे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे मराठा बहुजनांसह सर्वच अन्यायग्रस्त अनुसूचित जातीजमाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्यांक यांची सामाजिक मोट बांधून महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव असलेल्या 50 विधानसभा मतदारसंघातून आणि ज्या ज्या ठिकाणी अन्यायग्रस्त अनुसूचित जातीजमातींचे प्रचंड संख्याबळ असेल अश्या निवडक 40 ते 50 विधानसभा मतदारसंघांतून लोकराज्य पार्टीतर्फे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व अनुसूचित जातीजमातींसह इतर मागासवर्गीय बहूजनांचे प्राबल्य  असलेल्या सर्वच विधानसभा मतदारसंघासाठी सामंजस्याने संघटितपणे निर्णय घेऊन “एकमेव उमेदवार उभा करून तो भरघोस मतांनी निवडून आणणे” हा लोकराज्य पार्टीचा ध्यास आहे, अशी माहीती लोकराज्य पक्षाचे महासचिव अॅड. किशोर दिवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.