Category: होम

तर छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवणार –  हेमंत पाटील

रमेश औताडे   मुंबई : राज्यात बहु‌संख्येने असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या समस्या आहे तिथेच आहेत. तथाकथित ओबीसी नेत्यांनी समाजाच्या मतांचा वापर केवळ आपल्या राजकीय फाय‌द्यासाठी करून घेतला, असा थेट आरोप करत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी ) राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यानी शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेला आरक्षण आंदोलनकर्ते  मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्‌याला पुर्ण समर्थन असल्याचे यावेळी पाटील यांनी जाहिर केले. जरांगे पाटील यांनी संधी दिली तर ओबीसी आणि मराठा बांधवांच्या वतीने नाशिक मधून छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे  पाटील म्हणाले. भूजबळ आणि काही तथाकथित नेत्यांना धडा शिकवण्यासाठी राज्यभरात त्याच्याविरोधात समक्ष उमेदवार देण्याचा संघटनेचा प्रयत्न असणार आहे. मनोज जरांगे यांनी  ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी रास्तच आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने मोठे मन दाखवून जरांगे यांना समर्थन दिले तर, आगामी काळात ओबीसी-मराठा समाजाच्या नेतृत्वाला एक नवीन दिशा मिळेल. असे मत पाटील यांनी व्यक्त केले. ओबीसी समाजाच्या तरुणांमध्ये बेरोजगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रचंड नैराश्य पसरल्याचे चित्र आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहचल्या नाहीत. काही तथाकथित नेत्यानी आरक्षणाच्या मुद्दयावर ओबीसी विरोधात मराठा असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न केला. पंरतु, आता राज्यातील ओबीसी-मराठा बहुजनांना भासणारी सक्षम नेतृत्वाची पोकळी जरांगे पाटीलच भरू शकतात, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

 सायन-पनवेल महामार्ग व ठाणे-बेलापूर मार्गाची सखोल स्वच्छता

   5500 हून अधिक नागरिक सहभागातून नवी मुंबई : नवी मुंबई हे दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे शहर असून सायन पनवेल महामार्ग हा अत्यंत महत्वाचा व वर्दळीचा रस्ता शहरातून जातो. या महामार्गाचे…

रिलायन्स-स्टार इंडियादरम्यान ७१ हजार कोटींचा करार

रिलायन्स आणि स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सुमारे 71 हजार कोटी रुपयांचा करार झाला. केंद्र सरकारच्या महिती आणि प्रसारण मंत्रालयाने या कराराला मंजुरी दिली आहे. या करारांर्गत रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड…

 मुंबईच्या ज्येष्ठा पवारला तीन सुवर्णपदके

 इन्ड्युरन्स वर्ल्ड फेडरेशन आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा मुंबई: थायलंड येथे झालेल्या इन्ड्युरन्स वर्ल्ड फेडरेशन आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत लोअर परळच्या (मुंबई) सहा वर्षीय ज्येष्ठा शशांक पवारने तीन सुवर्णपदकांची कमाई केली. या स्पर्धेत…

श्रीलंकेत सत्तांतर ; भारताची डोकेदुखी वाढली

भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेत नुकतेच सत्तांतर झाले असून तिथे डाव्या विचासरणीचे अनुरा कुमार दिसनायके हे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. श्रीलंकेत नुकतीच निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत विमुक्त पेरामुना या राजकीय…

हैदराबाद मध्ये ब्रेस्ट कॅन्सरवर जनजागृती करण्यासाठी पिंक मॅरॉथनचे आयोजन

स्पर्धकांचा महाकाय पक्ष्याच्या आकाराच्या मानवी प्रतिमा तयार करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न हैदराबाद : भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या वाढत्या घटनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, MEIL (Megha Engineering & Infrastructure…

 महाराष्ट्राचा महिला खो-खो संघ स्पर्धेसाठी रवाना

 पश्चिम विभागीय अस्मिता खेलो इंडिया लीग मुंबई : पश्चिम विभागीय अस्मिता खेलो इंडिया खो- खो स्पर्धेच्या महाराष्ट्र महिला संघाचा निरोप समारंभ सरस्वती स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मुंबई येथे पार पडला. हा…

 भारताचा इंग्लंड वर रोमहर्षक विजय तर सिंगापूरला दणका

 इनडोअर क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज   कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या सहकार्याने इनडोअर क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज ऑस्टेशिया स्पोर्ट्स क्लब, थलावाथुगोडा, कोलंबो,…

कुडाळ येथे पालक मंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला प्रारंभ

सिंधुदुर्ग : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने महालक्षमी हॉल, कुडाळ, सिंधुदुर्ग येथे सुरु असलेल्या पालक मंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे उदघाटन भारतीय जनता…

प्रसादाने श्रद्धांना तडा

वादविवाद अजय दीक्षित, चेन्नई तिरुपती बालाजी देवस्थानमध्ये देण्यात आलेल्या लाडवांच्या प्रसादात चरबी आणि माशाचे तेल वापरण्यात आल्याच्या आरोपावरून काहूर माजले. हा भाविकांच्या श्रद्धांशी खेळ आहे. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण…