Category: होम

विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज, शहरात वाहतूक बदल

ठाणे : गणरायाला गुरुवारी निरोप दिला जाणार आहे. ठाण्यात विसर्जन सोहळ्यासाठी सार्वजनिक आणि घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जन मिरवणूका निघणार आहे. त्यामुळे ठाणे पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. सुमारे पाच हजार पोलिसांचा…

श्रीकांत चषक जिंकण्यासाठी ४८ ज्युनियर कॅरमपटूमध्ये चुरस

मुंबई : श्रीकांत चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी ज्युनियर ४८ कॅरमपटूमध्ये १४ सप्टेंबर रोजी कांदिवली-पूर्व येथे चुरस होणार आहे. श्रीकांत स्पोर्ट्स क्लब-कांदिवली व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित १८ वर्षाखालील…

नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये शतकीय संघांचा उत्स्फुर्त सहभाग

नवी मुंबई : महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे यांच्या सहकार्याने…

बोरीवलीच्या संजर शिंदे याची जर्मनीतील बाल सांस्कृतिक महोत्सवासाठी निवड

 गणेशोत्सव मंडळाने केला सत्कार मुंबई :  बोरिवली विभागातील संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रमोद शिंदे यांचे चिरंजीव कुमार संजर शिंदे याची युरोपमधील जर्मनीतील बाल सांस्कृतिक महोत्सवासाठी निवड झाली आहे. संजर शिंदे यांच्या निवडीबद्दल या भागात प्रचंड प्रमाणात आनंद व्यक्त करण्यात येत असून अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कुलूपवाडी, बोरिवली (पूर्व) या मंडळाच्या वतीने कुमार संजर शिंदे याचा संस्थेच्या वतीने गौरव करून त्यास पुढील भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. भारतातून पाच मुलांची निवड झालेली आहे. कुमार संजर शिंदे याचा सत्कार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे विभाग प्रमुख उदेश पाटेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, सिनेट सदस्य मिलिंद साटम तसेच शाखा समन्वयक योगेश देसाई हे उपस्थित होते. संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी कुमार संजर शिंदे यास भरभरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुलूपवाडी बोरिवली पूर्व या मंडळाचे पदाधिकारी राजू गीते यांनी केले. 0000

मोबाईल सोडा, मैदानावर या ; सार्वजनिक गणेशोत्सव सजावटीतून दिल्या कानपिचक्या

मुंबई :  आजकाल मोबाईल गेमच्या विळख्यात तरुणांपासून ते लहान मुले अडकली आहेत त्यामुळे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. तरुणांनी व लहान मुलांनी मैदानी खेळाकडे आकर्षित व्हावे व एक धाव आरोग्यासाठी असा…

क्यूआर कोडद्वारे ऑनलाईन सेवांचा लाभ

भाईंदर : नागरिकांशी संबंधित विविध प्रकारच्या सेवा महापालिकेने ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत, परंतु अनेकांना या सेवांचा लाभ कसा घ्यायचा, त्याची लिंक कशी मिळवायची याची माहिती नसते. यासाठी महापालिकीन एक…

खारघरमध्ये कृत्रिम तलावाला पसंती

खारघर : खारघर वसाहतीत गणपती बाप्पाच्या मूर्ती विसर्जनासाठी गणेशभक्त कृत्रिम तलावाला अधिक पसंती देत आहेत. कृत्रिम तलावात दीड दिवसाचे दोन हजार ८४२; तर पाच दिवसांच्या एक हजार ५२२ गणेशमूर्तींचे विसर्जन…

ज्ञानेश महाराव यांना अटक करण्याची जोरदार मागणी

पनवेल : लेखक ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर वाशी येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात अश्लाघ्य टीका केली होती, त्यामुळे आज पनवेलमध्ये ज्ञानेश महाराव यांचा हिंदू…

sमुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी

 आतापर्यंत 1 लाख 20 हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी मुंबई : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार, १३ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत १ लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.  शुक्रवार १३ सप्टेंबरपर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी Apply बटन दाबून अर्ज Submit करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक हे राज्यस्तरीय नोडल अधिकारी असून जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) व तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत हा उपक्रम राविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राबाबत ही जबाबदारी संबंधित समकक्ष अधिकाऱ्यांची असणार आहे. परिक्षण व पारितोषिके विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकाबाबत लिखित स्वरुपात मांडलेल्या विचारांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येऊन प्रत्येक स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची निवड तीन गटांसाठी स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. विजयी विद्यार्थ्यांना पुस्तक स्वरुपात पारितोषिक तर सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ग्रंथ प्रदर्शन/ पुस्तक मेळाव्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना नवनवीन पुस्तकांची माहिती मिळावी व वाचनास प्रोत्साहित करावे या उद्देशाने यावर्षी प्रत्येक तालुक्यात ग्रंथ प्रदर्शन / पुस्तक मेळावे घेण्यात आले आहेत. या मेळाव्यात त्या-त्या जिल्ह्यातील सार्वजनिक व खाजगी ग्रंथालयांना तसेच विविध प्रकाशकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती श्रीमती आर.विमला यांनी दिली आहे.