Category: होम

 नमुंमपा विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचे लाभ वितरण सुरू

28 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना होणार लाभ     नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ त्वरित वितरित करणेबाबत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार समाजविकास विभागाच्या वतीने लाभ वितरणास सुरूवात झालेली असून पहिल्या टप्प्यात पात्रता निश्चित झालेल्या 3174 विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात 2 कोटी 15 लक्षाहून अधिक शिष्यवृत्ती रक्कम डिबीटीव्दारे जमा करण्यात आलेली आहे. तसेच या आठवड्यात पात्रता निश्चित केलेल्या 25 हजार 417 विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यात रू. 19 कोटी 67 लाखाहून अधिक रक्कम डिबीटी व्दारे जमा करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्ती तत्परतेने वितरित केली जावी असे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत देण्यात आले होते. शिष्यवृत्ती वितरणासाठी अर्ज तपासणी, कागदपत्रांची त्रुटी आढळणा-या अर्जदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी कालावधी देणे अशा कार्यालयीन प्रक्रियेसाठी समाजविकास विभागास कालबध्द नियोजन करून देण्यात आले होते. आयुक्त महोदयांमार्फत याचा सातत्याने आढावा घेतला जात होता. या अनुषंगाने प्रक्रियेस गती देत प्रत्यक्ष शिष्यवृत्ती वितरण करण्यास सुरूवात झालेली आहे. सन 2023-2024 या आर्थिक वर्षात शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देणे करिता 08 फेब्रुवारी 2024 रोजी वृत्तपत्रात जाहीर आवाहन प्रसिध्द करुन महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. याकरिता 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांच्या विनंतीनुसार प्रथम 15 मार्च पर्यंत व त्यानंतर 31 मार्च 2024 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार सर्व घटकांतर्गत राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांकरिता एकूण 40635 अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले होते. त्यामधून प्रथम टप्प्यात 5594 एवढ्या लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करून लाभ देणेकरिता प्रस्ताव सादर करण्यात आले होते. तथापि, 15 मार्च 2024 रोजी लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने तसेच त्यानंतर पदवीधर मतदार संघ निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने या लाभार्थ्यांना लाभ देता आला नाही. तथापि आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार आचारसंहिता कालावधीत याबाबतची अंतर्गत कार्यालयीन कार्यवाही करण्यात येऊन या प्रक्रियेस गती देण्यात आली. त्यास अनुसरून सन 2023-24 या आर्थिक वर्षात महिला व बालकल्याण घटकांतर्गत विधवा / घटस्फोटित महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे आणि आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना शिष्यवृत्तीचे वितरण करणे, नवी मुंबई क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता 1 ली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे, नवी मुंबई क्षेत्रातील महापालिका आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे या योजनांव्दारे 18 जुलैला पहिल्या टप्यात एकूण 3174 विद्यार्थ्यांना रु. 2 कोटी 15 लक्ष 42 हजार 800 इतकी शिष्यवृत्ती रक्कम डिबीटीव्दारे वितरीत करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विविध शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पात्रता निश्चित केलेल्या 25,417 विद्यार्थ्यांना एकूण रु. 19 कोटी 67 लक्ष 20 हजार इतकी शिष्यवृत्ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डिबिटीव्दारे या आठवडयात जमा केली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील महिला, मुली, निराधार, विधवा, मागासवर्गीय घटकातील युवक – युवती, महिला. पुरूष, प्रकल्पग्रस्त, सफाई कामगार, नाका कामगार, खुल्या प्रवर्गातील गरजू बेरोजगार युवक – युवती इ. विविध घटकांतर्गत विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून त्यासाठी पात्र असलेल्या नवी मुंबईकर नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन नमुंमपा समाजविकास विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. 0000

 नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यात नवीन ‘एमआयडीसी’

एमआयडीसी’ उभारणीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश     मुंबई  : राज्याच्या उत्पन्नवाढीबरोबरच रोजगार निर्मितीसाठी उद्योगांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज, अहिल्यानगर (अहमदनगर)…

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूदी – निरंजन डावखरे

अनिल ठाणेकर     ठाणे : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला वाटा मिळाला नसल्याची विरोधकांची ओरड `निराधार’ आहे. वाढवण बंदरासाठी ७६ हजार कोटींची भरीव तरतूद झाली. तर मुंबई-दिल्ली औद्योगिक कॉरिडॉर, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधारणा, सर्वसमावेशक इकॉनॉमिक कॉरिडॉर, कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आदींसाठी तरतूदी आहेत, असे मत कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले. भाजपाच्या वतीने यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देऊन चर्चा करण्यासाठी ठाणे विभागीय कार्यालयात प्रबुद्ध संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार निरंजन डावखरे यांनी अर्थसंकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक संदिप लेले, उपाध्यक्ष सागर भदे, सरचिटणीस सचिन पाटील, समीरा भारती आदी उपस्थित होते. मुंबई, पुणे, नागपूर येथील मेट्रो प्रकल्पांसाठी तरतूदी केलेल्या आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात ग्रीन अर्बन मोबिलिटीसाठी तरतूद केलेली आहे. राज्यातील रेल्वे प्रकल्प व इतर कामांसाठी तब्बल १५ हजार ९४० कोटी रुपये दिले गेले. त्यातून रेल्वेची कामे वेगाने होतील. २००९-२०१४ मधील सरासरी ११७१ कोटी रुपयांच्या वाटपापेक्षा ही तरतूद तब्बल १३.५ पट अधिक आहे. आगामी पाच वर्षात २५० नवीन लोकल सेवा आणि १०० मेल-एक्सप्रेस गाड्यांची वाढ होणार असून, प्रवाशांचा प्रवास सुकर होईल.’महाराष्ट्रातील शहरी भागातील १३ लाख गरीब कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेन्वये घरे उपलब्ध होणार आहेत. त्यातील साडेआठ लाख घरांचे वाटप पूर्ण झाले आहे. तर ग्रामीण भागात आतापर्यंत सुमारे साडेबारा लाख घरे पूर्ण झाली, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा असून, समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांचा अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. चाकरमानी नागरिकांपासून नवउद्योजक आणि गरीब, महिला, युवक आणि शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळाला असून, देशाची विकसित भारताकडे वाटचाल सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात देशाने अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. सातत्याने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारताची वेगाने विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे. २०४७ मध्ये विकसित भारत घडविण्याचे लक्ष्य ठेवून विविध धोरणे आखण्यात येत आहेत. त्याचीच प्रचिती यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आली आहे. केंद्र सरकारच्या उत्तम धोरणांमुळेच भारत जगभरात प्रगतीपथावर आहे, असे प्रतिपादन आमदार डावखरे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशातील २५ कोटी नागरिकांची गरीबी दूर झाली असून, ते मध्यमवर्गात समाविष्ट झाले आहेत. या नवमध्यमवर्गाबरोबरच युवक, आदिवासी, दलित आणि मागासवर्गीयांचे जीवन सुखकर करण्याचा अर्थसंकल्पात प्रयत्न आहे. केंद्र सरकारने नऊ प्राधान्यक्रम निश्चित करून वाटचाल सुरू केली आहे. आगामी काळात ४ कोटी १० लाख तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होईल. बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन दिले जात असून, त्यातून २ कोटी १० लाख तरुणांना रोजगार मिळेल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये नोंदणी झालेल्या तरुणांना १५ हजार रुपयांपर्यतचा पगार मिळणार आहे. २० लाख तरुणांना कौशल्य विकासाचे, आगामी पाच वर्षात १ कोटी तरुणांना आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी, स्टार्ट अपसाठी गुंतवणूकदारांवरील एंजेल कर रद्द करण्यात आला. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणांसाठी १० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल. तर करप्रस्तावात बदलांमुळे नोकरदारांची प्रत्येकी १७ हजार ५०० रुपयांची बचत होणार आहे, असे आमदार डावखरे यांनी नमूद केले. 0000

शासकीय कोट्यातील रिक्त जागा विशेष फेरीव्दारे ऑनलाईन पध्दतीने भरले जाणार – डॉ.सुभाष महाजन

अशोक गायकवाड   रायगड : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका (D.El.Ed.) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. तथापि अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीव्दारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल प्राचार्य, डॉ.सुभाष महाजन यांनी दिली आहे. प्रवेश प्रक्रिया पुढीलप्रमाणे राबविण्यात येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in संकेत स्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतीत. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेशाची शैक्षणिक पात्रता-इयत्ता 12 वी उत्तीर्ण (खुला संवर्ग ४९.५% व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग ४४.५% गुणांसह), प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी ०१ ते ०५ ऑगस्ट, पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करुन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करणे ०१ ते ०८ ऑगस्ट, प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन भरणे खुला संवर्ग रुपये २००/- खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग रुपये – १००/-.यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन Approve करुन घेतला आहे. परंतु प्रवेश घेतलेला नाही, असे विद्यार्थी प्रवेश घेरु शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती (Correction) मध्ये आहे, तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले, असे सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. अर्ज ऑनलाईन Approve केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने स्वतःच्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयाची स्वतः निवड करुन लगेचच प्रवेशपत्राची स्वतःच्या ईमेल/लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची आहे व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे. 0000

 चुकीचा सिग्नल दिल्याने बदलापूर स्टेशनजवळ मालगाडी अडकली

कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प   बदलापूर : मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी मालगाडी बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ अडकल्याने अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा खंडित झाली होती. सायंकाळी चार वाजून 45…

 उल्हासनगरात उभा राहतोय महाराष्ट्रातील दुसरा पशु दाहिणीचा प्रकल्प Slug – लहान-मोठ्या पशूंची क्षणात होणार राख

 लहान-मोठ्या पशूंची क्षणात होणार राख     उल्हासनगर – दोन वर्षांपूर्वी ड्रेनेजची साफसफाई करणाऱ्या रोबोटला गणतंत्र दिनाच्या चित्र रथावर स्थान मिळाल्याने महानगरपालिकेचे नाव राज्य पातळीवर गाजले होते. आता महाराष्ट्रातील दुसरा…

ठाण्यात 22 मजली इमारतीत आग, जीवितहानी नाही

ठाणे : ठाण्यातील मानपाडा येथील एम एमएमआरडीए च्या 22 मजली इमारतीत आग लागली होती यात अडकलेल्या 25 ते 30 जनची सुखरूप सुटका करण्यात आली. 30जुलै रोजी रात्री अकरा वाजता इमारतीत…

भाजप सचिव सुनील कोळपकर व महिला मोर्चा सचिव सौ प्रज्ञा कोळपकर ह्यांनी त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरून घेतलेल्या महिलांना ऑनलाइन स्लिपचे वाटप केले प्रज्ञा कोळपकर ह्यांच्या वाढदिवसाच्या…

लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी समारंभाला माजी केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार !

मुंबई : यंदाचा १ ऑगस्ट लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे १०४ वे वर्ष! २०१५‌ ला शासनादेश प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल ९ वर्षांनंतर शासनाने स्वराज्यभूमी नामफलकाचे उद्घाटन केले. देशाच्या थोर राष्ट्रपुरुषांबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाची…

तोच पक्ष आता सत्तेत राहील – प्रकाश शेंडगे

  रमेश औताडे     मुंबई : ओ बी सी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जो कोणी सोडवेल तोच पक्ष आता सत्तेत राहील. असे स्पष्ट करत ओ बी सी बहुजन पार्टी चे…