Category: महाराष्ट्र

Maharashtra News

भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत – राहुल गांधीं

नवी दिल्ली :  भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. साडे चार कोटींपेक्षा जास्त नोकऱ्या आणि लाखो व्यवसाय धोक्यात आल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. अमेरिकी…

संभाजीनगरमध्ये शिवसेनेसोबतची युती तोडा

संभाजीनगरमध्ये शिवसेनेसोबतची युती तोडा भाजपा कार्यकर्त्यांनी मंत्र्यांची गाडी अडवली संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची  अखेर युती झाली आहे. शिवसेना २५ तर भाजप २७ जागा लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट तर भाजपकडून बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी घोषणा केली. मात्र, युतीच्या घोषणेनंतर संभाजीनगरमध्ये  राडा झाला. भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्यासमोर हात जोडले, तसेच त्यांच्या गाड्याही अडवल्या. साहेब, युती तोडा असे म्हणत भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले. संभाजीनगरमधील शिवसेना-भाजपची ही युती जिल्ह्यातील केवळ सात तालुक्यात असणार आहे. मात्र, सोयगाव आणि सिल्लोड या दोन तालुक्यातील ११ ठिकाणी युती न करता शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुकांचा जसा राडा झाला होता तसाच राडा आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या युतीच्या घोषणेनंतर त्याच ठिकाणी झाला. वैजापूर तालुक्यातील भाजपचे भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे थेट मंत्री अतुल सावे आणि भाजपचे आमदार खासदार यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच त्यांची गाडीही अडवली. त्यामुळे काही काळ राडा आणि गोंधळ पाहायला मिळाला. अखेर, पोलिसांच्या बंदोबस्तात मंत्री अतुल सावे निघून गेले. वैजापूर तालुक्यातील आठ जागांपैकी केवळ तीन जागा भाजपला मिळाले आहेत. त्यामुळे, भाजप कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला, अनेक वर्षे आम्ही निवडणुकीची तयारी करीत होतो. मात्र, ती जागा शिवसेनेला गेली आणि तिथं भाजप नेत्यांना शिव्या देणारा व्यक्ती उमेदवार असणार आहे. त्यामुळं आता आम्ही त्यांच्यासाठी काम करायचं का? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

नेस वाडिया व भारती विद्यापीठ उपांत्य फेरीत दाखल

विश्वनाथ स्पोर्ट्स मीट स्पर्धा नेस वाडिया व भारती विद्यापीठ उपांत्य फेरीत दाखल लोणी काळभोर: आठव्या राष्ट्रीय स्तरावरील विश्वनाथ क्रीडा स्पर्धा (व्हीएसएम–२०२६) अंतर्गत मंगळवारी पुण्यात खेळल्या गेलेल्या क्रिकेटच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांत…

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध ८८ शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरू

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध ८८ शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरू हरिभाऊ लाखे नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ११ विद्याशाखेंतर्गत असलेल्या विविध ८८ शिक्षणक्रमांचे शैक्षणिक सत्र जानेवारी २०२६ करीता नवीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश सुरु करण्यात आलेले आहेत. तसेच जानेवारी २०२५ या सत्रात ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षास प्रवेश घेतलेला आहे; अशा विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाचीही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. विनाविलंब शुल्कासह ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठीची अंतिम मुदत ही येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण व विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी. एड. (सेवांतर्गत), बी. एड. (विशेष) तसेच विज्ञान विद्याशाखेच्या शिक्षणक्रमांव्यातिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी जानेवारी २०२६ या सत्राकरिता प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांना नियमित पदवी सोवत दूरशिक्षणाद्वारे अधिकची एक पदवी घेता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी दिली आहे. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापनेपासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजातील विविध घटकातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यातून अनेक विद्यार्थी प्रशासकीय व खाजगी संवेत उच्चपदावर कार्यरत आहेत. मानाची पदे भूषवत आहेत. हे विद्यापीठ सर्वसामान्य ते विशेष पारंगत अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रवेशद्वार ठरत आलेले आहे. येथे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख तसेच वेब रेडिओ, दृकश्राव्य माध्यम व मोबाईलद्वारे देखील मार्गदर्शन केले जाते. दोन वेळा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, दूरशिक्षण क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य यूजीसी मान्यताप्राप्त व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचलेले एकमेव मुक्त विद्यापीठ आहे. विद्यापीठातर्फे सेनादल सैनिक, बंदीजन, कृषि सेवक, शेतमजूर आणि समाजातील इतरही घटक यांच्यासाठी विशेष शिक्षणक्रम आहेत. शिवाय ए.आय. डाटा सायन्स, सायबर ॲक्ट ते बीए, बीकॉम, एम. ए., एम. कॉम., एम. लिब., एम. सी. ए. यासह विविध व आधुनिक कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. हे सर्व शिक्षणक्रम नोकरदारांना आपली नोकरी व व्यवसायिकांना आपला व्यवसाय सांभाळून पूर्ण करता येतात. त्यामुळे संबंधित इच्छुकांना आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची व सर्वार्थाने प्रगती साधण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्या अनुषंगाने दिनांक २० जानेवारी २०२६ पासून विद्यापीठाच्या ११ विद्याशाखेंतर्गत विविध ८८ शिक्षणक्रमांचे ऑनलाईन प्रवेश सुरु करण्यात आले आहेत. त्यात प्रमाणपत्र – ३२, पदविका – ३०, पदवी – ११ व पदव्युत्तर १५ शिक्षणक्रमांचा समावेश आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही फक्त ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्र्माचे शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल. प्रवेशासाठीची अंतिम मुदत ही येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या विहित मुदतीत विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac  या वेबसाईटला भेट द्यावी. तेथे Admission  या पर्यायावरून Prospectus येथे विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत. काही तांत्रिक अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत (०२५३)२२३०५८०, २२३१७१५, २२३०१०६, २२३१७१४ या विद्यार्थी मदत केंद्रावरील दूरध्वनी क्र्मांकावर किंवा ९३०७५७९८७४, ९३०७५६७१८२ अथवा ९२७२०४६७२५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि लवकरात लवकर प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे व विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी केले आहे.

सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाचे प्रश्न मार्गी लावावेत…!

सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाचे प्रश्न मार्गी लावावेत…! आरोग्य मंत्री आबिटकर यांचे उप-संचालकांना आदेश..! सावंतवाडी/राजन चव्हाण सावंतवाडी  उप -जिल्हा रुंग्णालयातील ‘ट्रामा केअर युनिट’, ‘आय.सी.यु’, ‘रक्तपेढी’, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे आदी समस्या तातडीने सोडवा असे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज आरोग्य उप-संचालक डॉ. दिलीप माने यांना दिले. सावंतवाडी उप – जिल्हा रुग्णालय कृती समितीचे निमंत्रक रविंद्र ओगले, माडखोलचे माजी सरपंच संजय लाड,रविंद्र केरकर, अभिनव फाऊंडेशन, सिंधुदुर्ग चे प्रथमेश मुरगोड, सामाजिक कार्यकर्ते ऍड. नंदन वेंगुर्लेकर,संपत दळवी आदींच्या शिष्टमंडळाने आबिटकर यांची आज त्यांच्या गारगोटी येथील निवासस्थानी भेट घेतली. अभिनव फाऊंडेशनने सावंतवाडी उप- जिल्हा रुग्णालय प्रश्नी दाखल केलेली जनहित याचिका, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे,इथल्या दुरावस्थेमुळे, गोवा-बांबुळी येथे पाठवले जाणारे पेशंट, रखडलेले मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल यासंदर्भात निमंत्रक ओगले यांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.कृती समितीच्या वतीने आबिटकर  यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.  सावंतवाडीत उप -जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्ना संदर्भात येत्या २६ जानेवारीला उप -जिल्हा रुग्णालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा  इशाराही समितीने दिला आहे.

नेस वाडिया कॉलेज, सीओईपी टेक आणि निकमारचे दमदार विजय

विश्वनाथ स्पोर्ट्स मीट नेस वाडिया कॉलेज, सीओईपी टेक आणि निकमारचे दमदार विजय लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने आयोजित आठव्या राष्ट्रीय स्तरावरील विश्वनाथ स्पोर्ट्स मीट (व्हीएसएम–२०२६) अंतर्गत रविवारी व सोमवारी खेळविण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांत नेस वाडिया कॉलेज, अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) आणि निकमार संघांनी प्रभावी विजय नोंदवत आपली ताकद दाखवून दिली. उरुळी कांचन येथील निकम मैदान व एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या मैदानावर हे सामने रंगले. निकम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात नेस वाडिया कॉलेजने आयटीएम इलेव्हनवर ५२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत नेस वाडियाने सलामीवीरांच्या भक्कम भागीदारीच्या जोरावर १६ षटकांत ३ बाद १७० धावांचा मजबूत डाव उभारला. वेदांत डेडगेने संयमी खेळ करत ४७ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या, तर प्रणव लोखंडेने अवघ्या २१ चेंडूत ४९ धावांची स्फोटक खेळी साकारली. प्रत्युत्तरात आयटीएम इलेव्हनचा डाव नेस वाडियाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर गडगडला. रोहन देसाईने भेदक मारा करत ३ बळी टिपले, तर कर्णधार अश्विन शिंदेने महत्त्वाचे बळी घेत विजय निश्चित केला. त्याच मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात सीओईपी टेक संघाने एमआयटी– वर्ल्ड पीस विद्यापीठवर (डब्ल्यूपीयू) ९ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत एमआयटी–डब्ल्यूपीयूने १७ षटकांत ८ बाद १४६ धावा केल्या. मात्र, आदित्य इंदानीच्या अचूक गोलंदाजीमुळे (४/२२) डावाला मर्यादा आल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सीओईपी टेकचा सलामीवीर मल्हारने अप्रतिम खेळी साकारत ५३ चेंडूत नाबाद ७० धावा केल्या. त्याला अमेय दांडेकरची ४९ धावांची भक्कम साथ लाभली आणि संघाने सहज विजय मिळवला. दरम्यान, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात निकमार संघाने एमआयटी स्कुल ऑफ कंम्पुटींगवर (एसओसी) ९ गडी राखून वर्चस्वपूर्ण विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत एमआयटी एसओसीला १८.२ षटकांत अवघ्या १०३ धावांपर्यंत मजल मारता आली. निकमारकडून गौरव ठाकूरने ३ बळी घेत गोलंदाजीचे नेतृत्व केले. प्रत्युत्तरात, कर्णधार ओम अशोक कोकणेने आक्रमक फलंदाजी करत केवळ २७ चेंडूत नाबाद ५६ धावा ठोकल्या. रुतुराज तावरेनेही ४२ धावांची उपयुक्त खेळी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. संक्षिप्त धावफलक : नेस वाडिया कॉलेज – १६ षटकांत १७०/३ (वेदांत डेडगे* ६४ – ४७ चेंडू, प्रणव लोखंडे ४९ – २१ चेंडू, साकिब खान ३१ – २५ चेंडू; विकास सी २/२४) वि.वि. आयटीएम इलेव्हन – १६ षटकांत ११८/९ (सिद्धांत सातपुते ४७ – ३८ चेंडू, सक्षम सुखीजा २७ – १० चेंडू; रोहन देसाई ३/१६, अश्विन शिंदे २/१४)  सामनावीर: वेदांत डेडगे एमआयटी–डब्ल्यूपीयू – १७ षटकांत १४६/८ (रोहन मोहिते ३६ – २२ चेंडू, अफनान पंडित २९ – १६ चेंडू; आदित्य इंदानी ४/२२) पराभूत.वि.सीओईपी टेक – १६.३ षटकांत १४८/१ (मल्हार* ७० – ५३ चेंडू, अमेय दांडेकर ४९ – ३७ चेंडू) सामनावीर : आदित्य इंदानी एमआयटी एसओसी – १८.२ षटकांत १०३/१० (श्रेयश पारवे ३१ – २७ चेंडू; गौरव ठाकूर ३/२२, सुश्रुत भैस्वर २/१४, वेदांत गिदये २ बळी) पराभूत.वि. निकमार – ८.३ षटकांत १०५/१ (ओम अशोक कोकणे* ५६ – २७ चेंडू, रुतुराज तावरे ४२ – २२ चेंडू) सामनावीर: ओम कोकणे.

 उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सिंधुदुर्गात एक खिडकी योजना…!

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज! उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सिंधुदुर्गात एक खिडकी योजना…! सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व मदतीसाठी एक खिडकी योजना लागू करण्यात आली आहे.  ही माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती जोडमिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील आठ तालुक्यांसाठी आठ निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रत्येकी दोन याप्रमाणे १६ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत अशीही माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात १४ हजार १५३ दुबार मतदार आहेत त्यांच्याकडून ज्या ठिकाणी मतदान करणार त्याचे ‘ऑप्शन’  भरून घेण्यात येत आहेत असे धोडमिसे यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ५० सदस्य आणि पंचायत समित्यांचे १०० सदस्य असून या निवडणुकीत ५ लाख ९९ हजार ५६४ मतदार निश्चित झाले आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या जास्त असून ती ३ लाख १९०३ इतकी आहे तर पुरुष मतदार २ लाख ९७ हजार ६६० इतके आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. प्रतिबंधात्मक कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा हा गोवा राज्याच्या सीमेवर येतो.त्यामुळे निवडणूक काळात अवैध धंद्यांना चाप बसावायासाठीदोडामार्ग,सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यांमध्ये १० ठिकाणी ‘तपासणी नाके ‘ तयार करण्यात आले आहेत.तसेच जिल्हाभर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात एकूण ८७० मतदान केंद्रे असून कुडाळ तालुक्यात सर्वाधिक १५३ तर सावंतवाडी तालुक्यात १४३ मतदान केंद्रे आहेत. निवडणुकीसाठी सुमारे ४,५०० कर्मचारी लागणार आहेत.जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात असलेल्या ६५ मतदान केंद्रांमध्ये नेटवर्कची सुविधा नसल्याने त्या ठिकाणी अतिरिक्त व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी दिली.

शिबिर हे अनुभवाने जगता येते – डॉ.गोरखनाथ किर्दत

शिबिर हे अनुभवाने जगता येते – डॉ.गोरखनाथ किर्दत अनिल ठाणेकर सांगली, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व  नेतृत्वगुणांचा पाया राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून घातला जातो. शिबिर हे अनुभवाने जगता येते, असे प्रतिपादन जिल्हा समन्वयक डॉ. गोरखनाथ किर्दत यांनी केले. मसुचीवाडी येथे मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपा प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, “समायोजन,आपले वर्तन ,सहकार्य, समर्पणाची भावना हीच, स्वयंसेवकाची खरी ओळख आहे. समाजाची गरज काय आहे हे जाणून घेऊन समाजाच्या मदतीसाठी जाऊन आपल्याला  योगदान देता येईल व सामाजिक बांधिलकी जपता येईल.” अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर  होते. ते म्हणाले की, ग्रामीण संस्कृतीची जाण आणि समाजशीलता  शिबिरातून निर्माण होते. कृतीद्वारे घेतलेले शिक्षण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर उपयोगी पडते. आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्याकडे वेगवेगळी कौशल्य असणे गरजेचे आहे. सरपंच राधिका पाटोळे, उपसरपंच अमित कदम, ग्रामपंचायत सदस्य उज्वला फाटक, जयेश कदम, अजित गुरव ,तुकाराम सावळा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार माळगे ,सर्व प्राध्यापक, कर्मचारी ,ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरात गावची स्वच्छता, नदी परिसर स्वच्छता, प्लॅस्टिक संकलन ,जलसाक्षरता, कृषीविषयक सर्व्हे ,आरोग्य तपासणी सर्वे ,शाळेच्या परिसरात परसबाग, प्रबोधनपर व्याख्याने, व्यसनाधीनतेवर पोस्टर प्रेसेंटेशन इत्यादी उपक्रम राबविले .शिबिरातील उत्कृष्ट स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला.

लेकराची माया अन् पित्याचा आनंद…

महाराष्ट्रातील २९ महानगर पालिकांमध्ये घवघवित यश मिळविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देशातील सगळ्यांनीच कौतुक केले पण या एतिहासिक विजयानंतर घरी लेक दिविजाने अभिमानाने मारलेल्या या मिठीनंतर फडणवीसांच्या चेहऱ्यावरील…

ही पराभवानंतरच्या प्रतिक्रीयेची रंगित तालिम – देवेंद्र फडणवीस

नागपूर : मतदानावेळी वापरण्यात आलेली शाई लगेच पुसली जात असल्याच्या ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेवर ही तर पराभवानंतरच्या प्रतिक्रियची ते रंगित तालिम करीत असल्याची मिश्किल प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त…