Category: महाराष्ट्र

Maharashtra News

गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेसाठी नाशिक सज्ज

हरिभाऊ लाखे नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात विविध यंत्रणांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. याच पार्श्वभूमीवर गर्दीचा अंदाज, भाविकांची हालचाल, वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, सुरक्षा निरीक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद या सर्व बाबींचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याबाबत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या समन्वय बैठकीत चर्चा करण्यात आली. सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान कोट्यवधी भाविकांचे आगमन लक्षात घेता गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने पावले उचलली आहेत. यासाठी विविध विभागांना एका एकात्मिक डिजिटल व्यासपीठावर आणण्याचे नियोजन करण्यात येत असून, यासंदर्भात आंतरविभागीय समन्वय बैठक झाली. विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शहर पोलिस, ग्रामीण पोलिस, नाशिक परिक्षेत्र पोलिस, महामार्ग वाहतूक पोलिस, नाशिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, त्र्यंबकेश्वर नगर परिषद, आयआयएम नागपूर, ईवाय मोबिलिटी टीम, पीडब्ल्यूसी टीम तसेच संबंधित विभागांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. पीडब्ल्यूसीकडून प्रस्तावित तंत्रज्ञान आराखडा आणि इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळ्याचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेता प्रत्येक विभागाने स्वतंत्रपणे नव्हे तर एकात्मिक पध्दतीने काम करणे NASHIK SHANEY आवश्यक आहे. रिअल टाइम माहिती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विभागांमधील समन्वय यामुळे गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा आणि भाविकांना सुविधा पुरविणे अधिक प्रभावी होईल. त्यादृष्टीने सक्षम आणि भविष्यातील गरजा लक्षात घेणारी यंत्रणा उभारण्यावर भर आहे. बैठकीत साधुग्राम नियोजन, घाट व्यवस्थापन, पार्किंग व्यवस्था, मंगल कार्यालये व इतर सुविधांचे नियोजन, पोलिस दलाची तयारी, प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धी या विषयांवरही चर्चा करण्यात आली.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे शिवसेनेवर पीएचडी करुन डॉक्टरेट मिळविणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अकोला जिल्हा महिला संघटक डॉ. सरिता विजय वाकोडे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे…

 सोलापूर, धाराशिव, पुणे आणि मुंबई उपनगरची उपांत्य फेरीत धडक!

५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा मुलींच्या गटात सांगली, सोलापूर, धाराशिव व ठाणेची आगेकूच (स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीतून) : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, सोलापूर ॲम्युचर…

‘मोठी स्वप्ने पाहा, सर्वांना सोबत घेऊन पुढे चला’

– आनंद बाल शिबिरात डॉ. नीलम गोऱ्हे यांचा चिमुकल्यांना संदेश पुणे.दि.३: शिवसेना भवन येथे धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष आणि पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंद बाल शिबिर’ उपक्रमात मंगळवारी शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सहभागी होत बालचमूंशी संवाद साधला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी यावेळी नृत्य सादर करून व ओरिगामी कलेतून साकारलेल्या विविध कागदी वस्तू भेट देत डॉ. गोऱ्हे यांचे स्वागत केले. संवादादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी मुलांना भविष्यात काय बनायचे आहे, अशी विचारणा केली असता एअर होस्टेस, डॉक्टर, कलेक्टर, वकील, पोलीस अधिकारी, सैनिक आणि व्यावसायिक होण्याची स्वप्ने मुलांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करण्याबरोबरच पालक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन ऐकण्याचा सल्ला दिला. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर राग मनात न ठेवता सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची वृत्ती जोपासावी, असेही त्यांनी सांगितले. शिवसेना भवनात मुक्तपणे वावरणाऱ्या, खेळणाऱ्या आणि आनंदाने बागडणाऱ्या मुलांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर उत्साहाने फुलून गेला होता. लहान मुलांचे खेळ आणि शिबिरे हा धर्मवीर आनंद दिघे यांचा आवडीचा विषय असल्याची आठवण करून देताना डॉ. गोऱ्हे यांनी ठाण्यातील आनंदाश्रमाप्रमाणेच पुण्यातील शिवसेना भवनातही लवकरच मोफत स्पोर्ट्स लायब्ररी सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालकही उपस्थित होते. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी पालकांना मुलांसमोर मोबाईलचा अतिवापर टाळण्याचे आवाहन केले. मुलांसोबत प्रत्यक्ष संवाद वाढविणे आणि त्यांच्यासाठी वेळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला सुधीर कुरुमकर, वैभव वाघ, संदीप शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे यांचा भोर-मुळशी विधानसभेच्या वतीने सत्कार दरम्यान, डॉ. नीलम गोऱ्हे यांची सलग पाचव्यांदा विधान परिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवसेना भोर-मुळशी विधानसभेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे आणि महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख कांता पांढरे यांच्या हस्ते हा सत्कार झाला. यावेळी भोर-मुळशी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौल-२ शाखा कार्यालय रायगड जिल्ह्यातील पहिले १०० टक्के स्मार्ट मीटरयुक्त कार्यालय

१,५७० ग्राहकांचे सर्व मीटर स्मार्ट मीटरमध्ये रूपांतर रायगड : राज्यभर महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम वेगाने सुरू असताना रायगड जिल्ह्यातील अलिबाग-१ उपविभागांतर्गत चौल-२ शाखा कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या…

दिवा शहरातील नालेसफाई कामांबाबत मनसेची तीव्र नाराजी

दिवा, दि. 3 जून (आरती परब) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहराचे शहराध्यक्ष तुषार पाटील यांनी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन दिवा शहरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांबाबत…

सिंहस्थात धावणार साडेचार हजार बसेस

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या कोट्यवधी भाविकांचा प्रवास सुरक्षित, नियोजनबद्ध आणि सुलभ व्हावा, यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून व्यापक…

वाशी व तुर्भे भागात महापौर व उपमहापौर यांच्या उपस्थितीत विशेष जल तपासणी मोहीम

अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाची पाणी पातळी आज ७१.५. मीटर इतकी असून १५.७४ टक्के जलसाठा वापरण्यायोग्य आहे. हा जलसाठा जुलै अखेरपर्यंत पुरवठा करता येईल इतका आहे. मात्र आसपासच्या शहरांमधील पाणी टंचाईची भीषण परि‍स्थिती लक्षात घेता तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावेळी पावसाचे प्रमाण कमी आहे हे लक्षात घेता नवी मुंबईकरांनी पाण्याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी आपल्याकडून पाण्याचा कोणत्याही प्रकारे अपव्यय होणार नाही याची प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने काळजी घ्यावी असे आवाहन केले. दोन दिवसाच्या शटडाऊनमध्ये जलवाहिन्या कोरड्या झाल्याने त्यांच्या आतील भागात खाली बसलेला बारीक गाळ पाणीपुरवठा पूर्ववत सुरु झाल्यानंतर जलकुंभापर्यंत आला व गढुळ पाण्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या. या अनुषंगाने महानगरपालिका पाणी पुरवठा विभागामार्फत शहराच्या विविध भागामध्ये मोठया प्रमाणात जलतपासणी मोहीम हाती घेण्यात आली. त्याचप्रमाणे महापौर, उपमहापौर यांचे समवेत नगरसेवकांनीही विविध विभागांमध्ये जाऊन जलतपासणी चाचणीची पाहणी करण्यास सुरुवात केली. या पाहणीमध्ये आंतरराष्ट्रीय आयएसआय मानकानुसार पाणी नमुन्यातील पीएच, टिडीएस, टर्बिडिटी व क्लोरिनचे प्रमाण तपासण्यात आले. या ठिकठिकाणच्या तपासणीमध्ये पाणी पिण्यायोग्य असल्याचे आढळून आले. तरीही नागरिकांना आपल्या घरातील पाणी दूषित असल्याची शंका असल्यास तक्रार करण्यासाठी १८००२२२३०९ हा टोल फ्री विनामूल्य क्रमांक जाहीर करण्यात आला. आता तक्रारींचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून पाणी पूर्वीसारखे स्वच्छ मिळू लागले आहे. तरीही काही ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये लिकेजेस असल्याने नळाव्दारे मिळणारे पाणी गढूळ असल्यास लिकेजेस शोधून ते त्वरीत दुरुस्त करुन घेण्याचे निर्देश महापौर सुजाता पाटील यांनी आजच्या तुर्भे, वाशी भागातील पाणी नमुने तपासणी विशेष मोहिमेच्या पाहणी प्रसंगी दिले. यावेळी उपमहापौर दशरथ भगत, क प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश मोरे व ड प्रभाग समिती अध्यक्ष शैला पाटील, नगरसेवक शशिकांत राऊत, दयावती शेवाळे, शशिकला पाटील, अंजली वाळुंज, सुनिल कुरकुटे, शशिकला औटी, शिल्पा ठाकूर, प्रिती भगत तसेच अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता शंकर जाधव व संतोष उनवणे व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी महापौर महोदयांनी तुर्भे से. येथील मलप्रक्रिया केंद्र व टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टचीही पाहणी केली. याप्रसंगी विशेषत्वाने गावठाण भागातील जलवाहिन्या जुन्या झाल्या असल्याने त्यामध्ये मोठया प्रमाणात लिकेजेस असल्याचे सांगत नगरसेवकांनी त्या वाहिन्या बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. काही नागरिकांनी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली १०% पाणी कपात ही सध्या सगळीकडे जाणवत असलेली पाण्याची कमतरता लक्षात घेता २० % पर्यंत करावी अशी सूचना केली. त्याचप्रमाणे काही नागरिकांकडून अशा पाणी टंचाईच्या काळातही नवी मुंबईत मुबलक पाणी मिळत असल्याने गाडया धुण्यासाठी पाईप लावून पाण्याचा अनाठायी वापर करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशीही मागणी याप्रसंगी उपस्थित नागरिकांकडून करण्यात आली. यावेळी मोठया कालावधीसाठी शटडाऊन घेण्यात आल्याने पाणी गढूळ असण्याच्या तक्रारी अधिक प्रमाणात आल्या. आता पाण्याची स्थिती जवळजवळ पूर्ववत झाल्याचे आढळून येत असून महानगरपालिकेमार्फत पाण्याच्या चाचण्या सुरुच ठेवल्या जाणार आहेत. 00000000000

 मध्यंतराच्या पिछाडीवरून लातूरची जालन्यावर थरारक मात

 ५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा सोलापूर, दि. ३ जून : स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी, नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर सुरू असलेल्या ५२व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद…

 मिरा – भाईंदरमध्ये मोठी दहशतवादविरोधी कारवाई

फरार आरोपी हुजैफा दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात मिरा -भाईंदर महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने संयुक्त कारवाई करत मीरा-भाईंदर परिसरातून फरार दहशतवादी आरोपी हुजैफा याला अटक केली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये करण्यात आलेल्या अटक आणि चौकशीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हुजैफा हा कथितरित्या सैयद मुदस्सिर हुसेन उर्फ मुन्ना झिंगाडा यांच्या संपर्कात होता. मुन्ना झिंगाडाचा संबंध दाऊद इब्राहिम टोळीशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, तो या मॉड्यूलच्या कारवायांना मार्गदर्शन करत असल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील वांद्रे परिसरातील रेल्वे जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईनंतर निर्माण झालेल्या तणावाचा फायदा घेत तरुणांना भडकवून बेकायदेशीर व दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करण्याचा कट रचला जात होता. या कटाचे संचालन पाकिस्तानातील कराची येथून होत असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. हुजैफावर मुंबईत स्थानिक नेटवर्क उभारणे आणि कारवायांसाठी आर्थिक व्यवस्था करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तपासादरम्यान त्याला या नेटवर्ककडून सुमारे एक लाख रुपये मिळाल्याचे समोर आले आहे. तसेच काही तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करून कामाच्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष दाखवण्यात येत असल्याची माहितीही उघड झाली आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले तौकीर आणि साजिद शेख यांना अनुक्रमे कुर्ला आणि मुंब्रा येथून ताब्यात घेण्यात आले होते. दोघेही अमली पदार्थांच्या व्यसनाधीन असून सहज पैसा मिळविण्याच्या लालसेपोटी या नेटवर्कच्या संपर्कात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अंडरवर्ल्ड गँगस्टर मुन्ना झिंगाडाचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या हुजैफाला बुधवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी केली असून पुढील चौकशीसाठी त्याला दिल्लीला नेण्याची तयारी सुरू आहे. सध्या तपास यंत्रणा संपूर्ण नेटवर्क, त्याचे आर्थिक स्रोत आणि कथित दहशतवादी कारवायांशी असलेले संबंध यांचा सखोल तपास करत आहेत. 0000000