Category: महाराष्ट्र

Maharashtra News

दिव्यातील खड्ड्यांविरोधात मनसेचे ‘खड्ड्यांची शांती’ आंदोलन

 ३० जुलैला नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन दिवा: दिवा शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. “खड्ड्यांची शांती” या आंदोलनाचे आयोजन गुरुवार, ३० जुलै, सकाळी ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, दिवा (पूर्व) येथे करण्यात येणार आहे. मनसेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवा शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनसेने केली आहे. या पार्श्वभूमीवर खड्ड्यांनाच विनंती करून नागरिकांना होणारा त्रास थांबवण्याचा प्रतीकात्मक संदेश देण्यासाठी “खड्ड्यांची शांती” आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात दिवा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी अधिक तीव्र करावी, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले आहे.

आषाढी एकादशीनिमित्त एसएसटी महाविद्यालयाची अनोखी वृक्षदिंडी

 वारकरी परंपरेतून पर्यावरण संवर्धनाचा जागर सुनिल इंगळे उल्हासनगर :आषाढी एकादशीच्या निमित्ताने एसएसटी महाविद्यालयाने आपल्या स्थापनेपासून सातत्याने जोपासलेली वृक्षदिंडी यंदाही भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात काढून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. भारतीय संस्कृती,…

 माझ्या पंढरीची वारी जगात भारी : महेंद्रशेठ घरत

– स्वयंसेवक आणि पोलिस प्रशासनाला सॅल्युट पंढरपूर- “माऊली माऊलीच्या जयघोषात पंढरपूर दुमदुमले आहे. अक्षरशः लाखो भक्तांचा महासागर पाहून मन तृप्त झाले. पंढरपूरचा शिवाजी चौक ते  विठ्ठल मंदिर आणि चंद्रभागा नदीला आलेला…

 आषाढी एकादशी निमित्त दिव्यात रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे यांच्यावतीने रक्तदान शिबिर

 ४६ बाटल्या रक्त संकलित दिवा : आषाढी एकादशीच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे यांच्या वतीने दिवा पूर्व येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी नगर, दातिवली रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ४६ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत उत्साहाने सहभाग नोंदवला. तसेच आयोजकांच्या वतीने पहिल्या १०० रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेचे अध्यक्ष गणेश तावरे, सचिव अंकुर मुंडे, तसेच प्रकल्प प्रमुख नंदकुमार किणे आणि  विकास गुंजाळ (सी.ए) यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यावेळी साईनाथ म्हात्रे, स्वप्नील गायकर, महेंद्र दळवी, आदित्य पाटील, किशोर पाटील, प्रतीक बेडेकर, डॉ. पराग जोशी हे मान्यवर उपस्थित होते.  आषाढी एकादशीच्या दिवशी रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याचे आयोजन करून रोटरी क्लबने समाजासमोर सेवा आणि मानवतेचा आदर्श ठेवला. उपस्थितांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

 डोंबिवलीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात

 तब्बल १८५१ नागरिकांनी घेतला शासकीय योजनांचा लाभ ठाणे : अशोक गायकवाड राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाच्या धोरणानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.२५ जुलै २०२६ रोजी डोंबिवली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली पूर्व येथील ब्राह्मण सभा हॉल येथे सकाळी १० वाजेपासून आयोजित करण्यात आलेल्या या शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात तब्बल १ हजार ८५१ लाभार्थ्यांनी विविध शासकीय दाखले व योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतला.आमदार १४३ डोंबिवली विधानसभा मतदारसंघ तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र दत्तात्रय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. कल्याण उपविभागीय अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, कल्याणचे तहसीलदार विकास गारूडकर, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शासकीय योजनांचा लाभ थेट सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांपर्यंत सहजतेने पोहोचावा, या मुख्य उद्देशाने आयोजित या शिबिरात दिवसभरात विविध सेवांचे जलद गतीने वाटप करण्यात आले. यामध्ये शैक्षणिक व प्रशासकीय कामांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या इतर विविध प्रमाणपत्रांचा ४१७ नागरिकांनी लाभ घेतला. तर राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणानुसार ३१६ महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.त्याचप्रमाणे, २०८ नागरिकांना डिजिटल ७/१२ उतारे, १७७ जणांना आयुष्मान भारत कार्ड, १४५ जणांना उत्पन्न प्रमाणपत्र, १२८ जणांना अधिवास प्रमाणपत्र (डोमासाईल), १०७ जणांना जातीचे प्रमाणपत्र, ८२ ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, आणि ७४ जणांना रहिवासी दाखले प्रदान करण्यात आले. याशिवाय ५६ जणांना नॉन-क्रिमीलेअर दाखले, ४४ नागरिकांना आधार नोंदणी व दुरुस्ती सुविधा, २७ जणांना नवीन शिधापत्रिका (राशन कार्ड) आणि १७ जणांना गावठाणातील स्वामीत्व योजनेअंतर्गत सनद वाटप करण्यात आले.सामाजिक कल्याण व निवृत्तीवेतन योजनांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे १७, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे ७ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे ५ लाभार्थी लाभान्वित झाले. पारंपारिक व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी कुंभार समाजातील १५ व्यक्तींना व्यावसायिक सवलतीचे दाखले वाटप करण्यात आले. तसेच ६ जणांना जिवंत सातबारा मोहिमेचा लाभ मिळाला, तर ३ प्रकरणात कमी-जास्त पत्रके तयार करून नोंदी अद्ययावत करण्यात आल्या.नागरिकांना एकाच छताखाली आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने सर्व शासकीय सेवा व दाखले उपलब्ध करून देण्यात आले. महसूल विभागाच्या या धोरणात्मक सुधारणांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी हे विशेष समाधान शिबिर अत्यंत प्रभावी ठरली आहे. 0000

दिव्यातील ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

दिवा : दिवा येथील ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा पवित्र सण अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे विश्वस्त महेंद्र दळवी सर यांच्या हस्ते पालखी पूजनाने…

 कल्याणमधील फडके मैदानात तरुणाई एकवटली

– दिल्लीतील लाठीचार्जचा केला निषेध  धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केला जल्लोष कल्याण : दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या आंदोलनात कल्याणमध्ये फडके मैदानात तरुणाई एकवटल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विद्यार्थी, तरुण आणि त्यांचे पालक देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त येताच आंदोलनस्थळी एकच जल्लोष करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातून सर्वच भागातून या आंदोलनासाठी तरुण सहभागी झाले होते. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशभर संतापाची लाट उसळली आहे. “एका प्रधानासाठी संपूर्ण देशाला सरकारने वेठीस धरले आहे,” अशी टीका आंदोलनकर्त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्याच नव्हे, तर देशातील सर्वसामान्य नागरिकांच्याही भावना तीव्र असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. तर या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांनी देखील पाठींबा दर्शविला. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गट, शिवसेना शिंदे गटातील काही लोकप्रतिनिधी देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. तर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान या आंदोलनात घुसलेल्या काही असामाजिक घटकांनी काही पत्रकारांना मारहाण केल्याची घटना घडली. ०००००

पालकमंत्री नितेश राणेंमुळेच ८६ कोटींची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात

 जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे वक्तव्य ३५ हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ सिंधुदुर्ग | राजन चव्हाण पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सन २०२५-२६ च्या आंबा…

 शासनाच्या निधीचा अनियमिततेमुळे म्हसा आरोग्य केंद्र बिनकामाचा?

 आदिवासींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम.. दखल घेण्याची काळाची गरज… राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील नऊआरोग्य केंद्रा पैकी सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या म्हसा आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या आदिवासी बांधवाची पायपीट होऊ नये यासाठी शासनाने सन २०२२ मध्ये पाटगाव परिसरातील चाफेवाडी,गेटाची वाडी,बाटलीची वाडी.वाघाची वाडी अशा सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या आदिवासी बांधवांना स्थानिक ठिकाणी उपचार मिळावेत यासाठी सुमारे एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च करून बांधलेले आरोग्य केंद्र ,गेल्या तीन वर्षांपासून धुळखात पडले असल्याने हजारो आदिवासी बांधवांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने आरोग्य विभागाचे कारभारावर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तालुक्यातील म्हसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्रात सुमारे सत्तर हजार लोकसंख्या असल्याने त्यांना छोट्या मोठ्या आजारावर उपचार घेण्यासाठी म्हसा आरोग्य केंद्रात धाव घ्यावी लागते.त्यामुळे छोटे मोठे अपघात, सर्पदंश तसेच गर्भवती महिलांना तातडीचे उपचार वेळीच मिळत नसल्याने काहीना उपचारा अभावी आपला जीव गमवावा लागला आहे.यावर पर्याय म्हणुन शासनाने पाटगाव परिसरातील अनेक आदिवासी वाड्या वर वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांना तात्काळ उपचाराची सुविधा मिळण्यासाठी तेथे सुमारे एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च करून प्रशस्त असे आरोग्य केंद्राची उभारणी केली.त्या ठिकाणी लाईट , पिण्याचे पाणी.तसेच डॉक्टर आणि कर्मचारी यांचे निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली.तसेच त्या आरोग्य केंद्रात लागणाऱ्या मशिनरी पुरविल्या परंतु आरोग्य विभाग हे केंद्र सुरू करण्यात उदासीनता दाखवत असल्याने.सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने मलेरिया टायफॉइड तसेच इतर आजारांनी डोके वर काढल्याने अनेक नागरिकांना त्याची बाधा झाली असुन ते आपल्या शेजारी मोफत उपचार मिळण्यासाठी बांधण्यात आलेले आरोग्य केंद्र धुळखात पडले असल्याने सुमारे पाच ते सात किलोमीटर ची पायपीट करून म्हसा येथे मोफत उपचारासाठी येतात,परंतु तेथे ही डॉक्टर नसल्याने खाजगी उपचार घेण्यासाठी भटकंती करत असल्याचे वास्तव समोर येत आहे. या बाबतीत आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.. कोट पाटगाव येथील आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन ते तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच तालुका आरोग्य दोनअधिकारी यांनी वेळोवेळी वैद्यकीय अधिकारी.प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसा यांना दिलेले आहेत. त्यांनी अजुन ते सुरू का केले नाही,याचा लेखी खुलासा मागविण्यात येत आहे.  —-डॉ.श्रीधर बनसोडे.तालुका आरोग्य अधिकारी.पं. समिती मुरबाड. ००००००००००

आखाड्यांना त्यांच्या पारंपरिक जागा तातडीने द्याव्या’

– सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीत साधू-महंतांची मागणी हरिभाऊ लाखे नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध आखाड्यांच्या साधू-महंतांनी कुंभमेळा प्रशासनाकडे साधुग्राम आणि कुंभग्रामसाठी जागा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केल्याची माहिती राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते संजयदास महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयातील सभागृहात सोमवारी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निर्मोही आखाड्याचे महंत तथा राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते संजयदास महाराज यांनी पत्रकार परिषद घेत कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीत निर्वाणी, निर्मोही आणि दिगंबर आखाड्यांच्या महंतांनी आपल्या पारंपरिक जागा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात, तसेच या जागांवर अतिक्रमाणे असल्यास ती तातडीने हटवून आखाड्यांना जागा ताब्यात देण्यात यावीत, अशी आग्रही मागणी करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते संजयदास महाराज यांच्यासह महंत मोहनदास महाराज (खाकी आखाडा), रामजीदास महाराज (निर्मोही आखाडा, चित्रकूट), महंत राजेंद्रदास महाराज (महामंत्री, आखाडा परिषद), मुलीदास महाराज (निर्वाणी आणि आखाडा), भक्तीचरणदास महाराज (पंचवटी, नाशिक), हेमंतदास महाराज (हनुमान गढी, अयोध्या) आदी उपस्थित होते. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण ३१ ऑक्टोबर रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती साधू-महंतांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे साधू-महंतांच्या मागणीनुसार पारंपरिक जागा उपलब्ध झाल्यास आखाड्यांचे निवास आणि धार्मिक कार्यक्रम सुव्यवस्थितपणे पार पडतील, असा विश्वास साधू-महंतांनी व्यक्त केला. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाने साधू-महंतांसोबत बंद दाराआड चर्चा केली. यावेळी साधू-महंतांनी साधुग्राम उभारणी व साधू-महंतांच्या सुरक्षेविषयी प्रशासनाकडून काय तयारी सुरू आहे? याविषयी माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. ०००००००००