Category: महाराष्ट्र

Maharashtra News

चांदवडनजीक भीषण बस अपघात

नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगाव-चांदवड दरम्यान सकाळी पावणे दहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एसटी बसमधील चार प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही बस जळगावहून वसईकडे निघाली…

‘कातील पंजा’ तुमची कमाई लुटणार- मोदी

लातूर : काँग्रेसच्या ‘कातील पंजाची’ नजर आता तुमच्या आजच्या संपत्तीवरच नाही तर भविष्यात तुम्ही तुमच्या मुलांसाठी सोडून जाणाऱ्या संपत्तीवरही आहे. जर तुमच्याकडे दहा एकर शेती असेल तर त्यातील पाच एकर शेती काँग्रेस हडपणार आणि त्यांच्या व्होट…

होय ! माझा आत्मा अतृप्त आहे

शरद पवरांचा मोदींवर पलटवार शिरुर: पंतप्रधान मोदी यांचा हल्ली माझ्यावर फार राग आहे. एकेकाळी माझे कौतुक करताना त्यांना माझे बोट धरून राजकारणात आलो होतो असे अभिमानाने सांगितले होते  मात्र, आता ते बोलत आहेत…

दहा माओवाद्यांना छत्तीसगडमध्ये खात्मा

छत्तीसगढ : छत्तीसगडमधिल अबुझमाड मध्ये सुरक्षा दलानी दहा  माओवाद्यांचा चकमकीत खात्मा केला आहे. मृतांच्या संखेत आणखी वाढ होण्याची शक्यता सुरक्षा दलाच्या जवानांकडून व्यक्त करण्यात आलीय. या चकमकीत घटनास्थळी ३ महिलांसह एकूण १० माओवाद्यांचे मृतदेह…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले अभिवादन

रत्नागिरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उप जिल्हाधिकारी मारुती बोरकर, रोहयो उप जिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनीही अभिवादन केले.

‘जनतेच्या प्रगतीचा मोदी पॅटर्न,बाकी सगळे पॅटर्न भंगारात’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डागली विरोधकांवर तोफ लातूर : काँग्रेसने देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केला होता पण गेली दहा वर्ष देशात देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा आणि प्रगतीचा मोदी पॅटर्न चालत आहे. बाकी सगळे पॅटर्न भंगारात गेलेत अशी तोफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर डागली. महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी लातूर येथील गरुडा चौक येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लातूरची जनता आतुर दिसत आहे. आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा न करता इथे मोठा जनसागर लोटला आहे. काँग्रेसचा पारंपरिक गड दहा वर्षांपूर्वीच लातूरकरांनी उद्धवस्त करून टाकला. महायुतीचा प्रगतीचा नवा पॅटर्न मतदारांनी सेट केला आहे. आता लातूर जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे प्रचंड मताधिक्यांनी विजयी होतील. मेरे शरीर का हर कण मेरे समय का हर क्षण देश को समर्पित है, असे पंतप्रधान आपल्याला सांगतात. ते खरे असून त्याचा आपण दहा वर्षे अनुभव घेतला आहे. २०-२० तास काम करणारे आपले नेतृत्व आहे. त्यांची ऊर्जा ईश्वरी कृपा असून त्यांच्याकडून ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, असे मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेसवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्याकडे व्हिजन आहे. त्यांच्याकडे मतांचे राजकारण आहे. आपल्याकडे देशाच्या विकासाचा रोड मॅप आहे. त्यांच्याकडे रोडवर फिरून देखील लॉन्च न होणारा युवराज आहे. आपल्याकडे समृद्धीची धोरणे आहेत. त्यांच्याकडे न उगवणारे बेरनं आहे, असा टोला लगावला. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी टू जी स्कॅम, स्पेस घोटाळा, कोळसा घोटाळा, नॅशनल हॅराल्ड स्कॅम अशी घोटाळ्यांची मालिका ऐकत होतो. आता केंद्र सरकारच्या योजनांचा बोलबाला ऐकतो आहोत. त्यामुळे खरी गरिबी हटविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे काम सुरु आहे. लातूरला दुष्काळमुक्त करण्यासाठी अनेक सिंचनाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पाण्यासाठी आता जनतेला वणवण फिरावे लागणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विरोधक संविधान धोक्यात आल्याचे बोलत आहेत. पण पंतप्रधानांनी संविधान कोणीही बदलू शकत नाही, असे सांगितले आहे. जय श्रीराम म्हटल्यावर रावणाच्या सैन्यातील राक्षसांना राग यायचा. तसाच राग आता विरोधकांना येत आहे. तेच लोक आता मुह मे राम बगल मे चुरी घेऊन फिरत आहेत. मतदार त्यांना थारा देणार नाहीत. जो राम का नहीं वो किसी काम नही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अस्थिर सरकारांमुळे देशाचे प्रचंड नुकसान आपल्या देशाने ३० वर्षे अस्थिर सरकारे बघितली आहेत. त्यांच्या काळात झालेली देशाची अधोगती आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचार बघितला आहे. अस्थिर सरकारांमुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले. परंतु, गेल्या १० वर्षांत या देशाने स्थिर सरकार बघितले आहे. देशाला स्थिर सरकारची गरज आहे. स्थिर सरकार देण्याची ताकद फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनगटात आहे. त्यांचा उद्देश जनतेची आणि देशाची सेवा करण्याचा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रात अतृप्त आत्मा ते गुजरातमध्ये स्रीयांच्या अब्रुचे लुटेरे

निवडणूकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांचे शा‍ब्दिक वार पुणे :  महाराष्ट्रात निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून आरोप प्रत्यारोपांचा अक्षरशा धुराळा उडाला आहे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी लाखोंच्या गर्दीपुढे सभा गाजवताना…

अजित पवार धमकी बहाद्दर- संजय राऊत

नाशिक : अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहाद्दर अशी झाली आहे. रोज उठून ते सध्या मतदारसंघात 10 लोकांना धमक्या देतात, अशी जोरदार टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केली…

सहा कोटी मराठ्यांची आता ९ एकरात सभा घेणार- जरांगे

आंतरवाली सराटी: मराठा आरक्षणासाठी आणि सगेसोयऱ्यांच्या आग्रहासाठी सहा कोटी मराठ्यांची आता ९ एकरात सभा घेणार आहे यासाठी येत्या १ मेला नारायण गडावर आमची बैठक होणार आहे. या बैठकीची संपूर्ण महाराष्ट्रात तयारी सुरु आहे, असे…

‘घोषणा करतात ४०० पारची, चर्चा काँग्रेसच्या जाहीरनाम्याची’

चव्हाणांचा भाजपावर हल्लाबोल  सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या प्रचारात ४०० पारचा नारा देतात आणि संपुर्ण भाषणात काँग्रेसच्या जाहीरनाम्यांची चर्चा करतात अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर केली.…