Category: महाराष्ट्र

Maharashtra News

शेतकऱ्यांच्या मदतीला आता ‘बळीराजा मदतवाहिनी’

हरिभाऊ लाखे नाशिक : शेतकऱ्यांना फसवणुकीच्या तक्रारी करता याव्यात, यासाठी बळीराजा ही मदतवाहिनी कार्यान्वित करण्यात येत आहे. सद्यस्थितीत आर्थिक गुन्हे शाखा यासंदर्भातील तक्रारी जमा करत यावर काम करत आहे. केवळ नाशिक जिल्ह्यातून ९०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून फसवणुकीचा आकडा ४२ कोटींच्या घरात आहे. यातील एक कोटी रुपये शेतकऱ्यांना परत देण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे वाढते प्रकार पाहता कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. द्राक्ष, टोमॅटो, कांदा उत्पादकांची बऱ्याचदा परप्रांतीय तर, कधी स्थानिक व्यापाऱ्यांकडून फसवणूक होते. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या मालाला पैसे देण्याचा वायदा होतो. परंतु, आश्वासन न पाळता संशयितांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते. शेतकऱ्यांच्या बांधावर द्राक्ष खरेदीच्या वेळी भाव, वजन अशा वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक करण्यात येत असते. शेतकऱ्यांची होणारी ही अडवणूक लक्षात घेता याआधी जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पुढाकार घेतला होता. यानंतर काही काळ काम थंडावले. मात्र मागील आठवड्यात कृषि मंत्री कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा शेतकरी फसवणुकीचा विषय चर्चेत आला. फसवणूक झाल्यावर शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी नाशिक जिल्हा पोलिसांच्या वतीने बळीराजा ही मदतवाहिनी सुरू करण्यात येत आहे. तत्पूर्वी आर्थिक गुन्हे शाखेकडे फसवणुकीचे तक्रार अर्ज मागवण्यात येत आहेत. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातून ९०० हून अधिक तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील १०० शेतकऱ्यांची पोलिसांनी प्रत्यक्ष भेट घेत काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या बैठका घेत प्रबोधन करण्यात येत आहे. याविषयी कृषी, पणन, द्राक्ष बागायत संघ आदींशी पत्रव्यवहार करुन आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. परप्रांतीयांना वचक नाशिक जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या तक्रारी २०१४ पासूनच्या आहेत. फसवणुकीचा आकडा हा ४२ कोटींच्या घरात आहे. यात संशयितांकडून ९० लाखांहून अधिक वसूल केले आहेत. काही पैसे लवकरच परत मिळतील. परप्रांतीय व्यापारी किंवा अन्य व्यापाऱ्यांना जिल्ह्यात कृषिमालाची खरेदी करायची असेल तर त्यांनी द्राक्ष बागायतदार संघाकडे नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी एखादा व्यापारी माल खरेदीसाठी आला तर त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी. जेणेकरून त्याची तपासणी करुन त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती मिळवली जाईल. या सक्रियतेमुळे फसविण्याच्या उद्देशाने येणारे परप्रांतीय व्यापारी सावध झाले आहेत. – रवी मगर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा)

मुंबई महानगरक्षेत्रात केबल कार प्रकल्पासाठी नितीन गडकरींना भेटणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर नवी दिल्ली येथे ७ जानेवारी रोजी होणाऱ्या विकसित भारत २०४७ या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या लक्षप्राप्तीच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्व राज्यांच्या…

महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक स्थळांसाठी भरीव तरतूद करा – खासदार नरेश म्हस्के

अनिल ठाणेकर नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्याला समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा वारसा लाभलेला आहे. मात्र महाराष्ट्रातील काही महत्वपूर्ण स्थळांचा राष्ट्रीय विकासकामांमध्ये अद्याप समावेश झालेला नाही. महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि धार्मिक…

चोरी गेलेलं बाळ आईच्या कुशीत

बाळ शोधण्यात नाशिक पंचवटी पोलिसांना यश   हरिभाऊ लाखे नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी धक्कादायक घटना उघडकीस आली. अवघ्या पाच दिवसांपूर्वी जन्मलेल्या बाळाच्या मातेशी ओळख वाढवत संशयित महिलेने ऐन…

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ६ जानेवारीला – शुभांगी साठे

  अशोक गायकवाड रत्नागिरी :जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे जानेवारी२०२५ चा लोकशाही दिन सोमवार दि. ६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात १…

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महोत्सवामधून चालना- कीर्ती किरण पुजार

अशोक गायकवाड रत्नागिरी : मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्याचबरोबर त्यांचा बौधिक, शारीरिक, मानसिक असा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवासारखे महोत्सव उपयुक्त आहेत, असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचा शुभारंभ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून आज छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे करण्यात आला. यावेळी बाल कल्याण समिती सदस्य ॲड रजनी सरदेसाई, ॲड प्रिया लोवलेकर, शिरीष दामले, बाल न्याय मंडळ सदस्य ॲड विनया घाग, राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश खैरमोडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रुपेश पेडणेकर, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु श्रीरंग कद्रेकर, लांजा संस्थेच्या संचालक मंगला नाईक आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार म्हणाले, मुलांचा केवळ बौध्दिक विकास करुन चालणार नाही, तर त्याबरोबरच शारीरिक मानसिक विकासासाठी त्यांच्यामधील कला, क्रीडा, कौशल्य अशा सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे. त्यासाठी जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन केले आहे. भविष्यातील सुदृढ आणि सक्षम पिढी घडविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. विद्यार्थ्यांनी अशा महोत्सवांमध्ये सहभागी व्हावे. त्यामधून जीवनात उज्ज्वल यश संपादन करा. जिल्हा माहिती अधिकारी सातपुते म्हणाले, मन, मनगट आणि मेंदूचा विकास होण्यासाठी मैदानाशिवाय पर्याय नाही. प्रत्येकांमध्ये लपलेल्या कलागुणांना बाहेर काढण्याची एकमेव जागा म्हणजे विविध महोत्सव होय. अशा महोत्सवांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण, क्रीडा कौशल्य आर्वजून सादर करावीत. त्यामध्येच भविष्यातील बीजे रोवलेली असतात. प्रास्ताविकेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हावळे म्हणाले, जिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये पुर्नवसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांमध्ये बंधुभाव, सांघिक भावना व नेतृत्व गुण निर्माण होण्याच्या दृष्टीने दरवर्षी चाचा नेहरु बाल महोत्सव आयोजित केला जातो. यामध्ये ५०० मुला मुलींनी सहभाग घेतला आहे. क्रिकेट, खो खो , कबड्डी अशा क्रीडा प्रकाराबरोबरचे निबंध, चित्रकला, सामुहिक गायन, नाटिका अशा सांस्कृतिक स्पर्धाही होणार आहेत. रोटरी क्लबच्यावतीने यावेळी ४० ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिविक्षाधीन अधिकारी अनिल माळी यांनी स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, चाचा नेहरु आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दीपप्रज्ज्वलन करुन करण्यात आली. जिल्हा परिविक्षाधीन अधिकारी अतिश शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अॕड योगेंद्र सातपुते यांनी केले.

रत्नागिरीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या शतक महोत्सवी सोहोळ्याचे  शानदार उद्घाटन

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय या प्रशालेचा शतक महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री मान.  श्रीपादजी नाईक यांच्या  उपस्थित पार पडला. भविष्यात गुणवत्ताधिष्टित  शिक्षणासाठी शिक्षण पद्धतीत बदल केले जात…

नाशिकमधून 4763 टन द्राक्ष निर्यात

 हंगामास सुरुवात, राज्यात 37 हजार 732 शेतकऱ्यांकडून निर्यातीसाठी नोंद   हरिभाऊ लाखे नाशिक : निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षाच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे. युनायटेड अरब, रशिया, सौदी अरेबिया, मलेशिया, सिंगापूर, ओमान या देशामध्ये 312 कंटेनरमधून 4763 टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने जगाला भुरळ घालणाऱ्या नाशिकच्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली असून, निर्यातीचे कंटेनर रवाना झाला आहे. याबाबत द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी माहिती दिली की, यंदा या द्राक्ष पिकाला अवकाळी व थंडीचा फटका बसल्यामुळे द्राक्ष निर्यातीवर परिणाम झाला आहे. युरोपीय देश वगळता गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 138 कंटेनर या द्राक्षांच्या हंगामात कमी निर्यात झाली आहे. यंदा महाराष्ट्रामधून 37 हजार 732 शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंद केली असून, मार्च 2025 पर्यंत मुदत असल्याने यात वाढ होणार आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त द्राक्ष निर्यातीसाठी द्राक्षांची नोंद करावी आणि ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार औषधांची फवारणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे करण्यात आले आहे. द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. सन 2023-2024 हंगामात तब्बल 3 लाख 43 हजार 982 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून 3460 कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. नाशिकच्या द्राक्षांना जागतिक बाजारात स्थान गुणवत्ता वाढली तरी द्राक्षाच्या देशांतर्गत बाजारातील तसेच निर्यातीच्या बाजारातील असुरक्षितता मात्र कायमच आहे. सततचे प्रतिकूल वातावरण, वाढता उत्पादन खर्च आणि मजूरटंचाई या अडथळ्यांवर मात करीत जिद्दी द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीची झेप उंचावतच ठेवली आहे. गोड चवीच्या रसाळ व करकरीत द्राक्षांनी गुणवत्तेच्या जोरावर जागतिक बाजारात स्थान निर्माण केले आहे. 0000

 सिंहस्थ कुंभमेळा आराखडा अंतिम करण्याची गरज

 सुजाता सौनिक यांची सूचना   हरिभाऊ लाखे नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक त्या कामांचे सुक्ष्म नियोजन करून अंतिम आराखडा तयार करावा, प्रयागराजला भेट देऊन स्थानिक अधिकाऱ्यांनी कुंभमेळ्याच्या तयारीचा अभ्यास करावा, शहरातील गोदावरीचा काठ हरित करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, अशा विविध सूचना राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या. मुंबईत मुख्य सचिव सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा तयारी आणि नाशिकशी संबंधित विविध विषयांवर बैठक झाली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्यास आता केवळ दोन वर्षाचा कालावधी बाकी आहे. सरकारने कुंभमेळा नियोजनासाठी जिल्हा ते राज्य स्तरापर्यंत समित्या स्थापन केल्या आहेत. नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर पालिकेसह अन्य विभागांनी कुंभमेळ्याच्या दृष्टीने आराखडे तयार केले आहेत. सिंहस्थासाठी आवश्यक कामांचे सुक्ष्म नियोजन करून कुंभमेळा आराखडा अंतिम करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे ३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी  दरम्यान कुंभमेळा होत आहे. काही विभागातील अधिकाऱ्यांनी तिथे भेट देऊन अभ्यास करावा, असे सौनिक यांनी सूचित केले. नाशिकमध्ये साधुग्रामसाठी तपोवन परिसरात ३१८ एकर जागा निश्चित केलेली आहे. सिंहस्थ कालावधी वगळता उर्वरित ११ वर्षात या जागेचा कुठलाही वापर होत नाही. या जागेचा उपरोक्त काळात कसा वापर करता येईल याचा विचार करण्यास सौनिक यांनी सांगितले. गोदावरीचा नदीकाठ परिसर हिरवागार कसा करता येईल, यावर लक्ष देण्यास सांगण्यात आले. महापालिकेने नमामि गोदा प्रकल्पाचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला आहे. राज्य सरकारकडून त्याचा पाठपुरावा करण्याचे मान्य करण्यात आले. गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासंबंधीच्या नियोजनावर चर्चा झाली. शहरात मेट्रोनिओसह इलेक्ट्रिक मेट्रोवर चर्चा होत आहे. शहराच्या दृष्टीने कोणता प्रकल्प योग्य ठरू शकतो, याचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले. ०००००

नाशिक महापालिकेची ऐतिहासिक वसुली

मालमत्ता कर संकलनात २०० कोटींचा टप्पा पार   नाशिक : महापालिकेने डिसेंबर अखेरपर्यंत मालमत्ता कर वसुलीत प्रथमच २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आजवरच्या इतिहासात नऊ महिन्यांत इतकी वसुली कधीही झालेली नाही. थकीत घरपट्टीच्या वसुलीसाठी महापालिकेने राबविलेल्या अभय योजनेतून ५० कोटींची वसुली झाली. कर संकलन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या अखेरीस मालमत्ता कर वसुलीत नऊ महिन्यात पहिल्यांदा २०२ कोटींचा गप्पा गाठला गेला. २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी २५० कोटींचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात हे लक्ष्य तेवढेच होते. तेव्हा डिसेंबरअखेरपर्यंत १५२ कोटींची वसुली झाली होती. यंदा मात्र आजवरचे सर्व विक्रम मोडून काढत वसुलीत लक्षणीय यश मिळाले. शहरातील सहा विभागात साडेपाच लाखहून अधिक मालमत्ता आहेत. मालमत्ता कराच्या २७२ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने मध्यंतरी अभय योजना जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात थकबाकी एकरकमी भरणाऱ्यांना दंडातून ९५ टक्के माफी देण्यात आली. या योजनेतून ५० कोटींची वसुली झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. एप्रिल ते डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत मालमत्ता करापोटी २०२ कोटींचे संकलन करण्यात आले. मागील आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत एकूण २०७ कोटींची वसुली झाली होती. गतवर्षी याच काळात संकलित झालेल्या रकमेच्या तुलनेत ही वसुली ५० कोटींनी अधिक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. चालू आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे मालमत्ता कल संकलनाची आकडेवारी आणखी वाढणार आहे. 00000