Category: महाराष्ट्र

Maharashtra News

गडचिरोलीच्या दुर्गम भागात पहिल्यांदाच मतदान केंद्र

६०० सुरक्षा जवानांनी केलं मतदान गडचिरोली : लोकशाहीतील सर्वात मोठ्या पर्वाला सुरुवात होण्यास आता केवळ चार दिवस उरले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल भागात कर्तव्यपथावर असलेल्या सुरक्षा…

विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सांगली : गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. सांगलीची जागा महाविकास आघाडीने अधिकृतरीत्या शिवसेनेला सोडली. मात्र यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता विशाल…

पैलवान चंद्रहार पाटीलांचे सांगलीकरांना भावनिक आव्हान

सांगली :  ” मान्य आहे माझ्याकडे कारखाना नाही, मी माजी मुख्यमंत्र्यांचा नातू नाही. महाराष्ट्रातील मी एकमेव उमेदवार असेन ज्याची उमेदवारी चार वेळा जाहीर होऊनही मविआ मधील काही घटक पक्ष अजूनही आमच्या पासून लांब आहेत.माझी…

विनायक राऊतांचे डिपॉझिट जप्त करणार-नारायण राणे

सिंधुदुर्ग: आयुष्यात सगळी पदं ही रेकॉर्ड ब्रेक करून मिळवली आहेत, यंदाच्या लोकसभा निवडणूकीत शिल्लक सेनेच् विनायक राऊतांचे डिपॉझिट जप्त करून तब्बल अडीच लाख मताधिक्यांने विजय अपेक्षित असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे…

मोदींना रोखणे ही देशाची गरज- पवार

सातारा – नरेंद्र मोदींची हुकमशाही रोखणे ही देशाची गरज आहे. एक एक जागा निवडून आणण्यासाठी इंडिया आघाडी काम करतेय. मोदींची एक एक जागा कमी करणे, मोदींची संसदेतील संख्या कमी करणे, त्यांची शक्ती कमी करणं ही आता…

दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही-एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी : नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसल्याची माहिती ४६- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

कोल्हापूरकरांची पूर चिंता कायमची मिटणार

महायुतीच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांची घोषणा प्रकल्पासाठी ३५०० कोटींचा कृती आराखडा कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणारा ३५०० कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारने मंजुर केला असून त्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे कोल्हापूरकरांची महापुराची चिंता कायमची मिटणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदार संघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी आयोजित केलेल्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रिफ, मंत्री शंभुराज देसाई आदी महायुतीचे नेते उपस्थित होते. कोल्हापूर शक्तिपीठ महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहे. ही निवडणूक एका व्यक्तीची नाही आणि एका मतदारसंघाची देखील नाही तर ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणारी निवडणूक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर आपण वेगळे लढत असलो तरी या निवडणुकीत राष्ट्रभक्ती आणि देशाचा विकास डोळ्यासमोर एकजुटीने लढायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्था केवळ मजबूत केली नाही तर ११ व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आणली. आता भारताला तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे जगभरात भारताचा मानसन्मान वाढला आहे. राज्यातील महायुतीचे सरकार झपाट्याने काम करत आहेत. हे सरकार घरात बसणारे, फेसबुकवरुन काम करणारे सरकार नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा, शासन आपल्या दारी असे अनेक निर्णय महायुती सरकारने घेतले. कोल्हापुरकर शब्दाला पक्के आहेत. ते महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पंचगंगेचे प्रदूषण थांबवल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी राज्य सरकारने ३२०० कोटींचा प्रकल्प तयार केला आहे. कोल्हापुरातील महापुर निवारण्यासाठी ३५०० कोटींचा आरखडा शासनाने मंजूर केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विरोधक पंतप्रधान मोदींचा व्देषाने पिडीत आहे. २०१४ आणि २०१९ प्रमाणेच २०२४ च्या निवडणुकीत जनता विरोधकांचा सुपडा साफ करेल. संविधान बदलणार अशी ओरड करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री शिंदे यांनी परखड शब्दांत सुनावले. ६० वर्षे सत्तेत असताना काँग्रेसला कधी संविधान दिन साजरा करण्याचे सुचले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ पासून संविधान दिन सुरु केला. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोवर संविधान कधीही बदलणार नाही, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लोटला जनसागर कोल्हापुरात ४२ डीग्री तापमान असून देखील महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीचा अलोट महासागर आज कोल्हापुरकरांनी पहिल्यांदा बघितला असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोल्हापुरातील मुख्य रस्ते, गल्ली, बोळ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ओसंडून वाहत होते.

चंद्रपूरमध्ये महाप्रसादातून 100 जणांना विषबाधा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात महाप्रसादतून 100 जणांना विषबाधा झाली आहे. भद्रावती तालुक्यातल्या माजरी गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर मंदिरात भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, महाप्रसाद घेतल्यानंतर जवळपास 100 जणांना त्रास सुरु झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. रामप्रेक्ष यादव असे…

माढ्यासाठी फडणवीस क्शन मोडमध्ये

पंढरपूर: माढा मतदारसंघात शरद पवारांनी विजयसिंह मोहीते पाटील यांना राष्ट्रवादीत दाखल करून घेतल्यामुळे मतदार संघाचे बिघडलेले गणित सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मोहिते-पाटलांच्या जाण्यामुळे माढ्यात होणारे नुकसान भरुन…

बाबासाहेबांचा पराभव करणारेच त्यांच्या नावाने मत मागतायत

अमित शाहांचा काँग्रेसवर घणाघात भंडारा : अवघा देश आज बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती साजरी करत आहे. या महामानावाचा निवडणूकीत पराभव करण्यासाठी त्यावेळी ज्या काँग्रेसने जंग जंग पछाडले आज तीच…