Category: मुंबई

Mumbai news

सेवाभावाने मंत्रिपदाची दुसरी इनिंग सुरू-  मंगल प्रभात लोढा

मुंबई : मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी आज पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. आपल्या संस्कृतीच्या रक्षणार्थ आणि सन्मानार्थ लोढा यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. पुन्हा एकदा मंत्री पदी निवड करून महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी, केंद्रीय गृहमंत्री मा अमित शाह जी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा जे पी नड्डा जी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीसजी यांचे, मंगल प्रभात लोढा यांनी याप्रसंगी आभार मानले आहेत.…

 उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य

 आमदार संजय उपाध्याय यांची ग्वाही   मुंबई : उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करीन आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे या भव्य पत्रकार भवनाचे भूमिपूजन आणि उद्घाटन आपणच करु, अशी निःसंदिग्ध ग्वाही बोरीवली चे आमदार संजय उपाध्याय यांनी दिली.  महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि बोरीवली मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने संजय उपाध्याय हे निवडून आले. संजय उपाध्याय यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात राज्य अधिस्वीकृती समितीच्या सदस्या आणि बोरीवली येथील पत्रकार नेहा पुरव यांनी भेट घेतली त्यावेळी बोरीवली येथे आमदारांनी पत्रकारांशी संवाद साधावा अशी सूचना केली होती. त्याप्रमाणे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कोषाध्यक्ष आणि दैनिक भास्कर चे विशेष राजकीय प्रतिनिधी विनोदकुमार यादव यांना आमदार संजय उपाध्याय आणि पत्रकार यांच्या मध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली. बोरीवली पश्चिम येथील एका हॉटेलमध्ये पत्रकारांसमवेत संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उत्तर मुंबई पत्रकार संघाचे सरचिटणीस आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी परखडपणे भूमिका मांडतांना सांगितले की, लोकप्रतिनिधींनी दिलेल्या वेळेत येण्याची गरज आहे. पत्रकारांना गृहीत धरण्यात येऊ नये. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय वैद्य यांच्या नेतृत्वाखाली २०११ साली दहिसर, बोरीवली, कांदिवली, चारकोप, मालाड आणि मागाठाणे या सहा विधानसभा मतदारसंघ म्हणजे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ या क्षेत्रातील सर्व भाषिक पत्रकारांसाठी उत्तर मुंबई पत्रकार संघ स्थापन करण्यात आला. हा संघ नोंदणीकृत सुद्धा आहे. सुमारे दीडशे दोनशे पत्रकार या क्षेत्रात कार्यरत आहेत. या पत्रकारांसाठी एक पत्रकार भवन उभारण्यात यावे. ही भव्य वास्तू सभागृह, समिती कक्ष, उपहारगृह, कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पत्रकारांसाठी वास्तव्य करण्याची व्यवस्था, बॅंक आदी सुविधांनी सुसज्ज असावी, अशी आमची मागणी आहे. डॉ. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री असतांना राज्य सरकारने सर्व जिल्ह्यात पत्रकार भवन उभारण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला होता. मुंबई शहर जिल्ह्यात मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर भव्य पत्रकार भवन आहे. मात्र मुंबई उपनगरात असे भवन नाही. उत्तर मुंबई पत्रकार संघाने तत्कालीन खासदार गोपाळ शेट्टी यांना या मागणीचे निवेदन दिले. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे पत्र लिहून आमची मागणी पुढे रेटली. जागाही आहे. आता आपण पाठपुरावा करा. आपणच भूमिपूजन करा आणि उद्घाटन आपणच करा. याचा उपयोग लोकप्रतिनिधींनाच जास्त होऊ शकतो. आमदार संजय उपाध्याय यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन म्हणजे हॉटेल घेण्याचीही गरज भासणार नाही. त्या पत्रकार भवनातच आपण भेटून संवाद साधू शकतो, असे स्पष्ट केले. उपस्थित सर्व पत्रकारांनी या भूमिकेचे स्वागत केले. आमदार संजय उपाध्याय यांच्या धर्मपत्नी सौ. नीलम संजय उपाध्याय, प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ, निरंजन शेट्टी, उत्तर मुंबई पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रवीण वराडकर, कुनेश दवे, दीपक भातुसे, मनोहर कुंभेजकर, मयुर परीख, अभय मिश्रा, राजकुमार सिंह, दत्ताराम घुगे, नीलाबेन सोनी, श्याम कदम आदी मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते. 0000

 श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंती उत्सव श्रद्धेय भक्तीभावाने संपन्न

अक्कलकोट- ‘अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री.स्वामी समर्थ महाराज की जय’ च्या जय घोषात आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने…

वटवृक्ष देवस्थान मनोभावे स्वामी दर्शन घेण्याचे स्थान – गोपीचंद पडळकर

मंत्रिमंडळातील विस्तारीकरणात पडळकर यांना मंत्री पदासाठी महेश इंगळेंनी दिल्या शुभेच्छा   अक्कलकोट-एखाद्या धार्मिक स्थळी गेल्यानंतर जेवढ्या शांततेने देवाचे दर्शन होईल तितके मन प्रसन्न होते. आज सर्व धार्मिक स्थळांवर भविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असताना दिसून येत आहे. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या नियोजनातून श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांचे शांतचित्ताने मनोभावे दर्शन घेण्याचे भाग्य भाविकांना लाभत आहे याचा विशेष आनंद आहे.  त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान म्हणजे श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेण्याचे महत्वाचे मुळस्थान असल्याचे मनोगत भारतीय जनता पार्टीचे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला व राज्य मंत्रिमंडळ विस्तारीकरणात मंत्रीपद मिळणे बाबत शुभेच्छा व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, विपुल जाधव, गिरीश पवार, अविनाश क्षीरसागर, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते. 0000

अनंत महादेव भाताडे – खो-खो क्षेत्राचा आधारस्तंभ हरपला

मुंबई: खो-खो क्षेत्रातील एक उज्वल तारा, अनंत महादेव भाताडे, यांचे १३ डिसेंबर निधन झाले. आठ दशके मैदानावर कार्यरत राहून खो-खो खेळाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. भाताडे यांनी महाराष्ट्राच्या…

१८ वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक असल्यास वाहन जप्त होणार!

मुंबई : १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक आढळल्यास जागच्या जागीच वाहन जप्त करुन पोलिसांनी ताब्यात घ्यावे, असे आदेश राज्य पोलिसांकडून नव्याने देण्यात आले आहेत. या शिवाय मालवाहतुकीसाठी २० वर्षे ही…

 घनकचरा संकलन व विल्हेवाट लावण्यासाठी मुंबईकरांवर अवाजवी आर्थिक भार कशासाठी?

 वर्षा गायकवाड यांचा सवाल   मुंबई : मुंबई महापालिकेत लोकनियुक्त सरकार नसताना भाजपा युती सरकार प्रशासकामार्फत महापालिकेची तिजोरी आपल्या कंत्राटदार मित्रांचे खिसे भरण्यासाठी रिकामे करत आहे. भ्रष्ट भाजपा युती सरकार यावर कहर करत शहरातील घनकचरा उचलण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘युजर फी’च्या नावाखाली मुंबईकरांवर नवीन आर्थिक भार टाकण्याचा प्रस्ताव आणत आहे. कचऱ्याचे संकलन करून त्याची विल्हेवाट लावणे हे मुंबई महानगरपालिकेचे बंधनकारक कर्तव्य असताना मुंबईकरांवर हा अवाजवी आर्थिक भार का लादता? असा प्रश्न विचारुन काँग्रेसचा अशा कोणत्याही प्रस्तावाला ठाम विरोध आहे, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी म्हटले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर तोफ डागत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मोदीनिर्मित महागाई आणि दरवाढीने मुंबईकर आधीच भरडला जात आहे. खाद्यतेल, किराणासह सर्व जिवनावश्यक वस्तू सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. जीएसटी सारख्या गब्बरसिंग टॅक्सने जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाईचा सामना करणाऱ्या मुंबईकरांच्या माथी आणखी आर्थिक बोजा पडला तर त्यांना ते परवडणारे नाही. कचरा संकलनासाठी नागरिकांवर अवाजवी भार लावण्याऐवजी मुंबई महानगरपालिका आणि कंत्राटदारप्रेमी भाजपा युती सरकारने व्यवस्थित घनकचरा व्यवस्थापन करण्यावर आधी लक्ष केंद्रीत करावे, असेही खासदार वर्षाताई गायकवाड म्हणाल्या. ०००००

 राष्ट्रीय लोकअदालतला उत्तम प्रतिसाद

 लघुवाद न्यायालयात २१ प्रकरणे निकाली   मुंबई : राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमांला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून १८३ पैकी २१ प्रकरणं निकालात निकाली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे. गिरगावच्या प्रसिद्ध केशवजी चाळीतील काही वर्षे प्रलंबित असलेले एक प्रकरणदेखील निकालात निघाले आहे. लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकांत एल आणेकर व अतिरिक्त मुख्य न्यायाधीश श्रीमती ए. एस. खडसे, यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे काम अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एस. एस. देशपांडे, न्यायाधीश ए. एस. पंडागळे आणि ए. जे. फटाले, वकील अस्वीनी सिंग आणि पी. पी. तवसाळकर यांनी यशस्वी केले. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन अप्पर प्रबंधक अतुल राणे आणि आर. के. कुळकर्णी तसेच कर्मचारी वृंद यांनी केले.

वरळीच्या पूनम चेंबरमध्ये आग

मुंबई : वरळीतील पूनम चेंबरमध्ये रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आग लागली. सात मजली व्यवसायिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. वरळीतील ऍनि बेझन्ट मार्गावर ऍट्रिया मॉलच्या समोर असलेल्या पूनम…

आरोग्य विभागाने केल्या वर्षभरात १,५८४ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया!

मुंबई : शहापूर तालुक्यातील दुर्गम गावातील अंगणवाडीत लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करताना सचिन कंजारा या तीन वर्षाच्या मुलाच्या ह्रदयाच्या ठोक्यात गडबड असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. या मुलाला ठाण्यातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये…