Category: मुंबई

Mumbai news

आंबेकर स्मृती मिल कामगार कॅरम स्पर्धा राकेश, विलास, अभिषेक, विशालची विजयीदौड

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघ व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्यीत कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती मिल कामगार कॅरम स्पर्धेत इंदू मिलचा राकेश कोचरेकर, एनटीसीचा विलास काळे, टाटा मिलचा अभिषेक कदम, पोद्दार मिलचा विशाल सागवेकर, आरएमएमएसचे हरीश देठे व ओमकार हडशी आदींनी विजयीदौड केली. प्रारंभापासून आघाडी घेत अचूक सोंगट्या टिपणाऱ्या राकेश कोचरेकरने इंदू मिलच्या तयलू जांबीचे आव्हान १०-४ असे संपुष्टात आणले आणि उद्घाटनीय लढत जिंकली. संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते व खजिनदार निवृत्ती देसाई यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. परेल येथील आरएमएमएस सभागृहात अप्रतिम फटक्यांची आतषबाजी करीत एनटीसीच्या विलास काळेने टाटा मिलच्या हरिहर यांना पुनरागमनाची संधीच दिली नाही. परिणामी विलास काळेने २५-४ असा विजय मिळवीत जोरदार आगेकूच केली. अन्य सामन्यात टाटा मिलच्या अभिषेक कदमने विनायक शिंदेचा १३-० असा, पोद्दार मिलच्या विशाल सागवेकरने किशोर पांचाळचा १३-४ असा, आरएमएमएसच्या हरीश देठेने इंदू मिलच्या गंगाराम गावडेचा २५-० असा तर आरएमएमएसच्या ओमकार हडशीने पोद्दार मिलच्या सुभाष घाडगेचा ११-४ असा पराभव केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, माजी प्रादेशिक संचालक प्रदिप मून, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर व सरचिटणीस गोविंदराव मोहिते आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ०००००

प्रा.  डॉ प्रमोद वानखडे यांची मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड

मुंबई : १३७ वर्ष उच्चतंत्र शिक्षणासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या माटूंगा मुंबई  येथील व्हीजेटीआय  या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये बहुजन कामगारांच्या न्याय हक्कासाठी  मागील ३० वर्षांपासून लढणाऱ्या व्हीजेटीआय मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा डॉ प्रमोद वानखडे…

 आयकर, रिझर्व्ह बँक उपांत्य फेरीत

 कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी स्पर्धा महिला गटात शिरोडकर, शिवशक्तीची आगेकूच   मुंबई –  राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित कामगार महर्षी गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिला गटात जोरदार विजयांसह डॉ. शिरोडकर, शिवशक्ती, विश्वशांती आणि स्वामी समर्थ या संघांनी उपांत्य फेरी गाठली तर पुरूषांच्या व्यावसायिक गटात आयकर विरुद्ध श्री स्वामी समर्थ, रिझर्व्ह बँक विरुद्ध रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब (आरबीएससी) अशा उपांत्य लढती रंगतील. पुरुषांच्या अ गटात विजय क्लब- लायन्स स्पोर्ट्स क्लब आणि एसएसजी फाऊंडेशन – जय भारत यांच्यात अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी संघर्ष होईल. राष्ट्रीय मिल मजदूर संघाने (आरएमएमएस)  कामगार महर्षी आंबेकरांच्या स्मृतीनिमित्त ना.म.जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यावर आयोजित केलेल्या कबड्डी महोत्सवात महिलांच्या गटात बलाढ्य शिवशक्ती महिला संघाने गोल्फादेवी प्रतिष्ठानचा ४३-७ असा धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली. विश्वशांतीनेही जिजामाता स्पोर्ट्स क्लबवर ४३-१० अशी सहज मात करीत अंतिम चार संघात आपले नाव पक्के केले. आता डॉ.शिरोडकर- स्वामी समर्थ आणि विश्वशांती- शिवशक्ती अशा तुल्यबळ उपांत्य लढती रंगतील. पुरूषांच्या व्यावसायिक गटात आरबीएससीने ओमकार, आर्यन ढवळे आणि सागर जगताप यांच्या वेगवान चढायांच्या जोरावर गंधेकर इलेक्ट्रिकलचा ४४-२० असा फडशा पाडला. तसेच रिझर्व्ह बँकेनेही ओमकार थोटे आणि संग्राम साळुंखे यांच्या तूफानी चढायांमुळे रुबी कन्स्ट्रक्शनचे आव्हान ३४-२३ असे संपुष्टात आणले. श्री स्वामी समर्थने सीबीसी संघाचा ३२-१६ असा सहज पराभव करत उपांत्य फेरी गाठली. आयकरने बीपीसीएलचा ३७-३२ असा पराभव करत सर्वांनाच धक्का दिला. पुरूषांच्या स्थानिक गटात विजय क्लबसमोर अंकूर स्पोर्ट्स क्लबचे काहीएक चालले नाही. विजयने एकतर्फी सामन्यात ४२-२८ असा विजय नोंदवत उपांत्य फेरीत धडक मारली. लायन्स स्पोर्ट्स क्लबने हर्ष मोरे आणि राज आचार्य यांच्या चढायांच्या बळावर गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबचा २८-२६ असा पराभव केला. गुड मॉर्निंगकडून साहिल राणे आणि शार्दुल पाटील यांनी संघाच्या विजयासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण ते अपयशी ठरले. तसेच जय भारतने उपांत्य फेरीत धडक मारताना बंड्या मारुतीचे आव्हान २९-१७ असे मोडीत काढले तर एसएसजी आणि श्रीराम क्रीडा मंडळ यांच्यातला थरार ३०-२७ अशा अवस्थेत संपला. अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धां उपाध्यक्ष क्रीडा प्रमुख सुनिल बोरकर यांच्या आयोजनाखाली पार पडणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे‌ सहकार्य लाभत आहे. 00000

मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या किमतीत ५५ टक्के वाढ!

मुंबई : मुंबई महानगर परिसरात परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत गेल्या काही महिन्यात झालेली घट यामागे या घरांच्या वाढलेल्या किमती एक कारण असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानगरातील घरांच्या किमतीत गेल्या पाच…

कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या

मुंबई : नाताळच्या सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाण्याचे किंवा नववर्ष गोव्याच्या किनारी, कोकणात, दक्षिण भारतात साजरा करण्याचे अनेकांचे नियोजन असते. सलग सुट्ट्यांच्या कालावधीतील गर्दी आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मध्य आणि कोकण…

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमेत 1 लाखाहून अधिक दंड वसूली

नवी मुंबई: नवी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या दृष्टीने विविध उपाय योजना राबवितांना प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिकला प्रतिबंध करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. या करिता महापालिका आयुक्त डॉ.…

‘अंतरीचे प्रतिबिंब’ला प्रथम पुरस्कार

 ‘मराठबोली’  राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा मुंबई , ‘मराठबोली, पुणे’ या संस्थेने  घेतलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत सर्व विषयांना स्पर्श करणार्‍या श्रेणीत मुंबईतील चार अंकांना प्रथम पुरस्कार मिळाला आहे. त्यात ‘सदामंगल…

मुंबई अस्वच्छ करणाऱ्यांकडू ३४ कोटी १९ लाख रुपये वसूल

मुंबई : मुंबई अस्वच्छ करणाऱ्यांकडून गेल्या आठ महिन्यांत क्लीन अप मार्शलने कारवाईचा बडगा उगारून तब्बल ३४ कोटी १९ लाख रुपये दंड वसूल केला आहे. सर्वाधिक म्हणजेच सहा कोटी रुपयांहून अधिक दंड पालिकेच्या ए विभागातून वसूल करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक स्वच्छतेdचे नियम मोडणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यासाठी २ एप्रिलपासून क्लीन अप मार्शलची…

‘मर्डरर’ बसचालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

मुंबई: कुर्ला येथे सोमवारी रात्री भरधाव बेस्टने सात जणांना चिरडून ठार करणारा मर्डरर बसचालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेत असून ४९ पेक्षा जास्त नागरीक जखमी झाल्याची माहिती आहे. बेस्ट अपघाताची…

फडणवीसांच्या भेटीसाठी अदाणी सागर बंगल्यावर

मुंबई: लोकसभेत गौतम अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीमुळे रोज हल्लाबोल होत असतानाच आज गौतम अदाणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटीसाठी सागर बंगला गाठला. त्यांच्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे.…