Category: मुंबई

Mumbai news

सहकारातून गृहनिर्माणाला नवी दिशा – फडणवीस

सहकारातून गृहनिर्माणाला नवी दिशा – फडणवीस मुंबई, दि. — महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण क्षेत्राला नवे बळ देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळे आज मुंबईत उत्साहात पार पडले. कन्नमवार नगर, विक्रोळी येथे मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण…

वीज दरवाढ टळली

वीज दरवाढ टळली मुंबई : महावितरणच्या पुढील पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश आज प्रसिद्ध केला आहे. महावितरणने पाच वर्षात वीजदर कपातीसाठी मांडलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक…

 धारावीत लवकरच सुरु होणार आंदोलनाचा धडाका

धारावीत लवकरच सुरु होणार आंदोलनाचा धडाका धारावी बचाव आंदोलनची माहिती मुंबई,दि.२७ — धारावीतील झोपडपट्टीवासियांना  प्रत्येकी ५०० चौ.फू. चे घर देण्याबाबत राज्य सरकार करीत असलेली टाळाटाळ, धारावीतील सर्व झोपडपट्टीवासियांना धारावीतच घरे देण्याचे आश्वासन राज्य सरकार अजुनही देत नाही, धारावीतील झोपड्या एसआरए अदानी कंपनी मोठ्या प्रमाणात अपात्र करीत आहे, या प्रमुख मुद्द्यांकडे राज्य शासन,एसआरए व अदानी कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी ‘धारावी बचाव आंदोलन’ या संघटने तर्फे येत्या ५ एप्रिल नंतर व्यापक आंदोलन धारावीत सुरु करण्यात येणार आहे. या आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी धारावी बचाव आंदोलनचे नेते, पदाधिकारी व  कार्यकर्त्यांची एक महत्वाची  बैठक बुधवारी सायंकाळी धारावीत झाली. या बैठकीत अदानी कंपनी आणि राज्य सरकार विरोधात काढण्यात येणारे मोर्चे, करण्यात येणारी निदर्शने ,रास्ता रोको, जनसभा आयोजित करण्याबाबतचे वेळापत्रक निश्चितीबाबत चर्चा झाली.या  बैठकीस  २०० कार्यकर्ते उपस्थित होते. आता  आगामी  धडक, व्यापक आंदोलनाची रणनिती ठरविण्यासाठी आणखी  एक बैठक ५ एप्रिल रोजी धारावीत होणार आहे.या बैठकीनंतर आंदोलनाचा धडाका सुरु होणार आहे. हुसकावून लावण्यासाठी अपात्र करण्याचा धडाका धारावी झोपडपट्टीवासियांना ५०० चौ.फू.ची घरे देण्याची आमची मागणी ही पहिल्यापासूनच आहे.तसेच कोणालाही अपात्र न करता सर्व सव्वा लाख  झोपडपट्टीवासियांचे धारावीतच पुनर्वसन करावे हीही मागणी सुरवाती पासूनची आहे.तसेच झोपडपट्टीवासियांच्या सर्व्हेक्षणाच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत.यात १०० झोपड्यांमागे  १५/२०  झोपड्या पात्र बाकीच्या ८०\८५ झोपड्या अपात्र… हे असे येथील झोपडपट्टीवासियांच्या  संतापाचे कारण आहे. येथील झोपडपट्टीवासियांना हुसकावून लावण्यासाठी लोकांना मोठ्या प्रमाणात अपात्र केले जात आहे असा आरोप धारावी बचाव आंदोलनचे नेते माजी आमदार बाबुराव माने यांनी केला आहे.सरकार हे झोपडपट्टीवासियांच्या मदतीसाठी आहे की अदानीच्या मदतीसाठी आहे असा प्रश्न सध्या येथील लोकांना पडलेला आहे.लोकांच्या मनातील या असंतोषाला मोकळी वाट करुन देण्यासाठी धारावीत ५ एप्रिल नंतर धरणे, मोर्चे,निदर्शने करण्यात येणार आहेत असेही बाबुराव माने यांनी सांगितले. दरम्यान हे आगामी आंदोलन यशस्वी करण्यासाठी धारावी बचाव आंदोलन चे कार्यकर्ते पदाधिकारी हे  कामाला लागलेले आहेत. हे पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी  नगरसेवक जोसेफ कोळी,टी.एम.जगदीश,दीपक काळे व नगरसेविका अर्चना शिंदे यांची भेट घेतली तेंव्हा या स्थानिक नगरसेवकांनीही या आगामी आंदोलनास पाठिंबा दिला असून ते ही या आंदोलनात उतरणार असून तसे त्यांनी आश्वासन धारावी बचाव आंदोलनला दिलेले आहे.याच बरोबर या आंदोलनात खासदार अनिल देसाई,खासदार वर्षा गायकवाड,आमदार महेश सावंत, आमदार ज्योती गायकवाड हेही आपला सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे धारावी बचाव आंदोलन ने म्हटले आहे. धारावी बचाव आंदोलनचे हे आगामी व्यापक आंदोलन अधिक यशस्वी करण्याच्या सूचना आमदार महेश सावंत यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत.त्यांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे.खासदार, आमदार, नगरसेवक या आंदोलनात उतरणार असल्याने धारावी बचाव आंदोलनचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा उत्साह हा दुणावलेला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन धारावीतील झोपडपट्टीवासियांना धारावीतच प्रत्येकी ५०० चौ.फू.चे घर द्या, लोकांना अपात्र करण्याचा खेळ थांबवा,धारावीत छोट्या उद्योगांसाठी स्वतंत्र उद्योग क्षेत्र तयार करा, कुंभार बांधव, कोळी बांधव, गणेश मूर्तिकार यासारख्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाया प्रमाणे जागा देण्यात याव्यात आदी मागण्या धारावी बचाव आंदोलन च्या आहेत.या मागण्यांची पूर्तता लेखी स्वरुपात जो पर्यत अदानी कंपनी – राज्य सरकार करीत नाही तो पर्यंत आमचे हे आंदोलन चालू राहील असा इशारा बाबुराव माने यांनी दिला आहे.

संमती, न्याय आणि समतोल तपासाची गरज

संमती, न्याय आणि समतोल तपासाची गरज राष्ट्रीय पुरुष आयोगाची भूमिका स्पष्ट रमेश औताडे मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पुरुष आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, महिलांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून त्यात कुठलीही तडजोड होऊ शकत नाही; मात्र कोणत्याही व्यक्तीवर आरोप करताना पुरावे आणि तपास यालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. संमती आणि जबरदस्ती यामध्ये स्पष्ट फरक आहे. न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निकालांमध्येही परस्पर संमतीने घडलेल्या संबंधांना वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यामुळे अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये सर्व बाजू ऐकून, पुराव्यांच्या आधारेच निष्कर्ष काढावेत, असे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने हेही स्पष्ट केले की, महिलांवर होणारे अत्याचार ही गंभीर बाब आहे आणि अशा गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हायलाच हवी. त्याचबरोबर, कोणत्याही व्यक्तीवर खोटे आरोप होणार नाहीत याची काळजी घेणेही न्यायव्यवस्थेची जबाबदारी आहे. समाजात दोन्ही बाजूंचा विश्वास टिकून राहण्यासाठी समतोल दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात संबंधित व्यक्तींना न्याय मिळावा आणि सत्य समोर यावे असे आयोगाचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी सांगितले.

अव्वल मानांकित पूर्वा, आर्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

मनोज रामचंद्र स्मृती महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा अव्वल मानांकित पूर्वा, आर्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मुंबई : अव्वल मानांकित पूर्वा बर्वे आणि दुसऱ्या मानांकित आर्या कोरगावकरने माटुंगा जिमखाना कोर्टवर खेळल्या जात असलेल्या योनेक्स सनराईज मनोज रामचंद्र स्मृती महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने नॉर्थ इंडियन असोसिएशन आणि जितेश पादूकोण अकादमीद्वारे आयोजित बॅडमिंटन स्पर्धेला एसव्हीसी सहकारी बँक आणि सारस्वत सहकारी बँकेचे सहकार्य लाभले आहे. राऊंड ऑफ ३२ फेरीत पूर्वाने आक्रमक शैली आणि उत्तम डावपेचांच्या जोरावर अनन्या राणेवर १५-०, १५-८ असा विजय मिळवला. आर्याला टियान कॅस्टेलिनोकडून थोडा प्रतिकाराचा सामना करावा लागला. पण  तिने १५-५, १५-८ असा विजय मिळवून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दरम्यान, शिवंजली कार्डिलेने टिया उग्रानकरविरुद्ध पहिला गेम गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत १७-१९, १५-६, १५-१३ अशी बाजी मारताना अव्वल दोन मानांकित खेळाडूंसोबत पुढील फेरीत प्रवेश केला. तिसरी मानांकित श्रेया भोसले आणि चौथी मानांकित श्रेया शेलार यांनीही राऊंड ऑफ १६ फेरीत स्थान मिळवले. ज्युनियर गटांमध्ये, १५ वर्षांखालील मुलांच्या गटात श्लोक अंबरकर आणि आदेश एकाडेने राऊंड ऑफ ३२ फेरीतील आपापले सामने जिंकले. श्लोकने पुनरागमन करत आराध्य पवारला १२-१५, २०-१८, १५-९ असे हरवले तर आदेशने आदित्य सरवदेवर ११-१५, १५-७, १५-१० अशी मात केली. निकाल – महिला एकेरी (राऊंड ऑफ ३२ फेरी): १- पूर्वा बर्वे विजयी वि. अनन्या राणे १५-०, १५-८; २-आर्या कोरगावकर विजयी वि. टियान कॅस्टेलिनो १५-५, १५-८; शिवांजली कर्डिले विजयी वि. टिया उग्रंकर १७-१९, १५-६, १५-१३; ३-श्रेया भोसले विजयी वि. रुची राणे १५-५, १५-१; ४-श्रेया शेलार विजयी वि. ऋषिका पाल १५-४, १५-४. १५ वर्षांखालील मुली (राऊंड ऑफ ३२ फेरी): १-अन्विषा घोरपडे विजयी वि. पहल तन्ना १५-३, १५-४; मनस्वी राऊत विजयी वि. मीरा दीक्षित १५-८, १५-१३; अनुश्री मोडलिंबकर १५-५, १५-७; आराध्या शुक्ला विजयी मेहा शाह १५-७, १५-५;

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा हॉस्पिटल अंतिम फेरीत मुंबई :   आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत जेजे हॉस्पिटल संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. अर्धशतकवीर सुभाष शिवगण, सलामीवीर जगदीश वाघेला, अष्टपैलू प्रकाश सोळंकी यांच्या दमदार खेळामुळे जेजे हॉस्पिटलने बलाढ्य रहेजा हॉस्पिटलचा ९ विकेटने पराभव केला. सलामीवीर सचिंद्र ठाकूरने अर्धशतक ठोकूनही रहेजा हॉस्पिटलला उपांत्य उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सलामीवीर सुभाष शिवगण व सचिंद्र ठाकूर यांना सामन्यातील उत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार देऊन मुंबई क्रिकेट संघटनेचे जॉइंट सेक्रेटरी निलेश भोसले, प्रतिष्ठानचे सेक्रेटरी विराज मोरे व वैभव मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने सुरु झालेल्या स्पर्धेमधील उपांत्य सामन्यात जेजे हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून रहेजा हॉस्पिटलला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर सचिंद्र ठाकूरने ४८ चेंडूत ५९ धावांची आक्रमक फलंदाजी केल्यामुळे रहेजा हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ५ बाद १२९ धावांचा टप्पा गाठला. सलामीवीर जगदीश वाघेला (३३ चेंडूत ४२ धावा) व सुभाष शिवगण (४१ चेंडूत ५३ धावा) यांनी ११ व्या षटकाला पहिल्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केल्यामुळे जेजे हॉस्पिटलने विजयी लक्ष्य १ बाद १३२ धावा साकारून सहज साध्य केले. शिवतीर्थावर विजय मांजरेकर, रमाकांत देसाई, अजित वाडेकर यांच्यापासून सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, रोहित शर्मा यासारख्या अनेक क्रिकेटपटूंना शिवाजी पार्क मैदानाने घडवले. त्याच मैदानावर ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृतीप्रीत्यर्थ वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या क्रिकेटपटूंसाठी आंतर रुग्णालयीन टी-२० क्रिकेट स्पर्धेचे सातत्य त्यांचे सुपुत्र अश्विनीकुमार मोरे यांनी कायम राखणे, भूषणावह असल्याचे मनोगत एमसीएचे जॉइंट सेक्रेटरी निलेश भोसले यांनी व्यक्त केले.

ओंकार, वेदिका, शिवांश, निधी विजेते

सब जुनियर कॅरम स्पर्धा ओंकार, वेदिका, शिवांश, निधी विजेते मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहकार्याने सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर येथील महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये संपन्न झालेल्या ५९ व्या सब जुनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत १४ वर्षाखालील सब जुनियर गटात अंतिम विजेतेपद पटकावणाऱ्या कोल्हापूरच्या राष्ट्रीय कॅरमपटू ओंकार वडारने मुंबई उपनगरच्या प्रसन्ना गोळेवार १९-१३, १६-६ असा एकतर्फी विजय मिळवला. तिसरा क्रमांक प्राप्त करताना मुंबई उपनगरच्या उमेर पठाणने ठाण्याच्या नील म्हात्रेला ११-२१, २१-०, २१-९ असे नमवले. तर १४ वर्षाखालील मुलींच्या अंतिम फेरीत मुंबई उपनगरच्या वेदिका पोमेंडकरने प्रतिस्पर्धी मुंबईच्या गौरी सावंतवर ११-४, १६-४ अशी मात केली. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत ठाण्याच्या सारा देवनने धुळयाच्या कल्याणी मराठेवर २१-०, २१-१ असा सहज विनय मिळवला. १२ वर्षाखालील ( कॅडेट ) मुलांच्या गटात अंतिम सामन्यात ठाण्याच्या शिवांश मोरेने ठाण्याच्या आपल्या सहकारी समर्थ खंडेलवलवार तीन सेटमधील रंगतदार लढतीत २१-५, १-१६ व ९-८ असा उत्कंटावर्ध विजय मिळवून जेतेपद पटकावले. या गटात तिसरा क्रमांक मिळवताना पालघरच्या देवराज कथाडेने पुण्याच्या रुद्र इंगळेवर २१-०, १९-२ असा विजय मिळवला. मुलींच्या १२ वर्षाखालील ( कॅडेट ) गटात राष्ट्रीय कॅरमपटू रत्नागिरीच्या निधी सप्रेने बाजी मारली. तिने ठाण्याच्या देविका जोशींचा २१-१, १९-४ असा सहज धुव्वा उडवत आपल्या अंतिम विजयावर शिक्कामोर्तब केले. तर तिसऱ्या क्रमांक मिळवणाऱ्या सिंधुदुर्गच्या दिव्या राणेने पुण्याच्या आरवी शेलारवर ६-१८, १३-७ व १३-११ असा निसटता विजय मिळवला. सर्व विजेत्यांना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सरचिटणीस अरुण केदार, खजिनदार अजित सावंत व सहसचिव केतन चिखले यांच्या हस्ते व उपस्थितीत आकर्षक चषक व प्राविण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

गुदाशय कर्करोग आजाराबाबत जनजागृतीचा अभाव

गुदाशय कर्करोग आजाराबाबत जनजागृतीचा अभाव रमेश औताडे मुंबई : धावपळीची जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि बैठे काम यामुळे पचनसंस्था बिघडत आहे. पचनाच्या तक्रारी वाढत असल्या तरी कोलोरेक्टल कर्करोग सारख्या गंभीर आजाराविषयी जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे. अशी माहिती मर्क स्पेशालिटीज प्रा. लि. लिमिटेड च्या एका सर्वेक्षण अहवालात समोर आली आहे. अनियमित शौच, ऑसिडिट, शौचावाटे रक्त येणं यासारख्या लक्षणावर लोक कशी प्रतिक्रिया देतान, तसेच डॉक्टरांकडे जाण्यास होणारा विलंब व त्यामुळे निदान करण्यास होणारा विलंब आणि जागरुकतेचा अभाव यामागील त्यांच्या वर्तणुकीच्या तसेच सवयीचा अभ्यास करण्यात आला. या परिषदेला अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील वैद्यकीय आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती बाजपेयी, एस. एन. रहेजा हॉस्पिटल, मुंबई चेबीन वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शिवम शिंगला, हिरानंदानी हॉस्पिटल, मुंबई येथील वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मुबारकुन्निसा टोसे, मर एच. एन. रिलायन्स हॉस्पीटल, मुंबई येथीन वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दर्शित शाह उपस्थित होते.

छोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे – रामदास आठवले

छोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे – रामदास आठवले मुंबई / रमेश औताडे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानून काम करणाऱ्या छोट्या राजकीय पक्षांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये झाले पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात विलीन करून मिलिंद सुर्वे यांचा शेकडो कार्यकत्यांसह रिपब्लिकन पक्षात प्रवेश तसेच राष्ट्रवादीचे नेते जीवन जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन जाधव आणि डॉ रश्मी जीवन जाधव यांच्या नेतृत्वात त्यांच्या अनेक सहकान्यांनी जाहीर प्रवेश केला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील प् आहोत. संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष आपण पोहचवला असून लवकरच रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे. त्या दृष्टीने रिपब्लिकन  पक्षाची घोडदौड सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी छोट्या रिपब्लिकन गटांनी, पक्षांनी आणि संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे असे आवाहन आठवले यांनी केले.

हवामान बदलचा सामना करत समुद्री शेवाळ शेतीचा प्रयोग

हवामान बदलचा सामना करत समुद्री शेवाळ शेतीचा प्रयोग रमेश औताडे मुंबई: हवामान बदलामुळे मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील जनतेच्या बेरोजगारीवर झाला आहे. यावर उपाय म्हणून समुद्री शेवाळ शेतीचा प्रयोग करण्यात येत आहे. पर्यावरण बिघडले असले तरी माणसाला नवीन संधी मिळत असून उदरनिर्वाह करण्याची नवनवीन प्रयत्न यशस्वी होत आहेत. डीपी वर्ल्डचा सागरी सेवा व्यवसाय असलेल्या शिपिंग सोल्यूशन्स एएमईए यांच्या नेतृत्वाखालील हा उपक्रम इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज (आयएनईसीसी) आणि क्लाइमाक्रू यांच्या भागीदारीत राबवला जात आहे. डीपी वर्ल्डच्या शिपिंग सोल्यूशन्स एएमईए-मरीन सर्व्हिसेसचे प्रादेशिक संचालक-भारत सी. एम. मुरलीधरन म्हणालेः “हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सागरी शैवाल शेती किनारपट्टीवरील समुदायांना लवचिक उपजीविका देते. उदयोन्मुख नील अर्थव्यवस्थेचा एक भाग म्हणून समुद्री शैवाल लागवडीला जागतिक स्तरावर वाढत्या प्रमाणात मान्यता मिळाली आहे. त्यामुळे हवामान अनुकूलन आणि परिसंस्थेचे पुनरुत्पादन या दोहोंना आधार देणारी कमी परिणाम करणारी सागरी उपजीविका उपलब्ध होते.