Category: मुंबई

Mumbai news

रोहीत पवारांचा ‘लेटरबॉम्ब’

रोहीत पवारांचा ‘लेटरबॉम्ब’ राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रफुल पटेल. तटकरेंनी निवडणूक आयोगालाच लिहीले होते पत्र मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत आज लेटरबॉम्ब टाकून एकच खळबळ…

महाराष्ट्रात चाललंय काय ?

महाराष्ट्रात चाललंय काय ? झिरवळ हे वागणं बरं नव्हं माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांचे सेक्सकांड ० सरकारी बंगल्यात तृतीयपंथीसोबत शय्यासोबत आणि ‘दारू’बाजी ० पवन यादव या तृतीयपंथीविरोधात त्याच्या भावानेच केला भांडाफोड ०…

भायखळा येथील शूटिंगबॉल स्पर्धेत इस्तियाक मालेगावने पटकावला प्रथम क्रमांक

केतन खेडेकर मुंबई : अग्निशमन सेवा कला व क्रीडा मंच, मुंबई आणि मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विधानाने मुंबई अग्निशमन दल विभागीय अधिकारी कै. किशोर घाडीगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकदिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन मुंबई अग्निशमन केंद्र मुख्यालय, भायखळा, येथे नुकतेच करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे येथील २२ संघ सहभागी झाले होते. सर्व संघांमध्ये राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा होता त्यामुळे स्पर्धा खूप रंगतदार झाली. अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात मालेगावच्या इस्तियाक संघाने प्रतिस्पर्धी मालेगावच्याच आय एस सी संघाचा सरळ दोन सेट मध्ये १५-०७, १६-१४ असा पराभव केला. विजयी इस्तियाक मालेगाव संघातून इस्तियाक, यासीन, मुबासिर यांनी सुंदर खेळ केला; पराभूत आयएससी मालेगाव संघातून वकार याने दुसऱ्या सेट मध्ये आघाडी घेतली होती, तरीही इस्तियाक याने त्याचे आव्हान परतवून विजय संपादन केला. उपांत्य फेरीच्या दोन सामन्यात आय एससी मालेगाव संघाने आमिर काझी यांच्या संजय भोसले प्रतिष्ठान या सोलापूर संघाचा १५-०६, १५-०६ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात इस्तियाक मालेगाव संघाने सांगली जिल्हा संघाचा तीन सेट मध्ये ०६१५, १५-११, १५-०८ असा पराभव केला. या सामन्यात महेश माने व संदेश घारे यांनी अप्रतिम खेळ केला पण इष्टियाकच्या आक्रमणापुढे त्यांना हर पत्करावी लागली. स्पर्धेतील मालिकावीर म्हणून उत्कृष्ट शूटिंग केलेल्या इस्तियाक (मालेगाव संघ) याची निवड करण्यात आली, तर स्पर्धेतील बेस्ट शूटर म्हणून संदेश घारे (सांगली) याची निवड करण्यात आली. उपउपांत्य फेरीचे निकाल : अमीर काझी सोलापूर विजयी विरुद्ध टेंभुर्णी संघ २१-१४ इस्तियाक मालेगाव विजयी विरुद्ध कल्याण संघ २१-१० आयएससी मालेगाव विजयी वि. मुंबई महानगरपालिका २१-६ सांगली संघ विजयी विरुद्ध रायगड अलिबाग संघ २१-१६ स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल, सर्व अधिकारी, अग्निशमन सेवा कला व क्रीडा मंच चे सचिव भगत, स्पर्धा प्रमुख मंगेश भोसले, स्पर्धा निरीक्षक व माजी राष्ट्रीय खेळाडू रत्नदीप रावराणे तसे अग्निशन संघाचे राष्ट्रीय खेळाडू महेश कदम यांनी खूप परिश्रम घेतले. स्पर्धा नियंत्रक म्हणून प्रफुल्ल वाईरकर यांनी काम पाहिले., तंत्री सल्लागार म्हणून मिलिंद बिर्जे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे आयोजन मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनच्या कार्यकारिणीने पाहिले, सचिव दीपक सावंत यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी उपप्रमुख अग्निशमन अधिकारी भोर एस.डी सावंत, सेवानिवृत्त विभाग अधिकारी पाटील साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी सांगळे, भगत; केंद्र अधिकारी बोरुले, के किशोर घाडीगावकर कुटुंबिय, यांच्या उपस्थितीत झाले. नगरसेवक रोहिदास लोखंडे, समीर चव्हाण, प्रदेश प्रतिनिधी मुंबई काँग्रेस, दत्तप्रसाद पेडणेकर, अध्यक्ष, मालवण तालुका पत्रकार संघ; गजानन आंगणे, श्री भराडी देवस्थान आंगणेवाडी, मालवण यांनीही स्पर्धेला उपस्थिती दर्शवली. बक्षीस समारंभ उपप्रमुख अग्निशमन अधिकारी घोष साहेब व भोर सहाय्यक विभागीय अधिकारी सांगळे साहेब व भगत साहेब वरिष्ठ केंद्र अधिकारी विशाल चंद्रकांत विश्वासराव केंद्र अधिकारी जितेश गोरुले आणि प्रमुख अतिथी सुरज चव्हाण सचिव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. असोसिएशन अध्यक्ष माजी आमदार शाम सावंत यांनी उपस्थित राहून खेळाडूना मार्गदर्शन केले. ००००००००

 लीलावती हॉस्पिटल उपांत्य फेरीत

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा लीलावती हॉस्पिटल उपांत्य फेरीत मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत लीलावती हॉस्पिटलने बलाढ्य केडीए हॉस्पिटल-अंधेरी संघाचा ७ विकेटने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. लीलावती हॉस्पिटलचा राहुल जांभळे व केडीए हॉस्पिटलचा अॅलन गावद्या यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन क्रीडाप्रेमी अरुण माने, रुग्णालयीन क्रिकेटपटू प्रदीप क्षीरसागर, मनोहर पाटेकर, श्रीकांत दुधवडकर, भरत पेडणेकर, चंद्रकांत करंगुटकर, रुपेश कोंडाळकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. शिवाजी पार्कमधील बीएमसी खेळपट्टीवर लीलावती हॉस्पिटल विरुध्द केडीए हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. अॅलन गावद्या (३६ चेंडूत ६२ धावा), अलकेत तांडेल (३२ चेंडूत ३३ धावा), सुरज जयस्वाल (२२ चेंडूत ३४ धावा) यांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे केडीए हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ६ बाद १५८ धावांचा टप्पा गाठला. स्वकीत पांचाळने २५ धावांत ३ बळी व जगदीश कोठारेने ३६ धावांत २ बळी घेतले. विजयी लक्ष्य गाठताना धावगती जलद करण्याच्या नादात दुसऱ्या षटकामध्ये भरवंशाचा सलामीवीर मनोहर पाटेकरला (१३ चेंडूत १३ धावा) केडीएच्या दक्ष क्षेत्ररक्षकांनी धावचीतद्वारे टिपले. परंतु त्यानंतर मैदानात उतरलेल्या राहुल जांभळे (३९ चेंडूत ६४ धावा), संदीप कणसे (३७ चेंडूत नाबाद ३९ धावा), संदेश पंधेरे (१३ चेंडूत नाबाद २२ धावा) यांनी आक्रमक फलंदाजी करून लीलावती हॉस्पिटलचा विजय १८.१ षटकात ३ बाद १५९ धावा फटकावून साकारला. दुसऱ्या सामन्यात सोमैया हॉस्पिटलने सायन हॉस्पिटलला ३५ धावांनी पराभूत करतांना प्रकाश पुजारी (२९ चेंडूत ५७ धावा) व दर्शन गुरव (३९ चेंडूत ४९ धावा) यांची फलंदाजी विजयासाठी उपयुक्त ठरली. संभाजी थोरात (४० चेंडूत ४२ धावा) व निलेश चव्हाण (१२ चेंडूत नाबाद २० धावा) यांनी छान फलंदाजी करूनही सायन हॉस्पिटलला १३६ धावांपर्यंतच मजल मारता आली.

बंद असलेल्या बसेस ची वाहतूक पुन्हा सुरु करा

बंद असलेल्या बसेस ची वाहतूक पुन्हा सुरु करा शिवसेनेची मागणी मुंबई: देवीपाडा व जय महाराष्ट्र नगर, टाटा विद्युत संग्राही केंद्र, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील  नागरिकांसाठी असलेली मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) बस क्र.२९९ व बस क्र. २९3 या बेस्टची बंद असलेली सेवा पुन्हा पूर्ववत  सुरु करण्यात यावी अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा १२ व १४ च्या वतीने करण्यात आली. ही बंद असलेली सेवा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांनी मागाठाणे डेपो प्रमुख जितेंद्र सामंत यांना भेटून लोकांच्या समस्या सविस्तर सांगितल्या व मागण्यांचे निवेदन दिले.  यावेळी मागाठाणे विधानसभा निरीक्षक, सिनेट सदस्य शशिकांत झोरे, मागाठाणे विधानसभाप्रमुख रेखाताई बोऱ्हाडे, उपविभागसंघटक सिमीतिनी नारकर, वैभवी तावडे, शाखाप्रमुख सचिन मोरे, माधुरी खानविलकर, वनिता दळवी, प्रतीक चव्हाण, दिनेश विचारे, मूर्तिकार नंदकिशोर शिवलकर, विजया गायकवाड, सीमा सानप, मंगल करडे, कौस्तुभ खानविलकर उपस्थित होते.  

जलसंपदा अधिकाऱ्यांचा मृद-जलसंधारणात नियमबाह्य समावेश?

 जलसंपदा अधिकाऱ्यांचा मृद-जलसंधारणात नियमबाह्य समावेश? पदोन्नतीसाठी ‘५० लाखांचा दर’ चर्चेत; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही चौकशी लांबणीवर मुंबई : राज्यात जलसंपदा विभागातील काही अधिकाऱ्यांचा मृद व जलसंधारण विभागात नियमबाह्य पद्धतीने समावेश करून त्यांना…

 ३० कलाकारांची अभूतपूर्व ऐतिहासिक शास्त्रीय स्वरमैफल ‘अर्घ्य २०२६’

३० कलाकारांची अभूतपूर्व ऐतिहासिक शास्त्रीय स्वरमैफल ‘अर्घ्य २०२६’ पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत रंगली मुंबई:  बांद्रा येथील बालगंधर्व रंगमंदिरात ‘अर्घ्य इंडियन क्लासिकल म्युझिक अँड फाईन आर्ट फाउंडेशन’तर्फे आयोजित ‘अर्घ्य २०२६’ ही भव्य आणि ऐतिहासिक शास्त्रीय संगीत स्वरमैफल अत्यंत उत्साहात आणि रसिकांच्या दादेत पार पडली. संध्याकाळी ६.३० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात तब्बल ३० कलाकारांनी एकत्रित सादरीकरण करत एक अद्वितीय सांगीतिक अनुभव प्रेक्षकांना दिला. या विशेष स्वर मैफिलीत सतारवादक पं. रवी चारी, प्रख्यात गायक पं. राम देशपांडे, बासरीवादक पं. रूपक कुलकर्णी, तबलावादक पं. योगेश साम्सी आणि पखवाजवादक श्री कृष्णा साळुंके या पाच दिग्गज कलाकारांनी आपल्या शिष्यांसह एकाच मंचावर सादरीकरण करत गुरु-शिष्य परंपरेचा भव्य आविष्कार साकारला. विविध घराण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या कलाकारांनी राग आणि ताल यांच्या शाश्वत संगमातून एक सुरेल, समन्वयपूर्ण आणि मंत्रमुग्ध करणारी ‘सिम्फनी’ साकारली. या कार्यक्रमाला पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांची मुख्य अतिथी म्हणून लाभलेली उपस्थिती ही मैफलीची विशेष आकर्षण ठरली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची आणि आध्यात्मिक अधोरेखित अर्थ प्राप्त झाला. आजच्या काळात फ्युजन संगीताचा प्रभाव वाढत असताना ‘अर्घ्य २०२६’ने शुद्ध भारतीय शास्त्रीय संगीताचा एक भव्य आणि सखोल पर्याय रसिकांसमोर यशस्वीपणे मांडला. अनेक वाद्ये आणि स्वर एकत्र आणत तयार झालेल्या या संगीतमय संवादाने श्रोत्यांना भावनिक आणि ध्यानमग्न अनुभव दिला. ही केवळ एक मैफल नसून भारतीय संगीत परंपरेचा एक जिवंत उत्सव ठरला. ‘अर्घ्य २०२६’ने परंपरा, विद्वत्ता आणि भक्तिभाव यांचा संगम घडवत रसिकांच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटवला.

‘१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषद संपन्न

‘१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषद संपन्न अनिल ठाणेकर सांगली, स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्था संचलित, बाबा नाईक महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि आय.क्यू.ए.सी. (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने “१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता” या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. भगतसिंग नाईक यांच्या हस्ते झाले. बीजभाषक म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रो. डॉ. एम. एस. देशमुख यांनी भारताच्या ७९ वर्षांच्या कृषी प्रवासाचा आढावा घेतला. परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला पाटील होत्या. या सत्राचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रो. डॉ. विनोद राठोड यांनी केले. प्रथम सत्र: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय ठिगळे यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कृषी विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या सत्राचे अध्यक्षपद डॉ. जयवंत इंगळे यांनी भूषवले. या सत्राचे आभार प्रो.डॉ.के.आर.गावडे यांनी मानले.द्वितीय सत्र: पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथील डॉ. कुलविंदर सिंग यांनी १९४७ मधील कृषी स्थिती आणि आजची शाश्वतता यातील आव्हानांवर सविस्तर प्रकाश टाकला. या सत्राचे अध्यक्ष डॉ. मनोहर कोरे होते.या परिषदेसाठी तांत्रिक सहाय्य आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रो. डॉ. अनिल काटे आणि प्रा.डॉ. संदीप देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. एस. डी. शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. निलेश कांबळे यांनी मानले. या ऑनलाईन परिषदेत देशातील विविध भागांतून प्राध्यापक आणि संशोधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनसाठी मनसे आक्रमक

 दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनसाठी मनसे आक्रमक मुंबई : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सामान्य चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेली रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरु करण्यासाठी आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली…

कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट ?

कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट ? मुंबई : अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या मते यंदा केवळ २० टक्केच हापूस उत्पादन होणार आहे. त्यामुळे केवळ आंबा उत्पादकच नाही तर हापूसशी संबंधित सर्व पूरक व्यवसायांवरही मोठा परिणाम होताना दिसतोय. कोकणातील…