Category: मुंबई

Mumbai news

भोंदूबाबाच्या आहारी जाणाऱ्या केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी

भोंदूबाबाच्या आहारी जाणाऱ्या केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी राजन चव्हाण सावंतवाडी:  भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी ठाकरे सेना आक्रमक बनली असून  सेनेच्या वतीने शहरात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. अशोक खरात प्रकरणी आमदार दीपक…

नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही’

नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही’ स्लग- निरोप समारंभात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी स्वाती घोसाळकर मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत त्यांच्यासह इतर एकुण ९…

नायगाव-टिवरी जमीन घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण ?

नायगाव-टिवरी जमीन घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण ? आमदार विलास तरे यांचा विधानसभेत थेट सवाल  मूळ जमीन मालकांना न्याय मिळणार; सीआयडी चौकशीचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नायगाव मौजे टिवरी येथे…

दक्षिणेत भाजपसमोर संधी आणि आव्हान

दक्षिणेत भाजपसमोर संधी आणि आव्हान पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतातील राजकीय समीकरणे विशेष लक्षवेधी ठरत आहेत. केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी आणि राज्य केरळ येथे घडणाऱ्या राजकीय घडामोडी भाजपसाठी संधी आणि…

दक्षिणेत भाजपसमोर संधी आणि आव्हान

  पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतातील राजकीय समीकरणे विशेष लक्षवेधी ठरत आहेत. केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी आणि राज्य केरळ येथे घडणाऱ्या राजकीय घडामोडी भाजपसाठी संधी आणि आव्हान यांचे अनोखे मिश्रण…

युनियन क्रिकेट अकॅडमीतर्फे मुलींसाठी ओपन एज निवड चाचण्या जाहीर

युनियन क्रिकेट अकॅडमीतर्फे मुलींसाठी ओपन एज निवड चाचण्या जाहीर मुंबई :: युनियन क्रिकेट अकॅडमीतर्फे मुलींसाठी ओपन एज निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आले असून, इच्छुक महिला क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा दाखवण्याची आणि नॉकआउट स्पर्धेसाठी संघात स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या निवड चाचण्या २७ मार्चला सायं. ४ते  ६ वाजेपर्यंत, युनियन क्रिकेट अकॅडमी, कल्याण येथे पार पडतील. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणे आणि नवोदित खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. निवड झालेल्या खेळाडूंना आगामी नॉकआउट स्पर्धेत अकॅडमीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. पात्रता: – सर्व वयोगटातील मुलींसाठी खुले क्रिकेटची आवड असणे आवश्यक, सोबत आणावयाच्या वस्तू,  संपूर्ण क्रिकेट किट, स्पोर्ट्स शूज, पाण्याची बाटली निवड निकष: – खेळातील कामगिरी- फिटनेस- शिस्त – खेळाची समज अकॅडमीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी योग्य संधी देणे हा आमचा उद्देश आहे. इच्छुक खेळाडूंनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा.” अधिक माहितीसाठी ९९६८८५६७८८ या क्रमांकावर संपर्क साधा

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा केडीए, रहेजा, केईएम हॉस्पिटल उपांत्यपूर्व फेरीत मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत केडीए हॉस्पिटल-अंधेरी, रहेजा हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. अर्धशतकवीर संकेत किणी ( ४३ चेंडूत ५४ धावा) व दिशांत म्हात्रे (२८ चेंडूत ३५ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे केडीए हॉस्पिटलने उभारलेले १५१ धावांचे आव्हान किम्स हॉस्पिटलला २३ धावांच्या फरकाने पेलवले नाही. सलामीवीर डॉ.रौठू राकेशकुमार (२० चेंडूत २३ धावा) व डॉ. परमेश्वर मुंडे (११ चेंडूत नाबाद १५ धावा) यांनी किम्स हॉस्पिटलचा पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सामन्यातील उत्कृष्ट क्रिकेटपटू डॉ. राकेशकुमार व संकेत किणी यांना पुरस्कार देऊन क्रिकेटपटू धनंजय केतकर, डॉ. विवेक पालकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी गौरविले. शिवाजी पार्क येथील दुसऱ्या अतिशय चुरशीच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात सलामीवीर भूषण सावंत (२० चेंडूत २५ धावा) व विजय वैती (३३ चेंडूत ४६ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे रहेजा हॉस्पिटलने सर्वबाद १३१ धावसंख्या रचली. बलाढ्य सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाला विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना १४ धावा कमी पडल्या. सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे कप्तान डॉ. हर्षद जाधव (३१ चेंडूत ३५ धावा) व अष्टपैलू डॉ. मनोज यादव (९ धावांत ५ बळी) यांनी छान खेळ केला. केईएम हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ७ बाद १२१ धावांचा टप्पा गाठताना प्रीतेश सावंत (३९ चेंडूत ४३ धावा) व सागर सोळंकी (२८ चेंडूत ३१ धावा) यांनी चमकदार फलंदाजी केली. सलामीवीर कल्पेश भोसलेच्या (३३ चेंडूत ४७ धावा) धडाकेबाज फलंदाजीमुळे डावाच्या मध्यास ४ बाद ८१ धावांची सुस्थिती कस्तुरबा हॉस्पिटलकडे होती. परंतु जयदीप मेहेर (२७ धावांत ३ बळी) व प्रीतेश सावंत (१५ धावांत ३ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी करून कस्तुरबा हॉस्पिटल संघाला १५.४ षटकात ९७ धावांत गुंडाळले आणि केईएम हॉस्पिटलने २४ धावांनी शानदार विजय संपादन केला.

एनआयए मनोज रामचंद्र बॅडमिंटन स्पर्धा २६ मार्चपासून

एनआयए मनोज रामचंद्र बॅडमिंटन स्पर्धा २६ मार्चपासून मुंबई, २४ मार्च: महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने आणि नॉर्थ इंडियन असोसिएशन आणि जितेश पदुकोण अकादमीद्वारे आयोजित ‘योनेक्स सनराईज मनोज रामचंद्र स्मृती राज्यस्तरीय खुली बॅडमिंटन स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून खेळली जाणार आहे. या स्पर्धेत ३६० हून अधिक प्रवेशिका आल्या असून ही स्पर्धा पुरुष आणि महिला एकेरी तसेच १५ आणि ११ वर्षांखालील मुले आणि मुली एकेरी गटांमध्ये खेळवली जाईल. हे सामने नॉर्थ इंडियन असोसिएशन, एमआयजी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि माटुंगा जिमखाना येथील कोर्टवर खेळले जातील. पुरुष आणि महिला एकेरीतील विजेत्यांना प्रत्येकी रोख ४१,००० रुपये तर उपविजेत्याला प्रत्येकी रोख ३१,००० रुपये बक्षीस मिळेल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २१,००० आणि ११,००० रुपये मिळतील. १५ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या एकेरी गटातील विजेत्याला ८,५०० रुपये, उपविजेत्याला ५,५०० रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला ३,५०० रुपये असे  बक्षीस ठेवण्यात आले आहे. १५ वर्षांखालील गटासाठीची पारितोषिके संदीप ठाकर यांनी त्यांचे पुत्र निहार ठाकर यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली आहेत. ११ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या एकेरी गटातील विजेत्यांना प्रत्येकी ६,००० रुपये रोख बक्षिसे मिळतील तर उपविजेत्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला प्रत्येकी ४,००० आणि २,५०० रुपये मिळतील. अधिक माहितीसाठी आयोजन सचिव जितेश पदुकोण (९८२१० ५१७९०) यांच्याशी संपर्क संपर्क साधा.

एमसीसी ब्ल्यू संघाचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय

एमसीसी प्रो-४० क्रिकेट लीग २०२६ एमसीसी ब्ल्यू संघाचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मुंबई, २४ मार्च: ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन (जेएसएफ) आयोजित एमसीसी प्रो-४० क्रिकेट लीग २०२६ स्पर्धेत (एलिट ग्रुप) एमसीसी ब्ल्यू संघाने ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन (जेएसएफ) संघावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मात केली. एमसीसी ब्ल्यू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४७ षटकांत २३९ धावांची मजल मारली. त्यात झैद मुफ्ती ८७(७३) आणि शौर्य वीर नगरचे ६१(९२) सर्वाधिक योगदान राहिले. जेएसएफकडून निशार्ग चौधरी (५/४५) आणि देव जम्मुला (३/५१) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. हर्षल वाघमारे (४/३०), हृद्या (२/१९) आणि अफसर अहमदच्या (२/३७) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर जेएसएफचा पहिला डाव ४०.३ षटकांत १५० धावांमध्ये आटोपला. त्यांच्याकडून मुहम्मद इब्राहिम ५५(८८) आणि देव जम्मुला २७(२७) सर्वाधिक धावा केल्या. पहिल्या डावातील ८९ धावांची आघाडी एमसीसी ब्ल्यू संघासाठी निर्णायक ठरली. एमसीसी ब्ल्यू संघाने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३० षटकांत ७ बाद १९८ धावा केल्या. यांच्याकडून दियान कुबाडिया ५०(४६) आणि डॅलरॉन रॉड्रिग्जने ४३(३४) चांगली फलंदाजी केली. जेएसएफकडून निशार्ग चौधरीने (५/४९) अचूक मारा केला. पराभूत जेएसएफचा अष्टपैलू निशार्ग चौधरीला (संपूर्ण सामन्यात १० विकेट) सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. संक्षिप्त धावफलक: एमसीसी ब्ल्यू संघ (पहिला डाव) – ४७ षटकांत सर्वबाद २३९(झैद मुफ्ती ८७(७३), शौर्य वीर नगर ६१(९२); निशार्ग चौधरी ५/४५, देव जम्मुला ३/५१). दुसरा डाव – ३० षटकांत ७ बाद १९८(दियान कुबाडिया ५०(४६), डॅलरॉन रॉड्रिग्ज ४३(३४); निशार्ग चौधरी ५/४९). जेएसएफ (पहिला डाव) – ४०.३ षटकांत सर्वबाद १५०(मुहम्मद इब्राहिम ५५(८८), देव जम्मुला २७(२७); हर्षल वाघमारे ४/३०, हृद्या २/१९, अफसर अहमद २/३७). निकाल: सामना अनिर्णित, एमसीसी ब्लू संघ पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजयी. सामनावीर: निशार्ग चौधरी १२(२७) ५/४५ आणि ५/४९.

 महाराष्ट्रात घुमणार इनडोअर क्रिकेटचा आवाज!

 महाराष्ट्रात घुमणार इनडोअर क्रिकेटचा आवाज!  गरवारे क्लब, वानखेडे स्टेडियममध्ये क्रीडा संघटकांचा ऐतिहासिक मेळावा मुंबई: पारंपारिक क्रिकेटच्या चौकटीबाहेर आता नव्या थराराची चाहूल लागली आहे! महाराष्ट्रात इनडोअर क्रिकेटचा झंझावात घुमवण्यासाठी ‘महाइनडोर क्रिकेट…