Category: मुंबई

Mumbai news

सर्वोच न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूडजी यांच्या शुभहस्ते वांद्रे येथील प्रस्तावित नवीन उच्च न्यायालय संकुलाचे भूमिपूजन फलकांचे अनावरण आणि उदघाटन आज करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची वर्षावर बंद दाराआड शिंदेंशी भेट

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बंद दाराआड २० मिनिटे चाललेल्या या बैठकीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चाही झाली, सकाळी ९ वाजता राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे नेत्यांची…

बदलापूरचा वासनांध अक्षय शिंदेचा एनकाऊंटर

पोलिसांनी तीन गोळ्या ठोकल्या एनकाऊंटर बोगस असल्याचा विरोधकांचा आरोप ठाणे : बदलापूरच्या शाळेतील चिमुरड्या मुलिंवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वासनांध अक्षय शिंदेचा पोलिसांनी एनकाऊंटर केला. पोलिस व्हॅनमध्येच पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर…

2600 हून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी स्वच्छ केला नवी मुंबईतील रेल्वे स्टेशन परिसर*

आज पाचही एपीएमसी मार्केटमध्ये महास्वच्छता अभियानाचे आयोजन   नवी मुंबई : स्वच्छता ही सेवा मोहीमे अंतर्गत दररोज विविध ठिकाणांवर स्वच्छता मोहीमा हाती घेण्यात आल्या असून आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील…

चिन्मय ढवळे, अजय कृष्णन जोडी विजेती

मुंबई. .. नुकत्याच ऑस्ट्रेलिया येथे क्वीन्स लँड बॅडमिंटन असोसिएशनने ‌आयोजित केलेल्या एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी‌ बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडी चिन्मय ढवळे,अजय कृष्णन यांनी बाजी मारली. या…

राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत समारंभ संपन्न

मुंबई : डाॅ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. डाॅ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ राज्यपाल…

 प्लॅस्टिक द्या, टी शर्ट, पेन घ्या!

 मध्य रेल्वेचा अनोखा उपक्रम : मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद   मुंबई : सीएसएमटी रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेने शक्ती प्लॅस्टिक कंपनीच्या सहकार्याने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये प्लॅस्टिक द्या, टी-शर्ट,…

 1600 हून अधिक विद्यार्थी, नागरिकांनी केली खारफुटी परिसर स्वच्छता

 स्वच्छता ही सेवा’ मोहीमेत नवी मुंबई : स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 2 ऑक्टोबरपर्यंत दररोज विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये…

अन्न विश्लेषण प्रयोगशाळा विभागातील ५६ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई : अन्न व औषध विभागामार्फत ५६ पदांची भरती प्रक्रिया (टिसीएस) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून कोणीही दलाल व मध्यस्थांवर विश्वास ठेवू…

माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कामास गती देण्यासाठी सुट्टी दिवशी गर्डर बसवण्याच्या कामास 24 तास परवानगी द्यावी-  अजित पवार यांचे निर्देश

मुंबई : पुण्यातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या मार्गावरील शिवाजीनगर ते औंध दरम्यानच्या कामास गती देण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी तसेच इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी गर्डर टाकण्याच्या कामास पोलीसांनी  परवानगी द्यावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या खालील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. मेट्रो लाईन तीनच्या कामाची पाहणी करण्यासाठी येत्या 26 सप्टेंबर रोजी भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या कामाचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मंत्रालयात आज आढावा घेतला. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, पोलीस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर आदी उपस्थित होते. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह मेट्रो तीनचे काम करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. मेट्रो लाईन तीनच्या कामात येणाऱ्या अडथळ्यासंदर्भात माहिती घेऊन उपमुख्यमंत्री  म्हणाले की, मेट्रोच्या कामांमुळे रस्ते खराब झाल्यास, ड्रेनेजलाईन खराब झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. मेट्रोचे काम व त्याखालील खराब रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मेट्रोचे काम करताना त्याखालील रस्ते, ड्रेनेजलाईनची कामे तातडीने करण्यात यावीत. ही कामे वेळेत होत नसल्यास संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात येईल. मेट्रोचे काम सुरु असताना वाहतूक वळविण्यात येणारे रस्ते सुस्थितीत असतील याची संबंधितांनी काळजी घ्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री यांनी दिले.