Category: मुंबई

Mumbai news

 १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा मराठी विश्वकोशातील उल्लेख अवमानजनक

१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा मराठी विश्वकोशातील उल्लेख अवमानजनक तत्काळ दुरुस्ती करण्याची पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मागणी. मुंबई, दि. (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश मंडळाने प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोशात १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा उल्लेख उठाव असा केलेला असून यात स्वातंत्र्य योद्धे म्हणून गौरवण्यात आलेले नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई प्रभृतींचा उल्लेख एकेरीत करण्यात आला आहे. या मुद्याकडे लक्ष वेधत या अवमान जनक नोंदी विश्वकोशाच्या पुढील खंडांमध्ये तसेच संकेतस्थळावर दुरुस्त करण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका राज्य विधिमंडळाच्या पिठासीन अधिकाऱ्यांकडे पत्रकारिता, साहित्य, सांस्कृतिक, आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत काही व्यक्तींनी दाखल केली आहे. ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांच्या पुढाकाराने विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर अविनाश पाठक, विनोद देशमुख, श्रुती देशपांडे, महेश आंबोकर, विजय आडे, चारुदत्त कहू, उदय अंधारे, संजय लोखंडे, दीपक देशपांडे, कार्तिक लोखंडे, अरविंद मराठे, मेजर जनरल अच्युत देव, सुरेश विंचुरकर, सुनील किटकरु, नितीन केळकर, ॲड. लखनसिंह कटरे आणि शशिकांत सुरंगळीकर प्रभृतींनी सह्या केल्या असून या संदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. मराठी विश्वकोशाच्या खंड एक आणि खंड अठरा मध्ये अठराशे सत्तावन्नचा उठाव असल्याचा उल्लेख केला असून काही लोक याला बंड म्हणतात, तर काहींनी स्वातंत्र्ययुद्ध म्हणून उल्लेख केला आहे, असे नमूद केले असल्याचे या पत्रात म्हटले आहे. १८५७ चे स्वातंत्र्य युद्धच होते, याबाबत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर या विषयावर ग्रंथलेखन देखील केले आहे, याकडे या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. त्याचप्रमाणे झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे या स्वातंत्र्य योद्ध्यांचा उल्लेख  विश्वकोशाच्या खंडांमध्ये एकेरीत केला असून तो अवमानजनक असल्याचेही या याचिकेत म्हटले आहे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी स्वातंत्र्यरक्षणासाठी तटावरून घोडा फेकून देशासाठी आहुती दिली, तर तात्या टोपे हे फासावर चढले. त्यांच्या बलिदानावरच वसंत वरखेडकरांची  सत्तावन्नचा सेनानी ही कादंबरी देखील प्रसिद्ध आहे, हे देखील याचिकेत नमूद केले आहे, आणि या महनीय योद्ध्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख विश्वकोशात करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. याचिकाकर्त्यांनी विधान परिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे ही पत्रे पाठवली असून त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनाही या संदर्भात पत्रे पाठवली आहेत. सर्व पत्रांसोबत विश्वकोशातील संबंधित पृष्ठांच्या झेरॉक्स प्रतीही जोडलेल्या आहेत.

अभिनेते विजय पाटकर यांना धगधगती मुंबईचा जीवनगौरव पुरस्कार

अभिनेते विजय पाटकर यांना धगधगती मुंबईचा जीवनगौरव पुरस्कार मुंबई: ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय पाटकर यांना भीमराव धुळप यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होणाऱ्या धगधगती मुंबईतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विवेक पाटकर यांनाही उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेले राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी धगधगती मुंबईचे कौतुक केले. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्या प्रत्येकाला सन्मानाचे भाग्य मिळत नाही. परंतु धगधगती मुंबई च्या माध्यमातून संपादक भीमराव धुळप यांनी चांगला उपक्रम राबवलेला आहे. कुठेतरी अंधारामध्ये असलेल्या वंचित घटकांना प्रकाश झोतात आणण्याचे काम ते गेली सोळा वर्षे करीत आहेत. हेच कार्य अनेकांसाठी प्रेरणादायक आहे, अशा शब्दांत राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी धगधगती मुंबईचे कौतुक केले. साप्ताहिक धगधगती मुंबईच्या सोळाव्या वर्धापनदिना निमित्त आयोजित केलेल्या नवी मुंबई, कोपरखैरणे येथील स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृहातील कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, नवी मुंबई महापौर सुजाता पाटील, ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, ॲड. स्मिता चिपळूणकर, उद्योजक हनुमंत रांजणे, के. के. शेलार व लोक कलावंत योगेश चिकटगावकर व धगधगती मुंबई संपादक भीमराव धुळप, सरपंच रमेश धनावडे यांच्यासह मान्यवर पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे हितचिंतक मित्र परिवार व कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील घोगाव ता. कराड येथील श्री धुळप यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून गेली १६ वर्ष महाराष्ट्रात लेखणी धगधगती ठेवली . भीमराव धुळप व त्यांचे चिरंजीव ओमकार धुळप यांनी पत्रकारिता क्षेत्रांमध्ये चांगली टीम तयार केलेली आहे. समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने उपेक्षितांची बाजू मांडणार आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. वृत्तपत्रातही स्पर्धा असली तरी आपल्या उत्पन्नातील वाटा समाजासाठी खर्च करणाऱ्या पत्रकारांबद्दल समाज सुद्धा जागृत असल्याचे दिसून आले आहे. अशा शुभेच्छा देऊन अशा कार्यक्रमाला नेहमीच प्रोत्साहन दिले जाईल, असे वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक व नवी मुंबई महापौर सुजाता पाटील यांच्यासह मान्यवरांनी आश्वासन देऊन सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन केले. महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांसाठी कार्यरत असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा मोठा गौरव होत असतो. परंतु सामान्य माणसांसाठी पुरस्कार देऊन  त्यांना उत्साहित करणे. हे काम खऱ्या अर्थाने सामाजिक जबाबदारी वाढवणारी आहे. सर्व स्तरातील लोकांचा बहुमान ही अद्भुत शक्ती सर्वांच्या पाठीशी कायम राहणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी  ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांना जीवन गौरव पुरस्कार व रमेश कदम (समाज रत्न) वसंत जाधव (समाज गौरव)  राजन किणे (दलित मित्र) रमेश धनावडे (आदर्श सरपंच) प्रताप महाडिक (शिक्षण रत्न) संगम प्रतिष्ठान व नरेंद्र छाया कम्प्युटर इन्स्टिट्यूट (उत्कृष्ट संस्था पुरस्कार) नंदकुमार काटकर (सहकार रत्न) डॉक्टर शांताराम कारंडे (साहित्यरत्न) सचिन वरखडे वैद्यरत्न ( वैद्यकीय) अँड .मनीषा चव्हाण (कायदा रत्न) डॉक्टर सुरज पाटील (वैद्यकीय रत्न) विद्यावाचस्पती विजयकुमार स्वामी (अध्यात्मिक) अनुजा दांडगे (उद्योजिका) के.के शेलार (उद्योग रत्न) हनुमंत रांजणे (समाजभूषण) आदी मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

हिंद-दी-चादर’ समागम सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज

हिंद-दी-चादर’ समागम सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज नवी मुंबई : खारघर येथील ओवे मैदानावर शनिवारी ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमाचा मुख्य कार्यक्रम या शनिवार-रविवारी (२८ फेब्रुवारी-१मार्च) पार पडणार…

शिखर बँक घोटाळ्यात साऱ्यांनाच क्लीनचीट

शिखर बँक घोटाळ्यात साऱ्यांनाच क्लीनचीट दिवंगत अजित पवारांसह ७० जण निर्दोष मुंबई: महाराष्ट्रातील राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँकेत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्ष भाजपाकडून करण्यात आला होता आणि राज्यात आता…

अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं?- राज ठाकरे

अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं?- राज ठाकरे मुंबई : अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं ? असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित…

मराठी भाषा टिकवण्याची शपथ घ्या- नायगावकर

मराठी भाषा टिकवण्याची शपथ घ्या- नायगावकर मुंबई : मराठी भाषेचा अभिमान आणि भाषिक अस्मितेला नवी उभारी देणार्‍या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित कवितोत्सवाला शुक्रवारी उत्साही…

पावसाळ्यापुर्वी नालेसफाई वेळेत करा,

पावसाळ्यापुर्वी नालेसफाई वेळेत करा, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगरसेवक सरसावले मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यापुर्वी भांडुप मधील नालेसफाई युध्दपातळीवर करावी. दरवर्षी पावसाळ्यात नाल्यांमध्ये कचरा साचल्यामुळे पाणी तुंबणे, रस्ते जलमय होणे,त्यामुळे नागरिकांना…

वैनगंगा-नळगंगा महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी

वैनगंगा-नळगंगा महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी प्रसिद्ध जल अभ्यासक डॉ.प्रवीण महाजन यांच्या प्रयत्नाला मोठे यश राजेंद्र साळसकर मुंबई : पश्चिम विदर्भाला सुजलाम-सुफलाम करणाऱ्या आणि १४ वर्षांपासून मजुरीच्या प्रतीक्षेत असलेला महत्वाकांक्षी…

2.8 किलोची गर्भाशयातील गाठ काढली; 59 वर्षीय महिलेच्या पोटात वर्षानुवर्षे वाढत होती गाठ

2.8 किलोची गर्भाशयातील गाठ काढली; 59 वर्षीय महिलेच्या पोटात वर्षानुवर्षे वाढत होती गाठ मुंबई: 59 वर्षांच्या रजोनिवृत्त महिलेने सतत मळमळ होत असल्याची तक्रार घेऊन उपचारासाठी भेट दिली. त्यांना पोटदुखी नव्हती,…

ज्येष्ठ शिक्षिका सुरेखा कडवे स्मृती शालेय बुध्दिबळ स्पर्धा ७ मार्चला

ज्येष्ठ शिक्षिका सुरेखा कडवे स्मृती शालेय बुध्दिबळ स्पर्धा ७ मार्चला आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे ज्येष्ठ शिक्षिका सुरेखा कडवे स्मृती १३ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या एकूण ६ वयोगटामध्ये जलद बुध्दिबळ स्पर्धा ७ मार्च…