Category: मुंबई

Mumbai news

दादांच्या खांद्यावर हात ठेवायची नरेश अरोराचा हिंमत कशी होते ?

अमोल मिटकरींचा संताप 0 डिझाईन बॉक्सला नोटीस पाठविणार मुंबई : विधानसभेत राष्ट्रवादीला मिळाळेले घवघवीत यश हे फक्त आणि फक्त अजित पवारांच्या मेहनतीचे फळ आहे. कोण कुठला तो नरेश अरोरा दादांच्या बाजूला येतो, बुके देतो आणि…

दादांच्या खांद्यावर हात ठेवायची नरेश अरोराचा हिंमत कशी होते ?

अमोल मिटकरींचा संताप 0 डिझाईन बॉक्सला नोटीस पाठविणार मुंबई : विधानसभेत राष्ट्रवादीला मिळाळेले घवघवीत यश हे फक्त आणि फक्त अजित पवारांच्या मेहनतीचे फळ आहे. कोण कुठला तो नरेश अरोरा दादांच्या बाजूला येतो, बुके देतो आणि…

एकनाथ शिंदे नाराज अमित शाह आज मुंबईत ० भाजपाचा मुख्यमंत्रीपदावर दावा

स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत घमासान सुरु असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दिल्लीतील वाटाघाटीत मुख्यमंत्रीपदावर भाजपाने दावा सांगितल्याने एकनाथ शिंदे नाराज झाले असून त्यांनी सायंकाळच्या सर्व भेटी रद्द केल्याचे समजते. मुंबई…

दणदणीत

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन भूमीवरील २९५ धावांनी सर्वात मोठा दणदणीत विजय मिळविला आहे. यापूर्वी १९७७ मध्ये मेलबर्नमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा २२२ धावांनी पराभव केला होता. (अधिक वृत्त पान ६वर)

पसंतीचा वाहन क्रमांक घरबसल्या मिळण्याची सुविधा

मुंबई : लाखो-करोडो रुपये खर्च करून नवीन वाहन खरेदी केल्यानंतर आता ऑनलाइन पद्धतीने आकर्षक वाहन क्रमांक मिळवण्याची सुविधा आरटीओद्वारे राज्यभरात सुरू केली जाणार आहे. त्यामुळे घरबसल्या पसंतीचा वाहन क्रमांकाची नोंद…

पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे २८ नोव्हेंबरला प्रकाशन

मुंबई :भारतातील पोर्ट उद्योगात सर्वात जुनी असलेली १०४  वर्षाची  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन आहे. स्वातंत्र्यसेनानी, मुंबईचे माजी महापौर, माजी खासदार व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांच्या…

मिहीर शहा आणि त्याच्या चालकाची अटक कायदेशीरच

 वरळी येथील हिट अँण्ड रन प्रकरण : मुंबई : वरळी येथील अपघाताप्रकरणी शिवसेना (एकनाथ शिंद) नेत्याचा मुलगा मिहीर शहा आणि त्याचा चालक राजऋषी बिडावत यांना झालेली अटक ही कायदेशीरच होती. त्यात काहीच बेकायदा नाही, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने सोमवारी दोघांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. अटक करताना ती करण्याची कारणे आपल्याला सांगण्यात आली नव्हती, असा दावा करून मिहीर आणि बिडावत यांनी अटकेला आव्हान दिले होते. तसेच, अटक बेकायदा ठरवून आपली तातडीने जामिनावर सुटका करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने दोघांची अटक कायदेशीर ठरवून त्यांच्या याचिका फेटाळला. दरम्यान, याचिकांवरील युक्तिवादाच्या वेळी एखाद्या व्यक्तिला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले किंवा पकडले गेल्यास त्याला अटकेच्या कारणांची माहिती देणे ही निव्वळ एक औपचारिकता असते. मद्यपान करून बेदरकारपणे गाडी चालवणे आणि सदोष मनुष्यवधासाठी कारणीभूत ठरण्याच्या प्रकरणात तर या नियमाचे पालन न केल्याने फारसा फरक पडत नाही, असे खंडपीठाने प्रामुख्याने स्पष्ट केले होते. तसेच. गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगितले नसल्याचा दावा करून अटकेला आव्हान देणाऱ्या मिहीर आणि बिडावत यांच्या दाव्याबाबत आश्चर्य व्यक्त केले होते. याचिकाकर्त्याला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले गेले आहे. त्यानंतरही त्याला अटकेचे कारण माहिती नाही ? अटकेचे कारण सांगितले नाही म्हणून त्यांची अटक ही बेकायदा कशी ठरते ? प्रत्येक प्रकरणातील तथ्य आणि परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार, कार्यवाही करणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. याचिकाकर्त्यावरील आरोप लक्षात घेता त्याने मद्याच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून आधी दुचाकीला धडक दिली. त्यानंतर, धडकेमुळे, दुचाकीवरून पडलेल्या महिलेला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. एवढेच नाही, तर याचिककर्ता इतका घाईत होता की तो फास्टॅग कार्ड मागे विसरला, त्याचाही त्याला विसर पडला. त्यामुळे, या प्रकरणाकडे उदाहरण म्हणून पाहण्याची गरज आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली मिहीर याच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करताना केली होती. आरोपीला त्याने केलेल्या कृत्याची माहिती असतानाही निव्वळ औपचारिकता म्हणून त्याला ताब्यात घेत असल्याची माहिती द्यावी लागते. परंतु, सर्वकाही माहिती असूनही आपल्याला अटकेचे कारण सांगितले नाही हा मिहीर याचा दावा आश्चर्यकारक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. प्रकरण काय ? मिहीर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. त्याच्यावर मद्याच्या नशेत भरधाव बीएमडब्ल्यू चालवून कावेरी नाखवा (४५) या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. मिहीरने ९ जुलै रोजी मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू कार चालवताना नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे जमिनीवर पडलेल्या कावेरी यांना रुग्णालयात नेण्याऐवजी त्याने गाडीनेच दीड किमीपर्यंत फरफटत नेले होते. यात कावेरी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मिहीर घटनास्थळावरून पळून गेला. राजेश शहा यांनाही पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक केली होती. मात्र, त्यांना जामीन मिळाला आहे.

 मानसिक आरोग्य सुदृढ होण्यासाठी अध्यात्माची जोड महत्त्वाची

 प्रल्हाद पै यांचे प्रतिपादन कर्जतच्या जीवनविद्या ज्ञानपीठात आनंद सोहोळा उत्साहात   मुंबई, : ‘माणूस आनंदी असला की शरीरात हॅपी हॉर्मोन्स तयार होतात आणि या हॅपी हॉर्मोन्समुळे माणूस आनंदी होतो. मानसिक…

व्यवसाय परवाना नुतनीकरणाबाबत जाहीर आवाहन

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 376, अनुसूची ड, प्रकरण 18, भाग 4 मध्ये समाविष्ट असलेले सर्व व्यवसाय (उदा. खानावळी, हॉटेल, उपहारगृहे, लॉजिंग बोर्डींग, स्वीट मार्ट, केक…

भिवंडीतील अवैध भंगार गोदामे असुरक्षित

भिवंडी  : भिवंडीतील बेकायदा भंगार गोदामे आता सुस्थितीत नाहीत, अवैध भंगार गोदामांमुळे नेहमी आगी लागण्याच्या घटना घडतात. त्याचा फटका लोकवस्तीलादेखील बसतो. ही जाळपोळ थांबविण्यासाठी प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला…