प्रशांत – अंबिका विजेते
रोटरी क्लब रॅपीडो कॅरम स्पर्धा मुंबई : रोटरी क्लब डोंबिवली पूर्व आयोजित रोटरी क्लब रॅपीडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या प्रशांत मोरेने ठाण्याच्या झैद अहमद फारुकीचा…
Mumbai news
रोटरी क्लब रॅपीडो कॅरम स्पर्धा मुंबई : रोटरी क्लब डोंबिवली पूर्व आयोजित रोटरी क्लब रॅपीडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या प्रशांत मोरेने ठाण्याच्या झैद अहमद फारुकीचा…
मुंबई : माऊली प्रतिष्ठान ज्येष्ठ नागरिक संस्था प्रतीक्षा नगर मुंबईच्या वतीने रविवारी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता कै .श्री रघुनाथ विठल चव्हाण क्रीडांगण मैदानात समाजातील गरजू,निराधार व विधवा महिलांना…
मुख्य रस्ते साफसफाई व प्रक्रियाकृत पाण्याने धुण्यामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांकडून समाधान नवी मुंबई : नाविन्यपूर्ण उपक्रमांव्दारे स्वच्छतेमध्ये नेहमीच आघाडीवर असणा-या नवी मुंबई शहरातील जागरुक नागरिकांनी भारतातील सर्वात मोठा सण असणारा दिवाळी उत्सव हा ‘पर्यावरणशील, फटाकेमुक्त व प्लास्टिकमुक्त’ साजरा करण्याविषयी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले असून यादृष्टीने महानगरपालिकाही तशा प्रकारची कार्यवाही करीत आहे. दिवाळीपूर्वी नागरिक मोठया प्रमाणात आपल्या घराची साफसफाई करत असतात. अशावेळी नागरिकांनी आपल्याला नको असलेल्या, टाकून देणार असलेल्या वस्तू नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरात 92 ठिकाणी उभारलेल्या ‘थ्री आर’ सेंटरमध्ये आणून ठेवाव्यात, जेणेकरून त्या गरजूंपर्यंत पोहचून त्यांची दिवाळी आनंदात जाईल तसेच उर्वरित कच-याची विल्हेवाट लावणे सोयीचे ठरेल असे आवाहन करण्यात आले आहे. शहर स्वच्छ ठेवण्यात स्वच्छतामित्र आणि स्वच्छतासखींचे फार मोठे योगदान असून कच-याचे वर्गीकरण करण्यातून तसेच महानगरपालिकेने निश्चित केलेल्या योग्य जागी कचरापेट्यांमध्ये योग्य प्रकारे कचरा टाकण्यातून आपल्या स्वच्छताकर्मींना करावे लागणारे अतिरिक्त काम कमी करून दिलासा द्यावा असे आवाहन आहे. तसेच कोणत्याही प्रकारे उघड्यावर कचरा जाळून वायू प्रदूषण वाढू न देण्याची खबरदारी घ्यावी असेही आवाहन करण्यात आलेले आहे. दिवाळीपूर्वी शहर स्वच्छतेची विशेष सखोल स्वच्छता मोहीम आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून शहरातील मुख्य मार्गांवरील दुभाजकांचे कॉर्नर्स व पदपथ येथील गाळ सुकून झालेली माती काळजीपूर्वक साफ करण्यात येत आहे. याकरिता मॅकेनिकल स्विपींग वाहने तसेच वॉटर स्प्रेईंग वाहने यांचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. यामध्ये अग्निशमन विभागाचेही विशेष सहकार्य मिळत आहे. पावसाळी कालावधीत पावसासोबत वाहून आलेली माती रस्त्यांच्या कडेला गाळ स्वरुपात जमा होते व पाऊस थांबल्यानंतर वाहनांच्या रहदारीमुळे हवेत उडून प्रदूषणात वाढ होते. ही बाब लक्षात घेत ही रस्त्यांच्या कडेला साचलेली माती जमा करण्यात येत असून त्यानंतर या रस्त्यांची जेटींग मशीनव्दारे पाणी मारुन सफाई करण्यात येत आहे. यासाठी वापरण्यात येणारे पाणी मलप्रक्रिया केंद्रातील शुध्दीकरण केलेले प्रक्रियाकृत पाणी असून यामुळे रस्ते सफाईसोबतच पिण्याच्या पाण्याची बचतही केली जात आहे. या अंतर्गत नेरुळ विभागात राजीव गांधी उड्डाणपूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते से 3 बस डेपो – जय भवानी सर्कलपर्यंत रस्ते स्वच्छता व रस्ते धुणे अशा दोन्ही प्रकारे विशेष स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे अवजड वाहनांची नियमित वर्दळ असणा-या बेलापूरमधील आम्रमार्गावर उरण फाटा ते नमुंमपा मुख्यालय भागाची सखोल रस्ते सफाई करण्यात आली. यासोबतच ठाणे बेलापूर मार्ग, कोपरखैरणे – रबाळे एमआयडीसी मार्ग, महापे शिळफाटा मार्ग, वाशी कोपरखैरणे मार्ग, घणसोली पामबीच मार्ग, पटणी मार्ग अशा मुख्य मार्गांची रस्ते साफसफाई व धुणे अशा दोन्ही प्रकारे सखोल स्वच्छता करण्यात आली आहे. या भागात दररोज सकाळ, संध्याकाळ चालण्यासाठी येणा-या महिला व पुरुषांनी महानगरपालिकेच्या या सखोल स्वच्छता मोहीमेची प्रशंसा केली असून यामुळे धूळीचे प्रमाण कमी झाल्याचे अभिप्राय दिले आहेत. ००००
रमेश औताडे मुंबई : आजपर्यंत कुठल्याही सरकारने मुंबईत मराठी टक्का घसरु नये म्हणून प्रामाणिकपणे काहीही प्रयत्न केलेले नाहीत. निव्वळ भावनेचे खेळ करुन फायदा उचलला आहे. आता मात्र मराठी माणसाने या दिखाऊ प्रेमाला किंमत न देता ” ठोस कृतीचा ” जाहिरनामा काढणाऱ्या पक्षालाच मतदान करा असे आवाहन पार्ले पंचम संस्थेचे अध्यक्ष श्रीधर खानोलकर व जेष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई व मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी केले. गिरगावात भूमीपुत्राला तो मराठी आहे म्हणून रोजगार नाकारण्याचा प्रकार घडला होता. असाच प्रकार नंतर मरोळ येथील गुजराती मालकाच्या कंपनीत घडला होता. मुलूंड येथे देवरुखकर नावाच्या उद्योजिकेला गुजरातीबहुल सोसायटीत मराठी आहे म्हणून जागा नाकारण्यात आली होती. मध्यंतरी विलेपार्ले येथे देखील असाच प्रकार घडला होता. त्यावेळी शिवसैनिकांनी मोर्चा काढला होता. घाटकोपर जगदुशानगर येथे मराठी माणसांना मालकीचे व भाड्याने घर घेणे कठीण झाले आहे. मुंबईतील बहुतेक ठिकाणी मासांहारी म्हणून मराठी माणसांना घरे नाकारण्याचा प्रकार फार मोठ्या प्रमाणांत होत आहे. मराठी माणूस ,भाषा, परंपरा, संस्कृती टिकून राहावी म्हणून मुंबईत नवीन इमारतीत इमारतीचे बुकींग सुरु झाल्यावर एक वर्षापर्यंत ५० टक्के फ्लॅट हे मराठी माणसांसाठी आरक्षित ठेवावेत. एक वर्षानंतर मात्र ते खरेदी केले नाहीत तर ते कोणालाही विकण्याची मुभा असावी. प्रत्येक इमारतीत २० टक्के फ्लॅट हे लहान आकाराचे असावेत. ५०० फूट किंवा त्यापेक्षा कमी आकाराचे फ्लॅट असावेत. जेणे करुन सर्वसामान्य मराठी माणसाला देखील त्या फ्लॅटची किंमत व देखभाल खर्च परवडू शकेल. मुंबईत अनेक गृहनिर्माण इमारतीत हे धनदांडगे अमराठी लोक मराठी माणसांवर अन्याय करत असतात. अशा प्रकरणांत मराठी माणमांना त्वरेने न्याय मिळावा म्हणून सहकारी खात्याचे उपनिबंधक, मुंबई महानगर पालिकेचे प्रत्येक विभागातील सहाय्यक आयुक्त व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांना सुचना देण्यात द्याव्यात. तसेच या प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी एखाद्या सरकारी अधिकाऱ्याची नेमणूक करावी. मुंबईत होत असलेल्या मेट्रो स्टेशनना मराठी लेखक, कवी, कलाकार, संगीतकार याची नावे देऊन मराठी संस्कृतीची आठवण वृध्दिगंत करावी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यासाठी मराठी भाषेसाठी भरघोस निधी उपलब्ध करावा, मराठी तरुणांसाठी औद्यागिक वसाहती बांधून त्यांत त्यांना गाळे उपलब्ध करावेत. सरकारने त्यासाठी मार्गदर्शन केंद्र उभारुन सढळ हस्ते सबसिडी द्यावी.आदी मागण्यांसाठीचा जाहीरनामा श्रीधर खानोलकर व हेमंत देसाई यांनी प्रसिद्ध केला.
विरार : विधानसभा निवडणुकीसाठी काही उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली असतानाही महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा अद्याप सुटला नव्हता. यामध्ये वसई आणि नालासोपारा मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर विजय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याने वसईमध्ये काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले आहे. नालासोपारा मतदारसंघातून महाविकास आघाडी कुणाला तिकीट देणार, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. महाविकास आघाडीमधून शिवसेना ठाकरे गटाने पालघर आणि बोईसर मतदारसंघामधून उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामुळे वसई आणि नालासोपारा मतदारसंघातून काँग्रेसला उमेदवारी देण्यात येईल, असे संकेत मिळत होते. त्यानुसार काँग्रेसने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत विजय पाटील यांना स्थान देत त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पुन्हा एकदा २०१९ प्रमाणेच वसईत हितेंद्र ठाकूर विरुद्ध विजय पाटील, असा सामना रंगणार आहे. मागील वेळी हितेंद्र ठाकूर हे २६ हजार मतांनी विजयी झाले होते. त्या वेळी शिवसेना महायुतीकडून उमेदवार राहिले होते. या वेळी पक्षबदल करत काँग्रेसमध्ये गेले आहेत. महायुतीमधून अद्याप उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे नालासोपाऱ्यामधून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेली नसल्याने ठाकरे गट की काँग्रेस ही जागा लढवणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
नवी मुंबई : 20 नोव्हेंबर रोजी होणा- निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टीने 150 व 151 विधानसभा निवडणूक कार्यालयांप्रमाणेच नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वीपचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त…
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या तिसऱ्या यादीत चार उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या आधी अजित पवार यांनी दोन याद्यांची घोषणा केली होती. त्यानुसार अजित पवार…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानेदेखील उमेदवारांच्या दोन याद्या यापूर्वीच जाहीर केल्या असून आता ९ उमेदवारांची तिसरी यादी शरद पवारांनी जाहीर केली आहे. पहिल्या दोन यादीत राष्ट्रवादीने ६७ उमेदवारांची घोषणा केली होती. आतापर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकूण ७६ उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे. शनिवारी…
अहमदनगर: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलगी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजापाचे नेते वसंत देशमुखांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी पातळी सोडून जयश्री थोरांतावर टिका केली…
जालना : मी किंवा माझ्या जवळचे कोणीही इच्छुक उमेदवारांना तिकिटासाठी पैसे मागत नाहीत. आपलं तिकीटही किंवा पाठिंबाही फुकट असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. कुणीही पैशाचा व्यवहार करू नये…