Category: मुंबई

Mumbai news

शरद पवार गटाकडून अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला उमेदवारी,

मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाची तिसरी यादी रविवारी जाहीर करण्यात आली. या तिसऱ्या यादीमध्ये ९ जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या ९ जणांच्या यादीमध्ये अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडून त्यांना अणुशक्तीनगर येथून तिकीट देण्यात आलं आहे. अभिनेत्रीचे पती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वरा भास्करचे पती फहाद अहमद विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा होती. महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने काही दिवसांपूर्वी विधानसभेसाठी मुंबईतील अणुशक्तीनगरची जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. समाजवादी पक्षाकडून फहाद अहमद हे अणुशक्तीनगरची जागा लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र आता त्यांनी समाजवादी पक्षाला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांना अणुशक्तीनगरसाठी तिकीट देण्यात आलं आहे. कोण आहे फहाद अहमद? अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांनी २०२२ मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर ते तेथे युवा आघाडीचे अध्यक्ष होते. त्यांनी विद्यार्थी संघटनांमध्ये काम करत अनेक आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फी माफीच्या मुद्द्यावरुन त्यांनी अनेकदा आंदोलनं केली होती. दरम्यान, मुंबईतील अणुशक्तीनगरची जागा ही नवाब मलिक यांचा बालेकिल्ला मानला जातो. या जागेवर आता नवाब मलिक आमदार आहेत. नवाब मलिक यांच्यावर मनी लाँड्रिंगसारखे आरोप आहेत. याप्रकरणात त्यांना अटक झाली होती. ते जेलमध्ये होते. त्यामुळेच त्यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी दिली नसल्याचं बोललं जातं. मात्र २०२४ च्या विधानसभेसाठी आता यांच्या मुलीला सना मलिक यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अणुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात सना मलिक यांची चांगली पकड आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्या गटाकडून फहाद अहमद आणि अजित पवारांच्या गटाकडून सना मलिक यांना अणुशक्तीनगरची जागा दिल्यानंतर कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

कपिल पाटील फाउंडेशनतर्फे कल्याणमध्ये दिवाळी पहाट

 अभिजीत सावंत, प्राजक्ता शुक्रे खास आकर्षण कल्याण : कपिल पाटील फाउंडेशनतर्फे यंदाही कल्याणमधील साई चौकात २ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी-हिंदी गीतांबरोबर हास्य कलाकार आणि भारतातील प्रसिद्ध बंजारा ग्रुपचे बेली नृत्य पाहण्याची पर्वणी कल्याणमधील हजारो रसिकांना मिळणार आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी कल्याण पश्चिममधील साई चौकात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदा निवडणुकीची आचारसंहिता असतानाही, कल्याणमधील रसिकांसाठी कपिल पाटील फाउंडेशनने शनिवारी दिवाळी पहाट कार्यक्रम भरविला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हजारो कल्याणकरांना अविस्मरणीय मैफल अनुभवता येईल. या कार्यक्रमात इंडियन आयडॉल विजेता व बिग बॉस फेम गायक अभिजीत सावंत, गायिका प्राजक्ता शुक्रे, भूमी त्रिवेदी, जुईली जोगळेकर यांच्याकडून बहारदार गीते सादर होतील. तर प्रसाद खांडेकर व नम्रता संभेराव यांच्या विनोदी किस्स्याने हास्याचा गडगडाट होईल. त्याचबरोबर प्रसिद्ध `बंजारा स्कूल ऑफ डान्स’च्या कलाकारांनी बॅलेसह सादर केलेल्या दिलखेचक अदा आणि मनमोहक नृत्य पाहता येईल.सर्व कल्याणकरांनी २ नोव्हेंबर रोजी साई चौकात दिवाळी पहाटमध्ये सहभागी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे.

एक हजार पोस्टकार्डांवर भारती विद्यापीठ शाळेतील विद्यार्थ्यांनी दिला मतदान करण्याचा संदेश

नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान वाढीसाठी विधानसभा निवडणूक कार्यालय व महानगरपालिका यांच्या वतीने विविध उपक्रमांद्वारे प्रयत्न सुरू असून यामध्ये विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. असाच एक अभिनव उपक्रम भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, नवी मुंबई शाळेच्या विद्यार्थ्यांनी राबविला. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना आणि नातेवाईकांना एक हजाराहून अधिक पत्रांतून मतदान करण्याविषयी आवाहन केले. हा अनोख्या पध्दतीने व्यापक स्वरूपात राबवण्यात आलेला मतदान जनजागृतीचा उपक्रम शाळेतील कलाशिक्षक श्री. नरेश लोहार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.  या विद्यार्थ्यांनी पत्रांतून आपल्या आई-वडिलांना व नातेवाईकांना – बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून माझ्या व भारताच्या उज्वल भविष्यासाठी आपण जरूर मतदान करावे आणि भारताची लोकशाही बळकट करावी ही विनंती, माझेही वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मीही मतदान करेन असे लिहिले आहे. तसेच मतदानादिवशी लागणारी ओळखपत्रे म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदार ओळखपत्र, बँक पासबुक, भारतीय पासपोर्ट, यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत जरूर असावे असाही संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना व नातेवाईकांना पत्राद्वारे दिलेला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काही विद्यार्थ्यांनी मतदार आणि लोकशाही यावर  विधानसभा मतदानासंदर्भात लग्नपत्रिका तयार करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने मतदान जनजागृती केली आहे. याप्रसंगी उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त श्री. श्रीकांत तोडकर, सहायक आयुक्त डॉ.अमोल पालवे, स्वच्छ्ता अधिकारी श्री सूर्यकांत म्हात्रे तसेच  प्राचार्य श्री. बेल्लम आर टी व इतर शिक्षक उपस्थित होते.

कल्याणमध्ये निवडणूक भरारी पथकाकडून लाखो रूपयांची विदेशी दारू जप्त

  कल्याण : येथील पूर्व भागातील चक्कीनाका भागात विधानसभा निवडणूक भरारी पथकाने शनिवारी संध्याकाळी एक लाख १० हजार रूपयांची विदेशी दारू एका वाहनातून जप्त केली. या दारू खरेदी, विक्रीच्या पावत्या आणि याविषयी सविस्तर माहिती वाहनातील इसम देऊ शकला नाही. त्यामुळे भरारी पथकाने हे वाहन अधिकच्या चौकशीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. निवडणूक विभागाचे भरारी पथक कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात शनिवारी संध्याकाळी संशयास्पद वाहनांची तपासणी करत होते. यावेळी या चौकातून एक मोटार वेगाने जात होती. पथकाने ही मोटार अडवली. या मोटारीत बडवायझर कंपनीच्या ३८ इंचाच्या बाटल्यांचे खोके आढळून आले. वाहनातील इसमाकडे पथकाने या विदेशी दारू खरेदी आणि विक्रीच्या पावत्या मागितल्या. त्याची माहिती वाहन चालकासह त्याचा साथीदार देऊ शकला नाही. निवडणूक कामात या विदेशी दारूचा गैरउपयोग होण्याची शक्यता असल्याने पथकाने ही माहिती तातडीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक आर. डी. आव्हाड यांना दिली. हवालदार वाय. के. गायकवाड, पंच सुनील कशिवले, रोहिदास डोक यांच्या उपस्थितीत या विदेशी दारूसह वाहनाचा पंचनामा करण्यात आला. ही वाहने उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांच्या ताब्यात निवडणूक भरारी पथकाने अधिकच्या चौकशीसाठी दिली.ही विदेशी दारू मोटारीतून वहनाचे काम डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील संतोष किट्टना शेट्टी (४०) हे करत होते.

शेअर बाजार कोसळला १० लाख कोटीचा फटका

मुंबई : एन निवडणूकीच्या धामधुमीत शेअअर मार्केट पत्याच्या बंगल्यासारका कोसळला. शुक्रवारी सकाळपासून शेअर बाजारात मोठी घसरण झाली.  सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजार कमी तोट्यात होता, पण हळूहळू तीव्र घसरण होत गेली. काही वेळातच गुंतवणूकदारांचे…

निष्ठेला तिकीट, श्रध्देला ‘सबुरी’

स्वाती घोसाळकर मुंबई : शिवडी मतदार संघात तिकीट वाटप करताना उद्धव ठाकरेंसमोर मोठाच पेच होता. एकीकडे निष्ठा होती तर दुसरीकडे श्रद्धा. एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतरही शिवडीचे आमदार अजय चौधरीयींन मातोश्रीवरील निष्ठा दाखवित…

खासदार मिलिंद देवरा वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात लढणार

स्वाती घोसाळकर मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना हरवण्याचा चंग महायुतीकडून बांधला जात आहे. यासाठीच जोरदार मोर्चेबांधणी सुरु असून एकनात शिंदे यांनी राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांना…

राज्यातील कुष्ठरुग्णांचे प्रमाण घटले

मुंबई :आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध पातळ्यांवर कुष्ठरोग निर्मूलनासाठी होणाऱ्या प्रयत्नांमधून तसेच कुष्ठरुग्णांना करण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण औषधोपचारामुळे राज्यातील कुष्ठरुग्णांच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. २०२३-२४ मध्ये दर हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण…

राज्यातील कुष्ठरुग्णांचे प्रमाण घटले

मुंबई :आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध पातळ्यांवर कुष्ठरोग निर्मूलनासाठी होणाऱ्या प्रयत्नांमधून तसेच कुष्ठरुग्णांना करण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण औषधोपचारामुळे राज्यातील कुष्ठरुग्णांच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. २०२३-२४ मध्ये दर हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण…

म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२४ : लवकरच विजेत्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण

विजेत्यांना सोमवारपासून तात्पुरते देकारपत्र   मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,०३० घरांच्या सोडतीतील निवासी दाखला मिळालेल्या आणि स्वीकृती दिलेल्या विजेत्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या विजेत्यांना सोमवारपासून…