Category: मुंबई

Mumbai news

नवी मुंबई, ठाणे परिसरात पूर्वमोसमी पावसाची हजेरी

मुंबई : ठाणे, नवी मुंबईतील खारघर, कामोठे परिसरात सोमवारी पावसाने हजेरी लावली असून यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, राज्यात सोमवारपासून पूर्व मोसमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नवी मुंबईतील खारघर, कामोठे परिसरात सोमवारी १२ वाजता पावसाने हजेरी लावली. तसेच ठाण्यातही दुपारी १२.३० नंतर पाऊस पडायला सुरुवात झाली. याचबरोबर पश्चिम उपनगरातील पवई, सांताक्रूझ, बोरिवली परिसरात ढगाळ वातावरण होते. दरम्यान, राज्यातील काही भागात सोमवारपासून पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांची वाटचाल सुरू झाली आहे. काही दिवसांत मोसमी वारे राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवलं

मंत्रालयासमोरची घटना मुंबई : मुंबईतल्या IAS अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने इमारतीच्या १० व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. मंत्रालयाच्या समोर ही इमारत आहे याच इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन या मुलीने आयुष्य संपवलं. रस्तोगी यांची मुलगी वकिलीचं शिक्षण घेत होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या घटनेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विकास रस्तोगी हे शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. लिपी रस्तोगी असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे. या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारली तेव्हा ती खाली उभ्या असलेल्या बाईकवर कोसळली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. लिपी रस्तोगी ही LLB करत होती. वयाच्या २७ व्या वर्षी तिने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवलं आहे. त्याआधी तिने एक चिठ्ठी लिहिली आहे असंही कळतं आहे मात्र त्याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आयएस अधिकाऱ्याच्या मुलीने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने या घटनेची चर्चा होते आहे. या मुलीची आई राधिका रस्तोगी या चलन विभागात सचिव आहेत. मुंबईत मंत्रालयासमोर सुनीती नावाची इमारत आहे. या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत लिपी रस्तोगीने आत्महत्या केली. ज्या इमारतीत लिपी आणि तिच्या आई वडिलांसह राहात होती तिथे आयएएस अधिकारी आणि काही मंत्र्यांची घरं आहेत. पहाटे तीनच्या सुमारास लिपीने उडी मारली, ज्यानंतर तिला जीटी रुग्णालयात नेण्यात आलं पण तिचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी अनसैर्गिक मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.

तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने कार्यक्रम

मुंबई : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात प्रमोद जाधव, सह आयुक्त, समाज कल्याण संचालनालय, पुणे यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी व  मुंबईकरांना दिली तंबाखूमुक्तीची शपथ – “तंबाखूला नाही म्हणा”. यात धुम्रपानविरोधी कार्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. “जागतिक तंबाखू विरोधी दिन” निमित्ताने मंत्रालयात सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आय़ोजित करण्यात आला.  व्यसनांचे विदारक रुप प्रकट करणारे कटआऊट, बँनर्स, पोस्टर्स प्रदर्शनी याचे उदघाटन यावेळी प्रमोद जाधव, सह आयुक्त, समाज कल्याण संचालनालय, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उप सचिव रविंद्र गोरवे, कक्ष अधिकारी राजेश मांजरेकर, नशाबंदी मंडळाचे उपाध्यक्ष एकनाथ तांबवेकर, सरचिटणीस वर्षा विद्या विलास, चिटणीस अमोल मडामे हे उपस्थित होते. प्रमोद जाधव यांनी आपल्या मनोगतात व्यसन आणि वाढते प्रमाण यांना आळा घालण्यासाठी प्रचार, प्रसार, प्रबोधनाची त्रिसुत्री अवलंबून युवा पिढीचे तंबाखूजन्य पदार्थापासुन आपण रक्षण करण्यात यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त केला. जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे की, जर तंबाखूचे व्यसन थांबविले नाही तर सन 2020 ते 2030 पर्यंत जगातील सुमारे शंभर कोटी लोक तंबाखू पासून होणाऱ्या रोगांमुळे मृत्यू पावतील. त्यामध्ये 20 ते 30 वर्षे वयोगटातील 40 टक्के लोक असू शकतात. हा तंबाखूचा अतिरेकी हल्ला नाही का ? म्हणून या आयोजनात सर्वांनी सहभागी व्हावे व स्वतःला तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी तंबाखूमुक्तीची शपथ घ्यावी असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केले. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्यांनी 2011 साली व्यसनमुक्तीचे धोरण बनवले आहे. 2020 महाराष्ट्र राज्याचे साठावे वर्ष आहे. महाराष्ट्र सरकारने या निमित्ताने व्यसनमुक्त महाराष्ट्र च्या दिशेने पाऊल उचलावे असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केले. तसेच येणाऱ्या वर्षात शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स, धार्मिक स्थळे यांच्या 100 मीटर पासून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद व्हावी या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती कायदा अंमलबजावणीची मोहीम जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद यामध्ये मोहीम राबविण्यात येईल व याठिकाणी तंबाखूमुक्ती ची शपथ मंडळाच्या संघटकांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार असल्याचे चिटणीस अमोल स. भा. मडामे यांनी मांडले. वाढते व्यसनांचे प्रमाण आणि त्यात अडकत झालेली तरुणाई यांना व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी व्यसनांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि शरीराची होणारी परवड लक्षात घेऊन या मुलांना परावृत्त करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात ही प्रदर्शनी, व्यसनमुक्ती सापसिडी बघण्यासाठी येणारे कर्मचारी, अधिकारी व मुंबईकर यांचे लक्ष वेधुन घेऊन सर्वांना तंबाखूला नाही म्हणा असे संदेश देत होते. सदर कार्यक्रमाला आरोग्य सेवा आयुक्तालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, तंबाखू नियंत्रण उपक्रम कार्यक्रम, सलाम मुंबई फाऊंडेशन, नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन, किन्नर मॉ, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थांनी सहभाग घेऊन कार्यक्रमात पोस्टर प्रदर्शनीचे आयोजन करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. तंबाखूजन्य कायद्याची माहिती दर्शविणारे कटआऊट, प्रदर्शनी, पोस्टर्स, पत्रकांच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थ व विक्री कायदा २००३ चा प्रचार, प्रसार व अंमलबजावणीसाठी आयोजित या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी आपला सहभाग नोंदवत तंबाखू मतलब खल्लास तंबाखू मुक्त महाराष्ट्र चा नारा देत तंबाखूजन्य पदार्थ पासून दूर राहण्याचा संकल्प केला अशी माहिती नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व चिटणीस अमोल स. भा. मडामे यांनी दिली. सदर कार्यक्रमात नशाबंदी मंडळाच्या वतीने कार्यकारीणी सदस्य प्रिया पाटील, दिपक पाटील, पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील, मुंबई शहर संघटक विवेक साळवी, व मुंबई उपनगर संघटिका दिशा कळंबे, स्वयंसेवक चेतना सावंत या सर्वांनी उपस्थिती दर्शवुन कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रम प्रसंगी व्यसनमुक्ती सापसिडी चे पण आयोजन करण्यात आले होते याचा आंनद सर्वांनी घेतला. सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांचे आभार नशाबंदी मंडळाचे सदस्य प्रिया पाटील यांनी मानले. तसेच संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल मडामे, चिटणीस, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी केले.

ध्यानमग्न मोदींना ८०० जागा मिळतिल- राऊत

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये ध्यानधारणा सुरू केली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि एक्झिट पोलच्या निकालावर भाष्य…

मोदींच्या विजयाचा आनंद दोन दिवसांचाच – वडेट्टीवार

मुंबई :लोकसभा निवडणूकीच्या एक्झिट पोलच्या अंदाजावरुन देशात पुन्हा मोदी सरकरा येणार असल्याचे चित्र असले तरी हे आकडे फसवे आहेत. दोन दिवसांनी म्हणजेच येत्या चार जूनला मतमोजणीत सत्य सामोरे येईल. त्यामुळेच…

राज्यात महायुती कर्माची फळं भोगतेय- मनोज जरांगे

जालना : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल नुसार राज्यातक भाजपाप्रणित महायुतीच्या जागा कमी होताना दिसत आहेत. मराठा आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते आपल्या कर्माची फळे भोगत आहेत अशा शब्दात मनोज जरांगे यांनी एक्झिट…

फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलं नाही- एकनाथ खडसे

मुंबई : देशात भाजपायुक्त एनडीए साडेतीनशे पार जात असल्याचे एक्झिट पोलमधून दिसत असले तरी महाराष्ट्रात मात्र महायुतीला फटका बसला आहे. फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलं नाही, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला…

कॅन्सरच्या रुग्णांना जीवदान मिळणार !

 भारतात प्रथमच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी शेवटच्या टप्प्यावरील कर्करोग उपचारासाठी गामा-डेल्टा एलोजेनिक सीएआर -टी सेल कॅन्सर थेरपी ठरली प्रभावी  प्रख्यात मुंबईस्थित ऑन्कोलॉजिस्ट डॉ. विजय पाटील यांचे यश मुंबई:  जीवघेणा कर्करोग शेवटच्या टप्प्यावर…

अजितदादांचे अरुणाचलमध्ये ३ आमदार !

मुंबई: एक्झिट पोलमध्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महाराष्ट्रात धुव्वा उडाला असला तरी अरुणाचलमधून खुशखबर आहे. अरुणाचल विधानसभा निवडणूकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३ आमदार निवडूण आले आहेत. अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार…

ॲड अनिल परब आज उमेदवारी दाखल करणार

 मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी मंत्री, आमदार ॲड अनिल परब हे सोमवारी, ३ जून रोजी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार…