Category: मुंबई

Mumbai news

जळगावचा नईम तर मुंबईची काजल अंतिम विजेते 

राज्य कॅरम स्पर्धा मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व क्षत्रिय युनियन क्लब ( क्षात्रैक्य समाज, मुंबई ) यांच्या संयुक विद्यमाने वनमाळी हॉल, दादर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम…

अवयवदान वाढणे ही काळाची गरज – राजीव निवतकर

मुंबई : कोणत्याही ठिकाणी असूद्या प्रतीक्षा यादी असतेच. आरोग्य विभागही त्याला अपवाद नाही. आपले अवयव किती अनमोल असतात याची आपल्याला किंमत नसते. आज राज्यात अवयव मागणी मोठी आहे. प्रतीक्षा यादी…

आचारसंहितेत अडकला ‘आनंदाचा शिधा’

रमेश औताडे मुंबई : हातावर पोट असणाऱ्यांनी रोज कमवायचे व रोजचा उदरनिर्वाह करायचा असे असताना शिधावाटप दुकानाचा आधार होता.पोटाची खळगी भरताना सरकारने दिलेले खराब का असेना ते खाऊन तृप्तीची ढेकर देणारा मेरा भारत महान असे म्हणणारा गरीब नागरीक आनंदी असायचा. मात्र त्याचा आनंद मात्र निवडणुकीमुळे लुप्त झाला आहे. शिधावाटप अधिकारी म्हणतात की,  निवडणुकीनंतर ‘आनंदाचा शिधा’ मिळेल. गुढीपाडवा तरी गोड होईल या आशेवर चार पाच चकरा शिधा दुकानावर मारून आलेले शिधा ग्राहक मात्र भर उन्हाळ्यात शिधा न मिळाल्याने नाराज झाले आहेत. गुढीपाडवा व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून राज्य सरकारने शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा केली होती. गुढीपाडवा साजरा केला तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली मात्र शिधा काही मिळाला नाही.आता निवडणूक आहे त्यामुळे आतपण शिधा वाटप नाही. शंभर रुपयांत शिधा अशी जाहिरात करण्यासाठी सरकारने करोडो रुपये खर्च करून आपलीच पाठ थोपटली.त्यानंतर साडी वाटप सुरू केले. फाटक्या साड्या देऊन गरिबांची चेष्टा केली.अशी प्रतिक्रिया शिधापत्रिका धारक देत आहेत. मतदार राजा हा निवडणुकीत उमेदवारांच्या मागे मोफत वडापाव व पाणी पित भिकाऱ्यासारखा फिरत आहे.त्याला किमान शिधा तरी द्या अशी मागणी होऊ लागली आहे.आज भूक लागली आहे निवडणूक झाल्यावर सोने जरी दिले तरी त्याने भूक शमणार आहे का ? असा संतप्त सवाल गरीब जनता करत आहे. त्यामुळे आनंदाचा शिधा मिळत नसल्याने मतदार राजा आनंदी नाही.

मुंबईतील भूखंडाच्या ई लिलावासाठी पुन्हा तीन दिवसांची मुदतवाढ

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध वापरासाठी राखीव असलेल्या १७ भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा सादर करण्याची मुदत मंगळवारी संपुष्टात येणार होती. मात्र तत्पूर्वीच सोमवारी मंडळाने निविदा सादर करण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ दिली. मुंबई मंडळाने मार्चमध्ये १७ भूखंडांच्या विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदेनुसार मालवणी, कांदिवली, टागोरनगर (विक्रोळी), कन्नमवार नगर (विक्रोळी), प्रतीक्षा नगर आणि जोगेश्वरी येथील भूखंडांचा ई लिलावात समावेश आहे. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, मनोरंजन मैदान अशा विविध वापरासाठी हे भूखंड आरक्षित आहेत. विविध क्षेत्रफळाच्या या भूखंडांसाठी मुंबई मंडळाने एक बोली निश्चित केली आहे. ४५ हजार ३०० रुपये प्रति चौरस मीटरपासून १ लाख ६ हजार १७० रुपये प्रति चौरस मीटर दराने बोली निश्चित करण्यात आली आहे. या बोलीपेक्षा सर्वाधिक बोली लावणारी निविदाकार संस्था, व्यक्तींना हे भूखंड वितरीत करण्यात येणार आहेत. ई लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना बोली रक्कमेच्या एक टक्के अनामत रक्कम अदा करावी लागणार आहे. मुंबई मंडळाला या भूखंड विक्रीतून किमान १२५ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. या १७ भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २६ एप्रिल होती. मात्र आचारसंहिता आणि अधिक प्रतिसाद मिळावा या उद्देशाने निविदा सादर करण्याची मुदत संपण्याआधीच या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार निविदा प्रक्रियेस ७ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत मंगळवार, ७ मे रोजी संपणार होती. मात्र तत्पूर्वीच निविदा सादर करण्यास मंडळाने तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता इच्छुकांना १० मेपर्यंत निविदा सादर करता येतील, अशी माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

कोकण रेल्वेची विलंबयात्रा… मतदानाला पोहोचण्याबाबत शंका!

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी मुंबईस्थित बहुसंख्य कोकणवासीय गावी निघाले आहेत. मात्र कोकण रेल्वेवर असलेला मेगा ब्लॉक आणि रेल्वे गाड्यांची सातत्याने विलंबयात्रा यामुळे मतदानासाठी वेळेवर पोहोचणार का, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. नियमित आणि विशेष रेल्वे गाड्या किमान दोन-तीन तास उशिरा असून एलटीटी ते थिवीम विशेष गाडी तर ११ तास विलंबाने धावली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त कोकणात मूळ गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यात तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगडमध्ये मंगळवारी मतदान झाल्याने  मुंबईतील कोकणवासीय गावाकडे निघाले. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून गाड्यांना गर्दी वाढली आहे. मात्र सततच्या विलंबाने प्रवासी हैराण झाले.  कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक असल्याने मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी गावी पोहोचण्यासाठी मतदारांना तारेवरची कसरत करावी लागली. एलटीटीवरून ४ मे रोजी रात्री १०.१५ वाजता सुटणारी गाडी ५ मे रोजी सकाळी ७.२४ वाजता सुटली. त्यानंतर पुढील प्रवास प्रचंड रखडत सुरू असल्याने थिवीम येथे रात्री ९ वाजता पोहोचली. ५ मे रोजीची सीएसएमटी ते मडगाव कोकणकन्या १ तास १० मिनिटे, सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस ३२ मिनिटे, दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस ५३ मिनिटे, एलटीटी ते थिवीम १ तास २६ मिनिटे उशिराने धावल्या. केवळ एकच विशेष गाडी… मध्य रेल्वेने सोमवारी मुंबईतील टर्मिनसऐवजी पनवेलहून सावंतवाडीसाठी एकच विशेष रेल्वे गाडी सोडली. ही गाडी रत्नागिरीला रात्री १२ वाजता तर राजापुरात रात्री २ वाजता पोहोचेल. त्यामुळे पुढे गावापर्यंत प्रवास कसा करायचा, हा प्रश्न प्रवाशांना पडला. एसटीने एक लाख मतदार रवाना एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला या आगारांतून कोकणात जाण्यासाठी विशेष बसदेखील चालवण्यात आल्या. रायगड, रत्नागिरी या भागात सर्वाधिक बस धावल्या. ५ मे रोजी २४४ नियमित बस चालवण्यात आल्या, तर आठ जादा बस चालवण्यात आल्या. या बसद्वारे ४४,६०० प्रवाशांनी प्रवास केला. ६ मे रोजी २५० नियमित बस आणि आठ जादा बस सोडण्यात आल्या. त्यातून ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला.

मतांच्या लाचारीमुळे ठाकरे गप्प बसले- फडणवीस

मुंबई : हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाबने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे पाकिस्तानचीच भाषा बोलतायत. वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? असा सवाल करीत मतांच्या लाचारीमुळे ठाकरे गप्प बसले आहेत अशी…

मतदार राजा भडकला

माढ्यात ईव्हीएम पेटवले, सोलापुरात हतोड्याने फोडले मुंबई: सर्वपक्षीय राजकारण्यांच्या आश्वासनामुळे निराश झालेला तरुण मतदार राजा भडकल्याचे आज पुन्हा पहायला मिळाले. महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान माढा लोकसभा मतदार संघात एका तरुणाने चक्क…

30 वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि मार्गदर्शक सूचनांसह जाहीर आवाहन

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील विद्यमान इमारतींचे विभागनिहाय सर्वेक्षण करुन सदर इमारत धोकादायक असल्यास पावसाळयापूर्वी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 264 अन्वये प्रवर्गनिहाय धोकादायक म्हणून घोषित करण्यात येतात. सी-1 प्रवर्गातील इमारती या मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिकाम्या करणेबाबत त्या त्या सहकारी गृहनिर्माण संस्थाना नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात येते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 265(अ) नुसार  ज्या इमारतींचा वापर सुरु होऊन 30 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे अशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट संबंधित गृहनिर्माण संस्थेने एक वर्षाच्या मुदतीच्या आत नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचेकडून करुन घेणे अनिवार्य आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था अधिनियम 1968 अन्वये शासनाने जारी केलेल्या मॉडेल बाय-लॉ मधील मुद्दा क्र.75 (अ)(i) नुसार इमारतीचे आयुर्मान 15 ते 30 वर्षांचे दरम्यान असल्यास किमान 5 वर्षातून एकदा तसेच 75 (अ)(ii) नुसार  इमारतीचे आयुर्मान 30 वर्षापेक्षा जास्त असल्यास किमान 3 वर्षातून एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेणे अनिवार्य आहे. सदर स्ट्रक्चरल ऑडिट हे महानगरपालिकांमध्ये नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचेकडूनच करुन घेणे बाबतची तरतूद आहे. त्यास अनुसरून संबंधित सोसायटीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. याबाबतची दक्षता ही सोसायटीचे अध्यक्ष / सचिव यांनी घेणे आवश्यक आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नजिकच्या काळात विदयमान इमारतींमधील सदनिकांमध्ये अंतर्गत फेरबदलाची कामे – ज्यामध्ये लाद्या (Flooring) बदलणे, अंतर्गत असलेले आरसीसी कॉलम / बीम यांची दुरुस्ती करताना सदर सदनिकेच्या फ्लोअरिंगचा स्लॅब खालच्या मजल्यावर कोसळण्याच्या घटना यापूर्वी नेरुळ, सेक्टर 17 येथील जिमी टॉवर सहकारी गृहनिर्माण संस्था, सेक्टर 06 येथील तुलसी भवन, तसेच सन 2016 मध्ये अशाच प्रकारच्या अपघाताने जिवित हानी झालेली असल्याच्या घटना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये  घडलेल्या आहेत. त्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की, नवी मुंबई महानगरपालिकेस लागू असलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील तरतुदी विचारात घेता – इमारतींच्या रहिवास तथा वाणिज्य वापराच्या इमारतींमधील वरच्या मजल्यावरील गाळयांमध्ये अंतर्गत वा बाह्य भागात दुरुस्ती / स्ट्रेंग्थनींग करणेसाठी परवानगी प्राप्त करण्याची आवश्यकता असल्यास नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचे प्रमाणपत्रासह नियमानुसार वास्तुविशारदामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी प्राप्त करुन घेऊन त्यांचे देखरेखीखाली अशी कामे करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या बाबींकरीता नियमावलीतील तरतुदीनुसार अंतर्गत फेरबदलाचे काम करताना परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. अशा बाबतीत सदर काम करताना नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचे देखरेखीखालीच करण्यात यावे. तसेच सदर काम करतेवेळी संबंधित सदनिका / वाणिज्य वापराच्या गाळेधारकांनी संबंधित सोसायटीस अवगत करणे आवश्यक असून संबंधित सोसायटीने सदर काम हे नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचे देखरेखीखाली होत असल्याची खात्री करावी. भविष्यात विद्यमान इमारतींमध्ये दुरुस्तीच्या कामांमुळे काही दुर्घटना घडल्यास त्यास संबंधित सदनिका / वाणिज्य वापराचे गाळेधारक यांना व सोसायटीचे अध्यक्ष / सचिव यांनादेखील जबाबदार धरण्यात येईल. जेणेकरून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात यापूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. याची कृपया नोंद घेणेबाबत याव्दारे नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात ११ जागांसाठी आज मतदान

महायुतीला ७ तर मविआला ४ जागा राखण्याचे आव्हान या जागांसाठी होणार मतदान रायगड●बारामती●उस्मानाबाद ●लातूर ●सोलापूर ●माढा ●सांगली ●सातारा ●रत्नागिरी-सिंधुदुर्ग ●कोल्हापूर ●हातकणंगले मुंबई : लोकसभेच्या तिसऱ्या टप्यात मंगळवारी महाराष्ट्रातील ११ लोकसभेच्या जागांसाठी…

भाजपच्या ५ नेत्यांना ठाकरे तुरुंगात टाकणार होते- शिंदे

मुंबई : भाजपावर दबाव टाकून त्यांचे आमदार फोडायचे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या पाच बढ्या नेत्यांना तुरुंगात टाकून महाविकास आघाडी मजबूत करायची. असा प्लॅन उद्धव ठाकरेंचा सुरु होता, असा खळबळजनक गोप्यस्फोट मुख्यमंत्री…