Category: मुंबई

Mumbai news

सानपाड्यात सर्वपक्षीयांनी मोर्चा काढून गृहमंत्री अमित शहा यांचा केला जाहीर निषेध

नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी १७ डिसेंबर २०२४ रोजी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या अपमान जनक द्वेषपूर्ण वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नवी मुंबईतील…

सीएसएमटी-कल्याण लोकलमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे प्रवाशांचा गोंधळ

कल्याण : मुंबई सीएसएमटी ते कल्याण लोकलमध्ये मंगळवारी दुपारी स्वयंचलित दर्शक यंत्रणेतून रेल्वे स्थानकांच्या चुकीच्या उद्घोषणा करण्यात येत होत्या. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. लोकल धावत होती कल्याणच्या दिशेने आणि…

कल्याणमध्ये सॅटीसच्या रॅम्पमुळे वाहतुकीत अडथळा

आठ दिवसांत अडथळे दूर करून रस्ता सुरु करा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करणार युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव प्रतीक पेणकर यांचा पालिका प्रशासनाला इशारा कल्याण : कल्याण पश्चिम स्मार्ट सिटी अंतर्गत…

नाशिक जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक जलसाठा

आरक्षणासाठी पालकमंत्र्यांची प्रतीक्षा हरिभाऊ लाखे नाशिक : समाधानकारक पावसामुळे यंदा जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या धरणांमध्ये डिसेंबरच्या अखेरीस तब्बल ६२ हजार ५०३ दशलक्ष घनफूट म्हणजे ९५ टक्के जलसाठा आहे. मागील दुष्काळी वर्षाचा विचार…

तर मुंबई पोर्टमधील कंत्राटी कामगारांचा पगार पोर्ट प्राधिकरणाने द्यावा – सुधाकर अपराज

अनिल ठाणेकर मुंबई : पोर्ट प्राधिकरणाच्या वडाळा येथील पोर्ट प्राधिकरणाच्या वसाहतीमध्ये काम करणाऱ्या सफाई कंत्राटी कामगारांना सप्टेंबर २०२४ पासून गेले तीन महिने कंत्राटदाराने पगार न दिल्यामुळे कामगारांची उपासमार होत आहे.…

हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

अशोक गायकवाड मुंबई : राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारे सौर ग्राम आपण तयार करत आहोत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी…

धर्ती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान या आदिवासी योजनेची अंमलबजावणी करा –डॉ.नवलजीत कपूर

अशोक गायकवाड रायगड : धर्ती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना देण्यासाठी जिल्ह्य प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश अतिरिक्त सचिव,आदिवासी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार डॉ.नवलजीत कपूर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आत्माराम धाबे, उपजिल्हाकारी (पुनर्वसन) भारत वाघमारे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त सचिव, डॉ.नवल जीत कपूर म्हणाले की, आदिवासी बांधवांसाठी प्रधानमंत्री जनमन योजना या नावाने १५ नोव्हेंबर २०२३ सुरु झालेल्या योजनेचे २ ऑक्टोबरच्या धर्ती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान योजना नावाने नामांतर करण्यात आले आहे.आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी ही एक महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा आदिवासी बांधवांना लाभ द्यावा. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा विकास व्हावा, त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक आदिवासी बांधवांना मिळावा याकरिता संबधित विभागातील अधिकाऱ्यांनी महिन्यातील एक दिवस या योजनेसाठी द्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. या योजनेसाठी सकारात्मक भूमिका ठेवून काम केल्यास योजना अधिकाधिक गतिमान होईल व त्याचा लाभ आदिवासी बांधवांना मिळेल. ज्या आदिवासी बांधवांचे बँक खात्याशी आधार संलग्न नसेल तर त्यांचा सर्व्हे करुन ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.आदिवासीच्या विविध योजनांसाठी असलेले अनुदान वाढवून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. या योजनेविषयी काही अडचणी असतील तर अधिकारी वर्गाने माझ्याकडे संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपिस्थित अधिकाऱ्यांना केले. यावेळी उपस्थितांना दूरदृष्य प्रणालीद्वारे धर्ती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान योजनेची माहिती देण्यात आली. 00000

मुंबई शहराची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन

मुंबई शहराची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन मुंबई:-मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १४ वर्षाखालील मुले – मुली, द्वितीय श्रेणी (ब) आणि तृतीय श्रेणी (क) गट स्थानिक पुरुष, विशेष व्यावसायिक, व्यावसायिक-अ, व्यावसायिक-ब, व्यावसायिक महिला गट कबड्डी स्पर्धा दिनांक २५ डिसेंबर २०२४ ते ०३ जानेवारी २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.  भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा, मुंबई येथे या स्पर्धा खेळविण्यात येथील. ज्या संलग्न संघाना उपरोक्त स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी आपले प्रवेश अर्ज व खेळाडूंची नोंदणी ऑलाईन पूर्ण करून आपला सहभाग नोंदवावा. त्याच बरोबर आपल्या विभागातील सहकारी संघांनही याची कल्पना द्यावी. हि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून असो. ला सहकार्य करावे असे आवाहन या परिपत्रकाद्वारे सचिव विश्वास मोरे यांनी सर्व प्रसार माध्यमाद्वारे केले आहे.

ठाणेकरांची अडवणूक करणाऱ्या शहरविकास विभागातील अधिकाऱ्यांना हटवा – संजय केळकर

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महापालिकेच्या शहरविकास विभागातील काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच खुर्चीवर असल्याने त्यांनी स्वतःचे साम्राज्य निर्माण केले आहे. परिणामी अनेक कामांत ते अडवणूक करत असल्याने नागरिकांना त्रास होतो. दहा वर्षांहून अधिक काळ एकाच  विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना हटवा, अशी मागणी  आमदार संजय केळकर यांनी केली. त्यामुळे आता नगर विकास आणि ठामपा प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरातील विविध नागरी समस्यांना औचित्याच्या मुद्द्याद्वारे वाचा फोडली. पुरवणी मागण्यांच्या अंतर्गत झालेल्या चर्चेत विविध मागण्या करून काही सूचनाही केल्या. या अधिवेशनात शेवटच्या टप्प्यात श्री.केळकर यांनी ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागातील भोंगळ कारभारावर जोरदार टीका केली. वाढते महानगर आणि त्याला पुरेल अशा सुविधा देण्यासाठी अनेक अधिकारी सक्षम असले तरी काही अधिकारी लोकांची अडवणूक करत असल्याची बाब श्री.केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.शहर विकास विभागातील काही अधिकारी-कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी स्वतःचे साम्राज्य आणि हितसंबंधांचे जाळे या विभागात निर्माण केले आहे. त्यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची या विभागात अडवणूक केली जाते. याबाबत असंख्य तक्रारी नागरिक लोकप्रतिनिधींकडे करत असतात. शहर विकास विभागाचा कारभार लोककेंद्री होण्यासाठी येथे दहा वर्षांहून अधिक काळ एकाच विभागात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात तत्काळ बदली करावी, अशी मागणी श्री. केळकर यांनी अधिवेशनात केली. केळकर यांच्या मागणीबाबत ठाणेकर नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून याबाबत नगरविकास आणि ठामपा प्रशासन कोणती भूमिका घेईल, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.क्लस्टर ही क्रांतिकारी योजना आहे, पण याबाबत समन्वय नसल्याने आजही अनेक ठिकाणी काहींना योजना हवी आहे तर काही विरोध करत आहेत. योजनेची अंमलबजावणी होण्यापूर्वी त्याची माहिती अधिकाऱ्यांनीच रहिवाशांना देणे आवश्यक आहे. परंतु अधिकाऱ्यांआधी बिल्डर झोपडपट्टी भागात घुसतात, त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. अधिकारी जणू बिल्डरचेच सहकारी असल्याचे वागत असतात. ही योजना यशस्वीपणे राबवून सर्वसामान्यांना हक्काची घरे मिळण्यासाठी एसओपी तयार करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली.फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याने फेरीवाल्यांची संख्या वाढून वाहतुकीची समस्या भेडसावत आहे. पादचाऱ्यांनाही त्याचा त्रास होत असतो, नागरिक आणि फेरीवाल्यांमध्ये प्रसंगी हाणामाऱ्याही होत असतात. त्यामुळे येत्या १ जानेवारीपासून फेरीवाला धोरण लागू करण्यात यावे, अशी मागणी केळकर यांनी केली. ठाणे शहराला मिळणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा प्रश्नही गंभीर आहे. पिण्याचे पाणी इतर कामांसाठी वापरले जात असल्याने आणखी पाणी टंचाई जाणवते. त्यामुळे अन्य वापरासाठी लागणारे पाणी देणाऱ्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी केळकर यांनी केली. ठाणे शहर मतदारसंघातील ५० विहिरींची यादी सादर करण्यात आली असून या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी अधिवेशनात केली. अनेक वर्षे वीज जोडणीपासून वंचित रहिवाशांना वीज देण्यासाठी माझ्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला, मग पालिका प्रशासन विविध सुविधा देण्याबाबत चालढकल का करते, असा प्रश्न आमदार केळकर यांनी उपस्थित केला. ठाणेकरांना अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी ट्रान्सफॉर्मर उभारण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेने प्राधान्याने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली.

मनिषा, सुदिक्षाचे सोनेरी यश

मुंबई कुस्ती स्पर्धा मुंबई : मुठा कॉलेज कल्याण येथे नुकत्याच संपन्न झालेल्या मुबई विद्यापीठाच्या कुस्ती स्पर्धेत भाईंदर येथील श्री गणेश आखाड्यात प्रशिक्षण घेणाऱ्या मनिषा शेलार आणि सुदिक्षा जैस्वारने सुवर्ण पदकाची…