मुंबईत ‘ठाकरे’ महापौर होणार ?
मुंबई : मुंबई महानगर पालिकेत सगळी गणित जुळली आणि नशिबाने साथ दिली तर मुंबईच्या महापौरपदावर ठाकरे विराजमान होऊ शकातात… मुंबई महानगरपालिका निवडणूकीचा निकाल असा लागला आहे की कोणत्याच पक्षाला स्वबळावर…
Mumbai news
मुंबई : मुंबई महानगर पालिकेत सगळी गणित जुळली आणि नशिबाने साथ दिली तर मुंबईच्या महापौरपदावर ठाकरे विराजमान होऊ शकातात… मुंबई महानगरपालिका निवडणूकीचा निकाल असा लागला आहे की कोणत्याच पक्षाला स्वबळावर…
मुंबई : शिवसेना आणि भाजप हे मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढले असून मुंबईत महायुतीचा महापौर होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक…
मुंबईतील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार. मुबई : महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे २४ नगरसेवक विजयी झाले आहेत. या नवनिर्वाचित नगरसेवकांचा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस व मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकाबाजूला धनशक्ती होती, प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे वाटण्यात आले, विरोधी पक्षाला धमक्या देण्यात आल्या. सर्व यंत्रणा सत्ताधारी पक्षासाठी काम करत होती तर दुसऱ्या बाजूला जनशक्ती होती. जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवत २४ नगरसेवक निवडून दिले आहेत. अत्यंत विपरित परिस्थितीत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या निर्धाराने लढले आहेत. आमची संख्या कमी असली तरी मुंबईकरांच्या प्रश्नावर महापालिकेत आवाज उठवतील व जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील. मुंबईकरांना चांगले रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी, वाहतुक कोंडीतून सुटका, बेस्ट बसची चांगली सुविधा, प्रदुषणमुक्त मुंबई करायची आहे. महापालिकांच्या विविध संस्थांमध्ये खाजगीकरणाचा सपाटचा सुरु आहे त्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे काम केले जाईल. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावही अंकुश ठेवण्याचे कामही या नगरसेवकांच्या माध्यमातून केले जाईल, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. एका प्रश्नाला उत्तर देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपात हुकूमशाही आहे तर काँग्रेसमध्ये लोकशाही आहे, आमच्या पक्षात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. कोणी टिका केली असेल तर पक्ष त्यावर निर्णय घेईल. पक्षाने मला मुंबईच्या अध्यक्षपदाची संधी दिली आहे, माझ्या कार्यकर्त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. येणाऱ्या काळात मुंबईत काँग्रेस पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचे काम आम्ही करणार आहोत असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. “आमच्या नगरसेवकांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे त्यांना कोणत्या हाॅटेलमध्ये ठेवण्याची गरज वाटत नाही”, असा टोलाही खासदार वर्षा गायकवाड यांनी लगावला.
मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : शिवसेना आणि भाजप हे मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढले असून मुंबईत महायुतीचा महापौर होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक लढलो त्याठिकाणी महायुतीचाच महापौर बनवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये महानगर निवडणूक मध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने, आणि शिवसेनेने आपले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याने याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. मात्र या सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम देत मुंबित महायुतीचाच महापौर होईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईकर नागरिकांनी मोठ्या विश्वासाने महायुती म्हणून सेना – भाजपला मतदान केले असून त्यांच्या मतांशी प्रतारणा करून कोणताही वेगळा निर्णय शिवसेना घेणार नाही. नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही ते म्हणाले. यासोबतच ज्या ज्या मनपामध्ये शिवसेना भाजप हे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले आहेत तिथेही महायुतीचाच महापौर बसविण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अन्य काही राजकीय समीकरणे तयार होत असल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नसून मुंबईत शिवसेना भाजप रिपाइं महायुतीचा महापौर होईल असे त्यांनी सांगितले.
गोरेगाव फिल्म सिटी हत्याकांड प्रकरणात सर्व आठ आरोपींची निर्दोष मुक्तता गोरेगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई : गोरेगाव बहुचर्चित फिल्म सिटी हत्याकांडातील राजू उर्फ श्रीकांत शिंदे खून प्रकरणात दिंडोशी येथील बोरवली विभागाच्या सत्र न्यायालयाने सर्व आठही आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. ५ जानेवारीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी टी आगलावे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील इम्रान पी शेख यांनी बाजू मांडली. सदर खटला गोरेगाव येथील आरे पोलीस ठाण्याच्या तपासावर आधारित होता. अभियोजन पक्षानुसार फिल्मसिटी परिसरात सुरक्षा सेवा व्यवसाय करणाऱ्या श्रीकांत उर्फ राजू शिंदे यांच्यावर २२ मे २०१५ रोजी गोरेगाव आरे कॉलनीतील फिल्मसिटी परिसरात कालिया मैदानाजवळ बालाजी टेलिफिल्म्सच्या सेट समोर गळी बार करण्यात आला होता. हेल्मेट घातलेले दोन अज्ञान व्यक्ती मोटरसायकल वरून येऊन त्यांनी राजू शिंदे यांच्यावर गोळी झाडल्याचा प्रत्यक्ष दर्शनी पोलिसांना सांगितले होते. या हल्ल्यात राजू शिंदे यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. त्यावेळी त्यांना तत्काळ नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुमारे ४५ दिवस उपचार सुरू असताना २ जुलै २०१५ रोजी गोळीबाराच्या जखमेमुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून पुन्हा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत २१ ऑगस्ट २०२५रोजी आरोप पत्र सादर केले. हे प्रकरण सत्र खटला क्रमांक १८९/२०१५ म्हणून नोंदवण्यात आले. न्यायालयाने सर्व आरोपीं विरुद्ध भारतीय दंड संहिताच्या कलम ३०२, १२०ब तसेच शस्त्र कायद्याच्या कलम २५ व २७ अंतर्गत आरोप निश्चित केले होते. या प्रकरणात सुरेश सुभाष गायकवाड यांना मुख्य सूत्रधार म्हणून दर्शविण्यात आले होते. खटल्याच्या सुनावणी दरम्यान अभियोजन पक्षाने एकूण ३८ साक्षीदार तपासले मात्र उलट तपासणी दरम्यान साक्षीदारांच्या जबाबांमध्ये गंभीर विसंगती आढळून आल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीत फिर्यादी पक्षाने सांगितलेल्या तीन गोळ्यांच्या जखमान ऐवजी क्षविच्छेदन अहवालात चार गोळ्यांच्या प्रवेश जखमा आढळल्याचे समोर आले. विशेष म्हणजे हल्ल्याच्या दिवसापासून मृत्यू होईपर्यंत राजू शिंदे हे वैद्यकीय देखरेखीखाली होते. तसेच बॅलेस्टिक तज्ञांच्या साक्षीनुसार जप्त करण्यात आलेली शस्त्रे ही कथित गुन्ह्यात वापरलेले शस्त्रांशी जुळत नसल्याचे स्पष्ट झाले. तपास अधिकाऱ्यांच्या साक्षीतून हेही निष्पन्न झाले की पीडिताचा मृत्यूपूर्वी जबाब नोंदवण्यात आला असल्याचा दावा असूनही तो जबाब न्यायालय समोर सदर प्रकरणात आलेला नव्हता. या सर्व त्रुटी आणि संशयस्पद बाबी लक्षात घेता अभियोजन पक्ष आरोप कोणत्याही रास्त शंकेपलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरण्याचे नमूद करत न्यायालयाने सर्व आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले या प्रकरणात सुरेश सुभाष गायकवाड यांचे मुख्य प्रतिनिधित्व अॅड श्रीकांत सुरेशराव शिरसाट यांनी तर जुगल उर्फ पप्पू बाबू दोडिया याचे प्रतिनिधित्व अॅड सपना दिलीप हजारे यांनी केले तसेच सहकारी वकील म्हणून अॅड रवींद्र सोपान लिहिणार अॅड नरेश मुरलीधर गायकवाड अॅड प्रशांत वसंत जाधव आणि सहकारी आयुष्य राम शंकर पांडे यांनी काम पाहिले.
जय लहुजी दिनदर्शिकेचे प्रकाशन मुंबई: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर मानखुर्द येथील क्रांतीसम्राट डॉ. बाबासाहेब गोपले भवन येथे ४४ व्या मातंग समाज क्रांतीचक्र परिवर्तन दिनानिमित्त क्रांतीज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले यांच्या हस्ते जय लहुजी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. मातंग समाजाचे नेते समाजभूषण सुदाम आवाडे, बी जी गायकवाड, मदन आवाडे, योगेश शिंदे,बंडु चांदणे, तुलसिराम ताटे, नितिन हिवाळे, हरीभाऊ कांबळे, दत्तात्रय आवाडे, रवी थोरात, पार्वती आवाडे, अश्विनी शिंदे, द्वारकाबाई लोंढे, आदी मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्गात भाजपांतर्गत वाद उफाळला ! नारायण राणेंच्या विरोधात रविंद्र चव्हाण समर्थकांचे राजीनामा सत्र जिल्हापरिषद निवडणूकीतील नारायण राणेंच्या निवडणूक फॉर्म्युलावर नाराजी ० राजन चव्हाण सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गात एकीकडे खासदार नारायण राणे यांनी महायुती मधील…
स्वित्झर्लंडमध्ये फडणविसांचे मराठमोळे स्वागत… स्वित्झर्लंडमधिल वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी दावोसमध्ये दाखल झालेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चक्क स्वित्झर्लंड महाराष्ट्र मंडळाने विमानतळावर मराठ मोळ्या पद्धतीन लेझिमने स्वागत केले. फडणवीसांनी दावोसही ‘जिंकले’!…
मुंबईच्या महापौरपदावरून राजकारण पेटलं ! चेहऱ्यावर हसू आणि पडद्यामागे डावेपच स्वाती घोसाळकर मुंबऊ : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या मतमोजणीही झाली पण अजूनही महापौरपदाचा प्रश्न कायम आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महायुतीला काठावरचे…
नवी मुंबई : यंदाच्या २९ महानगर पालिकांच्या निवडणूकीत सर्वाधिक वादग्रस्त राहीलेल्या नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत अखेर भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी चँलेंज दिल्याप्रमाणे भाजपला एकहाती सत्ता मिळवून देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा टांगा पलटी केला. नवी मुंबईत भाजपाने ७२…