Category: देश

National-News

काँग्रेसचे सात, माकपचा एक खासदार निलंबित

काँग्रेसचे सात, माकपचा एक खासदार निलंबित राहुल गांधींना बोलू न दिल्याने खासदारांना घातला होता गोंधळ अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले होते कागद नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही लोकसभेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना बोलू…

मोदींनी देश अमेरिकेला विकला!

मोदींनी देश अमेरिकेला विकला! राहुल गांधींची व्यापार करारावरून मोदींवर टिका टीका नवी दिल्ली : अमेरिकेबरोबर भारताने केलेल्या व्यापार करारावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार टिका केली. पंतप्रधान मोदी घाबरलेले आहेत. जो व्यापार करार चार…

भारताचा व्यापार कराराचा विक्रम !

भारताचा व्यापार कराराचा विक्रम ! एका वर्षात विक्रमी ५ व्यापार करार  जागतिक जीडीपीत ५० टक्क्यांहून अधिक भागिदारी नवी दिल्ली : भारताने यंदाच्या एका वर्षात तब्बल पाच व्यापार करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतानं काही दिवसांपूर्वी यूरोपियन यूनियन सोबत मदर ऑफ…

प्रफुल पटेलांची मोदी-शाहांशी बंद दारा आड चर्चा

प्रफुल पटेलांची मोदी-शाहांशी बंद दारा आड चर्चा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीतून माघार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणास भाजपचा विरोध नवी दिल्ली : अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाबाबत उलटसुलट दावे दोन्ही बाजूंकडून करण्यात येत आहेत.…

सत्कार यशाचा, अमेरिकेसोबतच्या कराराचा

सत्कार यशाचा, अमेरिकेसोबतच्या कराराचा अमेरिकेसोबत यशस्वी व्यापार केल्याबद्दल एनडीएतील घटकपक्षांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतर्फे श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे प्रफुल पटेलही…

दिल्लीत होणार प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर!

पहिले महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत ७-८ मार्चला रंगणार नवी दिल्ली –  प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि स्वराज्यरक्षक महाराणी तारा राणी यांच्या शौर्याचा…

महाराष्ट्राचे किशोर–किशोरी संघ उपांत्य फेरीत

३५ वी किशोर–किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धा महाराष्ट्राचे किशोर–किशोरी संघ उपांत्य फेरीत कुरुक्षेत्रच्या थीम पार्क मैदानावर वेग, चपळाई आणि डावपेचांचा महाउत्सव हरियाणा, क्री. प्र. : कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे सुरु असलेल्या ३५ व्या किशोर व किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अफलातून, आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ साकारत उपांत्य फेरीत दणदणीत प्रवेश केला. थीम पार्क मैदानावर उपउपांत्य फेरीतील सामन्यांत महाराष्ट्राने प्रतिस्पर्ध्यांना संधी न देता वेगवान आक्रमण, भक्कम संरक्षण आणि अचूक डावपेचांचा प्रत्यय दिला. उपांत्य फेरीत किशोर गटात महाराष्ट्र विरुद्ध ओडिसा, कोल्हापूर विरुद्ध उत्तरप्रदेश, तर किशोरी गटात महाराष्ट्र विरुद्ध पंजाब, राजस्थान विरुद्ध हरयाणा अशी थरारक लढती रंगणार आहे. किशोर गट : महाराष्ट्राची मणिपूरवर दणदणीत सरशी उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राने मणिपूरचा ३०–२१ असा ५.३५ मि. राखून ९ गुणांनी दणदणीत पराभव केला. महाराष्ट्राकडून वरद पोळ (२.५०, १.२० मि. संरक्षण व २ गुण), सुरज खाडे (१.१०, १.५५ मि. संरक्षण), प्रफुल्ल वसावे (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), विक्रम राठोड (१.२० मि. संरक्षण व २ गुण) यांनी सलग उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. मणिपूरकडून एल. सिंग (१.१० मि. संरक्षण व ४ गुण), पी. पोहिंबा (१.२० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी झुंज दिली. किशोरी गट : महाराष्ट्राचा विदर्भावर एकतर्फी डावाने विजय किशोरी गटात महाराष्ट्राने विदर्भावर एक डाव आणि १२ गुण राखून (२८–१६) विजय मिळवला. महाराष्ट्राकडून अनुषा तामखडे (२.५० मि. संरक्षण व ४ गुण), अपर्णा वर्दे (२.४० मि. संरक्षण व ४ गुण), राही पाटील (२.१० मि. संरक्षण), कार्तिकी यलमार (१.५० मि. संरक्षण), ऋतुजा सुरवसे (१.३० मि. संरक्षण), पियुशा पानमळकर (नाबाद १.२० मि. संरक्षण) यांनी सलग दमदार कामगिरी केली. विदर्भकडून नव्या दुग्गा (१ मि. संरक्षण), मनवी राजू (१ मि. संरक्षण व ४ गुण), कोमल ठाकरे (४ गुण) यांनी चांगला खेळ केला. किशोर गट : ओडिसाची तामिळनाडूवर एकतर्फी धडक ओडिसाने तामिळनाडूचा २३ गुणांनी (४८–२५) पराभव केला. ओडिसाकडून सत्या (२.३०, २ मि. संरक्षण व १२ गुण), अमरज्योत (१.२०, १ मि. संरक्षण व १० गुण), धनंजय दास (१.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळ साकारला. तामिळनाडूकडून कौशिक (१.५० मि. संरक्षण व २ गुण) याने किल्ला लढवला. किशोर गट : उत्तरप्रदेशची विदर्भवर दणदणीत बाजी उत्तरप्रदेशने विदर्भवर २९ गुणांनी (५३–२४) मात केली. उत्तरप्रदेशकडून देव कुमार (१.४० मि. संरक्षण व ८ गुण), बिट्टु यादव (१.४५, १.१० मि. संरक्षण व ६ गुण), इशान (१, २ मि. संरक्षण व ८ गुण) यांनी प्रभावी कामगिरी केली. विदर्भकडून रोशन पालटे (१ मि. संरक्षण व ४ गुण) याने प्रतिकार केला.…

रस्ते अपघात पीडितांसाठीच्या `कॅशलेस उपचार योजने’तील उपचाराची रक्कम ५ लाखापर्यंत वाढवावी – नरेश म्हस्के

रस्ते अपघात पीडितांसाठीच्या `कॅशलेस उपचार योजने’तील उपचाराची रक्कम ५ लाखापर्यंत वाढवावी – नरेश म्हस्के अनिल ठाणेकर नवी दिल्ली, रस्ते अपघातातील जखमी व्यक्तींच्या उपचारासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘कॅशलेस उपचार योजना’ सुरु केली केली आहे. या योजनेतील आईसीयूची मर्यादा किमान २५ दिवसांपर्यंत वाढवावी तसेच उपचाराची रक्कम ५ लाख रुपयांपर्यंत वाढवावी, अशी आग्रही मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी आज लोकसभेत केली. कॅशलेस उपचार योजनेमध्ये या दोन सुधारणा केल्यास गोरगरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. लोकसभेमध्ये नियम ३७७ अंतर्गत खासदार नरेश म्हस्के यांनी कॅशलेस उपचार योजनेत करावयाच्या बदलांविषयी लोकसभा अध्यक्षांसमोर ठळक मुद्दे मांडले. मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १६२ अंतर्गत रस्ते अपघात पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजना २०२५ ही दिनांक ५ मे २०२५ रोजी अधिसूचित करण्यात आली आहे. आज देशभरात रस्त्यावर होणाऱ्या  अपघातांचं प्रमाण खूप वाढलं आहे. कमावता व्यक्ती अपघातात जखमी झाला की त्यांच्या उपचारासाठी कुटुंबावर आर्थिक संकट ओढावतं. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने सुरू केलेली ‘कॅशलेस ट्रीटमेंट योजना’ ही निश्चितच उल्लेखनीय बाब आहे. ‘गोल्डन ऑवर’ म्हणजे अपघातानंतरचे पहिले काही तास, या काळात उपचार मिळाला तर अनेकांचा जीव वाचू शकतो, ही संकल्पना लक्षात घेऊन सरकारने सुरु केलेली ही योजना नक्कीच दिलासादायक असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. योजना आणखी प्रभावी आणि उपयुक्त ठरण्यासाठी काही सुधारणांची आवश्यकता असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. देशातील एम्स (AIIMS) तसेच इतर नामांकित रुग्णालयांच्या आकडेवारीनुसार, मस्तिष्काला (ब्रेन) झालेली गंभीर दुखापत आणि पाठीच्या कण्याला (स्पायनल कॉर्ड) झालेली इजा अत्यंत गंभीर असते. अशा रुग्णांना धोका टळेपर्यंत सरासरी १८ ते २५ दिवस ICU मध्ये ठेवणं आवश्यक असतं. सध्याच्या कॅशलेस ट्रीटमेंट योजनेत फक्त १.५ लाख रुपये आणि ७ दिवसांपर्यंतच आयसीयू उपचारांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. अपघात झाल्यावर रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण सात दिवस आयसीयूमध्ये उपचार घेतो, पण सात दिवसांनंतरही तो पूर्णपणे बरा झाला नसेल तर पुढील उपचारांसाठी खर्चही खूप असतो. गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हा खर्च परवडणारा नसतो. म्हणून, काही कुटुंबं उपचार थांबवतात, काही कर्ज काढतात, तर काहींच्या आयुष्यभराची कमाई उपचारामध्ये संपून जाते. अशा वेळी, रुग्णाला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो ही गंभीर बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.आजच्या काळात वैद्यकीय उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. एका दिवसाचा आयसीयू खर्च अनेक हजार ते लाखो रुपयांपर्यंत जातो. त्यामुळे या योजनेतील आर्थिक कव्हरेज वाढवणं ही काळाची गरज आहे. जर ही रक्कम किमान ५ लाख रुपयांपर्यंत वाढवली, तर गंभीर अपघातग्रस्त रुग्णांना आवश्यक ते उपचार पूर्ण करता येतील आणि कुटुंबांवरचा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. जर आईसीयूची मर्यादा किमान २५ दिवसांपर्यंत वाढवली आणि कव्हरेज ५ लाख रुपये केले, तर असंख्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल. अनेक जीव वाचतील, अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील. ही मागणी कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नाही, तर मानवतेच्या दृष्टीने आहे. गरीब, कष्टकरी आणि सामान्य माणसाच्या वेदना समजून घेऊन सरकारने हा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात व्यक्त केली.

ज्ञानेश कुमारांवर ममतांचा हल्लाबोल

ज्ञानेश कुमारांवर ममतांचा हल्लाबोल नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एसआयआर मुद्द्यावर सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेतली. यानंतर, त्यांनी  निवडणूक आयोगावर अतिशय गंभीर…

भारत-चीन सीमारेषेवरुन राहुल गांधी आक्रमक

भारत-चीन सीमारेषेवरुन राहुल गांधी आक्रमक माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकचा दाखला दिल्याने संसदेत गोंधळ नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी  यांनी भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषेचा मुद्दा उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी माजी लष्करप्रमुख मनोज…