Category: रायगड

raigad news and updates

अवैध मार्गाने होणाऱ्या दारू वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर

अशोक गायकवाड रायगड : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका मुक्त, निपक्ष, शांततापूर्ण आणि प्रलोभनमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जिल्ह्याच्या रस्ते आणि सागरी सीमांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच अवैध मार्गाने होणाऱ्या दारू वाहतुकीवर…

आश्चर्य ! सिंधूदुर्गातील एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही

राजन चव्हाण सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात पराकोटीची राजकीय तेढ असतानाही आश्चर्यकारक रित्या येथील एकही मतदान केंद्र हे संवेदनशील नसल्याचे आज जाहिर करण्यात आले आहे. राजकीय पक्ष जास्त सुसंस्कृत झालेत की पोलिसांचा दरारा वाढलाय…

मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका

अहिल्यानगर :  ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास ब्रेनस्ट्रोकचा झटका बसला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नाशिकच्या नाईन पल्स रूग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास राजूर…

आमदारांच्या नियुक्तीला कोर्टात आव्हान देणार : अनिल देशमुख

नागपूर : राज्यपाल नियुक्त ७ आमदारांच्या शपथविधीला कोर्टात आव्हान देणार असल्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी जाहीर केले. राज्यपाल हे भाजप कार्यकर्त्यासारखे काम करत असल्याची टीकाही…

समस्यांच्या माहेरघरात माथेरानचे स्थानिक

माथेरान : माथेरान मधील जटील समस्यांना सामोरं जाता जाता इथली एक एक पिढी संपुष्टात येत आहे.परंतु माथेरानच्या स्थानिक नागरिकांना आजही अनेक प्रसंगांना तोंड देताना अक्षरशः नाकेनऊ येत असल्या तरीसुद्धा पिढ्यानपिढ्या…

लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना पोटदुखी

पनवेल : महिला भगिनी आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभर झटत असतात. या बहिणींना ताकद देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, मात्र ही योजना सुरू झाल्याने विरोधकांच्या पोटात दुखायला लागले आहे. ते ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. तरीही ही योजना बंद होणार नाही, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ठणकावून सांगितले. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महिलांकडून सरकारच्या या योजनेचे स्वागत केले जात आहे. याच महिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी पनवेलमधील सर्व महिला भगिनींसाठी खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून बेलवलीमध्ये हा कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महिलांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भष्टाचारी शेकापवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, तीन वर्ष झाली माजी आमदार विवेक पाटील हे कर्नाळा बँकेत घोटाळा केल्याने जेलमध्ये आहे. लोकांचे पैसे खाऊन जे तुरुंगात आहेत त्यांच्याच पक्षाने लोक येऊन सांगतात लाडकी बहीण योजना बंद होईल. त्यामुळे खोटं पसरवणारे कोण आहेत हे नीट पाहून घ्या. देशातील सरकार हे महिलांसाठी विविध योजना आणत आहेत, तर राज्यामध्ये महायुतीचे सरकार महिलांच्या हितासाठी काम करत आहे. या सर्व कल्याणकारी योजना सुरू राहण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत यायला पाहिजे. यासाठी तुमचा आशीर्वाद महायुती सरकारच्या पाठिशी राहूद्या, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, अमरीश मोकल, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी पं.स. सदस्य निलेश पाटील, जिल्हा चिटणीस भूपेंद्र पाटील, युवा नेते योगेश लहाने, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष कमला देशेकर, सरचिटणीस प्रतिभा भोईर, शिल्पा म्हात्रे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, गव्हाण ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य योगिता भगत, उपाध्यक्ष समिना साठी, कोषाध्यक्ष ज्योती भोपी, मनिषा बहिरा, माजी नगरसेविका निता माळी, पल्लवी पाटील, मित्तल पाटील, बेलवलीच्या उपसरपंच अप्रिता पवार, सदस्य सविता पाटील, रेश्मा माळी, पूजा पाटील, निता मंजुळे, शिल्पा पवार, संगीता भुतांबरा, सतिश पाटील, अप्पा भागीत, जितेंद्र बताले, संतोष पाटील, नारायण म्हात्रे, अनंता पवार, नासीर शेख, राम भवर, भालचंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खारघरमधील स्वप्नपूर्ती संकुलात अपुरा पाणीपुरवठा

पनवेल : खारघर येथील सिडकोने उभारलेल्या स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील १० हजार रहिवाशांना गेले आठ दिवस अपुरा पाणीपुरवठा होत आहे. स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील रोजच्या आठ लाख लिटरऐवजी केवळ अडीच लाख लिटर पाण्याचा पुरवठा…

विचुंबे येथील गाढी नदीवर नवीन पुलाचे लोकार्पण;

  नागरिकांनी मानले नामदार रवींद्र चव्हाण व आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार पनवेल : तालुक्यातील विचुंबे गावाजवळील गाढी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते…

लाडक्या बहिणींच्या बसला रायगडमध्ये अपघात

 बस दरीत २० फुट घसरली ०सहा जखमी रायगड :   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  वचनपूर्ती सोहळ्याचा तिसऱ्या टप्पा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात जाणाऱ्या लाडक्या बहिणींच्या…

विचुंबेतील गाढी नदीवरील पुलाच्या उद्घाटनाला येणाऱ्या राज्यमंत्र्यांचे अनोखे स्वागत

 हुकुमशाही विरोधात लोकशाहीचे विचूंबे ग्रामस्थांचे झळकले बॅनर राज भंडारी पनवेल : नवीन पनवेल ते विचुंबे येथील गाढी नदीवरील जुना पुल जीर्ण झाला असल्यामुळे याठिकाणी नव्याने पुलाची उभारणी करण्यात आली. या पुलाचे…