Category: ठाणे

Thane news

‘हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलून दाखवा’

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राहुल गांधींना चँलेंज स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीतील आपल्या शेवटच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली. महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती कटीबद्ध असून बहुमताने महायुतीला निवडून द्या…

ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त…

 लहान मुलांचे बालपण हरवू न देता त्यांना संवेदनशील करणे हे आव्हानात्मक

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन बाल सुरक्षा जनजागृती सप्ताहाचे उद्गघाटन   ठाणे : बाल लैंगिक शोषण ही जागतिक समस्या आहे. त्यामुळे जेवढे लवकर शक्य असेल तेवढे लवकर बालकांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श याची माहिती होणे आवश्यक आहे. हा अतिशय संवेदनशील विषय असून बालकांच्या मनात कोणतीही दहशत निर्माण न करता, त्यांचे बालपण हरवणार नाही, अशा पद्धतीने त्यांना या वास्तवाबाबत संवेदनशील बनवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे, असे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. बाल दिनाचे औचित्य साधून गुरूवारी महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे ‘बाल सुरक्षा जनजागृती सप्ताहा’चे उद्घाटन करण्यात आले. ठाणे महापालिका, ठाणे परिवहन सेवा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि अर्पण ही सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना धाक निर्माण व्हावा, तसेच, बालकांच्या हक्कांविषयी जागृती निर्माण व्हावी हा या सप्ताहाच्या आयोजनाचा उद्देश आहे. ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या सर्व बसगाड्यांमध्ये याबाबतचा संदेश प्रसारित केला जाणार आहे. तर, १० बस गाड्यांमध्ये बाह्य जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. या बसचे उद्घाटनही यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधिश इश्वर सूर्यवंशी तसेच बालकांच्या हस्ते महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. महापालिकेच्या शाळांमध्ये सुमारे ४० हजार विद्यार्थी शिकत आहेत. त्यांच्या शैक्षणिक जबाबदारीसोबतच सुरक्षेचे दायित्वही महापालिकेवर आहे. त्यामुळे ही जनजागृती मोहिम अतिशय महत्त्वाची आहे. त्यात बालकांसोबतच शिक्षक वर्गाचेही प्रबोधन केले जात आहे. त्यामुळे हा अतिशय संवेदनशील विषय त्यांना योग्य प्रकारे हाताळता येईल, असा विश्वास महापालिका आयुक्त राव यांनी व्यक्त केला. याप्रसंगी, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश इश्वर सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त अनघा कदम, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, अर्पण या संस्थेच्या पूजा टापरिया उपस्थित होते. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. तर, अर्पण या संस्थेच्या पूजा टापरिया यांनी जनजागृती मोहिमेचे स्वरुप आणि आवश्यकता विशद केली. 00000 00000

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ठाणेकरांनी घेतली मतदान करण्याची सामूहिक शपथ

ठाणे : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांनी निवडणूकीत मतदान करावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी तथा…

शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्या १५ वर्षातील विकासकामांच्या वचननाम्याचे प्रकाशन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने विकासाकामांना गती – प्रताप सरनाईक   अनिल ठाणेकर ठाणे : शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी १५ वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा आज पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला. यावेळी १५ वर्षात केलेल्या विविध विकासकामांबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हॉगकाँग, मलेशिया व सिंगापूर प्रमाणे मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही हावरे सिटीजवळ १२० एकर जागेवर प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. पाळीव प्राण्यांसाठी अद्यावत अंत्यविधी केंद्र तयार करण्यात आले आहे. विहिरींचे संवर्धन, म्युझिकल फाऊंटन, उपवन तलावाचे सुशोभिकरण, कॅशलेस रुग्णालय अशी असंख्य विकामकामं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आली. याबद्दल मुख्यमंत्र्याचे  प्रताप सरनाईक यांनी आभार मानले. भविष्यात रोप वे, जलवाहतूक, आणखी कॅशलेस रुग्णालय आदी विविध प्रकल्प साकारण्यात येणार आहेत असे प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली. घोडबंदर व लोकमान्य नगरमधील पाणीटंचाई समस्या सोडवण्यासाठी  मुंबई महानगरपालिकेकडे ५० एमएलडी पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती. ही मागणी आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने मान्य झाली. मुंबई महानगरपालिकेकडून ५० एमएलडी पाणी ठाणे महानगरपालिकेला देण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी २५ एमएलडी पाणी केवळ घोडबंदर भागासाठी आरक्षित असणार आहे. मिरा – भाईंदर शहारला सूर्या प्रकल्पातून २१८ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मी दिलेल्या वचनाची वचनपूर्ती होते याचे मला अत्यंत समाधान आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले. कापूरबावडी ते गायमुख ६० मीटर आणि गायमुख ते फाऊंटन ३० मीटर रस्त्याचे ६० मीटरपर्यंत विस्तारीकरणास मान्यता मिळाली असून त्या कामास सुरुवात झाली आहे. यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यास आपल्याला यश मिळेल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. ०००

फोटो सर्कल सोसायटीच्या छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : फोटो सर्कल सोसायटीच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त 10 ते  17 डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन – `आविष्कार – २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन आणि या निमित्त…

महाराष्ट्राचे लाडके भावेजी बांदेकरांची बासरेंच्या विजयासाठी वहीनींना साद

कल्याण : होम मिनिस्टर या मालिकेमुळे घराघरात पोहचलेले आदेश बांदेकर आता शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सचिन बासरेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. सचिन बासरे हे कल्याण पश्चिमधून महाविकास आघाडी आणि शिवसेना…

विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला- शिंदे

अंबरनाथ : ज्या लाडकी बहीण योजनेला विरोध करत होते, तशीच योजना आणून जास्त पैसे देण्याचे जाहीर करतात. आमचीच योजना कॉपी करतात. फक्त योजनाच नाही तर वचननामाही विरोधकांनी चोरला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.…

प्रताप सरनाईकांना मत म्हणजे विकासाला मत- योगीं आदित्यनाथ

अनिल ठाणेकर /अरविंद जोशी ठाणे : ओवळा माजिवडा १४६ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रताप सरनाईक चौथ्यांदा उभे राहिले आहेत. त्यांना दिलेले मत म्हणजे विकासाला दिलेले मत आहे असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे…

मोदी हे भारतातील मशिदी उद्ध्वस्त करणारा कायदा आणणार

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची आरोप   ठाणे : आपण यापूर्वीच एक मशीद गमावून बसलो आहोत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील इतर मशिदी उद्ध्वस्त करणारा कायदा आणू इच्छित आहेत…