घोडबंदर घाटात तेल सांडले, ठाणेकर कोंडीत अडकले
ठाणे : घोडबंदर घाटात बुधवारी पहाटे तेल सांडल्याने त्याचा परिणाम सकाळपासून जाणवू लागला आहे. भाईंदर पाडा ते मानपाडा पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर हैराण झाले आहेत.…
Thane news
ठाणे : घोडबंदर घाटात बुधवारी पहाटे तेल सांडल्याने त्याचा परिणाम सकाळपासून जाणवू लागला आहे. भाईंदर पाडा ते मानपाडा पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर हैराण झाले आहेत.…
अल्पसंख्याक योजनांकरिता कर्जावरील शासन हमीची मर्यादा ३० कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपयांपर्यंत ! अनिल ठाणेकर ठाणे :अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी एकूण ११ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात…
ठाणे, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आयोजन व्हावे यासाठी ठाणे महापालिकेतर्फे मार्च महिन्यापासून विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याच अंतर्गत महापालिकेने यंदा ठाणे महापालिका क्षेत्रातील ६ मूर्तीकारांना नि:शुल्क शाडूची माती, तसेच, ४…
भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचा पुढाकार ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांविरोधातील स्वाक्षरी मोहिमेला ठाण्यातील प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या…
अशोक गायकवाड पनवेल : भारतीय जनता पक्ष सत्ता लोकांच्या सेवेसाठी म्हणून बघतो मात्र विरोधक स्वार्थासाठी सत्ता मिळवू पाहत आहे.त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीपासून विरोधकांनी खूप अपप्रचार केला, आणि विष जसे…
सलमान पठाण ठाणे ; ठाण्यातील वागळे परिसरातील इंदिरा नगर रोड न. २२ येथे वाय पी ग्रुप यांच्याकडून ७ ऑगस्ट बुधवारी सकाळी ११ ते २ या दरम्यान रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. ठाण्यातील वागळे परिसरातील समाजसेवक योगेश पाठक यांच्या कडून लोकांमध्ये जनजागृती साठी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. समाजसेवक योगेश पाठक यांच्याकडून रुग्ण तपासणी , मेडिकल कॅम्प, रक्तदान शिबीर अशे विविध उपक्रम नेहमीच राबविले जातात. आजारी रुग्णांना लवकरात लवकर रक्ताची सोय व्हावी या साठी त्यांनी ब्लड लाईन या रक्तपेढीसोबत मिळून हा उपक्रम राबवला या प्रसंगी खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता त्याचबरोबर ७३ लोकांनी रक्तदान करून हा कॅम्प यशस्वी केला या रक्तदान शिबिराला भारतीय जनता पक्षाचे ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक भारत चव्हाण यांनी देखील उपस्तीथी लावली होती. ज्या ७३ नागरिकांनी रक्तदान केले त्यांना अल्पोहार व त्याच बरोबर रक्तदान केल्याचं प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
वाहतूक विभागाचे उपआयुक्त डॉ. विजयकुमार राठोड यांना नितीन देशपांडे यांचा प्रश्न अनिल ठाणेकर ठाणे स्टेशन जवळील गावदेवी मैदाना समोर गेल्या दहा दिवस एक जेसीबी वाहनाच्या चाकातील हवा गेल्यामुळे उभा असून वाहतुकीस अडथळा होत आहे. ठाणे स्टेशनवर जाण्यासाठी वाहनाची दिवसरात्र न भुतो न भविष्यती ये जा करीत असतात . काही वेळेस प्रचंड वाहतूक कोंडीही असते.म्हणूनच हा एक दिशा मार्ग ठेवला आहे.याची कल्पना वाहतूक विभागाला असतानाही सदर बाबतीत ही बाब कायदेशीर कर्तव्यात कसूर नाही का ? असा प्रश्न धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी वाहतूक विभागाचे उपआयुक्त डॉ.. विजयकुमार राठोड यांना विचारला आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे ठाण्याचे असताना त्यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी वाहतूक विभागाने जी तत्परता वाहतूक वळवण्यासाठी घेतली त्यापेक्षाही अधिक तत्परता वरील सार्वजनिक बाबतीत घेणे हे कायद्याला अपेक्षित असताना आपल्या विभागाचा दुर्लक्ष केल्यामुळे अनेक वाहनधारक व पादचारी यांना त्रास होतोय एवढेच नव्हे तर पादचार्यांची सुरक्षिताही धोक्यात आहे याची गंभीर नोंद घ्यावी. सदर बाब म्हणजे ” सरकार हे जनतेचे आहे” असे प्रतिपादन मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे नेहमीच करीत असतात याची जाणीव अपणास आहे का ? धर्मराज्य पक्षांच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत तत्काळ वरील बाबतीत कार्यवाही करून वाहतुकीचा अडथळा दूर करावा, अशी मागणी नितीन देशपांडे यांनी केली आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत जिल्ह्यात 5 लाख 47 हजार 870 अर्जांच्या नोंदी पूर्ण ठाणे : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” ही योजना राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून ठाणे जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणतीही प्रशासकीय क्लिष्टता न आणता सुलभता आणावी, अशा प्रकारच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्याला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त भगिनींचा या योजनेमध्ये सहभाग नोंदवून ठाणे जिल्हा राज्यात अव्वल राहील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी अत्यंत कठोर परिश्रम घेत “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेची यशस्वी अंमलबजावणी करीत असल्याचे दिसून येत आहे. “मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत जिल्ह्यात 5 लाख 47 हजार 870 अर्जांच्या नोंदी झाल्या असून 100% अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. यापैकी मान्यताप्राप्त अर्जांची संख्या 4 लाख 76 हजार 258 इतकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. गेले काही दिवस ठाणे जिल्हा प्रशासनातील महिला व बालविकास विभागासह अन्य विविध विभाग, सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती मधील अधिकारी-कर्मचारी एकवटून या योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांवर अक्षरश: दिवसरात्र कार्यवाही करीत होते. “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सर्व महसूल यंत्रणांच्या वेळोवेळी बैठका घेवून या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने होत असलेल्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला होता. त्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सर्व महानगरपालिका आयुक्त, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, प्रकल्प अधिकारी तसेच महिला बचतगट, एकात्मिक बालविकास अधिकारी, प्रभाग अधिकारी, कर संकलन अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका त्याचबरोबर इतर विभागांच्याही अधिकारी-कर्मचारीवर्गाची मोलाची साथ लाभली. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी रात्रंदिवस परिश्रम घेवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. “मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्याची कामगिरी कौतुकास्पद “मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत जिल्ह्यात 5 लाख 47 हजार 870 अर्जांच्या नोंदी झाल्या असून 100% अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. यापैकी मान्यताप्राप्त अर्जांची संख्या 4 लाख 76 हजार 258 इतकी असून 70 हजार 45 अर्ज हे त्रुटीयुक्त आहेत. तर 875 अर्ज रद्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यात मुरबाड तालुक्याची उत्तम कामगिरी जिल्ह्यात मुरबाड तालुक्याने उत्तम कामगिरी केली असून 38 हजार 308 अर्जांपैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या 37 हजार 886 आहे. तर त्रुटीयुक्त 390 अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या 22 आहे. यानुसार जिल्ह्यात सर्वाधिक मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी मुरबाड तालुक्याची आहे. ही टक्केवारी 98.90 टक्के आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय नोंदी झालेली अर्ज संख्या आणि मान्यताप्राप्त अर्जांची टक्केवारी:- ठाणे तालुक्याने 1 लाख 87 हजार 900 अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी 1 लाख 87 हजार 900 अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या 1 लाख 62 हजार 22 आहे. तर त्रुटीयुक्त 25 हजार 229 अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या 245 आहे. यानुसार ठाणे तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी 86.23 टक्के आहे. उल्हासनगर तालुक्याने 36 हजार 417 अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी 36 हजार 417 अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या 27 हजार 593 आहे. तर त्रुटीयुक्त 8 हजार 592 अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या 10 आहे. यानुसार उल्हासनगर तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी 75.77 टक्के आहे. कल्याण तालुक्याने 1 लाख 6 हजार 657 अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी 1 लाख 6 हजार 657 अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या 90 हजार 893 आहे. तर त्रुटीयुक्त 15 हजार 590 अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या 156 आहे. यानुसार कल्याण तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी 85.22 टक्के आहे. भिवंडी तालुक्याने 82 हजार 319 अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी 82 हजार 319 अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या 72 हजार 754 आहे. तर त्रुटीयुक्त 9 हजार 341 अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या 218 आहे. यानुसार भिवंडी तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी 83.38 टक्के आहे.…
दंड भरला तरी मान्यतेची टांगती तलवार कायम.! राजन चव्हाण सिंधुदुर्ग : तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि विद्यमान महायुतीचं सरकार या दोघांकडून झालेलं दुर्लक्ष आणि नाकर्तेपणामुळंच सिंधुदूर्ग वैद्यकीय महाविद्यालयाला १२ लाख रुपये इतका दंड भरावा लागला आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन आज तीन वर्ष झाली. महाविकास आघाडीचं सरकार असताना अत्यंत घाईगडबडीत हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या वर्षी तर अत्यंत वाईट परिस्थिती होती.मान्यता मिळविण्यासाठी जिल्हा रुंग्णालयाच्या सर्वच इमारतींचा ताबा घेण्यात आला.’लेडीज हॉस्टेल’ व ‘मेस’ दाखवण्यासाठी आवारात असलेल्या डॉक्टरांच्या निवासस्थानाचा ताबा घेण्यात आला.तर ‘बॉईज हॉस्टेल’साठी चक्क ‘आयटीआय ‘ च्या विद्यार्थ्यांसाठी नव्यानं बांधलेलं हॉस्टेल जबरदस्तीनं ताब्यात घेण्यात आलं.आज जिल्ह्याच्या विविध भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज ये जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तर अन्य जिल्ह्यातून आलेल्या मुलांना आसपासच्या परिसरात भाड्यानं रहावं लागत आहे.परिणामी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 00000
ठाणे : वार्षिक उद्योग पाहणी क्षेत्रकामासंबंधी संकल्पना सुस्पष्ट होण्याच्या आणि क्षेत्रकामादरम्यान संकलित केलेल्या आकडेवारीची गुणवत्ता उंचाविण्याच्यानुषंगाने अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय / जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील सर्व क्षेत्रीय अधिकारी /…