Category: ठाणे

Thane news

‘डिलिव्हरीचा मेसेज, पण सिलेंडर गायब!’

‘डिलिव्हरीचा मेसेज, पण सिलेंडर गायब!’ दिव्यात गॅस वितरणात गंभीर गैरव्यवहार दिवा, दि. २८ मार्च (आरती परब): दिवा शहरात घरगुती गॅस सिलेंडर वितरणामध्ये मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर कंपनीकडून “सिलेंडर डिलिव्हर झाल्याचा” मेसेज येत असला, तरी प्रत्यक्षात ८ ते १० दिवस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक कुटुंबांची रोजची स्वयंपाकाची व्यवस्था विस्कळीत होत आहे. विशेष म्हणजे, काही प्रकरणांमध्ये डिलिव्हरी बॉय किंवा संबंधित गॅस एजन्सीकडून नागरिकांना पुन्हा नवीन सिलेंडर बुक करण्यास सांगितले जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे हा प्रकार सरळसरळ फसवणूक असून न दिलेले सिलेंडर काळाबाजारात विकले जात असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, देशात सध्या आंतरराष्ट्रीय युद्ध परिस्थितीमुळे गॅस तुटवड्याची चर्चा असताना, दिवा शहरातील काही गॅस एजन्सींकडून नागरिकांची उघडपणे लूट सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. विशेषतः भारत गॅस कंपनीशी संबंधित काही एजन्सींविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या गंभीर प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात संबंधित एजन्सींवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मनसेने प्रशासनासमोर पुढील मागण्या केल्या आहेत: १) संबंधित गॅस एजन्सींवर तात्काळ चौकशी करावी २) दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ३) गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणून नागरिकांना वेळेत सिलेंडर उपलब्ध करून द्यावा तसेच, काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर तातडीने कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रशांत प्रभाकर गावडे, सचिव, दिवा शहर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना–  दिवा शहरातील नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाने त्वरीत लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी मी केली आहे.

सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त रंगली संगीत रजनी

सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त रंगली संगीत रजनी स्मरणिका `प्रतिबिंब’चे प्रकाशन ठाणे – ज. ए. ई. चे मो. ह. विद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय आणि अभिरुची मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त २८ मार्च, सायंकाळी ६ वा शाळेच्या प्रांगणात माजी विद्यार्थ्यांद्वारे संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी विद्यार्थी, प्रसिद्ध निवेदिका, अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विकास पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, उपकार्याध्यक्ष प्रदीप राका, संस्थेचे कोषाध्यक्ष आणि अभिरुची मंडळाचे अध्यक्ष रवींद्र तामरस, संस्थेचे उपकार्यवाह महेश केळकर आणि संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करताना संपदा जोगळेकर यांनी आपल्या शाळेविषयीच्या आठवणी सांगितल्या. शाळेतील खुल्या रंगमंचामुळे त्या रंगभूमी कडे वळल्या आणि आता रंगभूमी कडून प्रत्यक्ष भूमी कडे वळल्या आहेत असे सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिक्षा बोर्डे आणि माजी विद्यार्थी संदेश झारापकर यांनी केले. शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या सर्व कलाकार यांनी शाळेप्रती असलेली त्यांची कृतज्ञता त्यांच्या कलेमार्फत व्यक्त केली. यामध्ये माजी विद्यार्थी संवादिनी वादक डॉ.पंडित, प्रकाश चिटणीस, प्रसिद्ध गायक जगदीश पाटील, प्रसिद्ध गायक धीरज मढवी, गीतकार राजेंद्र ठाकूर, प्रिया सुरेश, खोल्लम आणि ग्रुप, रिद्धेश तरे, वृषाली दाबके आणि वर्षा कोल्हटकर, डॉ. वैशाली दुधे आणि समूह,  माजी शिक्षिका- ज्योती साटम, आजी शिक्षक मारुती सोनमोरे, सुनेत्रा मेस्त्री, उमेश महाजन, अर्जिता कुलकर्णी या सर्वांनी आपली कला सादर केली. शिवाय शाळेचे शुभचिंतक म्हणून प्रसिद्ध गायक अभिषेक कोसंबी यांनी देखील आपली कला सादर केली. तसेच यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी माजी शिक्षक आणि आजी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे सांगता सोहळा कार्यक्रमात नृत्य, गायन, वादन यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला व कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.

सम्राट अशोक जयंतीनिमित्त BRSPचा संवाद वितरण सोहळा व कार्यकर्ता मेळावा उत्साहात

सम्राट अशोक जयंतीनिमित्त BRSPचा संवाद वितरण सोहळा व कार्यकर्ता मेळावा उत्साहात उल्हासनगरमध्ये बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा उपक्रम उल्हासनगर : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (BRSP) उल्हासनगर युनिटच्या वतीने २६ मार्च रोजी…

तृतीय पंथी नागरिकांसाठी केडीएमसीतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

तृतीय पंथी नागरिकांसाठी केडीएमसीतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत तृतीय पंथी नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यामध्ये…

पालिका सभागृहात दिव्याचा आवाज बुलंद होतोय

पालिका सभागृहात दिव्याचा आवाज बुलंद होतोय नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी दिवा शहराकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला सुनावले खडे बोल दिवा : काल पार पडलेल्या अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभेत दिवा शहराविषयी…

जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी…

जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी… ठाणे पूर्वेकडील तुकाराम मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चैत्र नवरात्रोत्सव सोहळ्यात आज दशमीच्या दिवशी सहस्त्रचंडी होमाचे आयोजन करण्यात आले होते.…

राष्ट्रवादी महीला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकरांचा राजीनामा

राष्ट्रवादी महीला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकरांचा राजीनामा भोंदूगिरी भोवली पोलिसांकडूनही चौकशी होण्याची शक्यता ० पुणे : भोंदूबाबा अशोक खरातच्या नादी लागलेल्या रुपाली चाकणकरांना अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा…

ठाण्यात बाटली-कॅनमधून पेट्रोल-डिझेल विक्रीला बंदी

ठाण्यात बाटली-कॅनमधून पेट्रोल-डिझेल विक्रीला बंदी ठाणे : पेट्रोल आणि डिझेलचा तुटवड्याच्या पार्श्वभुमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि ज्वलनशील पदार्थांच्या गैरवापरामुळे कोणतीही अनुचित घटना घडू…

वीज दरवाढ टळली

वीज दरवाढ टळली मुंबई : महावितरणच्या पुढील पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश आज प्रसिद्ध केला आहे. महावितरणने पाच वर्षात वीजदर कपातीसाठी मांडलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक…

रहिवासी जागेत शेड, गोदाम उभारू देणार नाही- नरेंद्र मेहता

रहिवासी जागेत शेड, गोदाम उभारू देणार नाही- नरेंद्र मेहता मिरा – भाईंदर : मिरारोड (पुर्व) परिसरातील प्लेझंट पार्क या भागात मंगळवारी सांयकाळी ८.३० च्या सुमारास मंडप डेकोरेटर्सचे साहित्य असलेल्या मोकळ्या भुखंडावर मंडप शेडला भीषण आग लागल्याची घटना घडली, मिरा भाईंदर अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले, मात्र आजुबाजुला असलेल्या इमारतीमध्ये राहणा-या रहिवाश्यांच्या घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले ही घटना अतिशय दुर्देवी असल्याचे मत आमदार नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केली. सुदैवाने कोणतीही जिवितहानी यामध्ये झाली नसली तरी यामध्ये नागरिकांच्या घरातील साहित्यांचे व सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने सर्वेक्षण करुन संबधित नागरिकांच्या झालेल्या वित्तहानी बाबत योग्य उपाययोजना करुन निर्णय घ्यावा अशा सुचना आमदार नरेंद्र मेहता यांनी केल्या. घटनास्थळी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सोबत प्रभाग अधिकारी प्रियांका भोसले, अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र चव्हाण, मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे, महिला व बालकल्याण सभापती श्रीम.अनिता पाटील,नगरसेवक मोहन म्हात्रे, मनस्वी पाटील, सुरेखा सोनार,मनीष पराशर उपस्थित होते.मोकळ्या जागेत उभारलेली गॅरेज, गोडाऊन, फर्निचर दुकाने, झोपड्या इ. तात्काळ हटवणे व ज्वलनशील साहित्य साठवणाऱ्या अनधिकृत ठिकाणांवर कडक कारवाईचे करण्याचे निर्देश दिले आहे. मिरा भाईंदर शहरात यानंतर नागरी वस्तीत एकही गोदाम, शेड उभारू दिले जाणार नाही असे आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले.