Category: ठाणे

Thane news

पोलीस हे, जनतेच्या संरक्षणासाठी की गुन्हेगारांना पाठीशी घालून राजकारण्यांना संरक्षण देण्यासाठी? –  राजन राजे

अनिल ठाणेकर   ठाणे : पोलीस हे जनतेच्या संरक्षणासाठी की, गुंडपुंड राजकारण्यांना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या इशाऱ्यावर गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी ? असा सवाल धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी उपस्थित केला. बदलापूरमधील ‘आदर्श विद्यामंदिर’ या शाळेतील, वय वर्षे चार आणि वय वर्षे सहा या वयोगटाच्या दोन अल्पवयीन चिमुरड्या बालिकांवर, याच शाळेतील अक्षय शिंदे या सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक व घृणास्पद घटना घडलेली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली, पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, सहसचिव नरेंद्र पंडित, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, सचिन शेट्टी, ठाणे लोकसभा सचिव विनोद मोरे, ठाणे शहर अध्यक्ष जगन्नाथ सलगर, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव समीर चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी यांच्यासह, अविनाश सावंत, अमित लिबे, निलेश सावंत, संभाजी गिरी आणि कामगार सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना राजन राजे म्हणाले, “प्रश्न केवळ बलात्काराचा नसून, पोलिसांच्या व राजकारण्यांच्या बेकायदेशीर, बेईमान आणि नीतिशून्य व्यवहारातूनच बदलापूरकर जनतेच्या संतापाचा विस्फोट झालाय. पोलीस प्रशासन व राजकारणी यांच्यावरील विश्वास पूर्णपणे उडाल्यामुळेच, बदलापूरचे आंदोलन हिंसक बनून, ते आवरणं कठीण झालं होतं. म्हणूनच, पोलीस आणि सत्ताधाऱ्यांनी, सर्वप्रथम आपलं वर्तन, कार्यपद्धती सुधारावी आणि मगच, आंदोलकांवर कारवाई करावी. बदलापूरचं आंदोलन हे, एकूण परिस्थिती पाहता, उत्स्फूर्त व अत्यंत स्वाभाविक होतं, त्यामुळेच आंदोलकांवरील कारवाई तत्काळ मागे घ्या; अन्यथा, राजीनामे देऊन तोंड काळे करा!” असा जोरदार घणाघात राजन राजे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान, बालिकांवरील लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर, शाळेतील समस्त पालकवर्ग आणि बदलापूरकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरुन तीव्र निषेध-आंदोलन करीत, तब्बल ११ तास लोकल ट्रेनची वाहतूक रोखून धरली होती. प्रसिद्धीमाध्यमांद्वारे प्रकाशित झालेल्या बातम्यांनुसार, दोन्ही पिडीत बालिकांवरील लैंगिक अत्याचाराची घटना उघड झाल्यानंतर, सुरुवातीला शाळा प्रशासन आणि बदलापूर पोलिसांनी, संगनमताने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच, पीडित बालिकांचे पालक, पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असता, पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षिका शुभदा शितोळे या महिला अधिकारीकडून, त्यांना तब्बल १२ तास ताटकळत ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. या संतापजनक प्रकारानंतर जनप्रक्षोभ उसळल्यावर, पोलीस प्रशासनाने कारवाईला सुरुवात करुन, तपासकार्यात चालढकल केल्याच्या सबबीखाली शुभदा शितोळे यांची, ठाणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केल्याचे निदर्शनास आलेले आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असून, संबंधित महिला पोलीस अधिकारी यांची बदली करणे म्हणजे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली नसून, ज्या शुभदा शितोळे यांनी, शाळा प्रशासन आणि नराधम आरोपी यांना, पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्यावर कठोर-कायदेशीर कारवाई करणे हे क्रमप्राप्त ठरते. दुर्दैवाची बाब अशी की, एक महिला असूनही, अल्पवयीन चिमुरड्या बालिकांवर लैंगिक अत्याचार झालेला असतानादेखील, शुभदा शितोळे या महिला पोलीस अधिकारीने, पिडीत बालिकांच्या पालकांची तक्रार नोंदवून घेण्यास हलगर्जीपणा करीत, त्यांना तब्बल १२ तास ताटकळत ठेवले. हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे. याप्रकरणी नराधम आरोपीला अत्यंत कठोर शिक्षा होईलच; परंतु, आपल्या कायदेशीर कर्तव्यात कसूर करणाऱ्या शुभदा शितोळे यांची, फक्त ठाणे नियंत्रण कक्षात बदली करणे म्हणजे, पोलीस प्रशासन आणि राज्य शासनाच्या गृहविभागाकडून, संबंधित महिला पोलीस अधिकारीस पाठीशी घालण्यात येत असल्याचे, यानिमित्ताने स्पष्टपणे अधोरेखित होत आहे. तरी, या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करुन, शुभदा शितोळे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा आणि नराधम आरोपीस पाठीशी घालण्यात आल्याच्या आरोपाखाली, त्यांना पोलीससेवेतून तत्काळ बडतर्फ करुन, त्यांना सहआरोपी म्हणून घोषित करण्यात यावे आणि सश्रम कारावासाची कठोर शिक्षा ठोठावण्याकामी योग्य त्या न्यायालयीन कार्यवाहीची पूर्तता करण्यात यावी. त्याचप्रमाणे ‘आदर्श विद्यामंदिर’ या शाळेच्या प्रशासनाने, आपल्या शाळेतील चिमुरड्या बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण गांभीर्याने न घेता, बलात्कारी नराधमाला पाठीशी घालून आणि पोलीस प्रशासनाशी संगनमत साधत केलेल्या कृत्याबाबत, संबंधित शाळा प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने यावेळी करण्यात आली. हा संपूर्ण घटनाक्रम अत्यंत निषेधार्ह आहे आणि म्हणूनच या घटनेचा निषेध करण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने गुरुवार, दि. २२ ऑगस्ट-२०२४ रोजी, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर लोकशाही आणि सनदशीरमार्गाने निदर्शने करण्यात आली होती. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाचे प्रमुख या नात्याने, आपण योग्य ती कार्यवाही करीत, सर्व दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत, शासनदरबारी पाठपुरावा करावा अशी आग्रही मागणी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. 0000

जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख २५ लाखाचे पारितोषिक

महाराष्ट्रातही आरोपीवर २१ दिवसात शिक्षेची तरतूद करण्याचा कायदा आणा – आमदार प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर   दहीहंडी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही दहीहंडी सण मोठ्या…

आनंदपार्क येथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना मोफत छञी वाटप

ठाणे :आनंदपार्क येथील देवी मंडपात ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून शिवसेना उपनेते स्व. अनंत तरे व महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष स्व. जयेश अनंत तरे यांच्या स्मरणार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेव…

महिला व मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या – श्रमजीवी संघटना

ठाणे : महिला व मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाविरोधी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये निर्णय घेवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गशनाखाली माजिवडा-मानपाडा प्रभाग…

 २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा – प्राची हातिवलेकर

 बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ अनिल ठाणेकर ठाणे : बदलापूरच्या शाळेत कोवळ्या चिमुरड्यांवर झालेला अत्याचार मन सुन्न करणारा आहे पण हा गुन्हा दडवू पाहणारे शाळेचे संस्थाचालक सोडून पोलिसांनी आंदोलकांवरच लाठीचार्ज केला आणि त्यांनाच तुरुंगात डांबले. या सगळ्या प्रकारांनी व्यथित होऊन महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ची दिलेली हाक, हे एक स्वागतार्ह पाऊल आहे. जनवादी महिला संघटना या निर्णयाचे स्वागत करते. संघटनेच्या सर्व शाखांनी आपल्या जास्तीत जास्त सभासदांना घेऊन रस्त्यावर उतरावे आणि या बंद मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची राज्य कमिटीच्या अध्यक्षा नसीमा शेख व राज्य सरचिटणीस प्राची हातिवलेकर यांनी केले आहे. बदलापूरच्या शाळेत कोवळ्या चिमुरड्यांवर झालेला अत्याचार मन सुन्न करणारा आहे. अर्थात मन सुन्न करणाऱ्या घटना सध्या तर दिवसागणिक घडत आहेत. काही चव्हाट्यावर येतात. मग माध्यमे, जनता यांनी आरडाओरड केली की थोड्या वेळासाठी आरोपींना अटक करणे, कडक कारवाईचे आश्वासन देणे हा सोपस्कार होतो. अंकिता म्हात्रेवर तर देवाच्या दरबारात त्याची पूजा करणाऱ्यांनीच सामूहिक बलात्कार आणि खून केला. यशश्री शिंदे, श्रद्धा भोईर, वसईतील तरुणी एकतर्फी प्रेमाच्या शिकार. दिवसागणिक या घटना वाढतच आहेत. बदलापुरातील घटनेनंतर जनतेचा उद्रेक होऊन तिने जबरदस्त आंदोलन केले. ते उत्स्फूर्त होते. मात्र संवेदनशीलता मुळातच नसलेल्या मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन राजकीय असल्याचा आणि त्यासाठी बाहेरून लोक आणल्याचा साचेबद्ध आरोप केला. अटक झालेले सगळे नागरिक बदलापूर येथीलच असल्याचे सिद्ध झाल्याने या आरोपातील हवा निघाली. महिलांच्या, आणि एकूणच नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ लाडक्या बहिणींचे देवा भाऊ तर दिल्लीत होते. त्यांना असल्या फालतू घटनांशी काहीही सोयरसूतक नाही आणि का असावे? विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर देवा भाऊंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे युतीतील धुसफूस, उमेदवारीसाठी पक्षांतर्गत रस्सीखेच, मतदारांना विकत घेऊ पाहणाऱ्या सवंग योजना आणि त्यासाठी दिल्लीश्वरांची मर्जी राखणे, हे सगळे सोडून ते दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराची दखल का घेतील? घेतलीही असती हो, पण शाळा पडली आपलीच, म्हणजे संस्कारी. आणि बलात्कार हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, तो नष्ट होऊ शकत नाही, असे त्यांच्याच पक्षाच्या विदुषी, पडद्यावर सशक्त महिलेच्या भूमिका करणाऱ्या व खासदार असणाऱ्या एका अभिनेत्रीने म्हणूनच ठेवले आहे. पोलिसांबद्दल काय बोलावे? ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी, अशी त्यांची स्वच्छ आणि सोपी भूमिका. भाजप-रास्वसंघ चालवत असलेल्या शाळेच्या इमारतीत झालेल्या अत्याचाराची दखल घेऊन गुन्हा दाखल करून घेण्याचा अर्थ काय? इतके न कळण्याइतके पोलीस दूधखुळे नक्कीच नाहीत. मग उरले कोण? पालक आणि सामान्य नागरिक, ज्यांना आपल्या मुलींच्या सुरक्षिततेची खरी चिंता आहे तेच. आणि आंदोलन करण्यापलीकडे त्यांच्या तरी हातात काय आहे? असा संतापजनक प्रश्न अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य कमिटीच्या अध्यक्षा नसीमा शेख व राज्य सरचिटणीस प्राची हातिवलेकर यांनी केला आहे. ०००००

 शेतकऱ्याने बिल्डरला मारहाण करून कार्यालयातील ६५ हजार रुपये केले लंपास

अखेर ४ दिवसांनी गुन्हा दाखल मात्र शेतकरी फरार पनवेल : तालुक्यातील उसर्ली खुर्द गावातील शेतकरी बळीराम भोईर यांच्या जागेवर इमारत विकसित करणारे बांधकाम व्यावसायिक अयाझ मर्चंट यांना शुक्रवारी जागा मालक बळीराम भोईर यांनी आपल्या अन्य ३ साथीदारांसह जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. घटना घडल्यानंतर अयाझ मर्चंट यांनी पनवेल शहर पोलिस ठाणे गाठले असता पोलिसांनी त्यांना प्रथम उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. २ दिवस उपचार घेतल्यानंतर अयाझ मर्चंट हे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात फेऱ्या मारू लागले आणि अखेर ५ दिवसांनी आरोपी बळीराम भोईर यांच्यासह अन्य ३ साथीदारांवर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अयाझ मर्चंट यांनी पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात म्हटले आहे की, त्यांनी दिनांक १६ ऑगस्ट रोजी विकसित केलेल्या इमारतीमध्ये ग्राहकांना फ्लॅट दाखवून पुन्हा त्यांना बस स्थानकात सोडले. यानंतर याच इमारतीच्या त्यांच्या विकासक कार्यालयात ते गेले असता, जागा मालक बळीराम भोईर आणि अन्य ३ साथीदार यांनी त्याठिकाणी येवून अतिरिक्त पैशाचा लगादा लावला. यावर अतिरिक्त पैशाशी आपला संबंध नसल्याचे सांगितल्यामुळे जगामालक आणि अन्य तिघांनी बांधकाम व्यावसायिक अयाझ मर्चंट यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये अयाझ मर्चंट यांच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले असून त्यांच्या छातीला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. सदर घटना घडताच अयाझ मर्चंट यांनी पनवेल शहर पोलिस ठाणे गाठले. मात्र नाकातून रक्तस्त्राव होत असल्याने पोलिसांनी त्यांना तत्काळ उपचार घेण्यासाठी पाठविले. शहरातील गांधी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अयाझ मर्चंट यांनी संबंधित जागा मालक शेतकरी बळीराम भोईर आणि अन्य ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. याबाबत पनवेल शहर पोलिसांनी अखेर ५ व्या दिवशी जागा मालक शेतकरी बळीराम भोईर यांच्यासह अन्य ३ जणांविरोधात भा. दं. वि. कलम ३०९ (६), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश शेलकर हे करीत आहेत. ००००

 ‘वारी समतेची, वारी मानवतेची’ रविवारी होणार

कोर्टनाका सर्कलजवळ होणार अश्वरिंगण सोहळा   ठाणे : ठाणे ओबीसी एकीकरण समिती आणि मराठा सेवा संघाच्या वतीने यंदाही वारी समतेची आणि वारी मानवतेच्या माध्यमातून यंदाही ठाणेकरांना समतेची वारी अनुभवता येणार आहे. येत्या रविवारी ठाण्यातील कोर्टनाका परिसरात होणाऱ्या या वारीत अश्वरिंगण सोहळा वारकऱ्यांचे आकर्षण ठरणार आहे. या वारीचे आयोजक ठाणे ओबीसी एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रफुल वाघोले म्हणाले काही कारणास्तव नागरिकांना आषाढी वारीत सहभागी होता येत नाही. त्यामुळे त्यांना वारी अनुभवता यावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आणि संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीवर या वारीचे आयोजन करण्यात आले. या वारीच्या माध्यमातून समतामुलक् विचारांचा जागर घालण्यात येणार आहे. या वारीची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून होणार आहे. या वारीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज हभप भानुदास मोरे देहूकर यांचे किर्तन होणार आहे.या वारीत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, वारकरी संप्रदायातील संत, महात्मे यांची वेशभूषा केलेले कलावंत सहभागी होतील. त्यामुळे ठाणेकरांनी या वारीत सहभागी होऊन प्रत्यक्ष वारीचा अनुभव घ्यावा असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार-प्रताप सरनाईक

ठाणे : राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून ठाणे शहरामधील हजारो महिलांच्या खात्यावर ३ हजार रुपये जमा झाले आहेत. अजूनही या योजनेचे फॉर्म…

माकप पॉलिटब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांच्या उपस्थितीत

विधानसभा निवडणूक तयारीसाठी तलासरी व डहाणू तालुक्यांतील माकप पक्ष कार्यकर्त्यांची सभा अनिल ठाणेकर   ठाणे : येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिटब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांच्या…

कल्याण येथे “डॉ.नरेंद्र दाभोळकर” यांना अंनिसच्या वतीने अभिवादन

ठाणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कल्याण शाखा आणि समविचारी संघटना एकत्र येऊन “डॉ.नरेंद्र दाभोळकर” यांना सकाळी 7 वाजता कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन येथे अभिवादन करण्यात आले. त्यांचा स्मृतिदिन 20…