Category: ठाणे

Thane news

बियाणे खरेदी करताना काळजी घ्या -छायादेवी शिसोदे

ठाणे : ठाणे जिल्हयात खरीप हंगामास सुरूवात झालेली असून जिल्हयात खरीप हंगामाखाली 60,000 हेक्टर एवढे क्षेत्र आहे, त्यापैकी भात पिकाखालील सरासरी क्षेत्र 56,000 हेक्टर एवढे आहे. भात बियाण्यांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात पेरणीच्या कामास सुरूवात झाले असून शेतकऱ्यांनी भात बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगामाचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्याप्रमाणे बियाणांच्या गुणवत्ता नियंत्रणाचे काम बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968 व बियाणे नियंत्रण आदेश 1983 अन्वये करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी दिली. गुणवता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे.बनावट अथवा भेसळयुक्त बियाण्यांची खरेदी टाळण्यासाठी अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडून पावतीसह बियाणे खरेदी करावे. पावतीवर बियाणांचा संपूर्ण तपशील उदा. पिकाचे नाव, वाण, संपूर्ण लॉट नं., बियाणे उत्पादक कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे नाव व पत्ता इत्यादी बाबींचा उल्लेख असणे आवश्यक आहे. तसेच रोख किंवा उधारीची पावती घ्यावी. खरेदी केलेल्या बियाणांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व थोडे बियाणे कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.  खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठीच आहे याची खात्री करावी.भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पाकिटे, पिशव्या सिलबंद अथवा मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची, लेबलवरील अंतिम मुदत पाहून बियाणे खरेदी करावे. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किमंतीने विक्री होत असल्यास कृषि विभागाकडे तक्रार करावी. त्याकरिता 7039944689 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांच्या तक्रारींचे निरसन तालुकास्तरीय कृषि विभागाचे अधिकारी करतील. 0000

उल्हासनगरातील सुभाष टेकडी भागात पाणीटंचाई

उल्हासनगर : कॅम्प नं-४, सुभाष टेकडी परिसरातील दहाचाळ, डिफेन्स कॉलनी, महात्माफुले कॉलनी, नालंदा शाळापरिसर, भिमशक्तीनगर, आम्रपालीनगर, पंचशीलनगर, साईबाबानगर, कानसई रोड, भारतनगर, राजपूत लाईन आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली. पाणी द्या त्यानंतरच पाणी बिल पाठवा, असा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला मनसेने याबाबत आयुक्त अजीज शेख यांना निवेदन दिले आहे. उल्हासनगरात उच्चभु परिसरात मुबलक तर झोपडपट्टी भागात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप नेहमीचा झाला. मात्र महापालिका यावर निश्चित तोडगा काढत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कॅम्प नं-४, सुभाष टेकडी नेहमी पाणीटंचाईग्रस्त परिसर राहिला आहे. सुरवातीला अनियमित व कधीही पाणी पुरवठा होत होता. तर काही दिवसांपासून मध्यरात्री अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. असा आरोप स्थानिकांनी केला असून मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे यांनी याबाबत आवाज उठवून महापालिका आयुक्त अजीज शेख यांना निवेदन दिले. तसेच खडी मशीनपासून कुर्ला कॅम्प जलकुंभापर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेने नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी निश्चित पाणी योजना राबविण्याची मागणी होत आहे. अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे, उंच जलकुंभ बांधले. मात्र त्याचा पुरेसा उपयोग होत नाही. आयुक्त अजीज शेख यांना मनसेचे अध्यक्ष अध्यक्ष बंडू देशमुख, शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी पाणी टंचाई बाबत निवेदन दिले. यावेळी सचिन बेंडके, शैलेश पांडव, अक्षय धोत्रे, प्रकाश कारंडे, सुहास बनसोडे यांच्यासह सुनील रोहिडा, अमित सिंग, विक्की जिप्पसन, सचिन सिरसाठ, रमेश जाधव इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 00000

 सुपरमॅक्सच्या कामगारांना न्याय देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन ठाणे – ठाण्यातील  सुपरमॅक्स कंपनी पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक हालचाली करण्यात येतील. कामगारांच्या वेतनाची थकबाकी मिळवून देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगारांना गुरुवारी  ठाण्यात  दिले. गेली दोन वर्ष कंपनी व्यवस्थापनाने सुमारे दीड हजाराहून अधिक  कामगारांना मासिक वेतन दिले नाही. त्यामुळे कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी कैफियत मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर एकत्र येऊन  ठिय्या आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कामगारांची भेट घेऊन हे आश्वासन दिले. ठाण्यातील तीन हात नाका येथे ७० वर्षांपासून सुपरमॅक्स कंपनी कार्यरत आहे. या कंपनीत दीड हजारांहून अधिक कामगार कार्यरत हाेते.  दोन वर्षांपूर्वी कंपनी व्यवस्थापनाने कंपनी चालवू शकत नसल्याचे कारण पुढे करत अचानक कंपनी बंद केली. यासंदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा व्यवस्थापनाकडून केली नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. कंपनी बंद करत असल्याचे ज्यावेळी सांगण्यात आले,  त्यावेळी कामगारांचा पगार सुरू राहील, असेही आश्वासन दिले हाेते. प्रत्यक्षात दोन वर्षांपासून व्यवस्थापनाकडून पगारच दिला नसल्याचा कामगारांचा आराेप आहे. यासंदर्भात  कामगारांनी अनेकवेळा आंदोलनेही केली. गुरुवारी कामगार प्रतिनिधी शशांक खेर यांच्यासह कामगार माेठ्या संख्येने मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर एकवटले हाेते. कामगारांचा उद्रेक होण्याआधीच सुपरमॅक्सच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री शिंदे यांनी  भेट घेतली. येत्या दोन ते तीन दिवसात तुमच्या प्रश्नासंदर्भात सकारात्मक  निर्णय घेऊ,  असे आश्वासन दिल्याचे खेर यांनी सांगितले. कंपनीकडे १७५ काेटींहून अधिक थकबाकी कामगारांच्या वेतनासह १७५ कोटींहून अधिक थकबाकी कंपनीकडे येणी आहे.  देणी मिळावीत किंवा कंपनी  तत्काळ सुरू करावी, अशा मागण्यांसाठी कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर अनेकवेळा साखळी उपोषण केले. कामगारांसह त्यांच्या  कुटुंबावर उपासमारीची वेळ  आल्याने  मुख्यमंत्री शिंदे यांनी न्याय द्यावा, अशी मागणी कामगारांनी केली. ५४ कामगारांचा कोरोना काळात मृत्यू कंपनीला टाळेबंदी करताना कामगारांचे सहा महिन्यांचे थकीत वेतन दिले नाही. पीएफचे पैसेही न भरल्याने २०० कामगारांना निवृत्तीनंतरचे निवृत्तीवेतनही मिळाले नाही. ५४ कामगारांचा कोरोना काळात मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. दोन वर्षांपासून कामगारांना बोनसही मिळाला नसल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे.

 सुपरमॅक्सच्या कामगारांना न्याय देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन ठाणे – ठाण्यातील  सुपरमॅक्स कंपनी पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक हालचाली करण्यात येतील. कामगारांच्या वेतनाची थकबाकी मिळवून देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगारांना गुरुवारी  ठाण्यात  दिले. गेली दोन वर्ष कंपनी व्यवस्थापनाने सुमारे दीड हजाराहून अधिक  कामगारांना मासिक वेतन दिले नाही. त्यामुळे कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी कैफियत मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर एकत्र येऊन  ठिय्या आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कामगारांची भेट घेऊन हे आश्वासन दिले. ठाण्यातील तीन हात नाका येथे ७० वर्षांपासून सुपरमॅक्स कंपनी कार्यरत आहे. या कंपनीत दीड हजारांहून अधिक कामगार कार्यरत हाेते.  दोन वर्षांपूर्वी कंपनी व्यवस्थापनाने कंपनी चालवू शकत नसल्याचे कारण पुढे करत अचानक कंपनी बंद केली. यासंदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा व्यवस्थापनाकडून केली नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. कंपनी बंद करत असल्याचे ज्यावेळी सांगण्यात आले,  त्यावेळी कामगारांचा पगार सुरू राहील, असेही आश्वासन दिले हाेते. प्रत्यक्षात दोन वर्षांपासून व्यवस्थापनाकडून पगारच दिला नसल्याचा कामगारांचा आराेप आहे. यासंदर्भात  कामगारांनी अनेकवेळा आंदोलनेही केली. गुरुवारी कामगार प्रतिनिधी शशांक खेर यांच्यासह कामगार माेठ्या संख्येने मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर एकवटले हाेते. कामगारांचा उद्रेक होण्याआधीच सुपरमॅक्सच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री शिंदे यांनी  भेट घेतली. येत्या दोन ते तीन दिवसात तुमच्या प्रश्नासंदर्भात सकारात्मक  निर्णय घेऊ,  असे आश्वासन दिल्याचे खेर यांनी सांगितले. कंपनीकडे १७५ काेटींहून अधिक थकबाकी कामगारांच्या वेतनासह १७५ कोटींहून अधिक थकबाकी कंपनीकडे येणी आहे.  देणी मिळावीत किंवा कंपनी  तत्काळ सुरू करावी, अशा मागण्यांसाठी कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर अनेकवेळा साखळी उपोषण केले. कामगारांसह त्यांच्या  कुटुंबावर उपासमारीची वेळ  आल्याने  मुख्यमंत्री शिंदे यांनी न्याय द्यावा, अशी मागणी कामगारांनी केली. ५४ कामगारांचा कोरोना काळात मृत्यू कंपनीला टाळेबंदी करताना कामगारांचे सहा महिन्यांचे थकीत वेतन दिले नाही. पीएफचे पैसेही न भरल्याने २०० कामगारांना निवृत्तीनंतरचे निवृत्तीवेतनही मिळाले नाही. ५४ कामगारांचा कोरोना काळात मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. दोन वर्षांपासून कामगारांना बोनसही मिळाला नसल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे. 00000

मराठीची आवड असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

 ठाण्यातल्या जोशी, बेडेकर महाविद्यालयात करा एम. ए., ठाणे : विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी, बेडेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाने मराठी भाषा विषय घेऊन एम.ए.करण्याची संधी ठाण्यातच उपलब्ध करून दिली आहे. बी. कॉम., एम.कॉम, बी. एस्सी, झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच नोकरी करणाऱ्या युवक आणि युवतींना, गृहिणींसह एम.ए. करण्याची इच्छा असलेल्यांना मराठी विषय घेऊन एम.ए. करता येईल. एम. ए. मराठी का आवश्यक? विविध सरकारी आस्थापना आणि ठाणे महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांना विभागीय बढत्यांसाठी एम.ए.आवश्यक असून ते पूर्ण करणे गरजेचे झाले आहे. ही गरज ओळखून ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी, बेडेकर, कला वाणिज्य महाविद्यालयाने मराठी भाषा विषय घेऊन एम.ए.करण्याची संधी ठाण्यात उपलब्ध करून दिली आहे. मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही या संधीचा लाभ घेता येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय बेडेकर यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली इतर विषयांसह मराठी भाषा विभागातर्फे विविध कोर्सेस घेण्यात येणार आहेत.एम.ए.पूर्ण केल्यावर आवडीच्या क्षेत्रात संशोधन करून पी.एचडी म्हणजेच डॉक्टरेट करता येईल. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा असे आवाहन मराठी भाषा विभागप्रमुख प्रा.डॉ. संतोष राणे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी 9820176934 / 9819023904 या क्रमांकांवर संपर्क साधावा. एम. ए. मराठीचा कालावधी २ वर्षे अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये काय? रोजगारभिमुख अभ्यासक्रम प्रसारमाध्यमे आणि भाषा व्यवहार, भाषांतरकौशल्ये, साहित्य, चित्रपटांसह मुद्रितशोधन आणि अनुवादशास्त्राचा अभ्यास, ग्रंथ व्यवहार, पुस्तक प्रकाशन, वितरण असा अभ्यासक्रम असणार आहे. तसंच करिअरच्या विविध संधीही आहेत. जसे की, कवी, लेखक, ब्लॉग लेख, पटकथा लेखक, सर्जनशील लेखक, दुभाषी निवेदक, पटकथा लेखक, संहिता लेख, जाहिरात लेखक, निवेदक, मुद्रितशोधक, प्राध्यापक, संशोधक होता येईल. जून २०२४ मध्ये हा कोर्स सुरु होईल. एम.ए. चा कालावधी दोन वर्षे आहे.

अतिधोकादायक इमारतींचा पाणी, वीज पुरवठा खंडीत करा

ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश ठाणे : शहरातील अतिधोकादायक इमारतींचा वीज, पाणी पुरवठा खंडीत करण्याबरोबरच मलनि:सारण वाहिन्या तत्काळ तोडून टाकण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. इमारत अतिधोकादायक असल्याचे पालिका प्रशासनाने घोषित केल्यानंतरही अशा इमारतींमध्ये नागरिक वास्तव्य करीत असून पावसाळ्यात इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये म्हणून आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. याशिवाय, स्थिरता प्रमाणपत्र नसलेली तसेच जास्तीचे आकारमान असलेली जाहिरात फलक तत्काळ उतरवा आणि रस्त्यावरील खड्डे भरणे, झाडाच्या फांद्या उचलणे ही कामे २४ तासांत व्हायला पाहिजेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मान्सूनसाठी तयारीच्या दृष्टीने मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याच्या पालकसचिव सुजाता सौनिक यांनी दिलेले निर्देश, तसेच लोकप्रतिनिधी, नागरिकांनी केलेल्या तक्रारी या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व उपनगर अभियंता, सर्व सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्व कार्यकारी अभियंता यांची शुक्रवारी बैठक घेतली. महापालिका क्षेत्रात एकूण ९६ अतिधोकादायक इमारती (सी -१ वर्गवारी) आहेत. त्यापैकी, ३७ इमारतीत नागरिक राहत आहेत. त्यात, नौपाडा आणि कोपरी २७, माजिवडा १, उथळसर ३, कळवा २, मुंब्रा ४ अशा इमारतींचा समावेश आहे. या सर्व इमारतींचा पाणी, वीज खंडीत करण्याबरोबरच मलनिःसारण जोडणी तोडून या इमारती रिकाम्या करून घ्याव्यात, असे आदेश आयुक्त राव यांनी दिले. नागरिकांच्या जिविताचा प्रश्न असल्याने आता चर्चा करण्यात वेळ दवडू नये. नागरिकांची समजूत काढून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. पावसाचा जोर कधीही वाढू शकतो, याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी, असेही आयुक्त राव म्हणाले. पुढील दोन दिवसात सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागातील अतिधोकादायक (सी -१) आणि धोकादायक (सी २ ए) अशा सर्व इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि रहिवाशांना तेथून स्थलांतरित होण्यासाठी संवाद साधावा, असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना हलविण्याची वेळ आली तर आपल्या संक्रमण शिबिरामध्ये पाणी, वीज आणि स्वच्छता राखली जाईल, हे पाहावे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. पाणी साठणाऱ्या सखल भागातील १४ मोक्याच्या ठिकाणी ६३ पंप आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच, स्थानिक तरुणांना स्वयंसेवक म्हणून सोबत घ्यावे. त्यांना ओळखपत्र, जॅकेट देण्यात यावे. त्यांच्या मदतीमुळे आपत्कालीन स्थितीत नागरिकांपर्यंत जाणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले. खाडीच्या मुखापाशी कचरा साठून ते पाणी नाल्यात पाठीमागे येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी खाडी मुखांपाशी नाल्यांची स्थिती कशी आहे ते पाहून तेथे स्वच्छता करण्यात यावी. गटारांची झाकणे वरचेवर पाहणी करून सुस्थिती राहतील, याची खबरदारी घ्यावी. तसेच, रस्त्यावर साचणारे पाणी पर्जन्यजलवाहिन्यांमध्ये व्यवस्थित वाहून जाईल, तेथे कचरा, माती साचणार नाही, याचीही काळजी घ्यावी, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. नाल्यातील तरंगता कचरा दररोज साफ केला जावा. त्याचप्रमाणे, किती ठिकाणी सफाई झाली याचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. पावसाळ्यात मोठी दुरुस्ती नको नागरिकांनी पावसाळ्यात घरामध्ये कोणतीही मोठ्या स्वरुपाची दुरुस्ती करू नये. सोसायट्यांनी अशा दुरुस्तीसाठी परवानगी देवू नये. त्याचबरोबर, व्ह्यायब्रेटर सारख्या उपकरणाचा वापर निरीक्षकांच्या देखरेखीत करावा. काही इमारतींच्या दुरुस्तीच्या कामात नियमांची पायमल्ली केली जात असल्याने दुर्घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

टिटवाळा-बनेली येथील भूखंडावर बेकायदा चाळी

कल्याण : टिटवाळा-बनेली येथील २५ एकरच्या एका मोकळ्या भूखंडावर भूमाफियांनी जमीनी बळकावत बेकायदा चाळी उभारल्या आहेत. राजरोस बेकायदा चाळींची बांधकामे सुरू असताना या बेकायदा चाळींवर अ प्रभागाकडून फक्त दिखाव्या पुरती कारवाई केली जाते, अशा…

मुसळधार पावसामुळे डोंबिवली जलमय

डोंबिवली : मुसळधार पावसाने गुरुवारी दुपारी जोरदार हजेरी लावल्याने कल्याण डोंबिवली शहराच्या अनेक भागात पाणी तुंबले. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील नाले गटार सफाई योग्य रीतीने न केल्याने पहिल्याच पावसात डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर जलमय झाला. रेल्वे…

 ठाण्यात हरित कचऱ्याची डोकेदुखी

 रस्त्यावर जागोजागी छाटलेले वृक्ष पडून ठाणे : शहरात गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे अनेक वृक्षांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. तर काही ठिकाणी ठाणे महापालिकेने वृक्षांची छाटणी केली. परंतु छाटणी केलेल्या…

 रानभाज्या बाजारात दाखल

 जांभूळ, करवंदांसह, रानभाज्यामुळे आदिवासी महिलांना मिळतोय रोजगार बदलापूरः बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरातील बाजारपेठांमध्ये रानभाज्या आणि रानमेवा दाखल झाला आहे. बदलापूर शहराची बाजारपेठ, शहराच्या वेशीवरील एरंजाड, सोनिवली परिसरासह कल्याण अहमनदगर राष्ट्रीय महामार्गावर आदिवासी महिलांकडून रानभाज्यांची विक्री केली जात आहे. कोणत्याही मशागतीशिवाय उगवणाऱ्या या रानभाज्या पौष्टीक आणि आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी असतात. त्यामुळे जून महिन्यात या रानभाज्यांना पसंती मिळते. त्यामुळे आदिवासी कुटुंबाना आणि विशेषतः महिलांना हक्काचा रोजगार मिळतो आहे. ग्रामीण भागात दैनंदिन आहारात रानभाज्यांचे मोठे महत्व आहे. आदिवासी बांधव आपल्या जुन्या जाणत्या बांधवांनी दिलेल्या माहितीच्या जोरावर रानातून या भाजा निवडून आणतात. गेल्या काही वर्षात शहरी भागातही या रानभाज्यांना महत्व प्राप्त होताना दिसते आहे. मे महिन्यात पडणाऱ्या अवकाळी पावसानंतर या रानभाज्या रानात बहरू लागतात. आदिवासी बांधव त्या निवडून बाजारात विक्रीसाठी आणतात. कोणत्या लागवड आणि मशागतीशिवाय या रानभाज्या वाढतात. त्यामुळे त्यांच्यात अनेक औषधी गुण असतात. जुनच्या पहिल्या आठवड्यापासून बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या भागात या रानभाज्यांची आवक वाढल्याचे दिसून आले आहे. बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर आदिवासी महिला या रानभाज्या घेऊन बसलेल्या दिसतात. त्यासोबतच महत्वाचे चौक, बदलापुरच्या वेशीवर एरंजाड, सोनिवली, कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग, बदलापूर बारवीमार्गे मुरबाड रस्त्यावर आणि मुरबाडमध्येही या रानभाज्यांची विक्री करताना आदिवासी महिला दिसत आहेत. शेवळी, टाकळा, कुळू, कुड्याची फुले, चायवळ, तेलपट, मोहदुडी आणि लोतं या भाजा सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. १० रूपये जुडीपासून ४० रूपयांपर्यंत या भाज्यांची विक्री केली जाते आहे. ग्राहकही या भाजांना पसंती देत आहेत. संवादामुळे नवग्राहक दूरच आदिवासी महिला रानभाज्या विक्री करताना त्याची पुरेशी माहिती देऊ शकत नसल्याने नवग्राहक या भाज्यांकडे वळताना दिसत नाही. या रानभाज्या विक्रीच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्याची माहिती जुन्या पिढीकडे अधिक आहे. त्याचीही योग्य माहिती दिल्यास नवी पिढीही या भाज्यांकडे वळेल. जांभुळासाठीही ग्राहकांची गर्दी सध्या बदलापुरच्या जांभळानेही बाजारात गर्दी केली आहे. १६० ते २०० रूपये प्रति किलो दराने आदिवासी बांधव या जांभळांची विक्री करत आहेत. बदलापुरच्या जांभळांना भौगोलिक मानांकन नुकतेच प्राप्त झाले आहे. बारवी पर्यटनासाठी येणारे पर्यटक आवडीने या जांभळांना पसंती देत आहेत. सोबत करवंदांनाही पसंती मिळते आहे.