Category: ठाणे

Thane news

 प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या बसगाड्या परत घ्या

अशोक लेलँड च्या कार्यालयात चालक, मालकांचा ठिय्या ठाणे :  मोठ्या प्रमाणात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या अशोक लेलँडच्या बसगाड्या धोकादायक असून या गाड्या अचानक बंद पडत आहेत. शिवाय, भरधाव वेगात असताना अनेक भाग नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून याबाबत  करूनही संबधीतांकडून कार्यवाही केली जात नसल्याने मुंबई बस मालक संघटनेने आज कंपनीच्या माजिवडा येथील कार्यालयावर धडक दिली. वारंवार नादुरुस्त होणाऱ्या सुमारे ६१ नवीन बस गाड्या कंपनीने पुन्हा ताब्यात घ्याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. बस चालत असताना फ्रंट व्हील हब क्रॅक होणे, व्हील डिस्क तुटणे,  क्लच / प्रेशर प्लेट / रिलीझ बेरिंग,  क्लच सिलेंडर / डिझेल पाईप तुटणे,  सायलेन्सर पाईप फुटणे ,  पुरवठा करणे करणारे पाईप फुटणे,  गियर बॉक्स –  ब्रेक लायनर समस्या  अशा अनेक  अडचणी नव्या कोऱ्या बसगाड्यांमध्ये आहेत. अशोक लेलँडने विकलेल्या बस या सदोष असल्याने प्रवाशी आणि वाहन चालक, सहाय्य्क यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या बसगाड्या  बिघाड होऊन बंद  पडत आहेत.  या बसगाड्यांमधील  अनेक भाग अचानक नादुरुस्त होत असल्याने बसला अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. खासगी वाहतूक करणाऱ्या या बस गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यामध्ये लहान मुले, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असतो. मात्र, अचानक गाड्या बंद पडत असल्याने प्रवाशांना  रस्त्यावर तासनतास अडकून पडावे लागत आहे.  वारंवार बिघाडामुळे बस मालकांचेही आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय, प्रवाशांकडून चालकांना  घडत आहेत. याबाबत अनेकवेळा बस मालकांनी संबंधितांना कळवूनदेखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. अशोक लेलँड ही कंपनी मोठ्या अपघाताची वाट पहात आहे का, असा सवाल करीत मुंबई बस मालक संघटनेने माजिवडा येथे हे आंदोलन केले.यावेळी,  धावत्या बसमधील हब तुटल्यामुळे बसचे होणारे नुकसान कोण सहन करणार?  व्यवसायातील तोटा कोण सहन करणार ?  प्रवासादरम्यान आणि भविष्यातील प्रवासात वाहन निकामी झाल्यास प्रवाशांना परतावा, कर, विमा, बँक दायित्व, ब्रेकडाउनमुळे भविष्यातील बुकिंगवर परिणाम यावर उपाययोजना कोण करणार ? ब्रेकडाऊन दरम्यान पोलिस आणि टोइंग चार्जेसचे नुकसान कोण  करणार  ?  वॉरंटीमध्ये ब्रेकडाउन दरम्यान आम्ही किमीचा विचार करणार आहोत का?  कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांच्या निवासाचा खर्च कोण करणार?प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्यास कोण जबाबदार आहे?  असे प्रश्न मुंबई बस मालक संघटनेने उपस्थित केले असून या ६१ नवीन बस गाड्या कंपनीने पुन्हा ताब्यात घ्याव्यात,  अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जल जीवन मिशन अंतर्गत उन्हाळ्यात देखील विहीरीचे पाणी  १२ महिने गावकऱ्यांना झाले उपलब्ध – छायादेवी शिसोदे

अनिल ठाणेकर ठाणे : जल जीवन मिशन अंतर्गत मुरबाड तालुक्यातील खुटल बारागावात विहिर स्त्रोतद्वारे उन्हाळ्यात देखील विहीरीचे पाणी  १२ महिने गावकऱ्यांना उपलब्ध झाले आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक छायादेवी शिसोदे यांनी दिली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ७२० योजना राबविण्यात येत आहेत. मुरबाड तालुक्यात जल जीनव मिशन अंतर्गत २०२ योजना राबविण्यात येत असून या सर्व योजना भूजलावर आधारित आहेत. मुरबाड तालुका डोंगराळ व कठिण खडकाने म्हणजे मॅसिव्ह बेसाल्ट ने व्यापलेला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२२-२३ यावर्षी विहिर तयार करण्यासाठी मुरबाड तालुक्यातील खुटल बारागावात काम सुरू करण्यात आले होते. या विहिरीच्या मागिल वर्षी जून अखेर या स्रोताची जमीनीपासून ९.५० मीटर स्थिर पातळी होती यंदा मे महिन्यात जमीनीपासून ५.२५ मीटर स्थिर पातळी आढळून आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ४.०० मीटर ने पाणी पातळी वाढ झाल्याने हा स्त्रोत शाश्वत झाला आहे. स्त्रोत शाश्वत करण्यासाठी पाच आढवे बोरवेल खोदण्यात आले. या कामाची दखल वेळोवेळी घेतल्यामुळे यदां उन्हाळ्यात देखील विहीरीचे पाणी गावकऱ्यांना उपलब्ध झाले आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक छायादेवी शिसोदे यांनी दिली. सन २०११ मधील जनगणनेप्रमाणे गावातील लोकसंख्या १ हजार ७४७ असून सरासरी अंदाजे ७० हजार लिटर पाण्याची अवश्यकता असून विहिरीद्वारे १२ महिने पाणी पुरवठा सुरळीत राहण्याचे उत्तम कामकाज ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. या कामामुळे गावकऱ्यांसाठी शाश्वत स्त्रोत उपलब्ध असणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत गावकऱ्यांना पिण्यासाठी उपलब्ध पाणी साठा तपासून विविध ७२० योजनाचे काम हाती घेण्यात आले आहे.  खुटल बारागावातील ग्रामस्थांना या विहिरीद्वारे १२ महिने पाणी पुरवठा सुरळीत राहिल अशा प्रकारे काम करण्यात विभागाने यश मिळवले आहे. याठिकाणी जागा निश्चिती पासून ते कामाची सुरुवात करण्यापर्यंत विविध तांत्रिक पध्दतीने जागेची तपासणी करण्यात आली होती. यासाठी सहायक भूवैज्ञानिक सपना बोरकर, ग्रामस्थाचा प्रत्यक्ष सहभाग व वसुंधरा संस्थेच्या सहकार्यामुळे बंधारा दुरुस्तीचे काम उत्तमरित्या पुर्ण झाले आहे, असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदिप कुलकर्णी यांनी सांगितले. चौकट विहिरीची सन २०२२-२३ मधील जून महिन्यातील जमीनीपासून पाण्याची पातळी – ९.५० मीटर स्थिर पातळी. विहिरीची सन २०२३-२४  मधील मे महिन्यातील जमीनीपासून पाण्याची पातळी – ५.२५ मीटर स्थिर पातळी. सद्यस्थितीत जमीनीपासून पाण्याची पातळी – ४:३० मीटर स्थिर पातळी.

ठाण्यात नव्या खासदारांच्या बैठकीला भाजपची दांडी

ठाणे : शहरातील पावसाळा पूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासन आणि माजी नगरसेवकांची एकत्रित बैठक बुधवारी सायंकाळी आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला भाजपाचे माजी…

कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी आहार, गृहभेट व आरोग्याची तपासणी वेळोवेळी करा – छायादेवी शिसोदे

ठाणे : कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी दिला जाणारा आहार, गृहभेट व आरोग्याची तपासणी वेळोवेळी करा. घरातील मुलाप्रमाणे ग्रामपंचायतीतील बालकांना सांभाळा अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे  यांनी दिल्या.…

बियाणे खरेदी करताना काळजी घ्या -छायादेवी शिसोदे

ठाणे : ठाणे जिल्हयात खरीप हंगामास सुरूवात झालेली असून जिल्हयात खरीप हंगामाखाली 60,000 हेक्टर एवढे क्षेत्र आहे, त्यापैकी भात पिकाखालील सरासरी क्षेत्र 56,000 हेक्टर एवढे आहे. भात बियाण्यांची विक्री मोठ्या…

ठाणे जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेचा निरंजन डावखरे यांना पाठिंबा

अनिल ठाणेकर ठाणे जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेने कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. ठाणे जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या या पत्रकात म्हटले आहे की, कोकण विभागीय क्षेत्रात राहणारे व ज्यांची  कोकण पदवीधर मतदार संघाचे यादीत नावे आहेत अश्या सर्व निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस बांधवांना संघटनेतर्फे विनंती करण्यात येत आहे की, श्री डावखरे निरंजन वसंत हे कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे आहेत. श्री. डावखरे निरंजन वसंत  हे आपले सर्वांचे खास मित्र व परिचयाचे असून ते पोलिसांना सतत मदत करीत असतात. ते या क्षेत्रात महान कार्य करीत आहेत. तरी कोकण परिसरातील नोंदणी झालेले सर्व पदवीधर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी बुधवारी, २६ जुन २०२४ रोजी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण पदवीधर मतदारसंघातुन उमेदवार असलेले श्री. डावखरे निरंजन वसंत यांच्या नावासमोरील प्रथम क्रमांकाचा 1 आकडा टाकून त्यांना बहुसंख्य मतांनी निवडून द्यावे, अशी विनंती संघटनेचे  सल्लागार सोपानराव महांगडे, काशीनाथ कचरे, राजाभाऊ तांबट, मोतीलाल जाधव, अध्यक्ष माधव माळवे, कार्याध्यक्ष  रघुनाथ घरटे, सचिव व खजिनदार बाळासाहेब दंडवते आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

पावसाळ्यात दुर्घटना घडू नयेत, यासाठी दक्ष रहा – पालक सचिव सुजाता सौनिक

ठाणे,  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव तथा अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामांचा तसाच पावसाळ्याच्या कालावधीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यंदाच्या…

कल्पक, प्रयोगशील प्रकाशक माधव जोशी यांचे निधन

ठाणे : परममित्र पब्लिकेशनचे संस्थापक तथा अभाविपचे माजी पूर्णकालिन कार्यकर्ते माधव जोशी यांचे बुधवारी (ता.१२ जून) मध्यरात्री अल्पशः आजाराने निधन झाले. मृत्यु समयी ते ६६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,…

तलासरी तहसील व पोलीस कार्यालयावर माकपचा हजारोंचा धडक मोर्चा

अनिल ठाणेकर ठाणे : पोलीस आणि प्रशासन यांच्या दादागिरीविरुद्ध तलासरी तहसील व पोलीस कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने, माकपचे पाॅलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, आमदार विनोद निकोले, जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, किसन गुजर, किरण गहला, रडका कलांगडा, लक्ष्मण डोंबरे, रामू पागी, सुनीता शिंगडा, नंदू हाडळ, लहानी दौडा, सुरेश भोये, चंद्रकांत घोरखाना यांच्या नेतृत्वाखाली हजारोंचा जबरदस्त धडक मोर्चा काढण्यात आला. गेले काही महिने तलासरी तालुक्यात पोलीस आणि प्रशासन भाजप-आघाडीच्या राज्य सरकारने आणलेल्या दबावाला बळी पडून सामान्य आदिवासी, महिला यांवर दादागिरी करीत आहे. आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देणे, त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करणे, त्यांच्यावर खोट्या केसेस करणे, त्यांनी केलेल्या तक्रारींची दखल न घेणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. कहर म्हणजे थेट तलासरी पंचायत समितीच्या सभापती सुनीता शिंगडा यांच्याच जमिनीवर अतिक्रमण करण्याची भाजपच्या गुंडांनी हिम्मत केली. याचा समाचार घेणे भागच होते.  या त्यांच्या दादागिरीविरुद्ध जबरदस्त मोर्चा काढून त्यांना अद्दल घडवण्याचा निर्णय मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटना यांनी घेतला. आठवडाभर जोरदार प्रचार करून बुधवारो, १२ जून २०२४ रोजी हजारो महिला व पुरुषांचा मोर्चा दणकेबाज घोषणा देत तहसील आणि पोलीस स्टेशनच्या आतच घुसला. अखेर सर्व अधिकार्‍यांनी तातडीने शिष्टमंडळाला बोलावून चर्चा केली. सर्व तक्रारी ताबडतोब सोडवण्याचे आश्वासन दिल्यावरच मोर्चा संपला. 0000

शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू

 कल्याण व भिवंडीतील मागासवर्गीय मुलांमुलींचे ठाणे :- इयत्ता 8 वी पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या व महाविद्यालयीन विभागातील प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या भिवंडी व कल्याण येथील मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. वसतिगृह कार्यालयात प्रवेश अर्ज मोफत उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन वसतीगृहांचे गृहपाल प्र. ना. मडावी यांनी केले आहे. वसतीगृहात प्रवेशासाठी अर्जासोबत लागणारी प्रमाणपत्रे (सर्व छायांकीत प्रती)- 1. गुणपत्रिका, 2. शाळा सोडल्याचा दाखला, 3. जातीचा दाखला (सक्षम प्राधिकारी), 4. उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकारी),  5. रहिवासी दाखला (सरपंच/तलाठी/नगरसेवक), 6. आधार कार्ड तसेच प्रवेश घेतेवेळी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. 1. शाळा / महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, 2. आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायाकिंत प्रत, 3. वैद्यकीय प्रमाणपत्र 4. पासपोर्ट साईज फोटो  5.  10 रुपयांचे कोर्ट फी टिकीट लावून वसतिगृह नियमाचा करारनामा करुन द्यावे लागेल. अधिक माहितीसाठी संपर्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, भिवंडी, मानसरोवर शॉपीग कॉम्पलेक्स, पहिला माळा, भिवंडी, (संपर्क क्र 9767612897) मागास तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, भिवंडी, मानसरोवर शाँपिग कॉम्प्लेक्स, दुसरा माळा भिवंडी.मुलांचे शासकीय वसतिगृह (गुणवंत), कल्याण, गौरी अपार्टमेन्ट, पाचवा माळा, बेहतुरकर पाडा, कल्याण पश्चिम, (संपर्क क्र. ९७६७६१२८९७). या वसतिगृहात वर्ग 11 ते 12 व पॉलिटेक्निक प्रथम / आय. टी. आय मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. (हे वसतिगृह शासकीय इमारत, गौरीपाडा, कल्याण, येथे स्थलांतरित करण्यात येत आहे.) 000