Category: ठाणे

Thane news

पाण्यासाठी माजी विरोधीपक्ष नेते शानू पठाण बसले आयुक्तांच्या दारात

अनिल ठाणेकर ठाणे : मुंब्रा – कौसा भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात येत नाही.  पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडण्यात येत नसल्याने संतप्त  झालेले मा. विरोधीपक्ष नेते अश्रफ (शानू)…

महावितरणचा १९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांचाही सहभाग कल्याण : महावितरणच्या कल्याण परिमंडलात महावितरणचा १९ वा वर्धापन दिन गुरुवारी सायंकाळी उत्साहात साजरा झाला. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी, अभियंते, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. महावितरणच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण प्रादेशिक विभाग, कल्याण परिमंडल, कल्याण एक आणि दोन तसेच कल्याण स्थापत्य मंडलांतर्गत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्य मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापुरुषांच्या संयुक्त जंयती महोत्सवाची परंपरा सलग तिसऱ्या वर्षी कायम ठेवताना लेखक जगदिश ओहोळ यांचे प्रभावी व्याख्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला झाले. तर त्यानंतर ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या व्यावसायिक नाटकाच्या सादरीकरणाने उपस्थितांचे निखळ मनोरंजन करताना त्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते अनिल घोगरे, निलकमल चौधरी, संदिप पाटील, विजय मोरे, दीपक पाटील, दिलीप भोळे, संजय खंडारे, दिलीप खानंदे, महेश अंचिनमाने, महाव्यवस्थापक अनिल बऱ्हाटे, उप महाव्यवस्थापक योगेश खैरनार, हविषा जगताप, उपसंचालक सुमीत कुमार, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंते, उपविभागीय व शाखा अभियंते, नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य लिपिक गणराज वाळींबे यांनी केले.

‘शिवरायांचा राजभिषेक अखंड प्रेरणस्त्रोत ठरावा’

इतिहास संकलक आप्पा परब ठाणे : १६४२ ते १६७० दरम्यानच्या २८ वर्षांत शिवरायांची राजधानी घाटमाथ्यावर होती़  नंतर ती कोकणात (रायगड) नेली़ १४ जानेवारी शिवरायांचा पहिला राजाभिषेक झाला़ नंतर दुसरा आणि तिसरा १६७४ मध्ये झाला़ राजाभिषेकासाठी शिवराय विरासनात बसले़ ज्या आसनावर राजाभिषेक विधीवत संपन्न झाला़ त्या आसनावर आसनस्थ होण्यापूर्वी शिवरायांनी बैलाचे, वाघाचे , सिंहाचे आणि बोक्याचे कातडे आंथरले होते़  आज सघ्य शिखरीच्या राजाचा ३५० वा श्री. शिवराजाभिषेक स्मृती सोहळा ठाण्याच्या संकृति परिवार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शतायुषी-सेवाभावी श्री आनंद भारती समाजाच्या सभागृहात साजरा होत आहे, याचा मला अभिमान वाटतो, असे मनोगत ७५ वर्षीय जेष्ठ  इतिहास संकलक आप्पा परब यांनी व्यक्त केले. गु्रूवारी सकाळच्या सत्रात हा सोहळा  संपन्न झाला. संकृति परिवार सामाजिक संस्थेने आप्पा परब यांचा ‘‘जिवन गौरव ’’ पुरस्काराने डॉ. सच्चिदानंद शेनडे यांच्या हस्ते सत्कार केला. या प्रसंगी सौ. अनुराधा  परब, सुकन्या शिल्पा परब, कार्यवाहक सविता कावले, संयोजक विनोद ढगे, सुधाताई ढगे आदी मान्यवर उपास्थित होते . उत्त्तरार्धात पुष्पा ताई लेले संचालित शिवस्तुतीवर आधारित स्वरसंवादिनी भजनी मंडळाने वीर गीतांचा संगीत कार्यक्रम व श्री आनंद भारती मार्गावरुन संवाद शिवप्रतिमा पालखी मिरवणुक काढण्यात आली. शिवप्रेमीचा उत्स्फुर्त प्रतिसाद साडेतीनशेव्या श्री शिवराजाभिषेक स्मृती सोहळ्यास लाभल्याबदल श्री आनंद भारती समाज  संस्थेचे कार्यवाहक विवेक मोरेकर व संस्कृति परिवारातर्फे विनेाद ढगे यांनी आभार मानले.

राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष लढवणार कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक

अमीत सरैया यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षदेखील उतरला आहे. आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मा. नगरसेवक अमीत सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस त्यांनी, विजयाचा विश्वास व्यक्त केला. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झाला आहे.  शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणूक रिंगणात उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अमीत सरैय्या यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमीत सरैय्या यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे. या मतदारासंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सरैय्या यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी अमीत सरैया यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,  गेले सहा महिने आम्ही मोठ्या संख्येने मतदार नोंदणी केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारले आहे. सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यास प्राधान्यक्रम देऊन आपण काम करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात बदल होणार आहे. मनसेच्या माघारीबाबत विचारले असता, मनसे हा संपलेला पक्ष आहे. सेटींग करणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख आहे. त्यामुळे आपण त्यांना गांभीर्यपूर्वक घेत नाही. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष ही निवडणूक जिंकणार असून त्यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा अमीत सरैया म्हणून काम करीत आहे, असेही सरैया म्हणाले. दरम्यान,  जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी अमीत सरय्या यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त केला.  यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई,  युवक अध्यक्ष विक्रम खामकर,  महेंद्र पवार, प्रियांका सोनार, सचिन पंधेरे आदी उपस्थित होते.

दिवा प्रभाग समिती क्षेत्रात झाली सर्वंकष स्वच्छता मोहीम

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत (#deepcleandrive) शुक्रवारी सकाळी दिवा प्रभागात स्वच्छता करण्यात आली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शीळफाटा-महापे चौक येथील साफसफाई अभियानात सहभागी होऊन परिसराची स्वच्छता केली. तसेच, प्रभागातील स्वच्छता मोहिमेची पाहणीही केली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार करण्यात येत असलेल्या या मोहिमेची सुरूवात शीळफाटा चौक स्वच्छ करण्याने झाली. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी या मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेत, दिवा आणि परिसरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, चौक, रस्ते दुभाजक यांची स्वच्छता करण्यात आली. दुकानांसमोर रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी यावेळी दिले. या मोहिमेनंतर, दिवा, मुंब्रा आणि कळवा येथील नाले सफाईचीही पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केली.

पूरग्रस्त व दरडप्रवण गावांना स्ट्रेचर, लाईफ जॅकेटचे वाटप – अशोक शिनगारे

जिल्हाआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून ठाणे : ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीच्या वेळेस तातडीने मदत पोचावी, तसेच आपद्गग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संकट निवारणासाठी पूरप्रवण व दरडप्रवण गावांना स्थानिक प्रशासनामार्फत फोल्डिंग स्ट्रेचर, बहुद्देशीय लाईफ जॅकेट, रेस्क्यू किट, डिझाटर किट, बॉडी कव्हर बॅग आदी आवश्यक साहित्याचे वाटप प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली आहे. पावसाळ्याच्या काळात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळणे, पूरपरिस्थिती निर्माण होणे, अतिवृष्टी, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची संभावना असते. अशा नैसर्गिक आपत्ती काळात तातडीने मदत पोहचविणे व संकटग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध साहित्याची आवश्यकता असते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अशा प्रकारचे साहित्य स्थानिक स्वराज्य संस्था, तहसील कार्यालयांना वाटप करून हे साहित्य दरडप्रवण गावे, पूररेषेजवळील गावांना दिले जाते. या वर्षी प्राधिकरणाच्या वतीने मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये फोल्डिंग मल्टिपर्पज स्ट्रेचर (1705 संच), फ्लोटिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर व इतर साहित्य (710 संच), आपत्ती व्यवस्थापन किट साहित्य/रेस्क्यू किट (550 संच), बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (1260 संच) आणि नाविन्यपूर्ण जीवरक्षक जॅकेट (1190 संच) या साहित्याचा समावेश आहे. यामध्ये ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महापालिका, मिरा भाईंदर महापालिका, भिवंडी-निजामपूर महापालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद, कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांना प्रत्येकी 60 बहुद्देशीय स्ट्रेचर –(मोठे), 25 मध्यम आकाराचे स्ट्रेचर, 40 फ्लोटिंग अँड फ्लोडिंग स्ट्रेचर, 25 डिझास्टर मॅनेजमेंट किट, 60 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 50 बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) आणि 10  बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 50 बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) देण्यात आले आहेत.  तर ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड तहसील कार्यालये व मीरा भाईंदर अपर तहसील कार्यालयांना प्रत्येकी 100 बहुद्देशीय स्ट्रेचर –(मोठे), 40 मध्यम आकाराचे स्ट्रेचर, 50 फ्लोटिंग अँड फ्लोडिंग स्ट्रेचर, 50 डिझास्टर मॅनेजमेंट किट, 100 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 100 बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) आणि 10  बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 50 बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) देण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पूरग्रस्त गावे/प्रभाग आणि दरडग्रस्त गावांना या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. या साहित्यामुळे आपत्ती काळात तातडीने मदत पोहचण्यास व संकट निवारण करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. नुकत्याच डोंबिवली येथे झालेल्या स्फोटाच्या घटनेच्या वेळी डोंबिवली महानगरपालिकेला यापूर्वी दिलेल्या अशा साहित्यांचा मोठा उपयोग झाला आहे. तसेच यापूर्वीही झालेल्या विविध आपत्तीकाळातही या साहित्यांचा उपयोग होत आहे. एखादी व्यक्ती उंच इमारतीवर अथवा आगीत अडकली तर त्या व्यक्तिला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी हे स्ट्रेचर उपयुक्त ठरणार आहे. तसेच हे स्ट्रेचर पाण्यावर तरंगणारे असल्यामुळे पूर परिस्थितीत त्याचा उपयोग होणार आहे. रेस्क्यू रोपद्वारे इमारतीमधून अथवा अडचणीच्या जागेतून/दऱ्या खोऱ्यातून सुखरुपणे काढण्यासाठी उपयोग होणार आहे. फोल्डिंग मल्टीपर्पज स्ट्रेचर (संसर्ग रोधक) सोबतच या सोबतच्या किटमध्ये अंबू बॅग, कार्बन मास्क, हँड ग्लोज, सॅनिटायझर, शिट्टी, प्रेशर बॅंडेज/सेनेटरी पॅडस कॉडियेट पाईप, नेक बेल्ट, रेस्क्यू रोप, लिक प्रूफ लगेज बॅग, ऑईनमेंट, कापूस आदी साहित्याचा समावेश आहे. रेस्क्यू किटमध्ये अनेक छोट्या मोठ्या जीवनरक्षक सुरक्षित नावीन्यपूर्ण साधनांचा समावेश आहे. त्यामुळे हा संच शोध व बचाव पथक पोहचण्यापूर्वी उपयोगात येऊन जीवित व वित्त हानी टाळण्यास उपयुक्त ठरणार आहे. या संचामध्ये कार्बन मास्क, हँड ग्लोज, कॉम्पॅक्ट स्ट्रेचर, रिचार्जेबल रेस्क्यू टॉर्च, नेक बेल्ट, शिट्टी, रोलर बँडेज, लाल रंगाचे त्रिकोणी तसेच मेडिकेटेड बँडेज, सक्शन पंप, जखम साफ करण्यासाठी व निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध, रेस्क्यू रोप, टूल किट, टूल किट, सीपीआर मास्क सर्च लॅम्प आदी सुमारे 34 उपयुक्त साहित्यांचा समावेश आहे. आपत्त्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पूरग्रस्त व दरडप्रवण गावांना दिलेल्या साहित्य कसे वापरावे, त्याची देखभाल कशी करावी याचे प्रशिक्षणही संबंधित गावातील कर्मचारी, आपदामित्र व हे साहित्य वापरणारे कर्मचारी यांना देण्यात येणार आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, ठाणे महापालिका आपत्ती निवारण दल, नागरी संरक्षण दल व सामाजिक संस्थेच्या तज्ज्ञांकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपत्त्कालीन परिस्थितीत संकटग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी व त्यांची सुटका करण्यासाठी हे साहित्य उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांनी सांगितले..

मीरा-भाइर्दंरमध्ये सोसायटीच्या सचिवावर गुंडाचा हातोड्याने हल्ला

मिरा-भाईंदर : मीरा भाईंदरमधील प्रकाश भवन या इमारतीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे सचिव अनंत तिवारी (वय ५५) यांच्यावर पापू ऊर्फ अरविंद कदम या गुंडाने हतोड्याने हल्ला केला आहे. तिवारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली…

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच पाहणी केली. रुग्णालयातील सोयीसुविधा आणि औषधोपचार यांच्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन आयुक्त राव यांनी या भेटीनंतर केले. सरासरी १२००च्या घरात असलेली बाह्यरुग्ण संख्या सध्या २२००च्या घरात गेली आहे. त्यामुळे विनामूल्य असलेल्या औषधोपचाराचा खर्चही वाढला आहे. हा जास्तीचा खर्च महापालिका तत्काळ उपलब्ध करून देणार आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील कायम पदांच्या भरतीसाठीही जलद कार्यवाही करण्यात येत असून लवकरच ही पदे भरली जातील, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी रुग्णालयातील सर्व विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, वसतीगृह आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुख यांनी बैठक घेतली. या बैठकीत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी रुग्णालय तसेच महाविद्यालय यांच्याविषयी सविस्तर सादरीकरण केले. बैठकीस, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, उपायुक्त (आस्थापना) जी. जी. गोदेपुरे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, डीन डॉ. राकेश बारोट, डॉ. स्वप्नाली कदम आदी उपस्थित होते. रुग्णालयाच्या मजबुतीकरणासाठी राज्य सरकारने ६० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यासोबत, नवीन विद्युत व्यवस्था, ट्रान्सफॉर्मर आदी सुधारणांसाठी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थलांतरासाठी आणखी निधीची गरज भासणार आहे. त्या नेमक्या गरजा, त्याचा खर्च यांचा संपूर्ण आढावा घेऊन वाढीव खर्चाचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश यावेळी आयुक्त राव यांनी दिले. वाढीव औषधसाठा, अपघात विभागाची क्षमतावृद्धी, अतिदक्षता विभागातील खाटांची वाढ आणि डॉक्टरांची उपलब्धता या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता जाणवणार नाही, असे आयुक्त राव म्हणाले. तसेच, पार्किंग प्लाझामधील उपलब्ध वैद्यकीय सामुग्रीचा जास्तीत जास्त वापर रुग्णालयात करावा त्यासाठी डीन आणि अधीक्षक यांनी पार्किंग प्लाझामधील सामुग्रीची तत्काळ पाहणी करावी, असे निर्देशही आयुक्त राव  यांनी दिले. रुग्णालयावर असलेला अतिरिक्त भार लक्षात घेता डॉक्टर करत असलेल्या रुग्णसेवेबद्दल आयुक्त राव यांनी कौतुक केले. रुग्णांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या माहितीचे संगणकीकरण करून ती व्यवस्था अद्ययावत करण्याबाबतही आयुक्त राव यांनी सूचना दिल्या. विविध परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या निवासी डॉक्टरांचेही आयुक्त राव यांनी कौतूक केले. उत्तमोत्तम विद्यार्थी या महाविद्यालयात आले तर त्याचा फायदा रुग्णसेवेलाही होतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा आपल्या अभिमान असल्याचेही राव यांनी सांगितले.

स्पोर्टींग क्लबचे सेंट्रल मैदान म्हणजे ठाण्याचे लॉर्ड्स

ठाणे : स्पोर्टींग क्लब कमिटीच्या  सेंट्रल मैदानाने गेल्या शंभर वर्षात ठाण्याच्या क्रिकेटची अनेक स्थितंतरे अनुभवली आहेत. मड, मॅट, आणि टर्फ अशा खेळपट्टयांवर क्रिकेटवेड्या ठाणेकरांनी आपले कौशल्य पणाला लावले. श्री आनंद भारती समाज संस्थेची स्थापना १९१० साली झाली. तर संस्थेची क्रिकेट शाखा १९१५ साली स्थापन झाली. स्पोर्टींग क्लब कमिटीच्या शताब्दी वर्षात आमच्या संस्थेच्या गौरव होत आहे त्याबद्दल आम्ही क्लबचे अध्यक्ष डॉ राजेश मढवी यांच्यासह  स्पोर्टींग क्लब कमिटीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे आभारी आहोत असे भावपूर्ण मनोगत श्री आनंद भारती समाजाचे सचिव विवेक मोरेकर यांनी व्यक्त केले. स्पोर्टींग क्लब कमिटीतर्फे सीकेपी सभागृहात शताब्दी वर्षाचा सांगता सोहळा अनेक मान्यवर, क्लबचे सदस्य यांच्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. त्याप्रसंगी सचिव विवेक मारेकरी बोलत होते.  पुष्पगुच्छ, क्लबचे बोधचिन्ह असलेली टोपी, चांदीची मुद्रा यावेळी सर्वाना भेट देण्यात आली. यावेळी ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, माजी आमदार निरंजन डावखरे, क्लबचे जेष्ठ सदस्य दिलीप[ रणदिवे, मुकुंद सातघरे,  क्लबचे माजी अध्यक्ष मुरलीधर मढवी, सुषमा मढवी, हेमांगी नाईक यांचे डॉ राजेश मढवी यांनी स्वागत केले. कार्यवाहक दिलीप धुमाळ, सहकार्यवाहक सुशील म्हापुसकर, अतुल फणसे, , किशोर रणदिवे, किशोर ओवळेकर, योगेश महाजन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जेष्ठ सदस्य  प्रल्हाद नाखवा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  केले.

नेरुळ येथे विधी महाविद्यलयाकडून वृक्षरोपण

नेरुळ : महात्मा गांधी मिशिन विधी महाविद्यालय नेरुळ नवी मुंबई येथे विधी महाविद्याल यांच्या वतीने ५ जून रोजी  ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे  वृक्ष रोपणाचा उपक्रम यशवीरित्या राबवण्यात आला विधी महाविद्यालय  च्या मुख्याध्यापीक शीला होसमानी  व महाविद्यलयातील विद्यार्थी , कर्मचारी, नवी मुंबई महानगपालिकेचे अधिकारी ,कर्मचारी ,व   ईतर विद्यार्थी आणि नागरिक यांनी सहभाग घेतला होता. या उन्हाळ्यात साधारणतः तापमान हे ४५ अंश सेल्सियस च्या जवळ पास गेले होते पुढे काय होईल हे सांगणे कठीण आहे त्यामुळे वृक्षरोपण हि काळाची गरज  झालेली आहे प्रत्येक माणसांनी किमान एक तरी झाड लावून संगोपन करून जगवले पाहिजे असा संदेश मुख्याध्यापिका शीला होसमानी यांनी  पर्यावरणदिनानिमित्त तेथे जमलेल्या विद्यार्थी ,महानगपालिकीचे कर्मचारी व नागरिकांना  दिला.