Category: ठाणे

Thane news

भिवंडी लोकसभा मतदारसंघात एक खिडकी योजना कार्यान्वित

निवडणूक प्रचारासंदर्भातील परवान्यांसाठी ठाणे  – लोकसभा निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवाने घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहा विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित…

कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

ठाणे  : राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. तसेच निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त…

ठाणे स्थानकात भारतीय रेल्वेचा १७१ वा वाढदिवस साजरा

डोंबिवली : भारतीय रेल्वेचा १७१वा वाढदिवस मंगळवारी ठाणे रेल्वे स्थानकात साजरा करण्यात आला. ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेने त्याचे आयोजन केले होते, ठाणे ते कर्जत रेल्वे स्थानक पर्यन्त शटल सेवा सोडण्यापर्यन्त शांत बसणार नाही असा निर्धार संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी।केला. त्याबाबत त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया।दिली. सातत्याने नागरिकांनी मागणी करूनही रेल्वे प्रशासनावर त्याचा परिणाम होत नसल्याचे सांगण्यात आले. ठाणे स्थानकातील ऐतिहासिक रेल्वे इंजिन बसवण्यात आले आहे त्या ठिकाणी १७१ वर्षांचा इतिहास माहितीपर लावण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच या इंजिनाची ख्याती सर्वदूर जाऊन त्या स्मृती अजरामर} राहण्यासाठी सेल्फी पॉईंट असावा अशी सुविधा रेल्वेने द्यावी अशीही मागणी देशमुख यांनी केली. १७१ वर्षे झाली परंतु दिवसाला सुमारे सरासरी १२ अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात जातो हे योग्य नाही, त्यामुळे ते अपघात शून्य प्रमाणात आणावेत यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत सुधाकर पतंगराव यांनी व्यक्त केले. त्यावेळी स्थानक प्रबंधक केशव तायडे, समाजिक कार्यकर्ते शिवराम मिश्रा, किशोर बोन्द्रे आदींसह लोहमार्ग पोलीस, अरपीएफ जवान, प्रवासी आदी उपस्थित होते. भारतीय रेल्वेचा 171 वाढदिवस साजरा करीत असताना मुंबईतील उपनगरीय लोकल प्रवाशांचा प्रवास सुसह्य आणि किमान गर्दीचा व्हावा अशा अपेक्षा मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल प्रवाशांनी व्यक्त केल्या. यासाठी गेली 6 वर्षे रेल्वे बोर्डाकडे मंजुरी च्या प्रतिक्षेत असलेल्या बदलापूर व टिट वाळा लोकल 15 डबा चालविण्या च्या प्रकल्पाला  तात्काळ मंजुरी मिळावी व  सदर प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करावा अशी महत्वाची  मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. तसेच वेळा पत्रक बदलताना निदान कल्याण  किंवा ठाणे स्थानकातून कर्जत व कसारा मार्गावर लोकल फेर्या वाढवाव्यात  अशी माफक अपेक्षा व्यक्त केली. : मनोहर शेलार, संस्थापक अध्यक्ष, उपनगरी रेल्वे प्रवासी संस्था

१६ एप्रिल१८५३ रोजी पहिली लोकल रेल्वे मुंबई बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावल. या घटनेला १७१वर्ष पूर्ण झाले असून प्रवासी संघटना आणि रेल्वे कर्मचारी यांनी केक कापून हा क्षण साजरा केला. (छाया-प्रफुल गांगुर्डे)

सावधान ! आता उष्माघाताचे संकट

ठाणे : राज्यातील वाढत्या उन्हाचा चटका दिवसागणिक असह्य होत असून आता राज्यावर उष्माघाताच्या संकटाची टांगती तलवार डोक्यावर आहे. राज्य उष्माघात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. १ मार्च ते १२ एप्रिल या…

ठाणे, कल्याणात अशुद्ध पाणीपुरवठ्याची अफवा;

पालिका प्रशासन म्हणाले, अफवांवर विश्वास ठेऊ नका ठाणे / कल्याण : ठाणे आणि कल्याण शहरामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्याने ३ ते ४ दिवस अशुद्ध पाण्याचा पुरवठा होणार असल्याचे…

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर महानगरपालिकेची कारवाई

पनवेल : महानगरपालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या ७५ झोपड्यांवर कारवाई करून जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत, सदरची कारवाई पनवेल महानगरपालिकेने करत नागरिकांना मोठा दिलासा आहे. बेलपाडा गावाजवळ डोंगर परिसरात अनधिकृतरित्या झोपड्या बांधल्या जात असल्याची तक्रार भाजपचे खारघर शहर अध्यक्ष माजी नगरसेवक प्रवीण पाटील, ऍड. अमर उपाध्याय, कीर्ती नवघरे यांनी महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याकडे केली होती. बेलपाडा गावाच्या मागे आणि डोंगराळ भागात उभ्या राहिलेल्या या झोपड्या सहजा नजरेत येत नाही मात्र या भूखंडावर अनधिकृतपणे झोपड्यांचे बस्तान बांधल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत होता.  त्यामुळे अशा प्रकारच्या झोपड्यांना आंदण मिळू नये आणि अशा प्रकारामुळे झोपड्यांचे प्रमाण वाढू नये यासाठी अनधिकृत झोपड्यांवर वेळेवर कारवाईची गरज लक्षात घेता माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी महापालिकेचे प्रभारी आयुक्त प्रशांत रसाळ आणि प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्याकडे या संदर्भात तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार आज सकाळी प्रभारी आयुक्त प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त मारुती गायकवाड, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, अतिक्रमण विरोधी प्रमुख रत्नाकर जाधव, स्वच्छता निरीक्षक संदीप भोईर, अतुल मोहोकर आणि ५० कर्मचारी यांनी त्या ठिकाणी तीन जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत झोपडपट्ट्या जमीनदोस्त करत ती जागा पूर्ववत करून नागरिकांना दिलासा दिला आहे. या कारवाईबद्दल माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी समाधान व्यक्त करून प्रभारी आयुक्त प्रशांत रसाळ आणि प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांचे दूरध्वनीवरून आभार मानले आहेत. तसेच अशा कारवाईमुळे अनधिकृतपणे झोपड्यांचा विळखा उभारणाऱ्यांना जरब बसली आहे.

उड्डाणपुलाजवळ हाईट बॅरियरला टेम्पोची धडक

नाशिक-मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी ठाणे: नाशिक मुंबई पूर्व द्रूतगती मार्गावरील माजीवडा उड्डाणपूलाजवळ लोखंडी हाईट बॅरियरला एका टेम्पोने धडक दिल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात प्रविणकुमार अग्निहोत्री (३३, रा. इंदिरानगर, वागळे इस्टेट, ठाणे)  हा टेम्पोचालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या अपघातामुळे या मार्गावर अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त टेम्पो क्रेनच्या मदतीने बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिक- मुंबई या मार्गावर  माजिवाडा ब्रिजजवळ नाशिक ते मुंबईकडे जाणाऱ्या रोडवर माजिवाडा ब्रिजजवळ असलेल्या हाईट बॅरियरला टेम्पोने धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक नियंत्रण शाखेचे…

प्रचंड मतांनी कपिल पाटलांना निवडून आणू — आमदार किसन कथोरे

मुरबाड तालुक्यातील विरोधी पक्ष एकवटले मुरबाड : आगामी लोकसभा निवडणुकीत मुरबाड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याचा निश्चय आमदार कथोरे यांनी महायुतीच्या मेळाव्यात केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री व महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, भाजपाचे आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष गोटीराम पवार यांच्यासह मनसे व रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा भव्य मेळावा मुरबाड येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील, माजी आमदार कृष्णकांत तेलम, शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत गोंधळी, सुभाष घरत, उल्हास बांगर, भगवान भालेराव, नगराध्यक्ष मुकेश विशे, माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे, माजी सभापती दीपक पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश पवार, मनसेचे तालुकाध्यक्ष आशिष रत्नाकर, वैशाली घरत,  अनिल घरत, लियाकत शेख, देवेन जाधव, दीपक खाटेघरे, प्रतिक हिंदुराव, हरेश खापरे यांच्या सह आदीं  हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुरबाड तालुक्यातील नागरिकांचे अनेक दशकांपासून रखडलेले मुरबाड रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाले. केंद्रीय अर्थसंकल्पात मुरबाड रेल्वेमार्गासाठी तरतूद झाली असून, मुरबाड रेल्वेमध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना जादा नुकसानभरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. कल्याण-मुरबाड रेल्वे १०० टक्के होणार असल्याचे छातीठोकपणे सांगत असून, कल्याण-मुरबाड रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. बदलापूरपर्यंत मेट्रो निश्चितपणे येईल, अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिली. तर मुरबाड-शहापूर रस्त्याला अनेक वर्षांपूर्वी मंजुरी मिळाल्यानंतरही कंत्राटदारामुळे तेथील काम पूर्ण झालेले नाही, याकडे श्री. कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा समावेश `एमएमआरडीए’ क्षेत्रात करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. मुरबाड विधानसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्य देण्याची क्षमता असल्याचे श्री. कपिल पाटील यांनी आवर्जून नमूद केले. मुरबाड विधानसभा मतदारसंघात दहा वर्षांत अनेक विकासकामे झाली. अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली. रस्ते व अन्य विकासकामांसाठी सर्वाधिक निधी मुरबाड मतदारसंघाला मिळाला. या विकासकामांमुळे भाजपासह महायुतीला मतदारांची पसंती मिळाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मला मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळविण्यासाठी भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता मेहनत घेईल. महायुतीच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्याची नोंद होईल, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला. या वेळी ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार आदींसह महायुतीच्या नेत्यांची भाषणे झाली. मुरबाड तालुक्याची राजकीय ताकद एकाच व्यासपीठावर! मुरबाड तालुक्यात स्थानिक पातळीवर भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमोद हिंदुराव, शिवसेनेचे सुभाष पवार यांची राजकीय ताकद मोठी आहे. मनसे व रिपब्लिकन पक्षाचेही मोठ्या प्रमाणावर समर्थक आहेत. महायुतीच्या आजच्या मेळाव्यात ही ताकद एकाच व्यासपीठावर पाहावयास मिळाली. यापूर्वीच्या स्थानिक निवडणुकीत आपण एकमेकांविरोधात लढलो असलो, तरी आगामी लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी व्यक्त केला.

आता अप्पर ठाण्यातही डॉग हाऊसची सुविधा

ठाणे : अप्प्पर ठाण्यातील श्वानप्रेमींना आता आपल्या श्वानांची काळजी घेणारे हक्काचे डॉग हाऊस उपलब्ध झाले आहे. अंजूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील माणकोली-अंजूरफाटा मार्गावरील रामनगर परिसरात नव्याने सुरु करण्यात आलेल्या डॉग हाऊसचे अलीकडेच उदयॊजक आणि समाजसेवक लालचंद्र रामचंद्र पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल हर्ष केनेल्सचे दुर्वास करावकर म्हणाले बालपणापासून मला श्वानाबद्दल प्रेम आहे. माझ्या बेला या श्वानाला विविध डॉग शोजमध्ये बक्षिसे मिळाली आहेत. अप्पर ठाण्यात श्वानांची काळजी घेणारे कुठलेही डॉग हाऊस नव्हते. हि कमतरता भरून काढण्याचा विचार मागील चार वर्षांपासून मनात घोळत होता. आता हि मनीषा प्रत्यक्षात अवतरली आहे. या डॉग हाऊसमुळे केवळ अप्पर ठाण्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील इतर श्वानप्रेमींची अडचण दूर होईल. या हर्ष केनेलसच्या उदघाटन समारंभास सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, लघु उद्योजक किशोर नाखवा, प्रतिभा पाटील, ज्योती नाखवा आदी मान्यवर उपस्थित होते. प्रल्हाद नाखवा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अशोक पाटील यांनी आभार मानले.