Category: ठाणे

Thane news

मतदार जनजागृती कार्यक्रमांनी दुमदुमले ओवळा- माजिवडा विधानसभा क्षेत्र

ठाणे : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १४६ ओवळा माजिवडा विधानसभाक्षेत्र जनजागृती कार्यक्रमांनी दुमदुमले. येथील लोढा पॅराडाईज महिला संघ व हाऊसिंग फेडरेशन माजिवडा मानपाडा प्रभाग ठाणे येथे नोडल अधिकारी श्री.सुनिल यादव व नायब…

चैत्रनवरात्रोत्सवात ह. भ. प. निवृत्ती इंदुरीकर महाराजांच्या किर्तनासाठी अलोट गर्दी

वारकरी संप्रदायामध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या मान्यवरांचा सत्कार ठाणे : आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील चैत्रनवरात्रोत्सव २०२४ भक्ती व कला महोत्सवाच्या…

 ठाण्यात बँकेच्या शिपायाचा विश्वविक्रम

अखेर पंडित धायगुडे यांच्या विश्वविक्रमाची ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद ठाणे : काही माणसं झपाटलेली असतात जगावेगळं काहीतरी करून दाखवण्याचा ध्यासच त्यांनी घेतलेला असतो… विक्रमाचं क्षितीज त्यांना खुणावत असतं आणि…

नववर्ष स्वागतयात्रेत ठामपाच्या मतदान व पाणीपुरवठा  चित्ररथास विशेष पुरस्कार

ठाणे : मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, मतदानाचा दिवस हा सुट्टी असल्याने बाहेर जावू नका, नागरिकांनी मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावावा अशी जनजागृती ठाण्यातील भारतीय नववर्ष स्वागत यात्रेत ठाणे महापालिकेच्या…

पंधरा दिवसात रस्त्याचे तीन तेरा

नागरिकांमध्ये तीव्र संताप डोंबिवली : पश्चिमेतील गणेशनगर मधील रेल्वे मैदानाजवळील रस्ता पंधरा दिवस बंद ठेऊन कल्याण डोंबिवली पालिकेने या रस्त्याची सिमेंट काँक्रीटने बांधणी केली. हा नवाकोरा काँक्रीटचा रस्ता वाहतुकीसाठी शुक्रवारी…

मालमत्ता कर, पाणी पट्टी वसुली १०० टक्के करा-आयुक्त सौरभ राव

ठाणे, ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कळवा प्रभाग समितीची पाहणी करून प्रभाग समितीच्या माध्यमातून होत असलेल्या कामकाजाचा आढावा आज आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. यावेळी कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पाणीपट्टी व मालमत्ता…

बोरिवली, स्पीडची विजयी सलामी

ठाणे  : बोरिवली क्रिकेट क्लबने युनायटेड क्रिकेट क्लबचा सहा गडी राखून तर स्पीड स्पोर्ट्स क्लबने गोल्डन स्टार क्रिकेट क्लबचा पाच गडी राखून पराभव करत स्पोर्टींग क्लब कमिटीने शताब्दी वर्षात ठाणे…

आगरी-कोळी समाजात उल्लेखनीय काम करणार्‍या मान्यवरांचा सत्कार

ठाणे : चैत्र नवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी देवीची स्थापना करून आरती नंतर संतोष चौधरी प्रस्तुत “दादुस आला रे” या कोळीगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून देवीचे दर्शन करून या कोळीगीत कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमामध्ये ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर क्षेत्रातील आगरी व कोळी समाजातील उल्लेखनीय काम करणार्‍या मान्यवरांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले. सत्कार मूर्ती ठाण्यातील श्री. मनीष लीला चंद्रकांत वैती, श्री. दिलीप वसंत नाखवा, श्री. संदीप प्रभाकर कोळी, आनंदिता कुणाल कोळी, चैताली सुरेश नाखवा, डॉ. अंकित संतोष कोळी, सौ. शर्मिला दिनेश पाटील, सौ. करिष्मा केविन कोळी- नाखवा, श्री. अनंत पांडुरंग पाटील इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी असलेल्या दादुस यांना सन्मानित केले.

नफायुक्त वाढ हे टीजेएसबी बॅंकेचे ब्रिद आहे, भरोसेका बॅंक, भविष्यका बॅंक म्हणून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरेल !

टीजेएसबी बॅकेचा व्यवसाय २५ हजार कोटींवर जाईल – शरद गांगल अनिल ठाणेकर ठाणे : दोन ते तीन वर्षांत टीजेएसबी बॅंकेचा व्यवसाय २५ हजार कोटींवर जाईल, नफायुक्त वाढ हे टीजेएसबी बॅंकेचे ब्रिद आहे तेच आपले लक्ष आहे, तेच आपण फॉलो करत आहोत. टीजेएसबी बॅंक भरोसेका बॅंक, भविष्यका बॅंक म्हणून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरेल, अशी अपेक्षा टीजेएसबी बॅंकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. यावेळी बॅंकेचे उपाध्यक्ष वैभव सिंघवी, व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बलक्ष्मी शिराली, तसेच सर्व संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सर्व सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कुठल्यातरी वाढीसाठी वाढ करायची आणि कुठला तरी मोठा नंबर दाखविण्यासाठी टीजेएसबी बॅंक कधीही काही करत नाही, आम्ही नेहमी हे पाहत असतो की, देशाची इकॉनॉमी जेव्हा वाढते त्याच्या एक दोन टक्के आपण इकडे तिकडे वाढलो की आपण सुरक्षित हातात आहोत. ठेविदारांचा इंटरेस्ट हा सर्वात महत्वाचा आहे. इथे सगळे मध्यमवर्गीय व गरिब लोकांचे पैसे आहेत. आपले लक्ष नफायुक्त वाढ हे आपले ब्रिद आहे तेच आपण फाॅलो करत आहोत. दोन ते तीन वर्षांत टीजेएसबी बॅंकेचा व्यवसाय २५ हजार कोटींवर जाईल अशी अपेक्षा आहे. टीजेएसबी बॅंक भरोसेका बॅंक, भविष्यका बॅंक म्हणून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरेल. वर्षभरात सव्वा दोनशे कोटीचे गृहकर्ज वाटप करण्यात आले. आरबीआयने रिअल इस्टेट कर्जावर रिस्टीक्शन असतात. जास्तीत जास्त वैयक्तिक गृहकर्ज देण्याचा आपला प्रयत्न असतो. पण त्याला १० टक्केची मर्यादा आहे. ही मर्यादा आपण फेब्रुवारी-मार्च मध्येच पूर्ण करतो.आपल्या गृहकर्जाचा व्याजदर सर्वात कमी आहे. गेल्यावर्षी २०९५४ कोटींचा व्यवसाय झाला तो यावर्षी २२४६३ कोटीचा झालेला आहे. गेल्यावर्षी डिपॉझिट १३७४३ कोटी होते ते यावर्षी १४५८८ कोटी झाले आहे. ढोबळ नफा २९१ कोटी होता तो २८० कोटी झालेला आहे. नेट प्राॅफिट १७३ कोटीवरुन २१६ कोटी झालेला आहे. स्वनिधी १५४९ कोटीवरुन १७१९ कोटी झालेले आहे. बँकेचे आरोग्य पहाणारा स्वनिधीचे शेअर कॅपिटल १०९ कोटी आहे.तर स्वनिधी १७१९ कोटीवर गेले आहे. रिझर्व्ह बॅंकेचे बारीक लक्ष असते तो कॅपिटल ॲडक्विन्सी रेषो, बॅंकेचे आरोग्याचे प्रमाण १६. ९३ टक्क्यावरुन १७.५७ टक्क्यांवर आलेले आहे.हे ऑडिटेट फायनान्शियल रिझल्ट्स आहेत. हा बॅंकेचा आर्थिक ताळेबंद आहे. रिझर्व्ह बॅंकेने फिनान्शली स्ट्राँग ॲण्ड वेलमॅनेज बॅंक म्हणून दर्जा दिल्याने ऑटोमोटिव्ह रुटने बॅंक शाखा आपण उघडू शकतो. यानुसार पहिली शाखा गोवा येथे तर उरलेल्या चार शाखांपैकी तीन एप्रिल शेवटपर्यंत उघडण्यात येतील तर एक शाखा जून मध्ये उघडण्यात येईल. पहिल्या तिमाहीत चार शाखा उघडण्यात येणार आहेत. यामुळे आपण पाच शाखांपैकी दोन शाखा कर्जत (रायगड) आणि वाळूज छत्रपती संभाजी नगरव येथे शाखा उघडण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्य़ातील मोशी व बारामती येथे एक नागपूर येथे शाखा उघडण्यात येतील. कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या मदतीसाठी एटीएम टाकलेले आहे. नवीन तीन शाखांपैकी चौथी ठाणे शहरात घोडबंदर आनंद नगर येथे उघडण्यात येणार आहे. बॅंकेची वाढ अशीच चालू राहिल. बॅकेच्या मजबूतीसाठी काही भविष्यातील तरतुदी करुन ठेवलेल्या आहेत. ग्राॅस एनपीए कमी तर नेट प्राॅफिट वाढलेला आहे. बॅंक च्या १३९ शाखा, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश येथे कार्यरत आहेत.उत्तर भारतातील नोएडा सारख्या परिसरात खूप मोठ्याप्रमाणात व्यवसायवृद्धी होत आहे. यामुळे जिथे बिझनेस असेल तिथे आम्ही जाणार आहोत. पूर्ण उत्तर भारत आमच्या नियोजनात आहे, असे मत टीजेएसबी बॅंकेचे अध्यक्ष शरद गांगल यांधी व्यक्त केले. चौकट टीजेएसबी बॅंकेला इंडियन बॅंक टॅक्स असोसिएशन कडून तीन पुरस्कार, बेस्ट बॅंक सेल्स, पेमेन्ट ॲण्ड एन्गेजमेंट, बेस्ट टेकटॅलेन्ट ॲण्ड ऑर्गनायझेशन, बेस्ट टेक्नॉलॉजी बॅंक ऑफ द ईअर असे प्रतिष्ठित पुरस्कार टीजेएसबी बॅंकेला प्राप्त झाले आहेत.

डोंबिवली शहर संघटकाचा मनसेला रामराम

राज ठाकरेंच्या सतत बदलत्या भूमिकांमुळे मनसे कार्यकर्ते संभ्रमात डोंबिवली : मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठींबा जाहीर केला. मनसे पक्षाच्या सततच्या बदलत्या भूमिकांमुळे येथील मनसेचे काही कार्यकर्ते…