Category: ठाणे

Thane news

सुमेधा चिथडे यांचे कल्याण मध्ये व्याख्यान

सुमेधा चिथडे यांचे कल्याण मध्ये व्याख्यान कल्याण: “वंदे मातरम” या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण पूर्ती निमित्त रविवारी ८ फेब्रुवारी, सायंकाळी ४:३० वाजता ऐतिहासिक कल्याणाच्या सुभेदार वाड्यात “राष्ट्राय स्वाहा इदम न मम” या…

आज ठाण्यात ‘चिन्मय मिशनचा अमृत यात्रा’ महोत्सव

आज ठाण्यात ‘चिन्मय मिशनचा अमृत यात्रा’ महोत्सव ठाणे – गुरुदेव स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांनी अद्वैत वेदान्त, भगवद्गीता आणि उपनिषदांचे ज्ञान प्रसृत करण्यासाठी १९५३ मध्ये चिन्मय मिशनची स्थापना केली. जगभरातील चिन्मय मिशन केंद्रे…

 राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब ढाकणे यांचा सत्कार

ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब ढाकणे यांचा सत्कार नवी मुंबई: नवी मुंबई सानपाडा येथे राहणारे आणि भायखळा येथील मुंबई पोलिस विभागाच्या संरक्षण आणि सुरक्षा खात्यात…

शहापूरात सिकलसेल तपासणी मोहीम

शहापूरात सिकलसेल तपासणी मोहीम ठाणे: शहापूर तालुक्यातील शहापूर शहरात सिकलसेल तपासणी मोहीम सुरू असून प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रुण अंतर्गत असलेल्या उपकेंद्रा मार्फत शहापूर नंबर-१ येथील वारघडे नगर,व तावडे नगर गोणे…

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या अस्थीकलशांच दर्शन आज ठाण्यातील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात ठेवण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळीं ठाणे जिल्हाध्यक्ष…

मलंगगडाबाबत न्यायालय आपल्याला लवकरच न्याय देईल- एकनाथ शिंदे

मलंगगडाबाबत न्यायालय आपल्याला लवकरच न्याय देईल- एकनाथ शिंदे ठाणे  : श्री मलंगगडावरील काही बांधकामाबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात न्यायालय लवकरच आपल्याला न्याय देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. माघी पौर्णिमेच्या दिवशी…

स्फुर्ति महिला सामाजिक  संस्थेच्या वतीने महिलांसाठी प्रवास वर्णन कथालेखन स्पर्धा

स्फुर्ति महिला सामाजिक  संस्थेच्या वतीने महिलांसाठी प्रवास वर्णन कथालेखन स्पर्धा कल्याण :  स्फुर्ति महिला सामाजिक संस्था, डोंबिवली दरवर्षी महिलांसाठी निरनिराळ्या स्पर्धा घेत असते.  यावर्षी कथा-लेखन कींवा प्रवास वर्णन ही स्पर्धा आयोजित केली असून यापैकी एक लेख स्पर्धेसाठी पाठवायचा आहे. कथा स्पर्धेसाठी सामाजिक विषयावर कथा लिहावी. मात्र ती कथा स्वलिखीत आणि अप्रकाशित असावी. वादग्रस्त नसावी.   कथा मराठीतच असावी. ज्येष्ठ लेखक आणि अभ्यासकांकडून या कथा लेखनाचे व प्रवास वर्णनाचे परीक्षण होईल. तीन क्रमांक निवडुन  बक्षिसे दिली जातील. संपर्क: ९०८२४१२३०४, ७५०६३०८९१८

राष्ट्रवादी काँग्रेस-रदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह नगरसेवक यासीन कुरेशी, दिपाली भगत,…

४ फेब्रुवारी रोजी ठाण्यात चिन्मय मिशनचा अमृत यात्रा महोत्सव

४ फेब्रुवारी रोजी ठाण्यात चिन्मय मिशनचा अमृत यात्रा महोत्सव ठाणे : गुरुदेव स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांनी अद्वैत वेदान्त, भगवद्गीता आणि उपनिषदांचे ज्ञान प्रसृत करण्यासाठी १९५३ मध्ये चिन्मय मिशनची स्थापना केली. जगभरातील चिन्मय मिशन केंद्रे कोणत्याही भेदाभावाशिवाय सर्वांच्या कल्याणासाठी हे ज्ञान पसरवतात. चिन्मय मिशन, ठाणे येथे ७५ वा अमृत यात्रा महोत्सव बुधवार, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत श्री मुरलीधर मंदिर, ऋतू एन्क्लेव्ह, घोडबंदर रोड, ठाणे येथे साजरा केला जाईल. कार्यक्रमाची सुरुवात गुरु पादुका पूजनाने होईल. त्यानंतर भक्तिमय भजनांचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘गीता पंचामृत’ची ओळख, जे गीतेचा सार पाच श्लोकांमध्ये सादर करते. अस्वस्थ मनांसाठी हे एक रामबाण उपाय आहे. भगवद्गीतेशी जोडले जाण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे आणि हे पाच शब्दरूपी अमृताचे थेंब शुद्ध ज्ञानाकडे घेऊन जातात. चांगले असण्याचा आणि चांगुलपणा वाटण्याचा उत्सव साजरा करण्यासाठी हे सर्वांसाठी खुले निमंत्रण असल्याचे मिशन च्या वतीने सांगण्यात आले आहे.

कुस्तीपटू कोमल पटेलला रौप्य पदक

कुस्तीपटू कोमल पटेलला रौप्य पदक ठाणे : वसंतदादा कुस्ती केंद्र यशवंत नगर सांगली या ठिकाणी संपन्न झालेल्या २० वर्षा खालील राज्यस्तरिय     महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत मिरा भाईंदर येथील  श्री गणेश आखाड्यातील कुस्तीपटू कोमल पटेलने  रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेत महाराष्ट्रातून विविध वजनी गटातून निवड झालेल्या पैलवानांचा समावेश होता. ५० किलो वजनी गटात कोमलने पहिल्या फेरीत पुणे शहर जिल्ह्याच्या पूर्वा परदेशीला १० तांत्रिक गुणांच्या फरकाने सहज नमवले. दुसऱ्या  फेरीत कोमलने जळगावची कसलेली मल्ल समीक्षा काळेला चितपट केले. या कुस्तीत कोमलने  क्षणाचा ही विलंब न लावता झोळी या डावाची पकड घेत समिक्षाला चितपट करत सर्वांना अचंबित केले. तिसऱ्या फेरीत देखील‌ तिने मुंबई उपनगराच्या रसिका माळीला  चितपट करत अंतिम फेरीत मजल मारली. निर्णायक सामन्यात कोमलची लढत अनुभवी, अनेक पदके जिंकलेल्या  कोल्हापूरच्या गौरी पाटीलशी होती, पण अखेर अनुभवाने वरचढ असलेल्या गौरीने कोमलला  तांत्रिक गुणांच्या जोरावर नमवुन सुवर्ण पदक मिळवले. तर कोमलला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. कोमल ही सध्या अभिनव कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स या कॉलेज मध्ये कला शाखेच्या   प्रथम वर्षात  शिकत आहे . राज्यस्तरावरील कुस्ती स्पर्धेत कोमलचे हे पहिलेच पदक होते. श्री गणेश आखाड्याचे सर्वेसर्वा  वसंतराव पाटील , वैभव माने यांचे मोलाचे  मार्गदर्शन कोमलला मिळत आहे.