Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

वन समितीच्या माध्यमातून स्वच्छता राखण्यास मदत

वन समितीच्या माध्यमातून स्वच्छता राखण्यास मदत मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरान नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटाच्या माध्यमातून वन संरक्षण समिती कार्यरत असते. सत्ताधारी गटाच्या मर्जीतील विश्वासू कार्यकर्ते या समितीवर उत्तम प्रकारे विकास कामे करण्यासाठी नेहमीच सज्ज असतात.एकूण वीस सदस्यांची या समितीवर निवड केली जाते. जोपर्यंत सत्ताधारी गट नगरपरिषदेच्या सभागृहात अस्तित्वात असतो तोवर नेमून दिलेले कार्यकर्ते यामध्ये पन्नास टक्के महिला सदस्य असतात.ही सर्व मंडळी एकदिलाने कामे करत असतात. दस्तुरी वाहन पार्किंगच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न या समितीला प्राप्त होते. त्यातूनच काहीवेळा वृक्षारोपण, ठराविक पॉईंट्सची सुरक्षा व्यवस्था, कचराकुंडी लावणे अशी महत्वपूर्ण कामे समितीचे पदाधिकारी, सदस्य करीत असतात. विशेष म्हणजे ही सर्व मोठया रक्कमेची  कामे करताना कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जात नाही. समितीचे पदाधिकारी,सदस्य ह्यांच्या सामोपचारातुन कामे पूर्ण करून गावाच्या विकास कामात मदत होत असते. लाखो रुपयांची शिल्लक आजही जमा असल्याने यावेळी गावातील एकूण पाच गरजवंत महिलांना स्वच्छता कामे दिली आहेत.याकामी दर महिन्याला साठ ते सत्तर हजार रुपये पगाराच्या रूपाने या पाच महिलांना दिला जात आहे.प्लास्टिक मुक्ती त्याचप्रमाणे अन्य कचरा गोळा करण्यासाठी वन संरक्षण समितीने पुढाकार घेतला असून स्वच्छता राखण्यासाठी मदत होत आहे.यापुढे नव्याने स्थापन होणाऱ्या समितीवर सत्ताधारी गटाने बारकाईने लक्ष केंद्रित करून गावाच्या हिताच्या दृष्टीने जी काही लाखो रुपयांची शिल्लक रक्कम आहे त्याचा सदुपयोग विकास कामांसाठी करावा अशी स्थानिकांमधून मागणी केली जात आहे.

  १३४ औद्योगिक भूखंडांवरील उद्योग बंद

१३४ औद्योगिक भूखंडांवरील उद्योग बंद विहित कालावधीत उत्पादन न झाल्यास भूखंड ताब्यात घेणार कल्याण : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मार्फत उद्योजकांना औद्योगिक विकासाच्या उद्देशाने विकसित भूखंडांचे वाटप करण्यात येते. सदर भूखंड धारकांनी करारातील अटी व शर्तीप्रमाणे विहित कालावधीत आवश्यक परवानग्या प्राप्त करून उद्योग सुरू करणे व प्रत्यक्ष उत्पादनात जाणे बंधनकारक असते. या अनुषंगाने, प्रादेशिक कार्यालय, ठाणे–२ यांच्या पथकाकडून अंबरनाथ, कल्याण, भिवंडी व मुरबाड तालुक्यांतील अंतर्गत औद्योगिक क्षेत्रामध्ये पाहणी व सर्वेक्षण करण्यात आले. या पाहणीअंती एकूण १३४ भूखंडांवरील उद्योग बंद स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित भूखंड धारकांनी अद्यापपर्यंत आवश्यक शासकीय परवानग्या प्राप्त करून उद्योग सुरू केलेला नाही किंवा उत्पादन प्रक्रिया सुरू केलेली नाही, असे आढळून आले आहे. करारनामा व लागू नियमांनुसार भूखंडाचा उद्देशपूर्ण वापर न केल्यास किंवा निर्धारित मुदतीत उत्पादन सुरू न केल्यास संबंधित भूखंड ताब्यात घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार, संबंधित भूखंड धारकांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्याची कार्यवाही हाती घेण्यात येत आहे. विहित कालावधीत समाधानकारक खुलासा न मिळाल्यास किंवा उद्योग प्रत्यक्ष सुरू न झाल्यास, संबंधित भूखंड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ताब्यात घेणार आहे. त्यानंतर नियमावलीनुसार व पारदर्शक पद्धतीने सदर भूखंड गरजू व पात्र उद्योजकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या मिलाप  पोर्टल वरून ऑनलाइन पद्धतीने पुनर्वाटप करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे औद्योगिक क्षेत्रातील निष्क्रिय भूखंडांचा प्रभावी वापर होऊन स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती व औद्योगिक विकासास चालना मिळण्यास मदत होईल, अशी माहिती प्रादेशिक कार्यालय, ठाणे–२ यांच्याकडून देण्यात आली आहे.

 नवी मुंबई महानगरपालिकेत १० नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक

नवी मुंबई महानगरपालिकेत १० नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक नवी मुंबई : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 5(२)(ब) अन्वये नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेप्रसंगी पिठासन अधिकारी महापौर सुजाता पाटील यांनी नामनिर्देशनाव्दारे १० नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक रण्यात आल्याचे जाहीर केले. या १० नामनिर्देशित सदस्यांमध्ये  कुलदिप सुरी, भरत नखाते, जगजीवन केणी, अपर्णा गवते, अमित मेढकर, लक्ष्मीकांत पाटील, व्दारकानाथ भोईर, साहिल चौगुले, सुरेश भिलारे, अंकुश कदम यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे जाहीर केले. नियुक्त नामनिर्देशित सदस्यांचे महापौर सुजाता पाटील, उपमहापौर  दशरथ भगत व महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देउुन अभिनंदन केले.

 कल्याण पूर्वेतील शिवप्रेरणा यात्रेत ५०० हून अधिक वारकऱ्यांचा जागर 

कल्याण पूर्वेतील शिवप्रेरणा यात्रेत ५०० हून अधिक वारकऱ्यांचा जागर आचार्य प्रल्हाद शास्त्री महाराज आणि संजय राघो काळोखे ‘शिवकल्याण पुरस्कार – २०२६’ ने सन्मानित कल्याण : सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ कल्याण पूर्व यांच्या वतीने शिवजयंती निमित्त सिध्दार्थ नगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर शिवजयंती उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायाच्या सुमारे ५०० हून अधिक वारकरयांनी सहभाग घेवून हरिनामाचा गजर केला. या उत्सवात कल्याण पूर्वेच्या नावलौकिकात भर घालणारे आचार्य प्रल्हाद शास्त्री महाराज तसेच संजय राघो काळोखे यांना कल्याणकरांसाठी मानाचा म्हणून ओळखला जाणार ‘शिवकल्याण पुरस्कार २०२६ ‘ हा पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर सुमारे ५०० वारकऱ्यांच्या उपस्थितीत सामूहिक हरिपाठ करण्यात झाला. या समयी हरिनामाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला होता. या वेळी आपल्या कतृत्वाने उल्लेखनीय कार्य करणारे आचार्य प्रल्हाद शास्त्री महाराज तसेच संजय काळोखे यांना आमदार सुलभा गायकवाड, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, एसीपी कल्याणजी घेटे या मान्यवरांच्या हस्ते ‘शिवकल्याण पुरस्कार २०२६ ‘ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. . सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मिरवणूक व प्रेरणा यात्रा . या प्रेरणा यात्रेत द्वारका विद्या मंदिर नांदीवली, नुतन ज्ञान मंदीर, मॉडेल कॉलेज आणि हायस्कुल, जय हनुमान दांडपट्टा पथक, तिसाई बिटस् बॅण्ड पथक, बासरीवाला ढोल ताशा पथक, मैत्रेय संगत, सहयोग सामाजिक संस्था, शाम बाबु गुप्ता आणि पथक, आदि संस्था संघटनांच्या सहभागासह कल्याण शहर वारकरी सांप्रदाय प्रबोधन ट्रस्ट या आध्यात्मिक संस्थेचे ५००हून अधिक वारकरी आणि सेवेकरी सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीत शिवप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “नामात विठ्ठल, कर्मात शिवराय” या संकल्पनेनुसार आणि ह.भ.प. जगन्नाथ रामभाऊ नेहरकर महाराज यांच्या अध्यक्षते खाली साजरा झालेल्या या शिवजयंती उत्सवात भक्ती आणि शौर्य यांची सांगड घालणारा हा उत्सव यशस्वीरीत्या पार पडल्याची भावना मंडळाचे विश्वस्त नरेंद्र सुर्यवंशी आणि विष्णू जाधव यांनी व्यक्त केली. या शिव प्रेरणा यात्रेत आमदार सुलभा गायकवाड, नगसेवक रमेश जाधव, निलेश शिंदे, सचिन पोटे, नगसेविका मनिषा गायकवाड, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्यासह संजय मोरे, सुभाष म्हस्के, राजु अंकुश, रमाकांत देवळेकर, विवेक जगताप, प्रभाग ४ जे च्या सहाय्यक आयुक्त सविता हिले आदी मान्यवर आणि विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी, शिवप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  फक्त ६७० रुपये वीज बिल थकीत असताना वीज पुरवठा केला खंडीत

फक्त ६७० रुपये वीज बिल थकीत असताना वीज पुरवठा केला खंडीत बील भरुन २४ तास उलटले तरी वीज पुरवठा सुरळीत नाही घरात ८० वर्षाची आजी आणि मतीमंद मुलगा २४ तासापासून…

जलवाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार जखमी

जलवाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार जखमी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोड वरील हॉटेल प्रसाद समोरील रस्त्यावर जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात दुचाकीस्वार युवक वाहनासह खड्डयात पडून गंभीर जखमी झाला आहे. महापालिकेचा हा  निष्काळजीपणा नागरीकांच्या जिवावर उठला आहे. या रस्त्यावर डंपरचा दुचाकीस्वाराला धक्का लागल्याने दुचाकीस्वार दुचाकीसह खड्ड्यात पडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून  दुचाकीचे नुकसान झाले आहे. संपूर्ण केडीएमसी क्षेत्रात खोदकामे चालु आहेत, ही विकासकामे होत असतांना नागरीकांच्या सुरक्षेकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. या ठिकाणी पायी चालणाऱ्या नागरीकांचा फुटपाथ सुद्धा उखडून टाकण्यात आला असल्याने नागरिकांना चालणे देखील अवघड झाले आहे. हे काम गेल्या दिड महिन्याहून अधिक काळ या ठिकाणी चालु आहे. एकदा टाकलेले पाईप परत काढून पुन्हा टाकले आहेत. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून आता तरी प्रशासनाने योग्य ती उपाय योजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

 दिव्यातील ११ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात

दिव्यातील ११ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात अनधिकृत शाळेकडून दहावीचा फॉर्मच न भरल्याचा धक्कादायक प्रकार उघड दिवा- दिवा पूर्वेतील मॉडर्न वर्ल्ड इंग्लीश स्कूल, दिवा या अनधिकृत शाळेच्या गंभीर निष्काळजीपणामुळे दहावीतील अकरा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर झाल्यावर संबंधित विद्यार्थ्यांचा दहावी बोर्ड परीक्षेचा फॉर्मच भरला गेला नसल्याचे समोर आल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सदर शाळेत साहील शाह, शिवम बिंद, सपना हलवाई, आयुष पटवा, अनुक्षा सिंग, साहिल वलावटे, रिया कनोजिया, कृष्णा सोनावणे, सोनी कोरी, सपना राम आणि सगुन जैस्वाल हे अकरा विद्यार्थी दहावीत शिक्षण घेत आहेत. वर्षभर अभ्यास करूनही शाळेच्या हलगर्जीपणामुळे त्यांना परीक्षेला बसता आले नाही. शाळेने फॉर्म न भरल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. संतप्त पालकांनी दिवा पोलीस चौकीत धाव घेतली. मात्र, तेथे तक्रार नोंदवून घेण्याऐवजी त्यांना मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जाण्याचे सांगण्यात आल्याचे पालकांनी नमूद केले. दिव्यात गेल्या काही वर्षांत अनधिकृत शाळांची संख्या वाढताना दिसत असून त्यांच्यावर शासकीय नियंत्रण नसल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे. माध्यमिक विभागाच्या देवीदास महाजन या शिक्षणाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळेच अशा दिव्यातील अनधिकृत शाळांना आळा बसत नसल्याची टीका पालकांकडून होत आहे. गेली तीन ते चार वर्षे दिव्यातील अनधिकृत शाळांचा प्रश्न चर्चेत असला तरी त्यावर ठोस कारवाई झालेली नाही, असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित शाळेकडून विद्यार्थ्यांना जूनमधील परीक्षेला बसवण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. मात्र, नियमानुसार मार्चमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाच जूनमध्ये पुनर्परीक्षेला बसण्याची संधी मिळते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे एक संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत शाळेच्या ट्रस्टी व प्रशासनावर कठोर कारवाई करावी तसेच दिव्यातील अनधिकृत शाळा कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात, अशी मागणी संतप्त पालकांकडून करण्यात येत आहे.

 २३ फेब्रुवारीला भव्य सामूहिक गीतगायन

श्री गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त २३ फेब्रुवारीला भव्य सामूहिक गीतगायन ५१ लाख विद्यार्थी व १.५ लाख शिक्षकांचा सहभाग कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आवाहन…

 मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा

मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा शिळफाटामार्गे तळोजा मेट्रो, काटई, देसाई नाका, कल्याणफाटा, दहिसर मोरी मेट्रो मार्ग डोंबिवली (आरती परब) – कल्याण लोकसभा मतदार संघाला मुंबई आणि नवी मुंबई या शहरांशी जोडण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदेे यांच्या प्रयत्नांना आता आणखी एक यश आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका ऐतिहासीक प्रकल्पाची घोषणा केली आहे. कल्याण – डोंबिवली शहराला थेट तळोजा मार्गे नवी मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो १२ या मार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यासाठी मेट्रो १२ अ हा प्रकल्प आता राबवला जाणार असून कल्याण शीळफाटा रस्त्याला समांतर मेट्रो मार्गाची उभारणी केली जाणार आहे. कल्याण फाटावरून ही मेट्रो दहिसर मोरी मार्गे तळोजा मेट्रो स्थानकापर्यंत जाईल. यामुळे कल्याण शिळफाटा रस्त्यावरील वाहनांचा भारही कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी ८ हजार ४१४.५३ कोटींच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासह कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी घेतला. कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांमध्ये गेल्या काही वर्षात कमालीची सुधारणा झाली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघात नियोजनपूर्ण प्रकल्पांची आखणी करण्यात आली. त्यामुळे मतदारसंघातील वाहतुकीचा वेग वाढला आहे. मेट्रो, रेल्वे, रस्ते, उड्डाणपूल, उन्नत मार्ग, रेल्वे पूल, रस्त्याचे रूंदीकरण अशी अनेक ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण झाले आणि अनेक सुरूही आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक प्रकल्पांना गती मिळाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नुकताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २०२६- २७ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांसाठी ४ हजार ८९७.१९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला. यावेळी त्यांनी पलावा उड्डाणपूल, मेट्रो १२, तिसरा पत्री पूल, वालधुनी नदी लगत विठ्ठलवाडी स्थानक ते कल्याण अहिल्यानगर महामार्गा पर्यंतचा उन्नत मार्ग आणि कल्याण रिंग रोड या प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाला गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी कल्याण ते तळोजा मेट्रो १२ मार्गाच्या विस्तारीकरणाची घोषणा केली. कल्याण ते तळोजा या मेट्रो १२ मार्गाच्या विस्तारीकरणाचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या त्यामुळे मेट्रो १२ हा मार्ग दोन भागातून जाणार आहे. नव्या विस्तारीत मार्गामध्ये कल्याण शीळफाटा रस्त्याच्या समांतर मार्गिका नेण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विस्तारीत डोंबिवलीसह, मानपाडा, कटाई नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसार मोरी, दहिसारगाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव या भागातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. या नव्या मार्गामुळे शिळफाटा रस्त्यावरील वाहनांची संख्याही कमी होईल. कळवा, दिवा, मुंब्रा भागात जाणारी ही पहिली मेट्रो ठरणार असून भविष्यात मेट्रो १४ सोबत इंटीग्रेशन झाल्याने त्याचा फायदा थेट नवी मुंबई, कांजुरमार्ग ते मुंबईला जाण्यासाठी होईल. त्यामुळे या मेट्रोचे महत्व वाढलेले आहे, असेही खासदार डॉ. शिंदे म्हणाले. कशी असेल ही मेट्रो १२ अ मार्गिका ही विस्तारित मेट्रो लाईन कल्याण– मानपाडा– कटाई नाका– कल्याण फाटा मार्गे विद्यमान मेट्रो लाईन– १2 शी खुतारी गावाजवळ एकत्रित होऊन तळोजा रेल्वे स्थानक अर्थात अमनदूत पर्यंत पोहोचेल. कटाई नाका ते कल्याण फाटा दरम्यान मेट्रो १४ (कांजुरमार्ग ते बदलापूर) बरोबर कॉमन ट्रॅक व स्टेशन शेअरिंग प्रस्तावित आहे. निलजे डेपो कनेक्शन, मेट्रो १४ इंटिग्रेशन आणि नॅशनल हायस्पीड रेल्वेच्या ठाणे– बुलेट ट्रेन स्थानकाशी या मेट्रो मार्गाने जोडणी केली जाणार आहे. या सुधारित मार्गिकेची एकूण लांबी १८.४ किलोमीटर आहे. त्यातील सध्या सुमारे १०.५ किलोमीटरवर बांधकाम प्रगतीपथावर आहे. मेट्रो १२ अ ची स्थानके या मार्गात एकूण १२ उन्नत (एलिव्हेटेड) स्थानके प्रस्तावित आहे. प्रमुख स्थानके: मानपाडा, काटई नाका, कल्याण ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसर मोरी, दहिसारगाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव. संरचनात्मक संकल्पना या प्रकल्पासाठी प्रिकास्ट ट्वीन यू टाईप गर्डर प्रणाली जी सिंगल पिअरवर आधारित असेल ती वापरली जाणार आहे. मेट्रो आणि प्रस्तावित कल्याण– राजनोली फ्लायओव्हर साठी एकत्रित खांब (Integrated single…

 दिवा स्थानकात कामगाराचा मृत्यू

दिवा स्थानकात कामगाराचा मृत्यू अभियंता, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल दिवा –दिवा रेल्वे स्थानकात तिकिट खिडकी नजीक अर्थिंगसाठी खड्डा खोदताना विजेचा धक्का लागून राजस्थान येथील खंगाराम हरजीजी रावल (वय ३७) या कामगाराचा…