Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

सुनेत्रा पवार १५ दिवसात राष्ट्रीय अध्यक्ष होणार !

सुनेत्रा पवार १५ दिवसात राष्ट्रीय अध्यक्ष होणार ! मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी  पक्षाचे रिक्त असलेले राष्ट्रीय अध्यक्षपदी येत्या १५ दिवसात सुनेत्रा पवार यांची वर्णी लागणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर  चौथ्या दिवशीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार  यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांची महाराष्ट्र विधीमंडळाच्या नेतेपदी निवड…

मुख्यमंत्री दिल्लीत…

मुख्यमंत्री दिल्लीत… महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली भेटीत भाजपाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन नबिन यांची भेट घेतली. राज्यातील मंत्रिमंडळ बदलाच्या बातम्यांच्या पार्श्वभुमीवर ही भेट महत्वपुर्ण मानली जात आहे.

महाशिवरात्री निमित्त ठाण्यात वाहतुक बदल

महाशिवरात्री निमित्त ठाण्यात वाहतुक बदल ठाणे :  येत्या १५ फेब्रुवारी रविवारी साजऱ्या होणाऱ्या महाशिवरात्री निमित्त वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. ठाण्यातील बाजारपेठेत कौपिनेश्वर मंदिर आहे. या मंदिरात महाशिवरात्रिच्या दिवशी ठाण्यासह विविध शहरातून भाविक मोठ्याप्रमाणात दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे ठाणे पोलिसांनी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी बदल लागू केले आहेत. बाजारपेठेत वाहतुक करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी लागू केली असून पर्यायी मार्गाने येथील वाहतुक वळविण्यात आली आहे. बाजारपेठेत वाहनांना प्रवेशबंदी असेल.हे वाहतुक बदल रविवारी पहटे ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत लागू असतील.

तब्बल वीस वर्षांनी बांगलादेशमध्ये बीएनपी सत्तेत

तब्बल वीस वर्षांनी बांगलादेशमध्ये बीएनपी सत्तेत  ढाका : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला आहे. बीएनपीने २९९ पैकी २०९ जागा जिंकल्या आहेत, ज्यामुळे बहुमताचा १५० गुणांचा आकडा ओलांडला आहे. आतापर्यंत २८६ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील ११ पक्षांच्या आघाडीने ७० जागा जिंकल्या. जवळजवळ २० वर्षांनंतर देशात बीएनपीने सरकार स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेख हसीनाची अवामी लीग २००८ ते २०२४ पर्यंत सत्तेत होती. या विजयासह, माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आणि बीएनपी अध्यक्ष तारिक रहमान यांचे पंतप्रधानपद जवळजवळ निश्चित मानले जात आहे. तारिक यांनी दोन जागा लढवल्या आणि दोन्ही जिंकल्या. ते गेल्या डिसेंबरमध्ये १७ वर्षांनी देशात परतले होते.       बांगलादेशच्या निवडणुकीत कट्टरपंथी पक्ष जमात-ए-इस्लामीचा दारुण पराभव झाला. त्यांच्या युतीला फक्त ७० जागा मिळाल्या. बांगलादेशी लोकांनी शेख हसीनाचे सरकार पाडणारा विद्यार्थी पक्ष नॅशनल सिटीझन्स पार्टी (एनसीपी) लाही नाकारले.

मध्य, पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

मध्य, पश्चिम रेल्वेवर ब्लॉक मुंबई : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लाॅक घेण्यात येईल. हार्बर मार्गावरील कुर्ला – वाशीदरम्यान ब्लाॅक असल्याने प्रवाशांचा प्रवास रखडण्याची शक्यता आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान हा ब्लॉक असेल. तर, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर जलद मार्गावर ब्लाॅक असल्याने, सर्व लोकल धीम्या मार्गावर धावतील. त्यामुळे रविवारी प्रवाशांचा प्रवासाचा वेग मंदावण्याची चिन्हे आहेत. तसेच खारबाव येथे शनिवारी घेण्यात आलेला नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

प्रशासकीय आधुनिकतेचा नवा पत्ता सेवा तिर्थ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘सेवा तीर्थ’ या नव्या एकात्मिक संकुलाचे आणि ‘कर्तव्य भवन १ व २’ चे उद्घाटन करून हे संकुल देशाला समर्पित केले. प्रशासकीय आधुनिकतेचा नवा पत्ता सेवा…

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा होणार विस्तार

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा होणार विस्तार स्वाती घोसाळकर मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मुंबई दौऱ्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होणार आहे. महायुतीच्या भाजपा, एकनाथ शिंदे…

कोपरी येथील पुनर्विकासात ठाणेकरांची फसवणूक ?

कोपरी येथील पुनर्विकासात ठाणेकरांची फसवणूक ? आमदार केळकर घेणार संयुक्त बैठक सिद्धेश शिगवण ठाणे : झोपडपट्टी तसेच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या नावाखाली मूळ रहिवाशांची विकासकांकडून घोर फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर…

मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत ‘४७°C’ लघुचित्रपट प्रदर्शन व उपाययोजना संवाद कार्यक्रम संपन्न

मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत ‘४७°C’ लघुचित्रपट प्रदर्शन व उपाययोजना संवाद कार्यक्रम संपन्न मुंबई: मुंबई क्लायमेट वीकचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका, प्रोजेक्ट मुंबई आणि एसआयईएस इन्स्टिट्यूट, नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने…

  २७ जानेवारीच्या घटनांवरून राजकीय आरोपांना आनंद परांजपे यांचा तीव्र निषेध

२७ जानेवारीच्या घटनांवरून राजकीय आरोपांना आनंद परांजपे यांचा तीव्र निषेध ‘अजितदादांसोबत उभे राहिलेले खरे कुटुंब’ ठाणे दि. १३ फेब्रुवारी – कुटुंब म्हणजे फक्त रक्ताची नाती नाही तर २ जुलै २०२३…