Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या पवार पब्लिक शाळेतील ८० कर्मचारी वर्गावर गुन्हा दाखल

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६चे कामकाज पारदर्शक रितीने व सुरळीतपणे व विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी, शाळा, महाविद्यालय यांच्या…

मुंबईत मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी 

  मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होणार असून त्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग आणि उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांनी याबाबतचा अध्‍यादेश निर्गमित केला आहे. ही सार्वजनिक सुट्टी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहणार आहे. या निर्णयाच्‍या प्रभावी अंमलबजावणीसाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यांसाठी ‘दक्षता पथक’ स्‍थापन केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील. तसेच महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदार जर शहराबाहेर कार्यरत असतील, तरी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार असल्‍याचे सामान्‍य प्रशासन विभागाच्‍या अध्‍यादेशात नमूद आहे. याबरोबरच उद्योग आणि कामगार विभागानेदेखील सार्वजनिक सुट्टीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित केले आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खाजगी कंपन्यांतील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स , रिटेलर्स यांना सार्वजनिक सुट्टी लागू असेल. Reply Forward Add reaction

अंबरनाथमध्ये श्रीकांत शिंदेंचा मास्टरस्ट्रोक !

अंबरनाथ नगरपालिकेवर शिंदेसेनेचा भगवा फडकला अंबरनाथ : अवघ्या महाराष्ट्रात महानगर पालिकांची रणधुमाळी सुरु असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ नगरपालिकेत मास्टरस्ट्रोक लगावत भाजपावर कुरघोडी केली आणि नगरपालिकेवर भगवा…

राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना ‘सुप्रीम’ मुदतवाढ 

नवी दिल्ली : महापालिका  निवडणूकांचा राज्यातील यंत्रणेवरील ताण लक्षात घता सुप्रीम कोर्टाने  जिल्हा परिषद  आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यास आता दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. निवडणूक आयोगाने ही मुदतवाढ मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर, राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून  दिलासा मिळाला असून जिल्हा परिषद निवडणुकां या आता १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्यास मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालायने ३१ जानेवारीपर्यंत राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते.  राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांमध्ये आरक्षण आहे. तर इतर २० जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे त्याविषयी काय निर्णय होणार, यावर प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालायने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका पुढे ढकलण्यास परवानगी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे, आता १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

तळीरामांनो’ लक्ष द्या ! १३ ते १६ जानेवारी  ‘ड्राय डे’ !!

मुंबई : राज्यात २९ महापालिका क्षेत्राती तळीरामांसाठी वाईट बातमी आहे. गुलाबी थंडीत गसा गरम करण्याचे त्यांचे मनसुब निवडणूक आयोगाने उधळले आहेत. महापालिका निवडणुकांसाठीचा प्रचार १३ जानेवारीला संपणार आहे. त्यानंतर राजकीय पक्षांकडून कुठलीही आमिष दिले जाऊ नये या हेतुने राज्यात १३ ते १६ जानेवारी या चार दिवसांच्या कालावधीत जिथे महापालिका निवडणुका आहेत, तिथे ड्राय डे लागू करण्यात आला आहे. प्रचाराच्या तोफा थंडावताच मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपासून राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात ड्राय डे असणार आहे. जिथे जिथे निवडणुका आहेत, तिथे दारूची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्यात २९ महानगरपालिकांची निवडणूक होत आहे. यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर महानगरांमध्ये महानगरपालिका निवडणुका होत आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस या महानगरपालिकांच्या हद्दीत ड्राय डे लागू असेल. निवडणूक काळात शांतता, सुरक्षितता आणि शिस्त राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मद्यपानाला बंदी घातल्याने मतदानावेळी मतदारांना सुरक्षित वातावरण मिळेल. निवडणूकसंबंधी गैरप्रकार, गोंधळ, दंगल टाळता येईल. तसेच मतदारांना आमिष म्हणून मद्य देण्याच्या घटनाही घडल्याचे दिसून आले होते. तसे प्रकार टाळण्यासाठी या चार दिवसांत ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. यासंदर्भात दुकानदारांना पूर्वकल्पना देण्यात आली आहे.

मुंबईत तिसरं एअरपोर्ट  उभारणार :  फडणवीस

रमेश औताडे नवी मुंबई :  भाजपा नेहमी विकासाचे बोलते असे ठासून सांगत लवकरच मुंबईतील तिसरे विमानतळ वाढवण बंदराजवळ उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नवी मुंबईतील  महापालिका निवडणुकांच्या प्रचारात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.  राज ठाकरेंनी शिवाजीपार्कवरील भाषणात मुंबईतील विमानतळाची  जागा हडपण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप केला होता. त्याचा समाचार आज…

महाराष्ट्रात आवाज ढोल ताशांचाच झाला पाहिजे !

  माझा कोणत्याही उद्योगपतीला विरोध नाही, पण सगळे उद्योग एकाच उद्योगपतीकडे का? त्या उद्योगपतीच्या आडून मराठी ठसा पुसण्याचं काम केलं जात असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. मुंबई विमानतळ अदानीने ताब्यात घेतल्यानंतर…

ठाणे शिवसेनेचे, गद्दारांचे नाही ! उद्धव,राज ठाकरेंचा ठाण्यात एल्गार

  सिध्देश शिगवण ठाणे : गेली 25 वर्षं ठाणेकरांनी ठाणे शिवसैनिकांकडे दिलं होतं, गद्दाराकडे दिलं नव्हतं, गद्दारी गाडण्याची ही शेवटची संधी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. ठाण्यात आयोजित संयुक्त सभेत उद्धव ठाकरे आणि…

 कल्याणच्या हर्षिणी चव्हाणला सुवर्णपदक

अस्मिता खेलो इंडिया युथ वेटलिफ्टिंग अजिंक्य स्पर्धा कल्याणच्या हर्षिणी चव्हाणला सुवर्णपदक कल्याण : अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या हर्षिणी प्रशांत चव्हाण हिने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक…

 ५१व्या कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर.

५१व्या कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर. परभणीच्या अतुल जाधवकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा. मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशीएशनने ५१व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता आपला संघ घोषित केला. परभणीच्या…