२३ फेब्रुवारीला भव्य सामूहिक गीतगायन
श्री गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त २३ फेब्रुवारीला भव्य सामूहिक गीतगायन ५१ लाख विद्यार्थी व १.५ लाख शिक्षकांचा सहभाग कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आवाहन…
trendlyne-news
श्री गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त २३ फेब्रुवारीला भव्य सामूहिक गीतगायन ५१ लाख विद्यार्थी व १.५ लाख शिक्षकांचा सहभाग कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आवाहन…
मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा शिळफाटामार्गे तळोजा मेट्रो, काटई, देसाई नाका, कल्याणफाटा, दहिसर मोरी मेट्रो मार्ग डोंबिवली (आरती परब) – कल्याण लोकसभा मतदार संघाला मुंबई आणि नवी मुंबई या शहरांशी जोडण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदेे यांच्या प्रयत्नांना आता आणखी एक यश आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका ऐतिहासीक प्रकल्पाची घोषणा केली आहे. कल्याण – डोंबिवली शहराला थेट तळोजा मार्गे नवी मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो १२ या मार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यासाठी मेट्रो १२ अ हा प्रकल्प आता राबवला जाणार असून कल्याण शीळफाटा रस्त्याला समांतर मेट्रो मार्गाची उभारणी केली जाणार आहे. कल्याण फाटावरून ही मेट्रो दहिसर मोरी मार्गे तळोजा मेट्रो स्थानकापर्यंत जाईल. यामुळे कल्याण शिळफाटा रस्त्यावरील वाहनांचा भारही कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी ८ हजार ४१४.५३ कोटींच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासह कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी घेतला. कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांमध्ये गेल्या काही वर्षात कमालीची सुधारणा झाली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघात नियोजनपूर्ण प्रकल्पांची आखणी करण्यात आली. त्यामुळे मतदारसंघातील वाहतुकीचा वेग वाढला आहे. मेट्रो, रेल्वे, रस्ते, उड्डाणपूल, उन्नत मार्ग, रेल्वे पूल, रस्त्याचे रूंदीकरण अशी अनेक ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण झाले आणि अनेक सुरूही आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक प्रकल्पांना गती मिळाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नुकताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २०२६- २७ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांसाठी ४ हजार ८९७.१९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला. यावेळी त्यांनी पलावा उड्डाणपूल, मेट्रो १२, तिसरा पत्री पूल, वालधुनी नदी लगत विठ्ठलवाडी स्थानक ते कल्याण अहिल्यानगर महामार्गा पर्यंतचा उन्नत मार्ग आणि कल्याण रिंग रोड या प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाला गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी कल्याण ते तळोजा मेट्रो १२ मार्गाच्या विस्तारीकरणाची घोषणा केली. कल्याण ते तळोजा या मेट्रो १२ मार्गाच्या विस्तारीकरणाचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या त्यामुळे मेट्रो १२ हा मार्ग दोन भागातून जाणार आहे. नव्या विस्तारीत मार्गामध्ये कल्याण शीळफाटा रस्त्याच्या समांतर मार्गिका नेण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विस्तारीत डोंबिवलीसह, मानपाडा, कटाई नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसार मोरी, दहिसारगाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव या भागातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. या नव्या मार्गामुळे शिळफाटा रस्त्यावरील वाहनांची संख्याही कमी होईल. कळवा, दिवा, मुंब्रा भागात जाणारी ही पहिली मेट्रो ठरणार असून भविष्यात मेट्रो १४ सोबत इंटीग्रेशन झाल्याने त्याचा फायदा थेट नवी मुंबई, कांजुरमार्ग ते मुंबईला जाण्यासाठी होईल. त्यामुळे या मेट्रोचे महत्व वाढलेले आहे, असेही खासदार डॉ. शिंदे म्हणाले. कशी असेल ही मेट्रो १२ अ मार्गिका ही विस्तारित मेट्रो लाईन कल्याण– मानपाडा– कटाई नाका– कल्याण फाटा मार्गे विद्यमान मेट्रो लाईन– १2 शी खुतारी गावाजवळ एकत्रित होऊन तळोजा रेल्वे स्थानक अर्थात अमनदूत पर्यंत पोहोचेल. कटाई नाका ते कल्याण फाटा दरम्यान मेट्रो १४ (कांजुरमार्ग ते बदलापूर) बरोबर कॉमन ट्रॅक व स्टेशन शेअरिंग प्रस्तावित आहे. निलजे डेपो कनेक्शन, मेट्रो १४ इंटिग्रेशन आणि नॅशनल हायस्पीड रेल्वेच्या ठाणे– बुलेट ट्रेन स्थानकाशी या मेट्रो मार्गाने जोडणी केली जाणार आहे. या सुधारित मार्गिकेची एकूण लांबी १८.४ किलोमीटर आहे. त्यातील सध्या सुमारे १०.५ किलोमीटरवर बांधकाम प्रगतीपथावर आहे. मेट्रो १२ अ ची स्थानके या मार्गात एकूण १२ उन्नत (एलिव्हेटेड) स्थानके प्रस्तावित आहे. प्रमुख स्थानके: मानपाडा, काटई नाका, कल्याण ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसर मोरी, दहिसारगाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव. संरचनात्मक संकल्पना या प्रकल्पासाठी प्रिकास्ट ट्वीन यू टाईप गर्डर प्रणाली जी सिंगल पिअरवर आधारित असेल ती वापरली जाणार आहे. मेट्रो आणि प्रस्तावित कल्याण– राजनोली फ्लायओव्हर साठी एकत्रित खांब (Integrated single…
दिवा स्थानकात कामगाराचा मृत्यू अभियंता, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल दिवा –दिवा रेल्वे स्थानकात तिकिट खिडकी नजीक अर्थिंगसाठी खड्डा खोदताना विजेचा धक्का लागून राजस्थान येथील खंगाराम हरजीजी रावल (वय ३७) या कामगाराचा…
‘आयसीएआय’च्या कल्याण-डोंबिवली शाखेच्या अध्यक्षपदी अमित मोहरे यांची निवड कल्याण : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या कल्याण-डोंबिवली शाखेच्या वर्ष २०२६-२७ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. शाखेच्या अध्यक्षपदी डोंबिवलीकर आणि सीए अमित मोहरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष अमित मोहरे, उपाध्यक्ष प्रदीप मेहता, सचिव अमृता जोशी, कोषाध्यक्ष ईश्वर रोहरा, विकासा अध्यक्ष रोहन पाठक, माजी अध्यक्ष राकेश अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य गिरीश तारवानी, अनुराग गुप्ता आणि विपुल शाह यांचा समावेश आहे. कल्याण-डोंबिवली शाखेचे कार्यक्षेत्र अतिशय मोठे असून यामध्ये कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर, तसेच कर्जत आणि कसारा या भागांचा समावेश होतो. सध्या या शाखेशी ४ हजार ८०० हून अधिक सीए सभासद आणि १३ हजार हून अधिक विद्यार्थी जोडले गेले आहेत. सध्या ही शाखा ५ अभ्यासिका आणि २ आयटी प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून भाड्याच्या जागेतून कार्यरत आहे. मात्र, सभासद आणि विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने लवकरच संस्थेची स्वतःची सुसज्ज इमारत उभी राहणार आहे, अशी माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष सीए अमित मोहरे यांनी दिली. व्यावसायिक पारदर्शकता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक बांधिलकी जपत ही शाखा येणाऱ्या काळात उल्लेखनीय कार्य करेल, असा विश्वास नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा पहिला टप्पा राज्यात सुरू जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती अशोक गायकवाड अलिबाग : राज्यातील सामान्य जनता, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आणि तक्रारी सत्वर निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा १)’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे, या उद्देशाने प्रत्येक जिल्हयातील तालुक्यातील मंडळ स्तरावर या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत १८ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत पूर्व तयारी करण्यात येणार असून, प्रत्यक्ष शिबिरांची सुरुवात ७ मार्चपासून होणार आहे. या विशेष मोहिमेद्वारे नागरिकांना एकाच दिवशी सेवा पुरविण्यावर आणि महसूल संहितेतील नवीन तरतुदींची जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे. या अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी समस्त रायगडकरांना या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अभियानाच्या वेळापत्रकानुसार, मार्च महिन्यात ७ आणि १४ तारखेला मंडळ स्तरावर शिबिरे होतील. त्यानंतर एप्रिल महिन्यात १० आणि १७ तारखेला पुन्हा मंडळ स्तरावर आयोजन करण्यात येईल, तर मे महिन्यात ८ आणि १५ तारखेला नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर ही शिबिरे घेतली जातील. या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष हेल्प डेस्क उपलब्ध करून देणे आणि उत्पन्न, अधिवास व जातीच्या दाखल्यांचे वाटप करणे अशा महत्त्वाच्या सेवा पुरविल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, अकृषिक (NA) रूपांतरणासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज नसून, विकास आराखडा मंजुरी हीच परवानगी समजली जाईल, यासारख्या नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नांसंबंधी बदलांची माहितीही या शिबिरात दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त, जमिनीच्या तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा, एक वेळचे अधिमूल्य भरण्याची सोपी व्यवस्था आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ उताऱ्यांची कायदेशीर वैधता यांबाबत नागरिकांचे प्रबोधन केले जाईल. भूसंपादन झालेल्या जमिनींचे कमी-जास्त पत्रक तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्याची कार्यवाही देखील याच कालावधीत पूर्ण केली जाणार आहे. ‘एक खिडकी योजना’ राबवून सर्व महसूल अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहतील आणि लोकांचे प्रश्न तातडीने सोडवतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
कचोरे कोळीवाडा येथील गणेश घाट सुशोभिकरणाचा शुभारंभ नगरसेविका रेखा चौधरी यांच्या प्रयत्नांना यश कल्याण : कल्याण ठाकुर्ली समांतर रस्त्यावर असलेल्या कचोरे कोळीवाडा येथील खाडी किनारी गणेश घाट सुशोभिकरणाचा शुभारंभ कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्याहस्ते आज करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा तथा स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व प्रयत्नांमुळे या विकासकामाला सुरुवात होत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राला मोठा खाडी किनारा लाभला असून काही ठिकाणी गणेश घाट तयार करून सुशोभिकरण करण्यात आले आहे. अशाच प्रकारे कचोरे कोळीवाडा येथे असलेल्या खाडी किनाऱ्याचे देखील सुशोभिकरण व्हावे यासाठी नगरसेविका रेखा चौधरी पाठपुरावा करत होत्या. या ठिकाणी सागर देवीचे मंदिर असून गणपती विसर्जन देखील केले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आणि नागरिक येत असतात. त्यामुळे या परिसराचे सुशोभिकरण करून कायापालट करण्याची मागणी नागरिकांकडून देखील करण्यात येत होती. त्यानुसार रेखा चौधरी यांनी प्रशासनाकडे, खासदार, आमदार यांच्याकडे पाठपुरावा करून या कामासाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांनी या कामासाठी तब्बल 5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून या खाडी किनाऱ्याचे सुशोभिकरण करून रुपडे पालटणार आहे. आज या सुशोभिकरण कामाचा शुभारंभ आमदार राजेश मोरे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. या कामासाठी स्थानिक नागरिकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे आणि स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांचे आभार मानले आहेत. यावेळी आमदार राजेश मोरे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा तथा स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, बजरंग दल कल्याण जिल्हा संयोजक राजन चौधरी, भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष अतिश चौधरी, शिवसेना सचिव संतोष चव्हाण, माजी परिवहन सभापती मनोज चौधरी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कचोरे येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कचोरे परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका जे प्रभाग कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली. हे बांधकाम ठेकेदार यांच्यामार्फत करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पथकाने स्थळावर जाऊन कारवाई केली. आणखी काही ठिकाणी सुद्धा कारवाई करण्यात येईल. कारवाईदरम्यान संबंधितांना पुढील काळात कोणतेही अनधिकृत बांधकाम केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (MRTP Act) अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली. महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या व मंजूर नकाशा घेणे बंधनकारक आहे. अन्यथा नियमबाह्य बांधकामांवर प्रशासन कठोर कारवाई करेल.
स्मार्ट सिटी कामांमुळे नाशिक पुन्हा कोंडीत हरिभाऊ लाखे नाशिक: शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या रस्ते व भुयारी गटारांच्या कामांमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरात सध्या विविध भागांत रस्ते रुंदीकरण, काँक्रिटीकरण तसेच भुयारी मार्ग आणि गटारांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. द्वारका, त्र्यंबक रोड, शालिमार, पंचवटी, नाशिकरोड आदी प्रमुख भागांमध्ये एकाच वेळी कामे सुरू असल्यामुळे त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे. विशेषतः द्वारका सर्कल येथे भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्यामुळे वाहतुकीचा ताण वाढला आहे. सारडा सर्कल ते काठे गल्ली दरम्यान भुयारी मार्गाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले असले, तरी सध्या दोन ते तीन ठिकाणी एकाच वेळी काम सुरू असल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी काठे गल्लीमार्गे मुंबई नाक्याकडे वाहतुकीसाठी डायव्हर्जन देण्यात आले आहे. या मार्गावर विशेषतः मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येते. ठिकठिकाणी पर्यायी मार्ग (डायव्हर्जन) देण्यात आले असले, तरी वाहनांची वाढती संख्या आणि अरुंद रस्ते यामुळे कोंडी टळत नाही. वाहतूक शाखेतर्फे अतिरिक्त कर्मचारी तैनात करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र वाहनांचा प्रचंड ताण लक्षात घेता कर्मचाऱ्यांची चांगलीच कसरत होत आहे. कामे लवकर पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत असून, तोपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मिरा भाईंदर महापालिकेत महासभेचे चित्रीकरण करण्यास पत्रकारांना बंदी अरविंद जोशी मिरा -भाईंदर : जनतेच्या प्रश्नावर चर्चा सुरु असताना जनतेचा आवाज असणाऱ्या पत्रकारांनाच त्याचे चित्रिकरण करण्यास मनाई करण्याचा अजब निर्णय मिरा भाईँदर महापालिकेने घेतल्याने गोंधळ उडाला.…
झिरवाळांच्या लाचखोर लिपिकाला जामीन मंजूर मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लिपिक राजू (राजेंद्र) ढेरिंगे याला मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच त्याच्या जामिनावर सुनावणी घेण्यात आली आणि त्याला दिलासा मिळाला. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एसीबी कोर्टाने ढेरिंगे याचा जामीन अर्ज मंजूर केला. दरम्यान, एसीबीने त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर लगेचच जामीन अर्जावर सुनावणी झाली. लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी संबंधित लिपिकाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. केवळ चौकशीच नव्हे तर त्याची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागातील दक्षता पथकाला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून, वस्तुनिष्ठ व सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, एसीबीने ढेरिंगे याच्या नाशिक रोड येथील घराची काही दिवसांपूर्वी झडती घेतली होती. या झडतीत काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती आहे. ढेरिंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी असून, वर्षभरापूर्वी तो अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर आला होता. तो मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत होता.