Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

 नगरसेविका नीला सोन्स यांच्याकडून महासभेत प्रश्नांची सरबत्ती

नगरसेविका नीला सोन्स यांच्याकडून महासभेत प्रश्नांची सरबत्ती भाजपला घरचा आहेर मिरा – भाईंदर महानगरपालिकेच्या काल झालेल्या महासभेत अनेक ठराव पास करण्यात आले. मिरा-भाईंदरमधील भाडेतत्त्वावर दिलेल्या खासगी मालमत्तांवर कर आकारणीसंदर्भातील प्रस्ताव भाजपच्या मागणीनुसार महासभेपुढे चर्चेला आला होता. यावेळी नक्की कोणत्या मालमत्तांकडून कर वसूल केला जाणार? त्यावर नियंत्रण कसे ठेवले जाणार? नागरिकांना दिलासा न देता पहिल्याच महासभेत कराचा बोजा टाकणे योग्य आहे का? असे प्रश्न नगरसेविका नीला सोन्स यांनी उपस्थित केले. नवीन घर घेणारे तसेच नवे गाळे घेणारे व्यापारी हे या शहराचे रहिवासी आहेत त्यांच्यावर हा बोजा टाकणे ठीक होणार नाही असे मत त्यांनी मांडले, तसेच या प्रस्तावाच्या बाजूने मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका त्यांनी मांडली. १ एप्रिल २०२६ पासून नवे घर, दुकाने घेण्याऱ्यांवर कराचा बोजा वाढणार आहे. नागरिकांना काही दिलासा मिळणार नाही हे स्पष्ट झाले. बहुमताच्या जोरावर भाजपा नगरसेवकांनी सगळे ठराव पास करून घेतले, नागरिकांसाठी पुढे काही होणार का?  हे येणाऱ्या काळात बघावं लागेल.

 वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार

वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार रहिवाशांच्या मोर्चाची घेतली दखल प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर होणार कारवाई – शैलेंद्र कांबळे अनिल ठाणेकर मुंबई, वरळी नाका परिसरातील प्रेम नगर व सिद्धार्थ नगर येथील इंदिरा झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्प सुमारे २५ वर्षांपासून रखडला आहे. याविरोधात मार्क्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन शक्ती संघटनेच्या वतीने  रहिवाशांनी आज एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्च्याच्या शिष्टमंडळाला प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले, अशी माहिती शैलेंद्र कांबळे यांनी दिली. यावळी मनोज यादव, तृप्ती निकाळजे, प्रविण मांजळकर, अशोक पवार,बहुजन शक्तीचे सुधाकर रणखांबे, संतोषी शिरोडकर, कलप्पा न्हावी,नवाज शेख, विशाल कांबळे, संजय मकासरे आदी उपस्थित होते. मोर्चानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाकडे निवेदन सादर करत बैठकीत विकासकाच्या निष्क्रियतेबाबत तक्रार नोंदवली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष अधिकारी मजगे यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल तसेच प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.दरम्यान, ५७ रहिवाशांना विकासकाने भाडे न दिल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. याबाबत सहाय्यक निबंधक चंद्रकांत पवार यांनी सांगितले की, यापूर्वी विकासकाला नोटीस बजावण्यात आली होती. विकासकाने भाडे देण्याचे कबूल करत धनादेश दिला; मात्र तो बाऊन्स झाल्याची माहिती देण्यात आली. तरीही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.प्रकल्पासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करून ती सार्वजनिक करावी, तसेच अपयशी विकासकाची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला.

दिव्यातील साई सृष्टी हेरिटेज सोसायटीत शिवजयंती उत्साहात साजरी

दिव्यातील साई सृष्टी हेरिटेज सोसायटीत शिवजयंती उत्साहात साजरी दिवा : दिव्यातील साई सृष्टी हेरिटेज नारायण म्हात्रे को-ऑप. हौसिंग सोसायटी, खर्डी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सन्मानीय नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेविका वेदिका साहिल पाटील, माजी नगरसेवक हिरा पाटील, जयंता वालीकर आणि शक्ती पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात सोसायटीतील लहान मुलांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच सोसायटीतील वरिष्ठ नागरिकांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. सोसायटी कमिटीच्या वतीने मोहन मांडवकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमा साठी कार्याध्यक्ष संदीप कोकणे, उपाध्यक्ष चिलवेरी, खजिनदार रितेश मिश्रा तसेच राहुल शर्मा, मोहन मांडवकर, जीत शुक्ला, संजीव नारायणकर, सुशील राजपूत, दुर्गेश आणि सतीश गंगातीवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गंगातीवरे यांनी केले. यावेळी सोसायटीचे सेक्रेटरी गौतम कदम यांनी उपस्थित सर्व रहिवाशांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मध्य रेल्वेची प्रवासी वाहतूक १३७३ दशलक्षांच्या पार

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मध्य रेल्वेची प्रवासी वाहतूक १३७३ दशलक्षांच्या पार मुंबई : मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ (जानेवारी २०२६ पर्यंत) प्रवासी वाहतुकीत उल्लेखनीय वाढ नोंदवली असून उपनगरीय आणि गैर-उपनगरीय दोन्ही…

संकल्प ज्येष्ठ नागरिक संघात शिवजयंती साजरी.

संकल्प ज्येष्ठ नागरिक संघात शिवजयंती साजरी. संकल्प ज्येष्ठ नागरिक संघ गोरेगाव यांच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 19 तारखेला महाराष्ट्राचे आद्य आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवशी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला त्यामध्ये जुन्या विविध तिकिटांचे व नाण्यांचे शिवकालीन मुद्रांचे प्रदर्शन प्रमोद नवरे व परब राहणार गोरेगाव यांनी जोपासलेला छंदाचे प्रदर्शन आयोजित केले होते प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम मुंबई अध्यक्ष सुरेश पोटे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाट्न करण्यात आले. त्या प्रसंगी जुन ते सोन जुना इतिहास नवीन पिढी पुढे येणे गरजेचे आहे. सुरेश पोटे यांनी विचार मांडले, प्रदर्शनाला नगरसेवक सुहास वाडकर व नगरसेवक तुळशीराम शिंदे या नगरसेवकांनी व इतर मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देऊन शिवजयंती निमित्त केलेल्या कार्यक्रमाबाबत खूप कौतुक केले. हे सर्व आयोजन संकल्प ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिलीप धारकर,सचिव सोडा व संदीप परब यांनी चांगल्या रितीने आयोजन करून पार पाडले.

दक्षिण मुंबईत ७४ मजली ‘वन मरीना’ ची घोषणा

दक्षिण मुंबईत ७४ मजली ‘वन मरीना’ ची घोषणा रमेश औताडे मुंबई : वाय एम इन्फ्रा समूह आणि अश्विन शेठ समूह यांच्या संयुक्त विद्यमाने मरीन लाइन्स, दक्षिण मुंबई येथे ७४ मजली ‘ वन मरीना ’ या आलिशान निवासी टॉवरची घोषणा करण्यात आली. सुमारे १५ लाख चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेल्या या प्रकल्पाची अंदाजित किंमत २८०० कोटी रुपये आहे. या प्रकल्पात २, ३, ४ खोल्यांची घरे तसेच ड्युप्लेक्स आणि पेंटहाऊस घरे ७ कोटी ते ४५ कोटी रुपयांदरम्यान असतील. बहुतांश घरे अरबी समुद्राकडे तोंड करून असून ६९ व ७० व्या मजल्यावर विशेष सुविधा आहेत. वाहनतळासाठी ७२२ गाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. वाय एम इन्फ्रा समूहाचे अध्यक्ष सुहैल याकुब म्हणाले की, हा प्रकल्प दक्षिण मुंबईच्या विकासाला नवे रूप देईल. व्यवस्थापकीय संचालक अतिफ याकुब यांनी हा प्रकल्प दीर्घकालीन मूल्य निर्माण करणारा ठरेल, असे सांगितले. अश्विन शेठ समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अश्विन एन. शेठ यांनी दर्जेदार आणि नियोजनबद्ध अंमलबजावणीवर भर दिला जाईल, असे स्पष्ट केले. प्रकल्पाची वास्तुरचना ‘आर्क बाय रेजा काबुल आर्किटेक्ट्स’ यांनी केली असून महिमतुरा कन्सल्टंट्स (रचनात्मक सल्लागार), पीडीए असोसिएट्स (यांत्रिक व विद्युत सल्लागार), क्वांट लेझर्स (प्रकाशयोजना) आणि साइट कॉन्सेप्ट्स इंटरनॅशनल, फिलिपाईन्स (परिसर रचना) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  सुरेश प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ध्येयधुंद’ पुस्तकाचा सोहळा संपन्न

सुरेश प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ध्येयधुंद’ पुस्तकाचा सोहळा संपन्न सुरेश प्रभू यांच्या ‘ध्येयधुंद’ पुस्तकाची संस्कृत आवृत्ती लवकरच वर्धमान श्रुतगंगा ट्रस्टचे अध्यक्ष संजय शाह यांची घोषणा मुंबई :“माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीकडून…

मुलाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी आमदार प्रसाद लाड यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट…

मुलाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी आमदार प्रसाद लाड यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट… मुंबई: आमदार प्रसाद लाड यांचा मुलगा आणि उद्योजक शुभम लाड यांचा विवाह ७ मार्च रोजी जयपूर येथे संपन्न होणार आहे. यानिमित्ताने आमदार प्रसाद लाड आणि त्यांच्या पत्नी निता लाड यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना या विवाह सोहळ्याचे आमंत्रण दिले. राजकारणा पलीकडे जाऊन नाती जपली जातात, याचे उदाहरण यानिमित्ताने पाहायला मिळाले.

माथेरान युनियन बँकेच्या सेवेचा बोजवारा

माथेरान युनियन बँकेच्या सेवेचा बोजवारा मुकुंद रांजाणे माथेरान: माथेरान मध्ये एकमेव राष्ट्रीयकृत युनियन बँक असून नेहमीच या बॅंकेत सेवेचा बोजवारा पहावयास मिळत असून ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सेवा उपलब्ध होण्यास दिरंगाई आणि वेळ लागत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. माथेरान हे पर्यटनक्षेत्र असल्यामुळे मोठया प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते सहसा कुणीही रोख रक्कम स्वतःजवळ ठेवत नसल्याने ते याच युनियन बँकेच्या भरवशावर अवलंबून असतात परंतु या बँकेचे एटीएम सुध्दा नेहमीच तांत्रिक कारणास्तव अथवा नेटवर्किंग मुळे बंद असते.याच बँकेची छोटी शाखा एका कुटूंबाकडे देण्यात आली असून त्याठिकाणी सुध्दा अनेकदा सर्व्हर डाऊन असते त्यामुळे काही व्यवहाराची कामे पूर्ण होत नाहीत. येणाऱ्या पर्यटकांना एटीएममधून पैसे उपलब्ध होत नसल्याने त्यांना बाजारात काही वस्तूंची खरेदी करता येत नाही ग्राहकांसह पर्यटक सुध्दा या बँकेच्या अकार्यक्षम सुविधेबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.माथेरान मध्ये अन्य एखादी राष्ट्रीयकृत बँक उपलब्ध व्हावी जेणेकरून ग्राहकांना याचा नाहक त्रास सोसावा लागणार नाही अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर- राजेंद्र सावंत

सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर- राजेंद्र सावंत अशोक गायकवाड अलिबाग: विधी सेवा समितीच्या माध्यमातून जिल्हा व तालुका स्तरावर विधी सेवा समितीकडून वेळोवेळी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येत असतात. विधी सेवा समितीकडून अनेक बाबतीत मोफत कायदेविषयक सेवा पुरविली जाते. विधी सेवा समितीच्या या कार्याची माहिती सर्वांना व्हावी तसेच सर्वांसाठी न्याय ही संकल्पना सर्वत्र पोहोचावी आणि समाजातील सर्व घटकांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा समितीचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी शनिवार आरसीएफ हॉल कुरूळ येथील सभागृहात संपन्न झालेल्या विधी सेवा महशिबिर, शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्यात केले. या शिबिरास जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक आँचल दलाल, जिल्हा विधी सेवा समितीच्या सचिव तेजस्विनी निराळे, जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार, अलिबाग बार असोसएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील, जिल्ह्यातील न्यायालयांतील न्यायाधिश, शासनाच्या विविध खात्याचे अधिकारी, जिल्हा व जिल्ह्यातील तालुका विधी सेवा समिती मधील वकील वर्ग, अनेक मान्यवर, शासकीय कर्मचारी तसेच बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत म्हणाले की, या महामेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि त्यांना योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हे आहे. जिल्हा विधी प्राधिकरणामार्फत अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू जनतेला व्हावी तसेच तळागाळातील विविध समाजातील घटकांपर्यंत पोहचावी आणि कोणताही नागरिक न्यायापासून वंचित राहू नये याकरिता हा महामेळावा आयोजित करण्यात आहे. संविधानाने सर्वांना समान न्यायाची संधी दिली आहे. त्यामुळे हा उपक्रम महत्वाचा असून सर्व घटकातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी सावंत यांनी जिल्हा व तालुका स्तरावर विधी सेवा समितीकडून राबविले जाणारे विविध उपक्रम व सेवांची माहिती उपस्थितांना दिली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, रायगड मधील माझ्या कारकिर्दीतील हा दुसरा महामेळावा असून अशा महामेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत कायदेविषयक ज्ञान पोहचविणे, दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे हा मुख्य उद्देश असल्यामुळे महामेळावा अतिशय महत्वाचा आहे. उच्चशिक्षित व्यक्तींनाही कायद्याचे ज्ञान नसते. त्यामुळे राष्ट्रीय विधी सेवा समितीने भविष्यात शाळेय स्तरावर कायद्याची तोंड ओळख देणारे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावेत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या महामेळाव्यात शासनाच्या विविध विभागांचे 32 स्टॉल लावण्यात आले असून प्रत्येक विभागांनी आपल्या असलेल्या योजनांची तातडीने, तळमळीने अंमलबजावणी करुन योजनेचा लाभ तळागाळातील दुर्बल घटकांपर्यंत पोहचवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. हुडबळी नसलेला जिल्हा म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख आहे. तसेच रायगड जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. या जिल्ह्यातील प्रत्येक माणूस हा सतत कामकाजामध्ये मग्न असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्महत्या प्रमाण शून्य असलेला हा जिल्हा आहे. जिल्ह्यात नवनवीन प्रकल्प येत असून तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीमुळे भविष्यात रायगड जिल्हा विकासाचा केंद्र बिंदू म्हणून ठरणार आहे.याचवेळी त्यांनी महसूल खात्याकडून राबविल्या जाणाऱ्या विविध महत्त्वकांक्षी योजनांची सखोल माहिती दिली. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी आपल्या मनोगतात सामान्य प्रशासनाच्या विविध प्रकारच्या कर वसुलीमध्ये लोक अदालतीचा होणारा उपयोग सांगितला. तसेच त्यांच्या प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि ग्रामीण भागातील बचत गटांचे कार्य तसेच इतर बाबतीत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी आपल्या मनोगतात पोलीस विभागांकडून राबविण्यात येणारे कायदे व त्याची अंमलबजावणी याबाबत उपस्थितांना माहिती दिली. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांनी येथील महामेळाव्यात योजनांची मिळणारी माहिती कार्यक्रमास उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहचवावी, असे सांगितले. अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या दारी शासनाच्या योजना पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच सहकारी वकील संतोष पवार यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला, विविध कायदेशीर हक्क, सरकारी योजना तसेच न्यायालयीन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. या महामेळाव्यात शासनाच्या विविध खात्यांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणारे ३२ स्टॉल लावण्यात आले होते. याच कार्यक्रमात शासनाच्या विविध खात्यांमधील लाभार्थ्यांना धनादेश तसेच वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा समितीच्या सचिव तेजस्विनी निराळे यांनी सांगितले की, शासनाकडून राबविण्याल्या जाणाऱ्या नाविन्य पूर्ण योजनांची माहिती तळागाळातील घटकांपर्यंत पोहचावी याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याकरिता आलेल्या सर्वांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी शासकीय योजना व कायदे विषयक असलेल्या सोयी-सुविधांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी विविध शासकीय विभागांनी लावलेल्या स्टॉलची पाहणी करुन योजनांची माहिती जाणून घेतली.