Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

दिवेकर शिवसेना–महायुतीच्या नेहमीच भक्कमपणे पाठीशी – डॉ. श्रीकांत शिंदे

दिवा–सीएसटी लोकल सुरू करण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे दिवेकरांना आश्वासन दिवा, दि. १२ जानेवारी : “दिवेकर नागरिक शिवसेना–महायुतीच्या नेहमीच पाठीशी ठामपणे उभे आहेत. गेल्या दहा वर्षांत आम्ही जे वचन दिले, ते पूर्ण…

ठाण्यात “जय श्रीराम” वाला महापौर बसवा नाहीतर, हिरवे गुलाल उधळतील – नितेश राणे

ठाणे: एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने मतदानाचे फतवे काढायचे, ह्या व्होट जिहादचा पर्दाफाश आम्ही केला आहे. तेव्हा, राष्ट्रभक्त हिंदु समाजाने १५ तारखेला जागरूक राहुन मतदान करावे, आणि ठाण्यात “जय श्रीराम” वाला महापौर बसवावा, नाही तर हे हिरवे गुलाल उधळतील. असा सावधानतेचा इशारा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ चे भाजप – शिवसेना – रिपाई महायुतीचे उमेदवार सीताराम राणे, परिषा सरनाईक आणि जयश्री डेव्हीड यांच्या प्रचारार्थ मंगळवारी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत मंत्री नितेश राणे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवाईनगर येथील श्री संकटमोचक हनुमान मंदिर येथून ओपन जीपमध्ये सवार होऊन प्रारंभ झालेल्या ह्या रॅलीमध्ये महायुतीच्या तिन्ही उमेदवारांसह आमदार संजय केळकर, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत देवाभाऊ गीताने गुंजलेली ही रॅली तब्बल दोन तास चालली. रॅली दरम्यान माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी, व्होट जिहाद वर प्रखर भाष्य केले. आम्ही मुंबई – ठाणे या शहरांच्या विकासावर निवडणुका लढवतोय तर, दुसऱ्या बाजुला अजान बंद करणाऱ्याच्या विरोधात, मशिदी विरोधात बोलणाऱ्याच्या विरोधात मतदान द्या. असे धर्माच्या नावाने मतदान मागितलं जात आहे. याप्रकारे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करण्याची मागणी करणे, हा एक प्रकारे व्होट जिहाद असुन हेच मी जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केल्याचे ना. राणे यांनी सांगितले. एका बाजुला हिंदु समाजाला डिवचायचे आणि दुसऱ्या बाजुला मशिद आणि अजानच्या नावाने मते मागायची, एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या दुसरीकडे धर्माच्या नावाने मतदानाचे फतवे काढायचे,असे यांचे कारनामे सुरू आहेत. तेव्हा, राष्ट्रभक्त हिंदु समाजाने जागरूक राहुन १५ तारखेला मतदान करावे. ठाण्यात “जय श्रीराम” वाला महापौर बसला नाही तर १६ तारखेला हिरवे गुलाल उधळतील. असा सावधानतेचा इशारा मंत्री राणे यांनी दिला. चौकट बोगस मतदारांना मारणार म्हणणाऱ्या मनसेला प्रत्युत्तर देताना मंत्री नितेश राणे यांनी, हिंमत असेल तर बेहरामपाडा, नळबाजार येथील मोहल्यामध्ये बुरखे घालुन मतदान करतात. तिथे जाऊन त्यांचे हातपाय तोडा. तेव्हा कळेल बाळासाहेबांच्या विचारांचे कोण? असे आव्हान दिले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनतेने २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये कौल दिला आहे, मनसेसारखा शून्य मिळालेला नाही. अशी खिल्लीही त्यांनी मनसेची उडवली. ००००

ठाण्यात महायुतीच्या विजयासाठी ‘निरहुआ’ चा संगीतमय प्रचार

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप – शिवसेना – रिपाई महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोमवारी प्रसिद्ध भोजपुरी स्टार अभिनेता व खासदार दिनेशलाल यादव उर्फ निरहुआ आणि प्रसिद्ध अभिनेत्री आम्रपाली दुबे ठाण्यात आले होते. या दोन्ही कलाकारांनी ठाण्यातील विविध भागांना भेटी देऊन महायुतीच्या उमेदवारांचा संगीतमय प्रचार केला. निरहुआ याने तर देशभक्ती जागावत भोजपुरी गीतातून ‘कमळ’ आणि ‘धनुष्य बाण’ या चिन्हाला मत देण्याचे आवाहन करीत धमाल उडवून दिली. यावेळी मोठया संख्येने उपस्थित जनसमुदायानेही “भारत माता की जय” च्या घोषणा देत निरहुआला साथ दिली. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून प्रचाराचे नवनवे फंडे राजकीय पक्ष तसेच उमेदवार अजमावत आहेत. सोमवारी तर ठाण्यात भोजपुरी स्टार निरहुआ आणि अभिनेत्री आम्रपाली दुबे यांनी संगीतमय प्रचाराची धुम उडवुन दिल्याने सर्वत्र “ठाणे” शहर चर्चेत आहे. भोजपुरी अभिनेता व मा खासदार दिनेशलाल यादव (निरहुआ) व अभिनेत्री आम्रपाली दुबे यांनी वागळे इस्टेट प्रभाग क्र. १५ मधील इंदिरा नगर नाका, कळवा प्रभाग क्रं. २५ आतकोनेश्वर नगर,  मफतलाल मैदान आणि प्रभाग क्रमांक ४ मधील गांधीनगर, नळपाडा, खेवरा सर्कल परिसरात भाजप महायुतीचा साग्रसंगीत प्रचार केला. निरहुआ याने अनेक भोजपुरी गीतांचा नजराणा पेश करून  मतदारांशी संवाद साधला. उपस्थितांनी, भारतमाता की जय च्या जयघोषात फेर धरला होता. यावेळी प्रभाग क्रं १५ मधील भाजप महायुतीचे उमेदवार सुरेश चंदू कांबळे, अनिता दयाशंकर यादव, अमित सरैया, प्रभाग क्रमांक ४ मधील भाजपच्या स्नेहा आंब्रे, मुकेश मोकाशी, सेनेच्या आशादेवी सिंह, सिद्धार्थ संजय पांडे तर प्रभाग क्रमांक २५ ड चे उमेदवार ॲड. दीनानाथ पांडे आदी महायुतीच्या उमेदवारांच्या पारडयात भरभरून मतांचे दान टाकण्याचे आवाहन निरहुआ यांनी केले.

कल्याण पश्चिमेतील जनता शिवसेना–भाजप युतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील –विश्वनाथ भोईर

कल्याण: कल्याण पश्चिमेत शिवसेना आणि भाजप महायुतीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, संघटनात्मक ताकद आणि अनुभवी नेतृत्वाच्या जोरावर विजयाचा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे. आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आमदार भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला आहे.  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील आमदार विश्वनाथ भोईर यांनी शिवसेना–भाजप युतीच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला आहे. ठाकरे गट आणि मनसे यांना विधानसभा निवडणुकीतच पराभवाचा सामना करावा लागला असल्याने त्यांचा धोका आता कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत “आव्हान असल्याचे कुठेही वाटत नाही. काही प्रभागांत अपवादात्मक परिस्थिती असू शकते; मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कल्याण डोंबिवलीवर बारीक लक्ष आहे. आमची टीम अत्यंत तगडी असून मैदानात पूर्ण ताकदीने उतरली आहे. त्यामुळे कोणाचेही आव्हान वाटत नाही,” असेही आमदार भोईर यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, “गेली अनेक वर्षे शिवसेनेवर प्रेम करणारे मतदार आमच्यासोबत आहेत. आम्ही त्यांच्याशी कधीही अंतर ठेवलेले नाही. मतदार आमच्यापासून लांब नाहीत. इतकी वर्षे तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहात, आताही तीच साथ द्या असे आवाहन करतानाच कल्याण पश्चिमेतील जनता शिवसेना–भाजप युतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.”

२०१५ रोजी निवडून दिलेल्या सर्व नगरसेवकांविरोधात एल्गार 

२७ गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा २७ गावांचा मुद्दा न मांडणाऱ्या उमेदवारांना मतदानादिवशी अद्दल घडविणार कल्याण : २७ गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने २०१५ रोजी निवडून दिलेल्या सर्व नगरसेवकांविरोधात एल्गार पुकारला असून २७ गावांचा मुद्दा न मांडणाऱ्या उमेदवारांना मतदानादिवशी अद्दल घडवणार असल्याची भूमिका मांडत स्वतंत्र नगरपालिकेचा मुद्दा उचलणाऱ्या मनसे, शिवसेना(उबाठा), काँग्रेस, एनसीपी (एसपी) पक्षाला पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले आहे. २७ गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची बैठक पार पडली यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीबाबत २७ गावांतील नागरिकांची भूमिका सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मांडली आहे. काही दिवसांपूर्वी जो पर्यंत या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार विरोधी पक्षांनी पाठींबा दिला होता. मात्र सत्ताधार्यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विरोधकांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोणकोणत्या पक्षांनी २७ गावांच्या अस्मितेचा प्रश्न घेतला आहे हे समितीने पहिले आहे. यामध्ये प्रामुख्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा मुद्दा प्रचारात मांडला आहे. मात्र सत्ताधारी पक्षांना याबाबत गांभीर्य नसून, त्यातल्या त्यात मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच कल्याण येथे झालेल्या सभेत २०१५ साली २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या दिलेल्या आश्वासनाची पुनरावृत्ती केली असून एकाच गोष्टीसाठी दहा वर्षे पाठपुरावा करावा लागत आहे हि खेदाची बाब आहे. निवडणुकीनंतर संघर्ष समितीच्या वतीने त्यांच्यावर दबाव आणू, मात्र हा विषय नगरविकास खात्याकडे प्रलंबित असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या खात्याचे मंत्री आहेत. हा चेंडू त्यांच्या कोर्टात असून याबाबत शून्य टक्के समर्थन त्यांच्याकडून येत आहे. प्रचारात शिवसेनेचे उमेदवार २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या विरोधात होते. त्यामुळे ज्या ज्या पक्षांनी स्वत्तान्त्र नगरपालिकेबाबत समर्थन दिले आहे त्यांच्या पाठीशी संघर्ष समिती आणि २७ गावांतील नागरिक उभे असून ज्यांनी हा मुद्दा घेतला नाही त्यांना मतदानाच्या दिवशी अद्दल घडविणार असल्याची भूमिका २७ गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मांडली आहे.

निधी संकलनाने गाठला ५३ कोटींचा टप्पा

टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ मुंबई, १३ जानेवारी : टाटा मुंबई मॅरेथॉन (टीएमएम) २०२६ ने यंदा समाजोपयोगी निधी संकलनात नवा विक्रम प्रस्थापित केला असून, स्पर्धेच्या प्रत्यक्ष शर्यतीपूर्वीच तब्बल ५३.७ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. युनायटेड वे मुंबई या फिलान्थ्रॉपी पार्टनरच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेला ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अधिक गती मिळण्याची शक्यता असून, यंदाची आवृत्ती मॅरेथॉनच्या इतिहासातील सर्वात प्रभावी समाजसेवी उपक्रमांपैकी एक ठरत आहे. यंदा विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच निधी संकलन करणाऱ्या फंडरेझर्सची विक्रमी संख्या. शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पर्यावरण संरक्षण, प्राणी कल्याण आणि समुदाय विकास अशा विविध सामाजिक कारणांसाठी नव्या फंडरेझर्सनी पुढाकार घेतला आहे. एकूण सहभागी फंडरेझर्सपैकी जवळपास ७५ टक्के म्हणजे १,१०० हून अधिक फंडरेझर्स हे नवखे असून, त्यांनी आतापर्यंत ५.६ कोटी रुपयांहून अधिक निधी उभारला आहे. २००४ पासून आतापर्यंत टाटा मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून एकूण ५३६ कोटी रुपयांहून अधिक निधी संकलित करण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट्स, धावपटू आणि वैयक्तिक देणगीदार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा सामाजिक ठेवा उभा राहिला आहे. यंदा कॉर्पोरेट सहभागातही मोठी वाढ झाली आहे. १९४ कॉर्पोरेट संघ यंदा सहभागी झाले असून, त्यातील ४० कंपन्या प्रथमच मॅरेथॉनच्या समाजसेवी उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. तसेच ६८ नव्या स्वयंसेवी संस्था यंदा सहभागी झाल्याने एकूण सहभागी एनजीओंची संख्या ३०५ वर पोहोचली आहे. हे या व्यासपीठावरील विश्वासार्हता आणि परिणामकारकतेचे द्योतक असल्याचे आयोजकांनी सांगितले. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रथमच निधी संकलन करणाऱ्या काही फंडरेझर्सनी आपले अनुभव मांडले. यामध्ये आर्यवीर झुंझुनवाला, हसीना थेमाली, समीर मेंगल, इरा खान आणि शांता वल्लुरी गांधी यांचा समावेश होता. अनेकांनी सुरुवातीचा संकोच, लोकांकडे मदतीसाठी हात पुढे करण्याचा अनुभव आणि मिळालेला सकारात्मक प्रतिसाद याविषयी मनमोकळेपणाने सांगितले. ०००००००००

‘प्रेमांकुर’ काव्यसंग्रहाचे नेरूळमध्ये प्रकाशन

नेरूळ : येथील फ्रुटवाला कल्चरल सेंटर (मराठा हॉल) येथे २८ डिसेंबर २०२५ रोजी कवयित्री डॉ. पुष्पांजली आप्पाजी कुंभार (एम.ए., एम.एड., पीएच.डी.) यांच्या पहिल्या वहिल्या ‘प्रेमांकुर’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध वक्ते  अरुण म्हात्रे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. पुणे येथील वेदांतश्री प्रकाशन (प्रकाशक –…

पाथरवट समाज उन्नती मंडळ, कल्याण क्रिकेट चषक २०२६ उत्साहात संपन्न

कल्याण : पाथरवट समाज उन्नती मंडळ, कल्याण यांच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही क्रिकेट चषक २०२६ चे आयोजन मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात करण्यात आले. समाजबांधवांना एकत्र आणणे, सामाजिक बांधिलकी जपणे आणि सकारात्मक…

मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी  मिरा – भाईंदर महापालिकेची Voter Help Desk सुविधा

मिरा-भाईंदर : राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ करीता सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे. महापालिकामार्फत एकूण ९५८ मतदान केंद्र उभारण्यात आले असून मतदारांना मतदान प्रक्रियेबाबत सुलभ, पारदर्शक व अचूक माहिती मिळावी, निवडणूक विभागामार्फत मतदारांना मतदार यादीतील नाव व मतदान केंद्राची माहिती सहज शोधता यावे, यासाठी Voter Help Desk सुविधा तसेच QR कोड आधारित सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल आहे. या सुविधेमुळे नागरिकांना आपल्या मोबाईल फोनवर दिलेला QR कोड स्कॅन करून थेट मतदार यादी शोध पृष्ठावर जाता येणार आहे. याशिवाय, नागरिक https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/SearchVoterName या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, तसेच मतदान केंद्राची माहिती सहज  तपासू  शकतात.  यामुळे मतदानाच्या दिवशी  होणारी गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे. मतदान केंद्र तपासण्यासाठी मार्गदर्शक सूचना : दिलेला QR कोड मोबाईलवर स्कॅन करा किंवा लिंकवर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. आवश्यक माहिती (नाव / EPIC क्रमांक) भरा. मतदार यादीतील नाव व मतदान केंद्राची माहिती तपासा. मतदार यादीत नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी तांत्रिक अडचण येत असल्यास खालील निवडणूक निर्णय अधिकारी किंवा मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या मतदार हेल्प डेस्क क्रमांकावर संपर्क साधावा. मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी- whatsup chatbot क्र.: ९९६७६ ११२३४

प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची भव्य बाईक रॅली

मिरा भाईंदरच्या नागरिकांशी थेट संवाद मिरा-भाईंदर : निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मिरा भाईंदर शहरात शिवसेनेच्या वतीने भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आले होते. या रॅलीचे नेतृत्व परिवहन मंत्री  प्रताप सरनाईक यांनी केले, ज्यामुळे रॅलीला विशेष उत्साह लाभला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिवहन मंत्री  प्रताप सरनाईक यांनी नागरिकांशी संवाद साधताना विकासाभिमुख धोरणे, महापालिकेतील योजनेतील पारदर्शकता आणि जनहिताला प्राधान्य देण्याची भूमिका मांडली.  नागरिकांनी सरनाईक यांना प्रतिसाद देत “मिरा भाईंदरच्या कारभारात बदल हवा” अशी भावना उघडपणे व्यक्त केली.