Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

  सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज!

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज! द्वारका ते नाशिकरोड रस्ता आता होणार ‘दहा पदरी’ हरिभाऊ लाखे नाशिक :  आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनासाठी द्वारका ते नाशिकरोड या नाशिक-पुणे रस्त्याचे दहा पदरीकरण केले जाणार आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी टीडीआरद्वारे भूसंपादनाचा निर्णय महापालिकेने घेतला असून, रस्ता क्षेत्राचे डिमार्केशन करत ३५ जागामालकांना भूसंपादनाच्या नोटिसा बजावल्या जात आहेत. नाशिक शहरातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी तब्बल तीनशे कोटी रुपये खर्च करून अंडरपास तयार केला जात आहे. या कामाला सुरुवात झाली असून, चौकातील वाहतूक अन्य मागनि वळविण्यात आली आहे. तीन महिने काम सुरू राहणार असल्याने या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. या चौकातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधताना भविष्यातील गरज आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात वाहनांची वाढणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेच्या बांधकाम विभागाने एकूण २७६ कोटी रुपयांच्या खर्चातून द्वारका ते नाशिकरोड रस्ता दहा पदरी करण्याचा प्रस्ताव न्हाईला सादर केला आहे. न्हाईने त्यास हिरवा कंदील देत हा रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग देणे गरजेचे असल्यामुळे महापालिकेने रुंदीकरणासाठी आवश्यक रस्त्याच्या डाव्या बाजूकडील क्षेत्राचे डिमार्केशन करत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. मौजे नाशिक शिवारातील स.नं. ८४७/१/१-१/२/१/१ नगररचना योजना क्रमांक २ पैकी मधील ४५ मीटर रुंद विकास योजना रस्त्याने डाव्या बाजूने बाधित होत आहे. या बाधित क्षेत्राकरिता एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२० मधील विनयम क्रमांक ११.२ नुसार हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) / संलग्न उर्वरित जागेत चटई क्षेत्र निर्देशांकाच्या मोबदल्यात बाधित क्षेत्र मनपाच्या ताब्यात देण्यात यावे, अशा आशयाच्या नोटिसा मनपाकडून संबंधित जागामालक तसेच शासकीय यंत्रणांना बजावल्या आहेत. जागामालकांना जमिनीच्या मोबदल्यात टीडीआर मिळविण्यासाठी वास्तुविशारदांमार्फत मनपास प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदीनुसार आपल्या प्रस्तावावर नियमोचित निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेने जागामालकांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

 वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार

वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार रहिवाशांच्या मोर्चाची घेतली दखल प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर होणार कारवाई – शैलेंद्र कांबळे अनिल ठाणेकर मुंबई, वरळी नाका परिसरातील प्रेम नगर व सिद्धार्थ नगर येथील इंदिरा झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्प सुमारे २५ वर्षांपासून रखडला आहे. याविरोधात मार्क्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन शक्ती संघटनेच्या वतीने  रहिवाशांनी आज एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्च्याच्या शिष्टमंडळाला प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले, अशी माहिती शैलेंद्र कांबळे यांनी दिली. यावळी मनोज यादव, तृप्ती निकाळजे, प्रविण मांजळकर, अशोक पवार,बहुजन शक्तीचे सुधाकर रणखांबे, संतोषी शिरोडकर, कलप्पा न्हावी,नवाज शेख, विशाल कांबळे, संजय मकासरे आदी उपस्थित होते. मोर्चानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाकडे निवेदन सादर करत बैठकीत विकासकाच्या निष्क्रियतेबाबत तक्रार नोंदवली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष अधिकारी मजगे यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल तसेच प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.दरम्यान, ५७ रहिवाशांना विकासकाने भाडे न दिल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. याबाबत सहाय्यक निबंधक चंद्रकांत पवार यांनी सांगितले की, यापूर्वी विकासकाला नोटीस बजावण्यात आली होती. विकासकाने भाडे देण्याचे कबूल करत धनादेश दिला; मात्र तो बाऊन्स झाल्याची माहिती देण्यात आली. तरीही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.प्रकल्पासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करून ती सार्वजनिक करावी, तसेच अपयशी विकासकाची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला.

 आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील पर्यावरणाची काळजी केवळ दिखाऊपणा

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील पर्यावरणाची काळजी केवळ दिखाऊपणा भाजपा सरकारकडून राज्यात विकासाच्या नावावर पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी – सुरेशचंद्र राजहंस मुंबई : भाजपा महायुती सरकारने मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास केला आणि आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पर्यावरणाची काळजी व्यक्त करत आहेत, हा केवळ दिखाऊपणा  आहे. पर्यावरण आठवडा सारख्या कार्यक्रमात भाषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती अधिक महत्त्वाची असते. पर्यावरण हा केवळ परिषदांचा विषय नाही, तर तो जनतेच्या श्वासाचा, भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, असे मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे. पर्यावरणावर बोलताना सुरेशचंद्र राजहंस म्हणाले की, मुंबईतील ‘पर्यावरण आठवडा’ कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास याबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या पण त्यांच्याच सरकारने राज्यात पर्यावरणाची मोठी हानी केली आहे. आरे मधील झाडांची कत्तल, चंद्रपूर ताडोबा– अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जंगलांवर वाढता ताण आहे, वेताळ टेकडी येथील झाडांवर घाला घालण्यात आला, मुंबई तील मँग्रोव्ह्स आणि सॉल्ट पॅन जमिनींवर विकासाच्या नावाखाली अनेक प्रकल्प सुरू आहेत. तपोवन मध्ये वृक्ष तोड चाललेली आहे. या सर्व घटनांनी सरकारची “विकास” ही संकल्पना नेमकी कोणासाठी आहे, हा प्रश्न निर्माण केला आहे. सरकारला खरोखरच पर्यावरणपूरक विकास हवा असेल तर, मोठ्या प्रकल्पांपूर्वी पारदर्शक पर्यावरणीय परिणाम अहवाल जाहीर करावेत. झाडतोडी ऐवजी पर्यायी आराखडे तयार करावेत. मँग्रोव्ह, टेकड्या आणि जंगलांचे कायदेशीर संरक्षण अधिक मजबूत करावे. स्थानिक नागरिक व पर्यावरणतज्ज्ञांचा सल्ला बंधनकारक करावा. केवळ शब्दांमध्ये शाश्वत आणि प्रत्यक्षात वेगळीच कृती ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्राची जनता ओळखते. पर्यावरण वाचवायचे असेल, तर घोषणांपेक्षा ठोस कृती हवी. अन्यथा पर्यावरण आठवडा हा फक्त प्रतिमानिर्मितीचा कार्यक्रम ठरेल, असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी अनिल ठाणेकर ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभ‍िवादन करण्यात आले. तद्नंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सर्व ठाणेकरांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी  अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, दीपक झिंजाड, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे, सहायक आयुक्त ललिता जाधव, सोपान भाईक, प्र.उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

 मिलाप नगरमध्ये बंगल्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न

मिलाप नगरमध्ये बंगल्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद कल्याण : डोंबिवली एमआयडीसी, मिलापनगर हा विशेष करून बंगल्यांचा परिसर असून कारखानदार, डॉक्टर, सीए, वकील, शासकीय, खाजगी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी इत्यादी उच्चभ्रू लोकांची वस्ती येथे आहे. याठिकाणी एका बंगल्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला असून हे दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. महाशिवरात्री दिवशी रात्री अडीच वाजता दरम्यान मिलापनगर, एमआयडीसी मधील अभिनव सहकारी बँकेच्या समोरील एका बंगल्यात एक वृद्ध स्त्री घरात एकटीच असताना बंगल्याचे खिडकीचे ग्रील तोडून तीन दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश केला. त्यापूर्वी एका दरोडेखोराने त्याच रात्री १.२५ वाजता या बंगल्यात रेकी करून गेल्याचे सीसी कॅमेरात दिसत आहे. दरोडेखोरांचा हातात कोयते व इतर हत्यारे होती. बंगल्यात कोणीतरी असल्याचे व सदर वृद्ध स्त्री जागी झाल्याचे समजताच त्या तीन दरोडेखोरांनी भागो बोलत पलायन केले. यानंतर त्या वृद्ध स्त्रीने शेजारी राहणाऱ्यांना फोन करून माहिती दिली असता त्यानी मदतीसाठी प्रत्यक्ष येऊन पोलिसांना कळविले. काहीवेळातच मानपाडा पोलीस घटनास्थळी येऊन त्यानी चौकशी करून दरोडेखोरांना पकडण्यासाठी एक पथक रवाना केले. परंतु दरोडेखोर तोपर्यंत पसार झाल्याने मानपाडा पोलीस या दरोडेखोरांना पकडण्यासाठी सीसी कॅमेराद्वारे त्यांचा तपास करीत आहेत. यापूर्वीही मिलापनगर परिसरात अशा घरफोड्या झाल्या असल्याने येथील रहिवाशांत घबराट पसरली असून रात्री/पहाटे पोलीस गस्ती वाढवावी आणि या दरोडेखोरांना जेरबंद करावे अशी मागणी मिलापनगर रेसिडेन्ट्स वेलफेअर असोसिएशनने पत्राद्वारे केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती मोठया उत्साहात साजरी झाली. महापालिका मुख्यालयात राज्यगीत गायनानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अति.आयुक्त हर्षल गायकवाड, अति.शहर अभियंता (विदयुत/यांत्रिकी)  प्रशांत भागवत, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त कांचन गायकवाड, मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, सहा.आयुक्त धनंजय थोरात, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग आणि नागरिक उपस्थित होते. कल्याण पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास महापौर हर्षाली चौधरी, महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. डोंबिवलीतही राज्यगीताचे गायन करुन महापालिकेच्या जुन्या विभागीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास आणि मानपाडा रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास उपमहापौर राहुल दामले यांनी पुष्पहार अभिवादन केले. यावेळी उपस्थित उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, रामदास कोकरे, कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, सहा.आयुक्त प्रसाद ठाकूर, भारत पवार, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महापालिकेच्या बारावे येथील शाळा क्र.६८, धाकटे शहाड येथील शाळा क्र.३३ व उंबर्डे येथील शाळा क्र.१२  मधील चिमुकल्या विदयार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमांचे अतिशय बहारदार सादरीकरण करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

‘देआसरा उद्योजकता पुरस्कार २०२६’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू

‘देआसरा उद्योजकता पुरस्कार २०२६’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू ६ विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्हाने गौरवणार; ४ एप्रिल रोजी पुण्यात वितरण पुणे : उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या…

एलआयसी १०० रुपये रोज बचत योजनेची घोषणा

एलआयसी १०० रुपये रोज बचत योजनेची घोषणा मुंबई / रमेश औताडे जग जसे वेगाने बदलत आहे तसेच एल आय सी ने पण बदलत कात टाकली असून सामान्य ग्राहकाला अजून मोठ्या प्रमाणात जोडता येण्यासाठी रोज १०० रुपये बचत योजना जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या निधीत गुंतवणूक करण्यासाठी दैनंदिन गुंतवणूक रु. १००, मासिक गुंतवणूक रु. २०० आणि तिमाही गुंतवणूक रु. १,००० ने करता येईल.  किमान रक्कम रु. १,००० आहे. हा निधी कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा केंद्र, डिजिटल व्यासपीठ आणि इतर तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. याची सुरुवात २० फेब्रुवारी रोजी होईल आणि ६ मार्च २०२६ रोजी संपेल. नंतर लोक या निधीत पैसे जमा किंवा काढू शकतात. व्यवस्थापक कारण दोशी आणि जयप्रकाश तोष्णीवाल आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के. झा म्हणाले की सरकारने सेमीकंडक्टर आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा गुंतवणूकचा संकल्प केला आहे. मुख्य गुंतवणूक अधिकारी योगेश पाटील म्हणाले की या निधीत अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले जातात ज्या सतत वाढत राहतात, चांगला नफा करतात.

तुर्भे विभागामार्फत अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई

तुर्भे विभागामार्फत अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई नवी मुंबई महानगरपालिकाच्या अतिक्रमण विभागामार्फत तुर्भे विभागात अनधिकृत बांधकामाविरुद्ध तोडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त…

 जन आरोग्य शिबिराला पारशी बांधवांचा प्रतिसाद

जन आरोग्य शिबिराला पारशी बांधवांचा प्रतिसाद नगरसेविका नम्रता कोळी यांचे आयोजन ठाणे : टेंभीनाका परिसरात वास्तव्य करणाऱ्या पारशी बांधवांच्या अगियारी कंपाऊंडमध्ये आयोजित केलेल्या जन आरोग्य शिबिराला पारशी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी व आई-बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी दोन दिवसांच्या शिबिराचे आयोजन केले होते. पारशी समुदाय वर्षानुवर्ष गुण्यागोविंदाने राहत आहे. या समाजातील नागरिकांना केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष जन आरोग्य शिबीर भरविण्यात आले होते. या शिबिरात ज्येष्ठ नागरिक कार्ड व ७० वर्षांवरील नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड देण्यासाठी नोंदणी करण्यात आली. त्यात ७० वर्षांवरील ९० स्त्री-पुरुष नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी करून देण्यात आली. तर ज्येष्ठ नागरिक कार्डसाठी १०८ नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यात आले. या नागरिकांना लवकरच कार्डचे वाटप केले जाईल, असे नम्रता कोळी यांनी सांगितले. या शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल नगरसेविका नम्रता कोळी व जयेंद्र कोळी यांनी आभार मानले आहेत.