Month: April 2024

“पंचपक्वान्नाचं ताट सोडून पत्रावळीवर जाऊन बसलेत”

जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टिका ठाणे : ” यांच्यापेक्षा शिंदे बरे, निदान आपल्या लोकांसाठी भांडत तरी आहेत. काहीतरी मिळवतायत, यांनी काय मिळवलं? पंचपक्वान्नाचं ताट सोडून आज पत्रावळीवर जाऊन बसलेत. भाजपला शरद पवारांना संपवायचंय, त्याशिवाय यांच जातीय राजकारण इथं टिकणार…

रत्नागिरी-सिंधुदुर्गवर नारायण राणेंचा दावा

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट दावा करताना निवडणुकीच्या रिंगणात उतण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, याच ठिकाणी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत सुद्धा निवडणुकीच्या…

एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेत २० हजारांचा दंड वसूल

ठाणे : महाराष्ट्र  प्रदुषण नियंत्रण मंडळ व ठाणे महानगरपालिका प्रदुषण नियंत्रण विभागाने संयुक्तरित्या आज एकल वापर प्लॅस्टिक (सिंगल यूज प्लॅस्टिक्‍ कॅरीबॅग) बंदीबाबत मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेत वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत येणारे शॉपिंग मॉलसह १२ आस्थापनांना दिलेल्या भेटीत साडे आठ किलो प्रतिबंधीत प्लॅस्टिक जप्त करुन २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.विविध आस्थापनांतून साडेआठ किलो प्रतिबंधीत प्लॅस्टिक बाऊल, प्लॅस्टिक चमचे, ग्लासेस आदी साहित्य जप्त करण्यात आले. सदरची मोहिम ही सातत्याने सुरू राहणार असून एकल वापर प्लॅस्टिकचा वापर तसेच साठा करु नये असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

नाना पटोलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर

 “अजूनही वेळ गेलेली नाही, किती जागा पाहिजे ते सांगा” अकोला : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर दिली आहे. “प्रकाश आंबेडकरजी अजून रस्ते बंद झाली नाहीत. मी पुढाकार…

मुलुख मैदानी तोफ, मिनाक्षीताई हरपली – अजयकुमार सिताराम सर्वगोड

कणकवली : अशोक गायकवाड महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्रिपद भूषविलेल्या व शेतकरी कामगार पक्षाची मुलुख मैदानी तोफ असणाऱ्या मिनाक्षीताई पाटील यांचे २९ मार्चला दु:खद निधन झाले आहे. हि बातमी ऐकताच माझे मन हेलावुन गेले मला अतीर्व दु:ख झाले. मिनाक्षी ताई पाटील यांचे आणि माझे जिव्हाळयाचे संबंध १९ फेब्रुवारी १९८६ पासुन होते त्यावेळी त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. आजही मला तो दिवस आठवतो. रायगड जिल्हयातील पोलादपुर तालुक्यामधील अतिदुर्गम भाग म्हणुन ओळखला जाणारा कुडपण या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष स्वर्गीय प्रभाकर पाटील यांनी लावली होती. सदर स्थायी समितीच्या बैठकीत सदस्या या नात्याने मिनाक्षी ताई यांनी कुडपण आणि पोलादपुर तालुक्यासाठी विकासाचे मुद्दे अगदी आक्रमकपणे सभेत मांडत होत्या सदरचे मुद्दे मांडत असताना मी त्यांचा आक्रोश अणि आक्रमकपणा जवळुन पहिला. उपस्थित लोकांच्या अंगावर त्यांची आक्रमक भाषणे ऐकताना शहारे येत होते, अशी माहिती कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली, अजयकुमार सिताराम सर्वगोड यांनी दिली. मिनाक्षीताई यांची जिल्हा परिषद मधील कामगिरी अत्यंत उत्तम होती. म्हणुनच काय त्याची पोहचपावती म्हणून त्यानंतर अलिबाग विधान सभेच्या आमदार म्हणून भरघोस मतांनी निवडून आल्या. मिनाक्षीताई या अंत्यंत हुशार आमदार म्हणून त्यांच नाव लैकिक होते. विशेष म्हणजे विधानसभेच्या सभागृहामध्ये त्या त्यांची भुमिका अंत्यंत आग्रहीपणाने व आक्रमणपणे मांडत असत. एक धाडसी नेतृत्व एक धाडसी महिला एक धाडसी आमदार म्हणून त्यांचा विधानसभेमध्ये सातत्याने नाव लौकिक होत असे रायगड जिल्हयामध्ये जिल्हयाचा विकास होण्याच्या दृष्टिने त्याचे मोलाचे योगदान आहे. मिनाक्षीताई यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली याचे मी परमभाग्य समजतो. मिनाक्षीाताई यांची सुनबाई चित्राताई कुबल- पाटील चित्राताई या मुळच्या वेंगुर्ले जि.सिंधुदुर्गच्या आहेत. मिनाक्षीताई पाटील यांनी आपल्या सुनेला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आणले . तसेच चित्राताई पाटील यांना अर्थ व बांधकाम सभापती पद सुध्दा मिळवून दिले त्या एवढयावरच थांबल्या नाहीत तर बांधकाम व अर्थ विभागाचा कारभार गतीमान व पारदर्शक पणे कसा करायचा ,भाषणे कशी करायची अर्थ संकल्पीय भाषण कसे असले पाहिजे जिल्हयांच्या विकासासाठी कोणकोणत्या बाबी अर्थ संकल्पात प्राधान्याने घेतल्या पाहिजेत हे अंत्यंत बारकाईने समजावून सांगत असे चित्राताई पाटील आणि मिनाक्षीताई आम्ही एकत्र जिल्हा दौरे करीत असत चित्राताईला ते नेहमी म्हणत अजयकुमार सर्वगोड हा जुन्या पिढीतील इंजिनिअर आहे. त्याला माझ्या दादानी (स्वर्गीय प्रभाकर पाटील) यांनी नोकरीला लावले आहे. हा फार हुशार आणि प्रामाणिक इंजिनिअर आहे. याला बरोबर घेतल्याशिवाय तू जिल्हा परिषदेचा कारभार करत जाऊ नको असे चित्राताई पाटील यांना नेहमी सांगत असत तसेच मला सुद्धा नेहमी सांगत माझी सुनबाई ही माझी भाग्यलक्ष्मी आहे. अजकुमार तिला बांधकाम व अर्थ याचा कारभार गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी सर्वतोपरी मदत करीत जा, असे मला नेहमी सांगत. मी मिनाक्षीताई यांनी दिलेल्या सुचनाचे तंतोतंत पालन केले. चित्राताई पाटील यांना मी आणि जी.एच.पाटील यांनी त्याच्या कामात मदत केली. विशेष म्हणजे बांधकाम व अर्थ विभागात चित्राताई यांची सभापती म्हणून कामगिरी न भुतो न भविष्य अशी झाली याचे सर्व श्रेय मिनाक्षी ताई पाटील यांना जाते.मला मिनाक्षी ताई यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे माझे मी परम भाग्य समजतो मिनाक्षीताई यांनी मला मुलासारखे प्रेम दिले मला त्यांनी खूप आधार दिला. मिनाक्षीताईच्या जाण्याने मला अतिशय दु:ख झाले आहे. मिनाक्षीताई यांच्या जाण्याने संबंध रायगड जिल्हयाचे अतोनात नुकसान झाले आहे. ताईची विधानसभेतील आमदार व राज्यमंत्री म्हणून कारकीर्द वाखण्यासारखी आहे. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य आमदार राज्यमंत्री अत्यंत महत्वाची चोख कामगिरी बजावली. त्यांच्या कार्याचा अलौकिक कामाचा ठसा सुध्दा उमटवला आहे. त्यांच्या जाण्याने प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे. मिनाक्षी ताई यांच्या कार्याला, विचाराला अणि प्रेरणादायी स्मृतीला माझी भावपुर्ण श्रंध्दाजली व आदरांजली, अशा भावना शेवटी अजयकुमार सिताराम सर्वगोड यांनी व्यक्त केल्या.

स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय शाळेचं सक्षमिकरण

व्हिझिबल अल्फा कंपनीने दिला मदतीचा हात कर्जत : अशोक गायकवाड व्हिझिबल अल्फा कंपनी च्या मदतीने लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट च्या अंतर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, गौरकामत शाळेचे नूतनीकरण करण्यात आले. शाळेचे अध्यक्ष प्रमोद पाटील आणि मुख्याध्यापक प्रमोद किरंगे यांनी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि व्हिजिबल अल्फा यांनी दिलेल्या सुविधांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि दिलेल्या सुविधांचा वापर यापुढे केला जाईल अशी ग्वाही दिली. २८ मार्चला  स्वामी विवेकानंद माध्यमिक शाळेत अल्फा व्हिसिबल च्या मदतीने नूतनिकरणाचे काम झाले आहे…आनंदो शाळा सक्षमीकरण प्रकल्पाचा उद्देश शाळांना सक्षम करण्यासाठी तसेच शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे हे गौरकामत शाळेतील व्हिसिबल अल्फा डोनर च्या सपोर्ट मुळे साध्य झाले आहे. व्हिसिबल अल्फा ने शाळेसाठी शालेय विज्ञान प्रयोग शालेसाठी स्वतंत्र वर्गखोली , सौर ऊर्जा सुविधा , पाणी फिल्टर, शौचालये आणि स्नानगृहांचे नूतनीकरण तसेच ७० लाकडी बेंच , ग्रंथालय आणि एक स्वतंत्र वर्ग उपलब्ध करून दिले आहे . या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य व सामूहिक नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश दासवानी यांनी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टसोबत भागीदारी करून शाळेला पाठिंबा दिल्याबद्दल व्हिजिबल अल्फा टीमचे आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कांचन थोरवे यांनी शाळा सक्षमीकरण प्रकल्पाचा उद्देश सांगून शाळेची सक्षमीकरण प्रकल्पाची गरज स्पष्ट केली. शाळेचे अध्यक्ष पाटील आणि मुख्याध्यापक किरंगे यांनी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि व्हिजिबल अल्फा यांनी दिलेल्या सुविधांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि दिलेल्या सुविधांचा वापर यापुढेही केला जाईल अशी ग्वाही दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आमच्या शाळेत सर्व सुविधा असल्याने इतर विद्यार्थीही या शाळेत प्रवेश घेतील असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक समन्वयक प्रिया सोनावळे यांनी केले. ह्या कार्यक्रमासाठी विशेषाधिकारी पाहुणे म्हणून श्रीमती पद्म प्रिया सरस्वतुला हेड ऑफ व्हिसिबल अल्फा भारत , अरुल, आयटी विभाग व्हिसिबल अल्फा, श्रीमती सीमा, प्रशासकीय व्हिसिबल अल्फा लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे सीईओ दासवानी तसेच लाईफ ट्रस्ट मार्केटिंग टीम सदस्य हरपाल सिंग, कार्यक्रम व्यवस्थापक कांचन थोरवे, गौरकामत शाळेचे अध्यक्ष पाटील , चेअरमन राणे आणि गौरकामत गावचे सरपंच योगेश देशमुख उपस्थित होते.

उदयनराजे भोसलेंचा प्रचार सुरु

सातारा : भाजपाने जरी तिकीट दिले नसले तरी  खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. उदयनराजे भोसले यांनी आज कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे म्हटलं आहे. उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांनी संवाद…

उष्णतेमुळे उद्भवणाऱ्या आजारांची नागरिकांनी काळजी घ्यावी

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन उष्णता उपाययोजना कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या टास्क फॉर्सची झाली बैठक ठाणे : ठाणे शहर हे खाडी किनारी असल्याने मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यत वाढणाऱ्या आर्द्रतेमध्ये शरीराला जाणवणाऱ्या उष्णतेत वाढ होत असून त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असून चक्कर येऊन पडणे, स्नायूंना पेटके यणे, डोकेदुखी, श्चासाची व हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, झटके येणे याची माहिती द्यावी, नजीकचे आरोग्य केंद्र / रुग्णालयात त्याबाबत नोंद करणे तसेच उष्णतेच्या लाटेबाबत काळजी घेताना काय करावे व काय करु नये व उष्णतेमुळे होणाऱ्या आजाराबाबत आशावर्कर्स यांना प्रशिक्षण देवून याबाबतची जनजागृती नागरिकांमध्ये करण्याचे निर्देश देत असतानाच नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असे आवाहन नुकत्याच झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. ठाणे शहराचा उष्णता उपाययोजना कृती आराखडा तयार करण्यासाठी गठित केलेल्या टास्क फोर्स कमिटीची पहिली बैठक नुकतीच (मंगळवार 3 एप्रिल) महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या संनियंत्रणाखाली झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितिल, उपायुक्त अनघा कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान आदी उपस्थित होते. वाढत्या उष्णतेबाबत वागळे इस्टेट प्रभागात झोपडपट्टया व रहिवाशी संकुल येथे सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक, भौगोलिक सर्वेक्षण करण्यात आले होते. सदर बैठकीत सेंटर फॉर एन्व्हारमेंट एनर्जी ॲण्ड वॉटर या संस्थेने वागळे इस्टेट  येथे केलेल्या सर्व्हेक्षणाबाबत, नागरिकांचे उषणतेच्या लाटेबाबतचे निरीक्षण व त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली. गेल्या काही वर्षामध्ये उष्णतेच्या लाटेची तीव्रता व वारंवारिता वाढत असून रात्रीचे तापमान देखील वाढत आहे. त्याची झळ दैनंदिन कामकाज करताना समाजाच्या सर्व स्तरावर जाणवत आहे. वागळे इस्टेट प्रभागामध्ये अंदाजे 40% लोकसंख्या ही 15 वर्षाच्या खाली आणि 60 वर्षाच्या वरील वयाची असून त्यांच्यावर उष्णतेच्या लाटेचा परिणाम जास्त तीव्रतेने जाणवत आहे. नजीकच्या आरोग्‌य केंद्रामध्ये बहुतांशी लोक उपचार घेतात तसेच आशा वर्कर्स नियमितपणे घरोघरी पाहणी करतात व औषध उपचार देत आहेत, परिसरात ठिकठिकाणी पाणपोईची संख्या वाढविणे, सार्वजनिक वाहतुकीची ठिकाणे जसे बस स्टॅण्ड, रिक्षा स्टॅण्ड या ठिकाणी सावली वाढविणे अशा उपाययोजना नागरिकांनी सुचविल्या असल्याचे सदर बैठकीत नमूद करण्यात आले. उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांबाबत रहिवासी संकुलांमध्ये माहिती पत्रके वाटणे, डिजीटल बोर्डवर सूचना प्रसिद्ध करणे, शैक्षणिक संस्थांमध्ये मुलांना वेळोवळी पाणी पिण्यासाठी सूचना देणे यासारख्या बाबी समाविष्ट करणे तसेच आशा वर्कर्सच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबाबतचे निर्देशही आयुक्त सौरभ राव यांनी सदर बैठकीत संबंधितांना दिले. तसेच दर 15 दिवसांनी टास्क फोर्सची बैठक घेवून केलेल्या कामाचा आढावा घेण्याबाबतच्या सूचनाही यावेळी संबंधितांना देण्यात आल्या.

निरुपम ‘काँग्रेसमुक्त’; निवडणूक लढविणार

मुंबई : काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांन सहावर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलेआहे. एन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या आदेशावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे एन निवडणूकीच्या धामधुमीत त्यांना काँग्रेसमुक्त…

रुट मार्चच्या माध्यमातून निर्भय मतदान करण्याचा संदेश

पनवेल : लोकसभेच्या निवडणुका, तसेच सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल शहर पोलिसांच्या वतीने शिस्तबद्ध रुट मार्च काढण्यात आला. तसेच आचारसंहिता कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिस यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती रुट मार्चदरम्यान पोलिसांनी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख व्यवस्था करण्यात येत आहे. परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात आणि मतदारांमध्ये विश्‍वासार्हता वाढीस लागावी याकरिता सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये रुट मार्च काढण्यात येत आहे. परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे व पनवेलचे सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलिसांकडून पनवेल शहरातून करंजाडे वसाहतीत रुट मार्च काढण्यात आला. यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी, अंमलदार सहभागी झाले होते. करंजाडे वसाहतीतील सेक्टर-१ ते ६ पर्यंत पनवेल शहर पोलिसांनी संचलन केले. रमजान ईद, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सण-उत्सवानिमित्त पनवेल शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी रुट मार्च काढण्यात आला.