Month: June 2024

मतपत्रिकाद्वारे मतदान होणार असून कोकण पदवीधर मतदारांनी मतदानाची पद्धत समजून घेणे गरजेचे – किशन जावळे

  अशोक गायकवाड रायगड : कोकण विधान परिषद पदवीधर मतदान संघ निवडणूक प्रक्रिया सुरू असून या निवडणुकीत मतपत्रिका द्वारे मतदान होणार आहे. मतदारांनी या मतदानाची पद्धत समजून घेणे गरजेचे आहे, या…

निरामय जीवनासाठी योग महत्वाचा – चंद्रकांत सूर्यवंशी

रत्नागिरी : योग ही जीवन प्रणाली असून, ती अंगीकारली पाहिजे. निरामय जीवनासाठी योग अत्यंत महत्वाचा आहे. त्यामध्ये सातत्य ठेवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आणि योग असोसिएशन यांच्या सहकार्याने शुक्रवारी,(दि.२१) जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे, तहसिलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा सांख्यिकी उपसंचालक निवास यादव, स्काऊट गाईड संघटक रमाकांत डिंगणे आदी उपस्थित होते. सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन योगदिनाचा प्रारंभ करण्यात आला. रा. भा. शिर्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आणि योगासनांचे प्रात्याक्षिक सादर केले. राजेश आहिरे यांनी सूत्रसंचलन करत, उपस्थितांकडून योगासने करवून घेतली. ताडासन, भद्रासन, त्रिकोणासन, वज्रासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, मंडुकासन, सशांकासन, मकरासन, शवासन या आसनांबरोबरच कपालभाती, अनुलोम विलोम, शीतली आदी प्राणायामचे प्रकारही उपस्थितांनी केले. सूर्यनमस्कार स्पर्धेतील विजेते स्वस्ती पावसकर, स्वरा मांडवकर, पूर्वा साळवी, आयुषी क्षेत्री, पियुषा पाटील, सोहम बंडबे, वंश शिंदे, वरद पवार, राधिका पेडणेकर, आदिती चव्हाण, रुबीना सय्यद, श्रावणी शिवगण, प्रणिता लवटे, सांची धनावडे, रत्नेश आडविरकर, विनायक डांगे, निखिल चव्हाण, संकेत शिंदे यांना प्रशस्तीपत्र देण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. अ. दा. नाईक हायस्कूल, अ. के, देसाई हायस्कूल, स्काऊट गाईडचे विद्यार्थी आणि शिक्षक आजच्या योगदिनात सहभागी झाले होते. ००००

उत्तम आरोग्यासह विश्वशांती साठी योग आवश्यक : राज्यपाल रमेश बैस*

अशोक गायकवाड   मुंबई : योग ही भारताची जगाला अनमोल देणगी आहे. योगाच्या अमूर्त ठेव्याचे रक्षण करणे व त्याचा प्रचार – प्रसार करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. शारीरिक, मानसिक…

डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्थलांंतरित आरक्षित तिकिटांचे केंद्र सज्ज

डोंबिवली : रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते पाचच्या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या कामासाठी या पुलाने बाधित होत असलेले फलाट क्रमांंक एकवरील जुने प्रवासी आरक्षित तिकिटांचे केंंद्र फलाटाच्या कल्याण…

शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ११ च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

ठाणे : शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 11 च्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज गोकुळ नगर येथील वर्धमान हॉल येथे सकाळी 9 ते…

ठाणे महापालिका व अंबिका योगाश्रम ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन उत्साहात साजरा

ठाणे, आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त्‍ ठाणे महानगरपालिका व अंबिका योगाश्रम ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृह येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपायुक्त मीनल पालांडे, ठाणे जिल्हा…

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त नशाबंदी मंडळाच्यावतीने डोंबिवलीत व्यसनमुक्ती संकल्प कार्यक्रम साजरा

ठाणे : आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त नशाबंदी मंडळ महाराष्ट्राच्या वतीने डोंबिवलीतील नाना नानी पार्क, मानपाडा रोड या ठिकाणी व्यसनमुक्ती संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात रा.वी. नेरुरकर कनिष्ठ महाविद्यालयाचे…

जबाबदारी स्विकारून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा – प्रा. वर्षा गायकवाड

नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात मुंबईत काँग्रेसचे आंदोलन मुंबई : डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. नीट परीक्षेचा पेपऱ फुटल्याने देशभरातील २४ लाख…

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक

ॲड. अनिल परब यांच्या ‘वचननामा’चे आज मुंबई पदवीधर मेळाव्यात प्रकाशन आदित्य ठाकरे, भालचंद्र मुणगेकर यांची राहणार उपस्थिती   मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उमेदवार ॲड.…

केंद्र सरकारची आधार भावातील वाढ अत्यंत तुटपुंजी – डाॅ.अशोक ढवळे

ठाणे : लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देशभरातील शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता तरी आपल्या शेतकरी विरोधी धोरणांमध्ये बदल करेल व खरीप हंगामाचे एम.एस.पी.चे भाव रास्त उत्पादन खर्चावर आधारित शेतकऱ्यांना…