रायगड : विविध शासकीय कार्यालयातील प्रलंबित सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे जलद गतीने निपटारा करण्याकरिता दि. ०८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग येथे जिल्हास्तरीय पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. या जिल्हास्तरीय पेन्शन अदालतीमध्ये प्रलंबित प्रकारणांचा तात्काळ निपटारा करण्यात येणार असून या दिवशी व वेळी आपण आपल्याकडील आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील जिल्ह्यातील विविध राज्य शासकीय कार्यालयातील आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी हे मोठया प्रमाणात सन २०२३ ते २०२४ मध्ये निवृत्त होणार आहेत किंवा झालेले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती प्रकरणे कार्यालयीन स्तरावर तसेच वेतन पडताळणी पथकाकडे व रजा मंजूरीवर प्रलंबित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *