Month: October 2024

मुबईत शिवसेना, नागपूरमध्ये कांग्रेस ;

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला मुंबई :  काँग्रेस  नेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर महाविकास आघाडीतील तणाव निवळला आहे. मुंबईत शिवसेनेला तर नागपुरात काँग्रेसला झुकते माप मिळेल या निकषावर तडजोड झाली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. थोरात…

अन्न आणि औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्ती करु नका !’

धर्मराज्य पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित यांची राज्याचे मुख निवडणूक आयुक्त एस. चोक्कालिंघम यांच्याकडे मागणी   अनिल ठाणेकर ठाणे :‘आगामी विधानसभा निवडणुकांच्या कामकाजासाठी, अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) कर्मचाऱ्यांची, नियुक्ती करण्यात येऊ…

दहावीत दांडी गुल झाली तरी टेन्शन नाय

प्रशांत शिंदे मुंबई : दहावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुषखबर आहे. आता दहावीत सायन्स किंवा गणितात तुमची दांडी गुल झाली तरी टेन्शन घ्यायची गरज नाय…. अकरावीत तुम्हाल प्रवेश मिळू शकतो…राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार…

अमित ठाकरे माहीममधून, तर देशपांडे वरळीतून ‘मनसे’ लढणार

स्वाती घोसाळकर मुंबई : आणखिन एक ठाकरे अखेर निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहिम विधानसभा मतदार संघातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे निवडणूक लढविणार आहे. विशेष म्हणजे मनसेने आज…

संदीप नाईकांच्या हाती तुतारी; वडील गणेश नाईकांकडे कमळ

शैलेश तवटे नवी मुंबई : यंदाच्या निवडणूकीत ठाणे जिल्ह्यात अजब आणि गजब अशी लढाई पहायला मिळणार आहे. भाजपाचे नेते गणेश नाईक हे एरोलीतून भाजपाच्या कमळावर निवडणूक लढवित असतानाच त्यांच्या मुलाने…

 बनोटी परिसरात मुसळधार

वीज कोसळून दोन ठार, आठ शेळ्या ही ठार सोयगाव- बनोटी परिसरात सोमवारी दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास झालेल्या विजांच्या कडकडाटात…

राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या नेतृत्वपदी अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीसपदी गोविंदराव मोहिते यांची फेरनिवड!          

राजेंद्र साळसकर मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या अध्यक्षपदी आमदार सचिनभाऊ अहिर,तर सरचिटणीसपदी गोविंदराव मोहिते या नेतृत्वाची फेरनिवड झाली आहे.राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या पंचवार्षिक नवनियुक्त संयुक्त प्रतिनिधी मंडळाची सभा मनोहर‌ फाळके सभागृहात पार पडली. या सभेत एकमुखी ठरावाद्वारे अध्यक्ष व सरचिटणीसपदाची घटनेप्रमाणे आणि लोकशाहीप्रणालीनुसार निवडणूक पार पडली. मुंबईत आज आपले अस्तित्व टिकवून असलेल्या (१)टाटा (२)इं.यु.मि.क्र.५,(३)पोद्दार (४)दिग्विजय आणि (५ ) न्यू ग्रेट या गिरण्यांतील कामगारांमधून प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या प्रतिनिधींनी सभेत स्विकृत सदस्यांची निवड केली. निवडून आलेल्यांमध्ये‌‌ महिला प्रतिनिधींचाही समावेश आहे. निवडून आलेले प्रतिनिधी आणि ‌स्विकृत सदस्य यांच्या संयुक्त प्रतिनिधी मंडळाची सभा मनोहर फाळके सभागृहात पार पडली.या सभेत वरील प्रमाणे संघटना नेतृत्वाची निवड करण्यात आली आहे.या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम ११ ते २१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्यात आला होता. निवडणूक प्रमुख‌ म्हणून बजरंग चव्हाण यांनी काम पाहिले. सभेला निवृत्ती देसाई,अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, शिवाजी काळे या माजी पदाधिका-यांची सदस्य म्हणून निवड झाली.नव्या  पदाधिकाऱ्यांच्या  निवडीचे अधिकार अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना सभेत ठरावाद्वारे‌ देण्यात आले होते. लवकरच‌ पदाधिकाऱ्यांची‌‌ निवड रितसर जाहीर करण्यात येईल. नवनियू्क्त अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी सर्व नवनियुक्त प्रतिनिधींचे स्वागत करताना म्हटले‌ आहे, लोकशाहीची थोर परंपरा लाभलेल्या देशाच्या निवडणुकी पासून कामगार चळवळीतील कामगार संघटनांच्या संघटनात्मक निवडणुकीच्या इतिहासाची जेव्हा – जेव्हा चर्चा होईल, तेव्हा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलेले असेल.सन १९९६-९७ पासूनच्या गेल्या २८ वर्षांच्या आपल्या यशस्वी कारकीर्दीचा उल्लेख करून,सचिन अहिर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, केंद्र‌सरकारने चार संसदीय विधेयके संमत केली.त्यामुळे कामगार चळवळीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचेही त्यावेळी भाषण झाले. आभार बजरंग चव्हाण यांनी मानले. ठरावाना‌ अनुमोदन प्रतिनिधी दीपक राणे,नामदेव झेंडे, सुभाष नारकर‌ यांनी केले.महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष राजन‌ लाड, सुनिल अहिर यांनी नव्या नेतृत्वाचे पूष्पगुच्छाने स्वागत केले.राष्ट्रीय‌ मिल‌ मजदूर संघाच्या नव‌नियुक्त नेतृत्वाचे गिरण‌गावात जोरदार स्वागत होत आहे، 0000

महापालिकेच्या सेवानिवृत्तांचा सांस्कृतिक सोहळा उत्साहात साजरा                                                                        

मुंबई :  बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या गोरेगाव विभागातर्फे नुकतेच प्रबोधन क्रीडा भवनातील सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले हाेते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री सुभाष देसाई आणि बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर क्षीरसागर उपस्थित होते. जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शनमधील फरक समजावून सांगून महापालिका कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजनेसाठी प्रयत्नशील असल्याचे देसाई यांनी सभासदांना सांगितले. या वेळी संघटनेच्या नीता मांजरेकर, राजश्री श्रोत्रिय, ललिता भट, संजय भातखंडे, गौरी वंदना, राजन नाईक, अजित कदम यांनी सुमधुर गाणी म्हणत श्रोत्यांचे मनोरंजन केले. आनंद पुरंदरे यांनी कवितांचे वाचन करीत सर्वांना आनंद दिला. या कार्यक्रमासाठी संजय मोरे, बळीराम कदम, ज्ञानदेव कदम, आनंद पुरंदरे, भुवड , बंगेरा, जगदाळे, सुनील माने, पडवळ, स्वरदा दाते,  निलिमा जवंजाळ, प्रबोधन क्रीडा भवनाचे प्रमुख कार्यवाह गोविंद उर्फ विजू गावडे यांचे सहकार्य लाभले.

  युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करतांना माजी आमदार परशुराम उपरकर

 निवडणूक नांदी, पालिकेची चांदी!

 सभा, बॅनर, रॅलीसाठी नाशिक महापालिकेचे दरपत्रक जाहीर हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी महापालिका हद्दीत होणाऱ्या चौक सभा, जाहीर सभांसाठी भाडे निश्चित करून पालिकेच्या विविध विभागाने प्रचारफेऱ्या, सभांसाठीचे झेंडे, बॅनर्सकरिता दरपत्रक (रेटकार्ड) जाहीर केले आहे. प्रचार रॅली, जाहीर सभा, चौकसभा, पथनाट्य, प्रचार वाहन व प्रचार कार्यालयाच्या ठिकाणावर लहान पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे, चिन्ह, मफलर, टोपी आदींकरिता प्रतिदिन प्रतिनग १२ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. अनंत कान्हेरे मैदानासाठी राजकीय पक्षांना एका सभेसाठी ३५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांसाठी यंदाची निवडणूक खर्चिक होणार असली तरी महापालिकेची मात्र चांदी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी २२ ऑक्टोबरपासून प्रशासकीय प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज माघारीनंतर निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार आहे. यंदा दिवाळीनंतरच निवडणुकीचा माहोल तयार होणार असल्याचे चित्र आहे. विधानसभेसाठी राज्यात एकच टप्प्यात मतदान होणार असल्यामुळे राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या सभा, रॅलीवर नियंत्रण राखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार महापालिकेच्या विविध कर विभागाने दरपत्रक निश्चित केले आहे. सदर शुल्क अदा केल्यानंतरच संबंधित राजकीय पक्ष तसेच उमेदवारांना परवानगी मिळू शकणार आहे. या दरपत्रकानुसार चौकसभांकरिता प्रत्येकी २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. खासगी मालमत्ता तसेच प्रचार कार्यालयांच्या ठिकाणी ५० चौरस फुटांपर्यंत कापडी बॅनर्सकरिता प्रतिदिन १५० रुपये, तर १०० चौरस फुटांच्या कापडी बॅनर्सकरिता ३०० रुपये प्रतिदिन शुल्क आकारले जाणार आहे. जाहीर सभा व चौक सभेच्या ठिकाणी १०० चौरस फुटांपर्यंतच्या बॅनर्सकरिता प्रति सभा प्रति नग ३०० रुपये, तर लहान फलकासाठी १५० रुपये प्रति दिन, प्रति नग शुल्क आकारले जाणार आहे. ईदगाह मैदान व राजे संभाजी स्टेडियमवर हेलिपॅड तयार करण्यासाठी एक दिवसाकरिता ७०० रुपये, अधिक १८ टक्के जीएसटी आकारला जाईल. डिजिटलसाठीही मोजा पैसे खासगी जागेतील भित्तिचित्राकरिता सात रुपये प्रतिचौरस फूट मासिक, तर डिजिटल बोर्ड, एलइडी, एलसीडी बॅकलाइट बोर्ड, निऑन बोर्ड, इलेक्ट्रॉनिक, व्हिडीओ डिस्प्ले, लेझर शो व देखाव्यांकरिता ‘अ’ वर्गवारीकरिता ८.४० रुपये प्रतिचौरस फूट मासिक दर असेल. ‘ब’ वर्गाकरिता ६.६० रुपये प्रतिचौरस फूट मासिक दर निश्चित करण्यात आले आहेत. वाहनावरील स्टिकर (अप्रकाशित) करिता प्रतिचौरस फुटास ५.५० रुपये प्रतिदिन, तर प्रकाशितकरिता ६.५० रुपये प्रतिदिन शुल्क आकारले जाईल. बूथसाठी ९०० रुपये दर मतदान केंद्राबाहेर लावल्या जाणाऱ्या ५ बाय ५ चौ. फूट आकारच्या बूथकरिता १५०, तर १० बाय १० आकाराच्या बूथकरिता ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. प्रचार वाहनावरील कापडी बॅनरीकरिता २५० रुपये, तर स्टिकरसाठी ६.५० रुपये प्रतिदिन, प्रतिचौरस फूट दर आकारला जाणार आहे. प्रचाररॅली, जाहीर सभा, चौकसभा, पथनाट्य, प्रचार वाहन व प्रचार कार्यालयाच्या ठिकाणावर लहान पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे, चिन्ह, मफलर, टोपी आदींकरिता प्रति दिन, प्रति नग १२ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. जाहीर सभांकरिता मैदानांचे दर – ईदगाह व अनंत कान्हेरे मैदान : २८,८७५ अधिक १८ टक्के जीएसटी – ३५,००० अनामत – पवननगर मैदान, नवीन नाशिक : ३,८१८ अधिक १८ टक्के जीएसटी – ५,००० अनामत – पाटीलनगर, नवीन नाशिक : ६,९६६ अधिक १८ टक्के जीएसटी – १०,००० अनामत – शिवाजी चौक भाजी मार्केट : ४,९७८ अधिक १८ टक्के जीएसटी – ७,००० अनामत – यशवंत महाराज पटांगण : २,८०० अधिक टक्के जीएसटी – ५,००० अनामत – राजे संभाजी स्टेडियम : २१,९८० अधिक १८ टक्के जीएसटी – २५,००० अनामत – शिखरेवाडी मैदान, नाशिकरोड : १३,२६० अधिक १८ टक्के जीएसटी – २०,००० अनामत – मुक्तिधाममागे शाळा क्रमांक १२५ : ८९५७ अधिक १८ टक्के जीएसटी – १५,००० अनामत – सातपूर क्लब हाऊस मैदान : १८,०८४ अधिक १८ टक्के जीएसटी – २०,००० अनामत ०००००